Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हिंदुत्व आणि असहिष्णुता! - भाग १

D
DEADPOOL
गुरुवार, 03/24/2016 - 10:21
🗣 482 प्रतिसाद
भारतात म्हणे असहिष्णुता वाढीस लागली आहे! जर भारतात असहिष्णुता आहे तर बोंबाबोंब करणाऱ्यानी खालील प्रश्नाची उत्तरे द्यावीत! १.क्षणोक्षणी बाबरीचा उल्लेख करणाऱ्यानी आजपर्यंत प्रत्येक इस्लामिक शासकांनी किती मंदिरे पाडलीत याचा हिशेब द्यावा! २. जर असहिष्णुता वाढली असेल तर हिंदूंचा आराध्य प्रभु श्रीराम याचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करणाऱ्या ओवेसीवर एकाही हिंदूने हल्ला केला का? ३. भारतात ८० कोटी हिंदू आहेत तरीही यू आर अनंतमूर्ती यांचे विधान ऐकून किती हिंदूनी दंगली केल्या? ४. सरकार उजवे आहे व अल्पसंख्यविरोधी आहे तर अजूनपर्यंत अल्पसंख्य आरक्षण का संपवले नाही? ५. दादरी प्रकरनाचा गाजावाजा करतांना तुम्हाला मुम्बईची दंगल आठवत नाही? ६. असहिष्णुता वाढली आहे म्हणून देश सोडून जाऊ म्हणणारे किती लोक देश सोडून गेले ७. देव देवतांची नग्न चित्र काढणारा हुसैन याला आपल्या धर्माच्या प्रेषितची चित्र काढण्याची का बुद्धि सुचली नाही? ८. आणि चार्ली हेब्दो च्या हल्याची तुलना करता हिंदूंनी हुसैनला कोणती शिक्षा दिली? ९. आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न हिंदूंना का पडला नाही? १०. तथाकथित धर्मचिकित्सक व विचारवंत हिंदूधर्माचीच का चिकित्सा करतात? (दुसऱ्या शब्दात का टीका करतात?) अजूनही बरेच प्रश्न आहेत पण त्याबद्दल नंतर!

प्रतिक्रिया द्या
62422 वाचन

💬 प्रतिसाद (482)
क
कापूसकोन्ड्या Fri, 03/25/2016 - 04:25 नवीन
माननिय मिपाकर, सर्वांनी मुस्लिम धर्म स्विकारावा, हा सर्वात उत्तम मार्ग आहे. अत्यंत प्रगत धर्म असलेला तो धर्म आहे.
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 04:45 नवीन
खीक्क्क !
↩ प्रतिसाद: कापूसकोन्ड्या
अ
अत्रे Fri, 03/25/2016 - 04:29 नवीन
पार खिचडी करून टाकली आहे मुद्द्यांची। whatapp फॉरवर्ड होता का? मूळ प्रश्न काय होता? असहिष्णुता वाढत आहे कि नाही याबद्दल, बरोबर? यावर कोणते लेख वाचले आहेत आपण, आणि कोणत्या context मध्ये अशी विधाने केली गेली याची माहिती द्यावी। बाकी प्रश्न निरर्थक आहेत।
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 04:46 नवीन
अत्रे सर तुम्हीच योग्य प्रतिसाद द्या ना! म्हणजे इतरांना मार्गदर्शन मिळेल!
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Fri, 03/25/2016 - 04:46 नवीन
पहिल्या दोन वाक्यातच तर्कदोष आहे। १. असहिष्णुता वाढणे २. असहिष्णुता "असणे" यात फरक आहे। आधी तुमचे मत सांगा - १. भारतात काही प्रमाणात असहिष्णुता आहे की नाही? २. ज्या लोकांचं असं म्हणणं आहे, कि असहिष्णुता वाढलीये, त्यांनी पुरावे काय दिले आहेत (तुमच्या वाचनात आलेले)? ३. या पुराव्यांचे खंडन करा. मग चर्चा करता येईल सविस्तर।
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 05:42 नवीन
भारतात असहिष्णुता नाही!!!!! आणि पुरावा हवा असेल तर अजूनही पाकिस्तानी हिंदू आणि भारतीय मुस्लिम यांची तुलना करून बघा!
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Fri, 03/25/2016 - 07:20 नवीन
एखादी गोष्ट आहे कि नाही यासाठी तुलना करणे हा मार्ग योग्य नाही। "तुमच्या कडे आंबे आहेत का" याचं उत्तर हो किंवा नाही एवढंच असतं। शेजाऱ्याकडे आमराई आहे म्हणून comparatively आमच्याकडे आंबेच नाहीत , असे म्हणण्याला काय अर्थ आहे।
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Sun, 03/27/2016 - 11:47 नवीन
पण काही गोष्टीत तुलना होऊ शकते. उदा हिंदूंवर भारतात झालेले हल्ले व मुस्लिमांवर भारतात झालेले हल्ले! मुस्लिमांवर भारतात झालेले हल्ले व पाकिस्तानात हिंदूंवर झालेले हल्ले!
↩ प्रतिसाद: अत्रे
D
DEADPOOL Sun, 03/27/2016 - 11:47 नवीन
पण काही गोष्टीत तुलना होऊ शकते. उदा हिंदूंवर भारतात झालेले हल्ले व मुस्लिमांवर भारतात झालेले हल्ले! मुस्लिमांवर भारतात झालेले हल्ले व पाकिस्तानात हिंदूंवर झालेले हल्ले!
↩ प्रतिसाद: अत्रे
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 06:55 नवीन
www.dailyo.in/politics/secularism-islam-hindus-religion-persecution-tolerance-muslims-christians-safe-india/story/1/4090.html हा घ्या विदा
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Fri, 03/25/2016 - 05:01 नवीन
अजून एक - एक विधान घ्या. मुंबईत कावळे आहेत. याला disprove करण्यासाठी असे म्हणून चालेल का, कि आमच्या गल्लीत एक पण कावळा मी पाहिला नाही? हे वाक्य सिद्ध करण्यासाठी एक कावळा कुठेही पाहिला तरी sufficient आहे। पण disprove करण्यासाठी पूर्ण मुंबईत कुठेच कावळे नाहीत असे दाखवावे लागेल। तुम्ही असे सांगितले कि ओवेसी वर कोणी हल्ला केला नाही. याने हे सिद्ध होत नाही कि असहिष्णुता नाहीए। त्यासाठी तुम्हाला असे दाखवावे लागेल, कि कोणाही नेत्यावर त्याच्या विधानामुळे आजपर्यंत हल्ला झालेला नाही।
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 05:26 नवीन
कोणत्याही नेत्यांवर ही सार्वत्रिकरण झालं. माझा उल्लेख हिंदू धर्माची बदनामी करणाऱ्या ओवेसीवर होता! आणि जर सर्वच नेत्यांचा उल्लेख करायचा झाला तर धागा कुठल्याकुठे वाहत जाईल! जे तुम्हाला अमान्य आहे!
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Fri, 03/25/2016 - 05:31 नवीन
ठीक आहे, मग तुमचं असं म्हणणं आहे का, कि हिंदू धर्माविरुद्ध बोलणाऱ्या एकाही नेत्यावर (किंवा माणसावर), त्यांच्या बोलण्यामुळे एकही हल्ला झाला नाही?
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 05:40 नवीन
माझा मुद्दा ओवेसिंचा आहे. आणि हल्ले झालेत हे मान्य आहे. पण ९० कोटी जनता जर हिंदू असेल तर हे प्रमाण अत्यल्प आहे. कीम्बहुना अशा वाक्यांमुळे हिंदूंनी लगेच दंगली केल्या नाहीत. असेच पकिस्तानात कोणी हिंदू इस्लामविरोधात बोलला असता तर?
↩ प्रतिसाद: अत्रे
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 05:48 नवीन
आणि हिंदूंविरोधात बोलनार्यावरील हल्ले व इस्लामविरोधात बोलणार्यावरील हल्ले याची तुलना करून बघा! मग सांगा कोण सहिष्णु व कोण असहिष्णु!
↩ प्रतिसाद: DEADPOOL
अ
अत्रे Fri, 03/25/2016 - 06:09 नवीन
तुम्हाला असे सिद्ध करायचे असेल, कि मुस्लिम लोक जास्त असहिष्णू आहेत, तर ते एखाद्यावेळेस सिद्ध करता येईल. त्यासाठी तेवढा अभ्यास/research करावा लागेल। उगाच आपल्याला वाटत आहे म्हणून खरे असलेच पाहिजे असेही नाही. आणि जरी सिद्ध केले, याचा अर्थ असा होत नाही कि १. हिंदू समाजात असहिष्णुता नाही २. भारतीय समाजात असहिष्णुता वाढत आहे ३. हिंदू समाजात असहिष्णुता वाढत आहे
↩ प्रतिसाद: DEADPOOL
अ
अत्रे Fri, 03/25/2016 - 06:10 नवीन
Typo - शेवटच्या दोन वाक्यात आहे ऐवजी नाही असे वाचावे।
↩ प्रतिसाद: अत्रे
म
माहितगार Fri, 03/25/2016 - 06:50 नवीन
बदल करुन वाचल्यास आपलेच "त्यासाठी तेवढा अभ्यास/research करावा लागेल। उगाच आपल्याला वाटत आहे म्हणून खरे असलेच पाहिजे असेही नाही." स्टेटमेंट आपल्याही वाक्यांना लागू होईल हेवेसांनल.
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Fri, 03/25/2016 - 07:21 नवीन
हाहा, ते पण आहेच :)
↩ प्रतिसाद: माहितगार
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 06:33 नवीन
तुम्हाला असे सिद्ध करायचे असेल, कि मुस्लिम लोक जास्त असहिष्णू आहेत, तर ते एखाद्यावेळेस सिद्ध करता येईल. त्यासाठी तेवढा अभ्यास/research करावा लागेल>>>>>>>>>>>>>>>>> त्याचीही गरज नाही, भारताचा इतिहास बघीतल्यावर आपोआप उत्तर मिळेल.
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Fri, 03/25/2016 - 06:46 नवीन
ठीक आहे। मुद्दा असा आहे कि एखादा समाज असहिष्णू आहे कि नाही, हे दुसर्या समाजाशी तुलना करून सांगता येत नाही। तसे करत बसलो तर सगळेच समाज आपापली सहिष्णुता (जी काही बाकी उरलीये) गमावून बसतील। आपल्याला "ideal society" कडे जायचे आहे का "not worse than X" याचा विचार केला पाहीजे, असं मला वाटतं।
↩ प्रतिसाद: DEADPOOL
अ
अत्रे Fri, 03/25/2016 - 06:02 नवीन
जर-तर चा मुद्दा कामाचा नाही।
हल्ले झालेत हे मान्य आहे, पण ९० कोटी जनता जर हिंदू असेल तर हे प्रमाण अत्यल्प आहे.
१. म्हणजे असहिष्णुता बाळगणारे हिंदू अस्तित्वात आहेत। याचा अर्थ काही प्रमाणात असहिष्णुता आहे। 2. भारतात धार्मिक कारणामुळे अनेक दंगली झाल्या आहेत। त्यामुळे कावळ्याच्या उदाहरणात सांगितल्या प्रमाणे अमुक प्रसंगी दंगल झाली नाही याने काहीच सिद्ध होत नाही। २. असहिष्णुतेचा थ्रेशोल्ड काय असायला पाहिजे? लोकसंख्येच्या किती प्रमाणात लोक हिंसक असले म्हणजे समाज असहिष्णू असतो। माझ्या मते थ्रेशोल्ड ०.०००००१% असला पाहिजे। ३. फक्त शारीरिक हिंसा म्हणजे असहिष्णुता का? जर कोणी धमक्या देत असेल (डायरेक्ट किंवा ऑनलाइन - उदा. "याला मारले पाहिजे"), तर त्याचा समावेश असहिष्णुतेमध्ये करावा का? उदाहरण म्हणून लोकसत्ता च्या फेसबुक पेज वरच्या कंमेंट वाचा https://m.facebook.com/story.php?story_fbid=1089392237780072&id=301804346538869
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 06:40 नवीन
म्हणजे कोटीमध्ये १ समाजातील माथेफिरुची संख्या यापेक्षा जास्त असेल. आणि त्या माथेफिरुने हल्ला केला तर संपूर्ण धर्माच असहिष्णु! वा रे वा! लोकसत्तेचे उदाहरण घेतले तर कुबेरानी हिंदूंविषयी अग्रलेख अनेकदा लिहिले तेव्हा माफी मागितली नाही व एक तेरेसाचा लेख लिहिला तर माफी मागून मोकळे!
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Fri, 03/25/2016 - 07:33 नवीन
त्या माथेफिरुने हल्ला केला तर संपूर्ण धर्माच असहिष्णु!
नाही. एवढेच म्हणता येइल की या धर्मातील लोकात "काही प्रमाणात" असहिष्णुता आहे. त्याचबरोबर हल्य्यास किती लोकांचे जाहीर्/खासगी समर्थन आहे ते पहावे लागेल.
एक तेरेसाचा लेख लिहिला तर माफी मागून मोकळे
याचा मी निषेध करतो. लेख मागे घेण्याची काहीच गरज नव्ह्ती.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Tue, 03/29/2016 - 16:42 नवीन
आचार्य मी तुलनेसाठी घटक दिले आहेत वर! त्यांची तुलना करून आपणांस काय वाटते?
↩ प्रतिसाद: अत्रे
म
माहितगार Fri, 03/25/2016 - 05:23 नवीन
विषय चघळला जाऊन चर्चा क्षीण होत असताना, धागा लेखकाने धागा लेख का टाकला ? असहिष्णूतेवर चर्चा खिळवून ठेवणे हा राजकीय ट्रॅप आहे हे मोदींनी त्यांच्या अलिकडील भाषणातून स्पष्ट केले, कदाचित हेच लक्षात घेऊन अडवाणींनी 'भारत माता की जय' घोषणाचा विषय 'नॉन इश्यू' आहे असे दोनच शब्दात सांगत बातमीदारांना पिटाळले. कार्यकर्ता म्हणून तुम्हाला भाजपा सरकारचे समर्थन करावयाचे असेल तर भाजपा सरकारांच्या स्तुत्य उपक्रमांना अधिकाधीक प्रसिद्धी देणे मार्केटींग पॉईट व्ह्यू अधिक यश देऊ शकते. एनी वे तुम्ही धागा टाकलाच आहे तर कोणतीही एक बाजू घेण्याचे आश्वासन न देता उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो पण क्रम उलटा असेल.
१०. तथाकथित धर्मचिकित्सक व विचारवंत हिंदूधर्माचीच का चिकित्सा करतात? (दुसऱ्या शब्दात का टीका करतात?)
माझ्या माहितीनुसार हिंदू धर्मात धर्मचिकित्सा आणि टिका यांना फारमोठे स्थान आहे. -विरोधकांनी केलेल्या टिकेला पुर्वपक्ष संबोधून टिकेला उत्तरपक्षात उत्तर देऊन मुद्दे खोडून काढणे याला शास्त्रार्थ म्हणतता - उलट ते हिंदू धर्माचे बलस्थान आहे. तुमचे धर्म अभिव्यक्ती स्वातंत्र्यात कच्चे आहेत आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यात पक्के आहोत हि अभिमानाने सांगावयाची गोष्ट असावी. १) विचारवंतांच्या टिका जेथे एकांगी असतील तेथे त्या एकांगी असल्याचे निदर्शनास आणत तर्कसुसंगत मांडणी करणे हि समर्थकांची जबाबदारी आहे. २) धागालेखकाने स्वतःच्या भूमिकेवर आतापर्यंत किती टिका केली आहे ? टिकाकारांना तुम्ही स्वतःवर टिकाकरुन घ्या अथवा अमुक गोष्टीवर टिकाकरा असे प्रत्यक्षात म्हणणे कठीण असावे. केवळ दुसर्‍यांनी टिकाकेली म्हणून न रडता दुसर्‍या धर्मांची समतोल चिकित्सा करत टिका करणे हि तुमची स्वतःची जबाबदारी आहे हे लक्षात घेण्याची जरुरी असावी का ?
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 05:36 नवीन
सर्वप्रथम मी विचारवंत नाही अथवा धर्मचिकित्सक नाही. माझा धर्माचा तेवढा अभ्यासही नाही. आपण स्वतः मान्य केलेत की हिंदू धर्मात व्यक्तिस्वातंत्र्याला फार स्थान आहे. पण कधीकधी ते व्यक्तिस्वातंत्र्य अतिरेकीपणाने वापरले जाऊन त्यात द्वेष निर्माण होतो. यासाठी वर यू आर अनंतमूर्ती यांचा उल्लेख केलाच आहे. मिपावर असलेली उदाहरणे म्हणजे १. चिमणा आणि विविध अवतार २. यनावाला- हे देवपूजासुद्धा करू नये असे सांगतात.व तोंडसुख घेतात. आजपर्यंत यांना फक्त हिंदू धर्माच वाईट दिसत आलाय! बाकीच्या धर्माची चिकित्सा हे का करत नाहीत?
↩ प्रतिसाद: माहितगार
अ
अत्रे Fri, 03/25/2016 - 06:23 नवीन
टीका करत नसतील, पण समर्थन तरी कुठे करतात. आणि कोणी टीका कटात नसेल तर दुसऱया लोकांना टीका करायला बंदी आहे का? कोणी कशावर टीका करावी हा व्यक्तिगत प्रश्न आहे, जी कि तीच व्यक्ती सांगू शकते. जर आजूबाजूला बहुसंख्य हिंदू दिसत असतील, तर साहजिक आहे कि त्यांच्या "चुका" जास्त दिसणार.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
म
माहितगार Fri, 03/25/2016 - 06:31 नवीन
पण कधीकधी ते व्यक्तिस्वातंत्र्य अतिरेकीपणाने वापरले जाऊन त्यात द्वेष निर्माण होतो. यासाठी वर यू आर अनंतमूर्ती यांचा उल्लेख केलाच आहे.
तुम्ही "शुभंकरोती कल्याणम,... शत्रुबुद्धी विनाशाय..." कधी ऐकले आहेत हिंदू धर्मात द्वेषाला कुठे स्थान आहे ? द्वेष करताना तुम्ही हिंदू धर्माच्या मुलभूत तत्वांपासून भटकत नाही आहात का ?
२. यनावाला- हे देवपूजासुद्धा करू नये असे सांगतात.व तोंडसुख घेतात. आजपर्यंत यांना फक्त हिंदू धर्माच वाईट दिसत आलाय! बाकीच्या धर्माची चिकित्सा हे का करत नाहीत?
हिंदू धर्माच्या आत राहून देवपूजेवर तोंडसुख घेता येतच त्यासाठी इतर धर्मांवर टिका केलीच पाहीजे नाहीतर देवपूजेवर तोंडसूख घेऊ नये अशी हिंदू धर्माची परंपरा नाही. हिंदू धर्मीय परंपरा विरोधी बाजू मुद्देसुद पणे दाखवण्याची आहे. यनावालांनी बाकी धर्मांची चिकित्सा केली नसेल तर ते एकांगी ठरते यात अंशतः तथ्य आहे म्हणून तुम्ही स्वतः पर धर्मांचा अभ्यासकरून अभ्यासपूर्ण अशा (अक्रस्ताळ्या नव्हे ) काय टिका केल्या हा प्रश्न उरतोच ? ठरवले तर करता येते की मीही पक्क्या हिंदूत्ववाद्यांमध्ये मोडत नाही तरीही जिथे तर्कसुसंगत आहे तिथे परधर्मीय भूमिकांची चिकित्साही केली हिंदू धर्मीय बाजूही मांडली आहेत. पण माझ्या या आणि या धाग्यांवर किती जण आले ? तुम्हालाही यनावालाच दिसतात केवळ यनावालाच दिसणे आणि इतर काही न दिसणे याला काय म्हणावे ? टिकाकारांशी अभ्यासपुर्ण शास्त्रार्थ करा आक्रस्ताळ्या विरोधाने तुमच्या स्वतःच्या भूमिकेचे नुकसान होते, तुमच्या स्वतःच्या मुलभूत भूमिकांना बाधा पोहोचते. आणि तुमच्या विरोधकांना तेच हवे असते. हा विरोधकांचा ट्रॅप असतो या ट्रॅप मधून जेवढ्या लवकर बाहेर पडाल तेवढी तुमची भूमिका सशक्त होईल असे माझे यक्तिगत मत आहे.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 06:58 नवीन
पण कधीकधी ते व्यक्तिस्वातंत्र्य अतिरेकीपणाने वापरले जाऊन त्यात द्वेष निर्माण होतो.>>>>>>> इथे व्यक्तिस्वातंत्र्य अति वापरून हिंदू धर्माचा द्वेष केला गेलाआहे असा अर्थ अभिप्रेत आहे.
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 03/25/2016 - 07:12 नवीन
इथे व्यक्तिस्वातंत्र्य अति वापरून हिंदू धर्माचा द्वेष केला गेलाआहे असा अर्थ अभिप्रेत आहे.
इथे कार्य-कारण संबंधाची गल्लत होते आहे. द्वेषाची निर्मिती त्यांनी काढलेल्या अबकड निष्कर्षामुळे होत असू शकते. त्यासाठी त्यांनी काढलेल्या निष्कर्षातील तार्कीक उणीवांकडे बोट दाखवावयास हवे त्यांचे मुद्दे खोडावयास हवेत. व्यक्तिस्वातंत्र्यावर बंधन घालणे हा उपाय नाही. व्यक्तिस्वातंत्र्यावरच्या बंधनांची मागणी वाढवली की तुम्ही असहिष्णूतेच्या आरोपास पात्र होण्याची शक्यता निर्माण होते हा एक भाग झाला. त्याही पेक्षा हिंदू धर्माची सगळी दारोमदारच व्यक्तिस्वातंत्र्यावर आहे आणि व्यक्तिस्वातंत्र्याच्या मुद्यास ठेच पोहोचवली की तुमच्या स्वतःच्या धार्मीक स्वातंत्र्याच्या तत्वास आधी ठेच पोहोचते त्यामुळे हिदूत्ववाद्यांनी कुणाच्याही व्यक्तिस्वातंत्र्यावर टिका करण्यापुर्वी किमान दहा वेळा तरी विचार करणे हिंदूंच्या स्वतःसाठी महत्वाचे असावे.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
र
राजाभाउ Fri, 03/25/2016 - 06:23 नवीन
चिमणा , यनावाला किंवा कुणीही काय म्हणावे, त्यांची मते काय असावी हे तुमच्या, माझ्या किंवा कुणाच्या हातात नाही. तुम्हाला जर त्यांची मते चुकीची वाटतात तर तुम्हाला ती खोडुन काढण्याचा प्रयत्न केला पाहीजे. त्यांनी इतर धर्मांची पण चिकित्सा करावी आमचीच का वगैरे म्हणण्यात काय अर्थ ? वर माहीतगार पण हेच म्हणत आहेत माझ्या मते.
विचारवंतांच्या टिका जेथे एकांगी असतील तेथे त्या एकांगी असल्याचे निदर्शनास आणत तर्कसुसंगत मांडणी करणे हि समर्थकांची जबाबदारी आहे
↩ प्रतिसाद: माहितगार
इ
इरसाल Fri, 03/25/2016 - 05:45 नवीन
सगळीकडे जर विद्वानच असले तर ते विद्वान आहेत हे कसे सिद्ध होणार मग त्यासाठी स्टँडर्ड म्हणुन एक तरी चिमणीरुपी मुर्ख हवाच ना (काय पण ते ध्यान दिसतं, थो. पाहिलय काय कधी आरशात म्हणा)
म
माहितगार Fri, 03/25/2016 - 06:15 नवीन
९. आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न हिंदूंना का पडला नाही?
१) यात हिंदू असण्याचा काय संबंध ? आमेरीकेचे अथवा फिजीचे नागरीक असलेल्या हिंदूं "भारत माताकी जय" का म्हणतील ते "माता आमेरीका की जय" म्हणतील आणि कदाचित "बाबा आमेरीका की जय " म्हणणार नाहीत. "बाबा आमेरीका की जय " न म्हणता "माता आमेरीका की जय" म्हटल्याने त्यांचे आमेरीका प्रेम कमी होईल का अशा पद्धतीचा युक्तीवाद केला जातो आहे आणि केवळ "बाबा आमेरीका की जय " असेच म्हणा म्हणण्याचा आग्रह त्यांच्या लेखी असहिष्णूता असेल. अशा युक्तीवादास तुमचे उत्तर काय असेल ? बेसिकली चर्चा चघळत ठेवण्याचा ट्रॅप आहे का ? बाबा म्हणा की माता म्हणा की गुलशन म्हणा तुमची तुम्ही नागरीक असलेल्या देशाशी बेसीक लेव्हलची काही रचनात्मक केले नाहीतरी किमान डिस्ट्रक्टीव्ह काही न करण्याची आणि डिस्ट्रक्टीव्ह टेंडंन्सीचे समर्थन न करण्याची कमिटमेंट आहे का ? हा आणि एवढाच प्रश्न असावयास हवा आहे का ? २) "भारत माता की जय ही घोषणा का देतो? " हा प्रश्न पडणारे तुमच्यातच (हिंदूधर्मीयातही) दुर्दैवाने इतके/पुरेसे कनैय्या निपजतात की सर्व हिंदू 'भारत माता की जय' म्हणतात हे सरसकटपणे स्विकारणे कठीण व्हावे. तुमचे वाक्य "आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न बहुसंख्य भारतीयांना का पडला नाही? " असे लिहिल्यास विरुद्ध बाजू डिफेन्सीव्हवर जाते पण जिथेतिथे हिंदूत्व सिद्धकरण्याच्या घाईत घोटाळा होत असेल का. ३) वंदे मातरम अथवा भारत माता की जय यांचा हिंदूत्ववादाशी संबंध लावण्याच्या आग्रहातली अथवा शिर्क ठरवण्याच्या तर्कातली (दुसर्‍या बाजूची) तर्कविसंगती मी दुसर्‍या धागा लेखातील या प्रतिसादां मधून खोडून काढली आहे. तेव्हा त्याची या प्रतिसादात पुर्नौक्ती करणे तुर्तास टाळतो.
अ
अत्रे Fri, 03/25/2016 - 06:29 नवीन
The requested page "/node/www.misalpav.com/comment/818409" could not be found.
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 03/25/2016 - 06:35 नवीन
http://www.misalpav.com/comment/818409#comment-818409 आणि त्यानंतरचे उपप्रतिसादातील चर्चा
↩ प्रतिसाद: अत्रे
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 06:44 नवीन
इथे अमेरिका व फीजीचा प्रश्न येतोच कुठे? धागा भारतातल्या असहिष्णुतेवर आहे!
↩ प्रतिसाद: माहितगार
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 07:11 नवीन
"भारत माता की जय ही घोषणा का देतो? " हा प्रश्न पडणारे तुमच्यातच (हिंदूधर्मीयातही) दुर्दैवाने इतके/पुरेसे कनै य्या निपजतात की सर्व हिंदू 'भारत माता की जय' म्हणतात हे सरसकटपणे स्विकारणे कठीण व्हावे. >>>>>>>> कण्हैयाने आपण हिंदू अथवा हिंदुत्ववादी असल्याचा कुठेही उल्लेख केला नाही! तो डाव्या विचारांचा आहे! मात्र ओवेसी गावभर आपण मुस्लिम असल्याचा प्रचार करत हिंडत असतो!
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 03/25/2016 - 07:14 नवीन
वस्तुस्थिती कुठे बदलते आहे ?
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 06:45 नवीन
आणि भारत माता की जय यावर आक्षेप असण्याचे कारण काय?
म
माहितगार Fri, 03/25/2016 - 06:55 नवीन
इथे विरुद्ध बाजूच्या भुमिकेचा आपला अभ्यास कमी पडत असण्याची शक्यता असू शकते का ? त्या शिवाय आमेरीका आणि फिजीची केलेली काल्पनीक तुलनाही आपल्याला लक्षात येणार नाही.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 06:47 नवीन
उद्या उठून भारतातील यमुना गंगा या हिंदूंच्या पवित्र नद्या आहेत असे म्हणून कुणी मी राष्ट्रगित म्हणणार नाही हे चालेल का?
म
माहितगार Fri, 03/25/2016 - 07:03 नवीन
:) हा कसा तर्कसुसंगत मुद्दा आला याला जरा अजून एक्स्टेंड करुन तुमच्या इश्वराचे नाव हिंदूसाठीही पवित्र असेल तर तुम्ही तुमच्या इश्वराच्या नावाचा जयजयकार करणे सोडाल का ? एखादी गोष्ट हिंदूंसाठी पवित्र आहे म्हणून नाकारणे हा नकारात्म्क भाग झाला हिंदू हाताला पवित्र मानतात म्हणून तुम्ही तुमचे हात वापरणार नाही का ? हिंदू कपडे घालण्यास पवित्र मनतात पुढे ..?
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 07:06 नवीन
आता तुम्हीच एक्सटेंड करा. मोबाईलवर टायपिंग करून वाट लागली माझी! ;)
↩ प्रतिसाद: माहितगार
अ
अत्रे Fri, 03/25/2016 - 07:44 नवीन
हे चालेल का?
कोणाला राष्ट्रगीत म्हणायचे नसेल तर ते खेदजनकच आहे . पण आपल्याला तसे करायचेही स्वातंत्र्य आहे, त्यामुळे चालेल का याचं उत्तर "हो" असं द्यावं लगेल. फार फार तर त्या व्यक्तीशी चर्चा करणे एवढेच आपल्या हातात आहे . समजा तुम्ही फेसबुक वर स्टेटस टाकला - सगळ्यांनी माझ्या status वर "भारतमाता की जय" अशी comment करा. आणि फक्त १० लोकांनी ती केली, तर बाकीच्या लोकांना तुम्ही काय कराल?
↩ प्रतिसाद: DEADPOOL
म
माहितगार Fri, 03/25/2016 - 07:51 नवीन
फार फार तर त्या व्यक्तीशी चर्चा करणे एवढेच आपल्या हातात आहे .
चर्चा शब्दाच्या आधी 'तर्कसुसंगत' हा शब्द तेवढा जोडण्याचे सुचवतो
↩ प्रतिसाद: अत्रे
D
DEADPOOL Tue, 03/29/2016 - 16:47 नवीन
बरं मग गंगा ही हिंदूंची मैया आहे तर आता ओवेसीनी तिचे पानी पीने बंद केले पाहिजे!
↩ प्रतिसाद: अत्रे
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 07:04 नवीन
हिंदू धर्माच्या आत राहून देवपूजेवर तोंडसुख घेता येतच त्यासाठी इतर धर्मांवर टिका केलीच पाहीजे नाहीतर देवपूजेवर तोंडसूख घेऊ नये अशी हिंदू धर्माची परंपरा नाही. उद्या कोणी चर्चमधून मेन्बत्ती लावण्यावर तोंडसुख घेतले त्याचेही समर्थन कराल कारण मेन्बत्ती लावण्यावर तोंडसूख घेऊ नये अशी ख्रिस्ती धर्माची परंपरा नाही. परवा कुराणातील पाने फाड़ली तर त्याचे समर्थन कारण पाने फाड़न्यावर तोंडसूख घेऊ नये अशी इस्लामिक धर्माची परंपरा नाही.
म
माहितगार Fri, 03/25/2016 - 07:21 नवीन
कोणत्याही म्हणजे अगदी कोणत्याही तोंडसुखाला तर्कसुसंगत उत्तरपक्ष मांडणे हाच उपाय असू शकतो व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी नव्हेच आणि खासकरुन व्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेपीत हिंदूधर्मीयाम्चेच अधिक नुकसान असल्यामुळे त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्याच्या गळचेपी करण्याच्या मागण्या टाळणे उलटपक्षी व्यक्तिस्वातंत्र्याचा डांगोरा पिटणे हे हिंदू धर्मीयांच्या स्वतःसाठी महत्वाचे असावे.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
न
नाना स्कॉच Fri, 03/25/2016 - 07:43 नवीन
प्रश्न थेट आहेत अन त्याला काही थेट उत्तरे प्रतिप्रश्न सुद्धा आहेत (आमच्या डोक्यात) फ़क्त धागा लेखक मुद्द्यावर बोलतील ह्याची गारंटी असली तर बोलून उपयोग! नाहीतर ज़रा अपचन झाले की समोरच्या आयडी च ओरिजिनालिटी ते अस्तित्व खंगाळत बसणे होणार असेल तर बोलून उपयोग नाही!!. अशी हमी अन निकोप चर्चेचा विश्वास मिळाला तर बरेच काही बोलता येईल!! तोवर आमचा पास! :)
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा