Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हिंदुत्व आणि असहिष्णुता! - भाग १

D
DEADPOOL
गुरुवार, 03/24/2016 - 10:21
🗣 482 प्रतिसाद
भारतात म्हणे असहिष्णुता वाढीस लागली आहे! जर भारतात असहिष्णुता आहे तर बोंबाबोंब करणाऱ्यानी खालील प्रश्नाची उत्तरे द्यावीत! १.क्षणोक्षणी बाबरीचा उल्लेख करणाऱ्यानी आजपर्यंत प्रत्येक इस्लामिक शासकांनी किती मंदिरे पाडलीत याचा हिशेब द्यावा! २. जर असहिष्णुता वाढली असेल तर हिंदूंचा आराध्य प्रभु श्रीराम याचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करणाऱ्या ओवेसीवर एकाही हिंदूने हल्ला केला का? ३. भारतात ८० कोटी हिंदू आहेत तरीही यू आर अनंतमूर्ती यांचे विधान ऐकून किती हिंदूनी दंगली केल्या? ४. सरकार उजवे आहे व अल्पसंख्यविरोधी आहे तर अजूनपर्यंत अल्पसंख्य आरक्षण का संपवले नाही? ५. दादरी प्रकरनाचा गाजावाजा करतांना तुम्हाला मुम्बईची दंगल आठवत नाही? ६. असहिष्णुता वाढली आहे म्हणून देश सोडून जाऊ म्हणणारे किती लोक देश सोडून गेले ७. देव देवतांची नग्न चित्र काढणारा हुसैन याला आपल्या धर्माच्या प्रेषितची चित्र काढण्याची का बुद्धि सुचली नाही? ८. आणि चार्ली हेब्दो च्या हल्याची तुलना करता हिंदूंनी हुसैनला कोणती शिक्षा दिली? ९. आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न हिंदूंना का पडला नाही? १०. तथाकथित धर्मचिकित्सक व विचारवंत हिंदूधर्माचीच का चिकित्सा करतात? (दुसऱ्या शब्दात का टीका करतात?) अजूनही बरेच प्रश्न आहेत पण त्याबद्दल नंतर!

प्रतिक्रिया द्या
62422 वाचन

💬 प्रतिसाद (482)
अ
अत्रे Sat, 03/26/2016 - 07:28 नवीन
प्रतिसाद आवडला! इथे लाईक ची system असली असती तर केले असते.
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
म
माहितगार Fri, 03/25/2016 - 08:11 नवीन
५. दादरी प्रकरनाचा गाजावाजा करतांना तुम्हाला मुम्बईची दंगल आठवत नाही?
एकांगी भूमिकांकडे निर्देश करण्यात वावगे नसावे तेव्हाच, कोणत्याही एका चुकीने दुसर्‍या चुकीचे समर्थन होत नाही हेही लक्षात घ्यावयास हवे. सामाजिक सौहार्द आणि सहिष्णू वातावरणासाठी वस्तुतः Truth and reconciliation commission सारखी व्यवस्थेची गरज मी माझ्या मागच्या एका धागा लेखातून मांडली आहे तीचा पुर्नौल्लेख करतो.
म
माहितगार Fri, 03/25/2016 - 08:15 नवीन
४. सरकार उजवे आहे व अल्पसंख्यविरोधी आहे तर अजूनपर्यंत अल्पसंख्य आरक्षण का संपवले नाही?
सकारात्मक कृती अफर्मेटीव्ह अ‍ॅक्शनचा भाग म्हणून आरक्षणाचे तर्कसुसंगत समर्थ जिथपर्यंत होते तिथपर्यंत ठिकच अन्यथा हे काँग्रेसी लांगूलचालन ठरते पण मुख्य म्हणजे या मुद्द्याचा असहीष्णूतेच्या मुद्द्याशी खूप सरळ संबंध नाही. एखादी गोष्ट तर्कसुसंगत नाही म्हणून केली नाही अथवा थांबवली तरी त्यानेही कुणी असहीष्णू आहे असे ठरत नसावे. आणि लांगूलचालन अथवा लोकानुनय करणारे अधिक सहिष्णू असतात असेही नसावे.
प
पक्षी Fri, 03/25/2016 - 08:27 नवीन
बिच्चार्या मुस्लिम लोकांवर खूपच अन्याय होतो. दुसर्या महायुद्धात जू लोकांवर झाला नसेल इतका अन्याय गरीब, सहिष्णू, सज्जन,सचोटीने वागणाऱ्या मुस्लीमानावर अन्याय झाला आहे. आणि महत्वाचा मुद्दा असा आहे कि गरीब बिचारे कुठलाच प्रतिकार करत नाही. आज मुस्लिम विरुद्ध rest of the world अशी परिस्थिती आहे. अगदी सर्व स्थरातून आणि देशातून ह्यांच्यावर अन्याय होतो. खूपच दया येते ह्यांच्या पापभिरू आणि शांत स्वभावाची.....
म
माहितगार Fri, 03/25/2016 - 08:33 नवीन
२. जर असहिष्णुता वाढली असेल तर हिंदूंचा आराध्य प्रभु श्रीराम याचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करणाऱ्या ओवेसीवर एकाही हिंदूने हल्ला केला का? ३. भारतात ८० कोटी हिंदू आहेत तरीही यू आर अनंतमूर्ती यांचे विधान ऐकून किती हिंदूनी दंगली केल्या?
इथे तुम्ही हिंदूंच्या स्थितप्रज्ञतेच्या आदर्शांचा उल्लेख केलात तर सहिष्णूतेचे क्रेडीट तुम्हाला नक्कीच मिळते पण या दोन्ही वाक्यांचा निट तपासले तर संबंधीत तोंडसूखांना मुद्देवार अभ्यासपूर्ण खोडणे यातून पुढे येत नाही आम्हाला राग आलेला आहे पण आम्ही तो गिळून शांत आहोत अशी वाली भूमिका आहे. मुद्देसूद पणे खोडले की झाले मनात राग ठेऊन काय साध्य होते ? किमान पक्षी स्थितप्रज्ञतेच्या भूमिकेला धक्का पोहोचतो. मुख्य म्हणजे मानव हा स्खलनशील आहे, तुमचा-किंवा कोणताही धर्म कितीही केव्हा ग्रेट असो त्यातील एखादी व्यक्ती पथभ्रष्ट होणारच नाही उद्या अनंतमुर्ती अथवा ओवेसीवर राग आला म्हणून काही बाही करणारच नाही याची गॅरंटी देणेही अवघड होते पण एखादी व्यक्ती पथभ्रष्ट झाली तरीही सर्व हिंदू धर्मीय असहीष्णू आहेत असा निष्कर्ष कुणी काढणेही घाईचे असावे.
म
माहितगार Fri, 03/25/2016 - 08:36 नवीन
१.क्षणोक्षणी बाबरीचा उल्लेख करणाऱ्यानी आजपर्यंत प्रत्येक इस्लामिक शासकांनी किती मंदिरे पाडलीत याचा हिशेब द्यावा!
अपवादावरुन नियम सिद्ध करण्याचे अट्टाहास नसतीलतर, तौलनिक दृष्ट्या ढोबळ मानाने हिंदू धर्मीय तत्वज्ञान आणि हिंदू धर्मीय अधिक सहिष्णू आहेत हे मान्यच. अर्थात त्याच वेळी एका चुकीने दुसर्‍या चुकीचे समर्थन होते असेही नसावे.
H
hmangeshrao Fri, 03/25/2016 - 11:03 नवीन
आमचा खापरपणजोबा हिंदू राजे व सरदार याना ट्याक्स देत होता... त्यामोबदल्यात आमचे रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य होते. त्ञामुळे मुस्लिम / इंग्रजांच्याबद्दल जाब हिंदु राजे व सरदाराना विचारायला हवा , असे आमचे मत आहे. आम्ही मोघलाना इंग्रजाना याबाबतीत पूर्ण निर्दोष मानतो.
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 03/25/2016 - 11:20 नवीन
;) आपल्या उपहासाची दखल घेत मुद्दा अंशतः आणि केवळ अंशतः मान्य करतो. राजा कोणताही असो कनिष्ठ अथवा वरीष्ठ तो जनहीतास बांधील असतो. टॅक्स कुणाच्या हातात दिला त्याने मुख्य शासनकर्त्याची जबाबदारी संपत नसावी असेच तुम्हालाही मनातून वाटत असावे. आपला मुद्दा अंशतः स्विकारला गेल्याने मनात आनंदाची उकळी फुटली असेल तर अवश्य फुटू द्या चर्चेतून कधी कधी आनंद मिळणे चांगली गोष्ट असते. आपल्या स्मित हस्यासाठी शुभेच्छा :)
↩ प्रतिसाद: hmangeshrao
न
नेत्रेश Fri, 03/25/2016 - 08:53 नवीन
हबीनण्डन
त
तर्राट जोकर Fri, 03/25/2016 - 08:56 नवीन
आपले माननीय पंतप्रधान खुद्द म्हणालेत इस्लाम हा शांततेचा धर्म आहे म्हणून. आता बोला?
च
चेक आणि मेट Fri, 03/25/2016 - 09:04 नवीन
काय गंमत पहा,शेवटी चर्चेमध्ये मोदी आलेच.
श
श्री गावसेना प्रमुख Fri, 03/25/2016 - 09:40 नवीन
मोदी नव्हे पंतप्रधान म्हणाले ते!
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
च
चेक आणि मेट Fri, 03/25/2016 - 09:42 नवीन
अर्ररर असं झालं व्हयं मग चालू दे:'(
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
श
श्री गावसेना प्रमुख Fri, 03/25/2016 - 09:51 नवीन
ह्यांनी हीच प्रतिक्रिया गॅरी शोमन ह्यांच्या धाग्यावर दिलेली आहे!
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
प
पक्षी Fri, 03/25/2016 - 11:12 नवीन
मोदिफोबिया...
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
H
hmangeshrao Fri, 03/25/2016 - 11:07 नवीन
आमचा खापरपणजोबा हिंदू राजे व सरदार याना ट्याक्स देत होता... त्यामोबदल्यात आमचे रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य होते. त्ञामुळे मुस्लिम / इंग्रजांच्याबद्दल जाब हिंदु राजे व सरदाराना विचारायला हवा , असे आमचे मत आहे.आम्ही मोघलाना इंग्रजाना याबाबतीत पूर्ण निर्दोष मानतो. जर आमचे रक्षण याना करायचे नव्हते तर त्या पदाव बसुन आमच्या खापरपणजोबाकडुन मुजरे का घेत होते ?
म
माहितगार Fri, 03/25/2016 - 11:25 नवीन
;) आपल्या उपहासाची दखल घेत मुद्दा अंशतः आणि केवळ अंशतः मान्य करतो. राजा कोणताही असो कनिष्ठ अथवा वरीष्ठ तो जनहीतास बांधील असतो. टॅक्स कुणाच्या हातात दिला त्याने मुख्य शासनकर्त्याची जबाबदारी संपत नसावी असेच तुम्हालाही मनातून वाटत असावे. आपला मुद्दा अंशतः स्विकारला गेल्याने मनात आनंदाची उकळी फुटली असेल तर अवश्य फुटू द्या चर्चेतून कधी कधी आनंद मिळणे चांगली गोष्ट असते. आपल्या स्मित हस्यासाठी शुभेच्छा :)
↩ प्रतिसाद: hmangeshrao
H
hmangeshrao Fri, 03/25/2016 - 13:54 नवीन
हिंदु राजानी ट्याक्स घेतला. तरीही ते बघत राहिले / युद्ध करुनही हरले. मग इतरानी राज्यविस्तार करुन राज्यकारभार ताब्यात घेउन आमच्या खापरपणजोबाकडुन त्यानीही पैकं घेतलं . खापर कुणावर फोडायचं ? फक्त परदेशी लोकांवर ?
↩ प्रतिसाद: माहितगार
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 13:59 नवीन
आमचा खापरपणजोबा हिंदू राजे व सरदार याना ट्याक्स देत होता... >>>>>>>>> पावती दाखवा!
↩ प्रतिसाद: hmangeshrao
H
hmangeshrao Fri, 03/25/2016 - 14:12 नवीन
समजा नसला ट्याक्स देत , तरीही राजाचे / सरदारांचे देशरक्षण हे कर्तव्य ठरतेच ना ?
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 14:18 नवीन
आपणच अत्यंत ठळक अक्षरात सांगितले आहे की ते टेक्स् भरत होते. आधी पावती दाखवा. समजा नसला ट्याक्स देत , तरीही राजाचे / सरदारांचे देशरक्षण हे कर्तव्य ठरतेच ना ?>>>>>>>> ते भारताचे नागरिक होते याचा विदा अथवा पुरावा द्या! अवांतर : माझ्याकडे आमच्या सहा पिढ्या भारताच्या नागरिक होत्या याचे पुरावे आहेत. + सारा भरल्याच्या कागदपत्रसहित!
↩ प्रतिसाद: hmangeshrao
H
hmangeshrao Fri, 03/25/2016 - 14:32 नवीन
अ आणि ब याना क हे पोर झाले ... जर अ आणि ब हे भारताचे नागरिक असतील तर क हा आपोआपच नागरिक ठरतो. ... आता हेच तत्व उलट फिरवा. क हा भारताचा नागरिक असेल तर त्याचा किमान एक पालक भारतीय असतोच. ..... मी भारताचा नागरिक आहे. .... युक्तिवाद समाप्त!
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 14:52 नवीन
अ आणि ब हे भारताचे नागरिक असल्याचा पुरावा द्या!
↩ प्रतिसाद: hmangeshrao
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 14:53 नवीन
आणि टेक्स खापरपणजोबा भरत होते, अ आणि ब नाही!
↩ प्रतिसाद: DEADPOOL
H
hmangeshrao Fri, 03/25/2016 - 14:57 नवीन
ट्याक्सचा संबंधच नाय हो ! देशाचे रक्षण हे राजा / सरदार यांचे कर्तव्यच होते ना ? मनुस्मृतीच्या भाषेत , क्षत्रियांचे कर्तव्य !
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 15:08 नवीन
टॅक्स चा विषय कोणी काढला? जर पुरावा देता येत नसेल तर आपले बेजबाबदार विधान मागे घ्या! मनुस्मृतीच्या भाषेत , क्षत्रियांचे कर्तव्य ! >>>>>>>> याचाच अर्थ आपण मनुस्म्रुती मानता हा घ्यायचा का? देशाचे रक्षण हे राजा / सरदार यांचे कर्तव्यच होते ना ?>>>>>>> पण आपण जर त्या देशाचे नागरिक असाल तरच हा मुद्दा लागू होतो. अ आणि ब च्या पुराव्यांचा प्रतिक्षेत!
↩ प्रतिसाद: hmangeshrao
भ
भंकस बाबा Sat, 03/26/2016 - 03:54 नवीन
मी तर समजत होतो तुम्ही इराण,इराक,सऊदी चे नागरिक आहात. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जा, सुखी होंणे शक्य नाही.उगाच्च खुसपट काढत रहाने हां तुमचा स्थायीभाव झालेला आहे. असो, पण एक इशारा,इथे करता तसे इस्लामिक देशात जाऊन करु नका, म्हणजे अल्पसंख्यक लोकांची तळी उचलणे, लय मारतात हो तिथे! आणि काहीतरी ईशनिंदा कायदा अस् गोंडस नाव पण देतात. बाकी मार खाल्यावर मलम लावायला इथेच याल हो तुम्ही!
↩ प्रतिसाद: hmangeshrao
इ
इरसाल Fri, 03/25/2016 - 12:43 नवीन
पिज्जा हट मधे जसं प्रत्येक पिज्जापुढे १ लाल मिरची, २ लाल मिरच्या, ३ लाल मिरच्यांचे चित्र काढलेले असते जेणेकरुन कोणता जास्त तिखट (मराठीत -स्पायसी)त्यानुसार मागणी करता येते. तर ईथे येणार्‍या धाग्याच्या कंटेंटनुसार तिथे अश्या लाल मिरच्यांचे चित्र लेखाच्या नावा आधी लावावे. लोकांना लेखाचे पोटेंशियल समजण्यास मदत होईल.
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 14:20 नवीन
इथे किती मिरच्या लावव्यात? ;)
↩ प्रतिसाद: इरसाल
म
मितभाषी Fri, 03/25/2016 - 17:54 नवीन
लिंबू मिरच्या टांगा. धाग्याला दिष्ट लागायला नको.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
उ
उगा काहितरीच Fri, 03/25/2016 - 18:29 नवीन
धाग्याला दृष्ट लागलीच होती. ४ तासात एकही प्रतिक्रिया आली नव्हती . ते तर माझा पायगुण चांगला आहे मी प्रतिक्रिया दिली आणी सेंचुरी झाली बघा.
↩ प्रतिसाद: मितभाषी
त
तर्राट जोकर Fri, 03/25/2016 - 18:45 नवीन
धन्यवाद. असेच येत र्‍हावा. अजून मालिका बाकी है. ;-)
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 20:20 नवीन
उ का यांस ________/\_________
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 20:18 नवीन
टांगली असती, पण तुम्ही लगेच अंधश्रद्धा निर्मूलनवाले सोडाल आमच्यावर!
↩ प्रतिसाद: मितभाषी
म
मितभाषी Fri, 03/25/2016 - 20:40 नवीन
बुध्दीभेद करून एकमेकात भांडणं लावून परस्पर दोघांनाही संपवणारे वायले. आम्ही कोणावर कोणाला सोडत नाही, स्वत: भिडतो.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 20:48 नवीन
शांत गदाधारी भीम शांत! उपरोध होता तो! आणि भिडायला तर आम्हीही सदैव तयार असतो.फक्त पुढचा तयारीचा हवा! नाहीतर बेण एका फटक्यात वर जायचं! (हाही विनोदनिर्मितीचा प्रयत्न समाजावा)
↩ प्रतिसाद: मितभाषी
इ
इरसाल Sat, 03/26/2016 - 10:18 नवीन
ईथे पोतं टांगाव लागेल.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
ट
ट्रेड मार्क Fri, 03/25/2016 - 15:43 नवीन
कोणाच्या नाकाला किती मिरच्या झोंबतील हे आधीच कसं ठरवणार?
↩ प्रतिसाद: इरसाल
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 15:50 नवीन
बरोबर बोलले ट्रेड मार्कशेठ
त
तर्राट जोकर Sat, 03/26/2016 - 15:39 नवीन
बातमी रोचक आहे. देशात काय स्थिती आहे ह्याबद्दल अधिक काय बोलणे. Image removed.
त
तर्राट जोकर Sat, 03/26/2016 - 15:49 नवीन
दुसरीकडे दिल्लीतील विकासपुरीत झालेल्या डॉ. नारंग ह्यांच्या अमानुष आणि निंदनीय हत्येचा काही फेसबुक संप्रदाय घातक पद्धतीने प्रचार करत आहेत. नारंग कुटुंबियांसाठी हा मोठा आघात असला तरी प्रस्तुत हत्येला कोणताही धार्मिक रंग नव्हता. पोलिसांनी पकडलेल्या मारेकर्‍यांमधे काही मुले हिंदूही आहेत. साध्याशा भांडणातून हत्या करण्याचा हा प्रकार होता. तरी ज्याप्रकारे फेसबुकवर ह्याला धार्मिक रंग देऊन भडकवणे सुरु आहे ते जास्त चिंताजनक आहे. खुद्द नारंग कुटूंबियांनी ह्या प्रेतावरचे लोणी खाण्याच्या पद्धतीबद्दल आक्षेप नोंदवला असला तरी संबंधित लोक शुद्धीवर यायला तयार नाहीत.
श
श्री गावसेना प्रमुख Sat, 03/26/2016 - 16:08 नवीन
बरं आहे हेच अखलाक च्या बाबतीत झालेलं होत तेव्हा कोणता संप्रदाय होता बीफ होत म्हणून हत्या झाली म्हणायला।अखिलेश सरकार ने अखलाक ला बीफ वरून नाही तर वैयक्तिक भांडणावरून मारले असा रिपोर्ट सेंट्रल गवर्मेंट ला दिला होता।तेव्हा तर झाडून सारे फेकुलर शिमगा करीत होते मोदींच्या नावाने।
त
तर्राट जोकर Sat, 03/26/2016 - 16:51 नवीन
सत्य बेमालूम कसे दाबावे ह्याचा हा प्रतिसाद हा पुरावा. जरा टाइमलाइन सांगता का अखलाक मर्डर केसची. दुधकादुध होउन जाइल.
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
D
DEADPOOL Sun, 03/27/2016 - 03:21 नवीन
जरा आपण विदा देतात का? आपण बोलाल ते परमसत्य आणि बाकीचे बोलतील ते असत्य?
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
D
DEADPOOL Sun, 03/27/2016 - 03:25 नवीन
आणि उद्या ट्रम्प निवडून आला आणि त्याच सुमारास एखाद्या मुस्लिमांची भारतात हत्या झाली तरीही तुम्ही तीच टाइमलाइन जोडाल!
↩ प्रतिसाद: DEADPOOL
त
तर्राट जोकर Sun, 03/27/2016 - 08:59 नवीन
हा हा हा. अखलाक मर्डर केसची टाइमलाईन जालावर सर्वत्र उपलब्ध आहे. काय झाले कसे झाले सगळे साग्रसंगित उपलब्ध आहे. मी कशाला काय बोलू. हे प्रमुख म्हणतायत बीफवरुन नाही मारले त्याला. वैयक्तिक भांडणाचा बदला धार्मिक षडयंत्र रचून केला गेला, मंदिराच्या भोंग्यावरुन अनाउन्समेंट करुन लोक बोलावल्या गेले, इतर अनेक तप्शील मिळतील तुम्हाला. गोमांसाचे कारण देऊन खून केला. बरेच अ‍ॅन्गल आहेत. पण बीफवरुन मारले नाही हे खोटे आहे. यु कॅन चेक फॉर योर्सेल्फ. खोटं असेल तर सांगा इथे. म्हणून म्हटलं तुम्हीच टाइमलाईन द्या.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
च
चेक आणि मेट Sat, 03/26/2016 - 16:54 नवीन
इथेही तोच प्रतिसाद देतो "काही लोकं लंगडी बाजूसुद्धा किती हिरारीने मांडत आहेत,हे पाहुन अंमळ गंमत वाटली." हिंदू हा मुसलमानांपेक्षा सहिष्णु आहे,आणि यात शंका असण्याचं कारणच नाही,आणि हे मुसलमानांची बाजू मांडणार्यांनादेखील माहित आहे.
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/26/2016 - 18:29 नवीन
एक साधा प्रश्न-- असहिष्णुता वाढली आहे वगैरे बोंब गेले अनेक महिने मारली जात आहे. दिल्लीचे युगपुरूष मुख्यमंत्री पंतप्रधानांना सायकोपाथ वगैरे म्हणून मुख्यमंत्री या महत्वाच्या पदाची गरिमा कमी करतात हे सगळे चालते. मोदी सरकार आल्यानंतर जर का खरोखरच असहिष्णुता अचानक वाढली असती तर या पध्दतीने सतत बोंब मारायची परवानगी असती का? आणि असहिष्णुता वाढली आहे अशी बोंब मारणारे डावे लोक मात्र त्यांच्या विचारसरणीच्या सत्तेत पक्षाविरूध्द काही बोलणे म्हणजे एकतर गोळी खाणे नाहीतर गुलागमध्ये पाठविणे असेच परिणाम असायचे त्याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करतात. खरी असहिष्णुता बघायची असेल तर गुलागमध्ये जाऊन बघा. अर्थातच भारतीय समाज सहिष्णु वगैरे भ्रमात मी अजिबात नाही. आपण जितका दावा करतो तितके सहिष्णु अजिबात नाही.पण ही असहिष्णुता गेली कित्येक शतकांपासून आहे. पण हे मध्याच्या डावीकडचे आणि केजरूके गुलाम असे चित्र उभे करत आहेत की पूर्वी सर्वकाही आलबेल होते आणि १६ मे २०१४ पासून असहिष्णुता एकाएकी वाढली आहे. या ढोंगी प्रचाराला मात्र प्रखर विरोध आहे.
म
मितभाषी Sat, 03/26/2016 - 19:36 नवीन
२०० पार झाल्याबद्दल.
D
DEADPOOL Sun, 03/27/2016 - 03:26 नवीन
धँस तोंडघशी!!!
↩ प्रतिसाद: मितभाषी
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा