हिंदुत्व आणि असहिष्णुता! - भाग १
भारतात म्हणे असहिष्णुता वाढीस लागली आहे!
जर भारतात असहिष्णुता आहे तर बोंबाबोंब करणाऱ्यानी खालील प्रश्नाची उत्तरे द्यावीत!
१.क्षणोक्षणी बाबरीचा उल्लेख करणाऱ्यानी आजपर्यंत प्रत्येक इस्लामिक शासकांनी किती मंदिरे पाडलीत याचा हिशेब द्यावा!
२. जर असहिष्णुता वाढली असेल तर हिंदूंचा आराध्य प्रभु श्रीराम याचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करणाऱ्या ओवेसीवर एकाही हिंदूने हल्ला केला का?
३. भारतात ८० कोटी हिंदू आहेत तरीही यू आर अनंतमूर्ती यांचे विधान ऐकून किती हिंदूनी दंगली केल्या?
४. सरकार उजवे आहे व अल्पसंख्यविरोधी आहे तर अजूनपर्यंत अल्पसंख्य आरक्षण का संपवले नाही?
५. दादरी प्रकरनाचा गाजावाजा करतांना तुम्हाला मुम्बईची दंगल आठवत नाही?
६. असहिष्णुता वाढली आहे म्हणून देश सोडून जाऊ म्हणणारे किती लोक देश सोडून गेले
७. देव देवतांची नग्न चित्र काढणारा हुसैन याला आपल्या धर्माच्या प्रेषितची चित्र काढण्याची का बुद्धि सुचली नाही?
८. आणि चार्ली हेब्दो च्या हल्याची तुलना करता हिंदूंनी हुसैनला कोणती शिक्षा दिली?
९. आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न हिंदूंना का पडला नाही?
१०. तथाकथित धर्मचिकित्सक व विचारवंत हिंदूधर्माचीच का चिकित्सा करतात? (दुसऱ्या शब्दात का टीका करतात?)
अजूनही बरेच प्रश्न आहेत पण त्याबद्दल नंतर!
💬 प्रतिसाद
(482)
त
तर्राट जोकर
Sun, 04/03/2016 - 08:52
नवीन
बरं, तुम्ही आहात अतिशाहाणे तेवढं पुरे आहे.
सती परंपरेचा मुस्लिम आक्रमणाशी संबंध कसा हे तुम्ही अजून सिद्ध केले नाही. जर मुस्लिम शासक एवढे जाच करणारे होते तर त्यांना नवरा मरायची वाट पाहण्याची काय गरज ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे का तुमच्याकडे?
V
viraj thale
Sun, 04/03/2016 - 09:05
नवीन
माझ्या पुर्वीच्या प्रतिसादात ते उत्तर मी दिलेले आहे .दुसरा प्रश्न समजला नाही व्यवस्थीत सांगा .
L
lgodbole
Sat, 04/02/2016 - 11:02
नवीन
...
L
lgodbole
Sat, 04/02/2016 - 11:22
नवीन
इंग्रजानी केलेले ते कायदे आजही आस्तित्वात आहेत. दहा हजार वर्षे सुरु असलेल्या अन्यायाविरुद्ध मुसलमान व इंग्रज यानी कायदे केले हे दहा हजार वर्षच्या धर्माला किती लाजिरवाणे आहे ना ?
भ
भंकस बाबा
Sat, 04/02/2016 - 20:08
नवीन
होय ते पाळावे लागतात नाहीतर तुरुंगात जावे लागते.
इथे तर कायदा पाळावा असे बंधन नाही, तर दबाव आणून तो बदलन्यास भाग पाडले जाते.
शाहबानो खटला. साहेब कायदा बनला त्यानंतर, धार्मिक स्वातंत्र्य देशाच्या कायदयापेक्षा मोठे आहे तर!
न
नाना स्कॉच
Sat, 04/02/2016 - 07:52
नवीन
सगळ्या इललॉजिकल गोष्टी संपलेल्या नाहीत अजुन बऱ्याच शिल्लक आहेत, अन त्या न मानल्यास शिक्षाही क्रूर होतात.
म
माहितगार
Sat, 04/02/2016 - 13:20
नवीन
DEADPOOL सेठ हिंदू धर्मीय सुधारणांच्या बाबतीत दुरुस्त येतात ह्याचे क्रेडीट द्यायला पाहीजे हे खरेच पण त्याच वेळी देरही बरीच करतात, मुख्य म्हणजे धर्माची तत्वे उदात्त आहेत पण मनमोकळेपणाने मनाचा मोठेपणा दाखवण्याची वेळ असते तेव्हा नेमके संकोचून जातात ;) . तुमचा धर्म उदात्त आणि शक्ती स्वरुपातही इश्वराची उपासना करतो ना ! मग एवढी न्यायालयाची लढाई लढण्याची वेळ यावी हे स्पृहणीय राहते किंवा कसे अशी शंका वाटते.
D
DEADPOOL
Sat, 04/02/2016 - 13:39
नवीन
बरं देर करतात पण करतच नाही असे थोडेच आहे?
आणि आम्ही शक्ति स्वरूपात स्त्रीची उपासना करतो यातच आमच्या धर्मात स्त्रियांना किती मान दिला जातो हेच ध्योतक आहे!
प
प्रतापराव
Sat, 04/02/2016 - 17:06
नवीन
महिलांना प्खर विरोध झालाय तेथे. हातही उचलला गेल्याचे सांगतायत टिव्हीवर..
D
DEADPOOL
Sat, 04/02/2016 - 17:48
नवीन
टी वी वर सगळं खरंच सांगतात का?
आणि विरोध झाला मान्य आहे पण कोणीही विश्वस्ताने आम्ही न्यायालयाचा निर्णय मानणार नाही अशी भूमिका घेतली का?
बरं विरोध कोणाकडून झाला तर त्र्यंबकला आणि शनि शिंग्नापुर ला महिलाच विरोध करायला पुढे होत्या!
आणि प्रत्येक गावची एक परम्परा असते आणि ती जपण्याकरिता गावाकडुन प्रयत्न होने साहजीक आहे!
मात्र कोणत्याही महिलेला धर्मविरोध केला म्हणून दगड मारले अथवा चाबकाचे फटके दिले असे ऐकले नाही!
आणि हो प्रतापराव मी याच धाग्यावर सांगितले की हिंदू धर्म महान आहे कारण हा धर्म सुधारणा मोकळ्या मनाने स्विकारतो. आणि हीच या धर्मातील सहिष्णुता!!!!
खूप पल्ला गाठला आहे आणि अजूनही गाठायचा आहे!!!!!!! :)
त
तर्राट जोकर
Sat, 04/02/2016 - 18:57
नवीन
ख्या ख्या ख्या ख्या =)))))
लंगडी बाजू सांभाळून धरने आणि गिरे तो भी टांग उपर ह्या दोन्ही वाक्प्रचाराचे उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रतिसाद.
आप्ल्या बाजूचे नाही तर टीवीवाले खोटारडे होतात, महिलाच पुढे होतात म्हणजे भेदाभेद त्यांनाच मान्य आहे तर, हिंदूंची ती परम्परा, पण इस्लामचा तो मागासलेपणा असतो, इस्लामशी तुलना केली की आपला धर्म महान होतो.
मोकळ्या मनाने स्विकारलेल्या सुधारणा????? जस्ट टेल मी वन एक्झाम्पल?
D
DEADPOOL
Sat, 04/02/2016 - 19:34
नवीन
ख्या ख्या ख्या ख्या =)))))>>>>>>>>
हिंदी चित्रपटातल्या व्हीलनची आठवण झाली!
आप्ल्या बाजूचे नाही तर टीवीवाले खोटारडे होतात>>>>>>
आणि जेव्हा टी वी वाले मोदिंचि बाजू घेत होते तेव्हाही ते तुमच्या लेखी खरेच होते नाही का?
लंगडी बाजू सांभाळून धरने आणि गिरे तो भी टांग उपर ह्या
दोन्ही वाक्प्रचाराचे उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रतिसाद.>>>>>>>
लंगड़ा घोड़ा रेसमे दौड़ा, हारा तो मै था लंगड़ा, तीन पाव पे दौड़ा, जीते तो नाज़ हे खूदपर, हारे तो कर लो गिरकर भी टाँग ऊपर!
महिलाच पुढे
होतात म्हणजे भेदाभेद त्यांनाच मान्य आहे तर, हिंदूंची ती
परम्परा, पण इस्लामचा तो मागासलेपणा असतो, इस्लामशी
तुलना केली की आपला धर्म महान होतो.>>>>>>>
म्हणजे इथे दोन्ही बाजूच्या महिला आपल्याच विचारस्वातंत्र्यासाठी व व्यक्तिस्वातंत्र्यासाठी लढल्या जे हिंदू धर्मातच होऊ शकते!
पण इस्लामचा तो मागासलेपणा असतो, इस्लामशी
तुलना केली की आपला धर्म महान होतो.>>>>>>>>
मुलींच्या शिक्षणासाठी लढणार्या मलालाला अत्यंत फुरोगामी धर्मातली लोकच गोळ्या घालू शकतात, नाही का?
मोकळ्या मनाने स्विकारलेल्या सुधारणा????? जस्ट टेल मी वन
एक्झाम्पल?>>>>>>>>>
आमच्याच गावी झालेले एग्ज़ेंपल>>>>>>>
१.शिवरात्रीला नेहमीच अखंड दुग्धअभिषेक होत असतो, पण यावर्षी नगराध्यक्षा बाईंनी दुष्काळामुले हे करू नये अशी फक्त एका वाक्याची अधिसूचना मांडली व ती सार्वमताने पास झाली!
२. होळी व रंगपंचमी हे हिंदूचे महत्वाचे सण. परंतु यावर्षी सगळीकडे बिनपाण्याचि होळी खेळण्यात आली दुष्कालामुळे!
एक मागितले होते, दोन दिले.
मी नेहमी असेच करतो, एक मागितली की दोन ठेऊन देतो. समोरच्याची इच्छा पूर्ण व्हायला हवी नाही का?
त
तर्राट जोकर
Sat, 04/02/2016 - 20:02
नवीन
१. आंबेडकरांनी एवढा महान हिंदू धर्म सोडण्याचं कारण?
२. असल्या सुधारणांना मनमोकळ्या नाही म्हणत, परिस्थितीपुढे लोटांगण म्हणतात. दुष्काळ संपला की जैसे थे.
३. महान हिंदू धर्मातल्या स्त्रियांना मंदिरात प्रवेश तो नाहीच. मान्य करा आता.
४. मोदींची गरज पडलीच का शेवटी?
खुश?
L
lakhu risbud
Sat, 04/02/2016 - 21:59
नवीन
तजो,लवकर बरे व्हा आणि आमच्या प्रश्नांची उत्तरे आम्हाला द्या.
D
DEADPOOL
Mon, 04/04/2016 - 06:11
नवीन
१. आंबेडकर काय की मोगा काय, कुणीही हिंदू धर्म सोडला काही फरक पडत नाही!
२.म्हणजे काहीच करायचं नाही? आणि पश्चिम महा. आमच्या गावी बारमाही नदी वाहते!
३.प्रवेश आहेच!!
४.मोदीना हिंदुत्वाची गरज आहे!हिंदुत्वाला त्यांची नाही!
L
lgodbole
Sun, 04/03/2016 - 07:16
नवीन
यात सुधारणा काय आहे म्हणे ? दुध व पाण्याच्या कमतरतेमुळे लोकलज्जेस्तव हे निर्णय घेतलेले आहे. तेही ठराविक काळापुरते. इस बार फसल अच्छी नै थी , इसलिये त्योहार को बकरा / मुर्गा नही काटा .... सबप्राइम येउन नोकरी गेल्याने सत्यनारायणाचा शिरा तुपाऐवजी तेलात केला !
अशी शेकडो उदाहरणे देता येतील की ! या सगळ्याना सुधारणा म्हणायचे का ?
....
दॅवळं मोडली .... ते जबाबदार !
बायका सती गेल्या .... ते जबाबदार !
मग त्या काळात या देशाच्या संरक्षणाची जबाबदारी नेमकी कुणाची होती ?
भ
भंकस बाबा
Sun, 04/03/2016 - 07:53
नवीन
दुष्काळामुळे प्रथा मोडली, हो पण मोडण्याचे धाडस दाखवले.
नमाज अदा करण्यासाठी वजुला जे पाणी लागते ते वाचवायला सांगा, आणि ते प्रत्येक मशीदिला किती लागते याचा हिशोब करा. प्रश्नाची उत्तरे इथेच मिळतील. पाच वेळचा नमाज इतका आवश्यक आहे?
जरा इतिहास वाचायचे कष्ट करा, भारत हां नेहमी कृषिप्रधान देश होता. हाताला काम असल्यामुळे व् बलुतेदार सिस्टिम असल्यामुळे युद्धाची खुमखुमि येथील नागरिकांना कधीच नव्हती. याउलट मुस्लिम शासकाचे मुख्य ध्येय धर्म वाढवणे व् लुटालूट करून खजिना भरणे हेच होते. वर परधर्मातील स्त्रिया उपभोगायला मिळाल्या तर बोनसच! अशी मानसिकता असलेल्या लोकांनी स्थेर्य असलेल्या लोकावर हल्ला केला तर परिणाम काय होणार?
एक चांगले उदाहरण म्हणजे इस्लाम पूर्व काळात बौद्ध धर्म पार अफ़ग़ानिस्तानपर्यन्त पसरला होता. इस्लामी आक्रमणात या धर्माची अशी काही वाताहत लागली की पुऱ्या अफ़ग़ानिस्तान पूर्ण पाकिस्तान व् उत्तर भारत इथुन हां धर्म नामशेष होण्याच्या मार्गावर आला. कारण काय तर अहिंसा परमो धर्म! बुद्धाचे तत्वज्ञान इस्लामी अतिरेक्यापुढे सफशेल निष्क्रिय ठरले. हिन्दुनि पहिल्यांदा मार खाला पण जेव्हा ते संगठित झाले तेव्हा आक्रमकाना थोपुन धरले. तुमचे मत जर ग्राह्य धरायला गेले तर ओरंगजेब महात्मा बनेल व् शिवाजी महाराज वाट चुकलेले देशभक्त ! असे मी नाही नेहरूनी आपल्या ग्रंथात लिहिले आहे.
L
lgodbole
Sun, 04/03/2016 - 13:08
नवीन
बौद्धांची अहिंसा भारताला भोवली हे हिंदुंचे लाडके पालुपद आहे.. ते खरे असते तर चीन जपान अशा बौध देशात कुंफू , कराटे , तायक्वांदो वगैरे दिसले असते का ? हिंदुंचे आराध्य स्थान साक्षात अंदमानही बौद्ध जपान्यानी इंग्रजांकडुन जिंकले होते ना ?
बौद्धांची संख्या आजही ६ % देखील नाही. म्हणजे त्या काळातही हिंदूच मेजोरिटीत असणार ... एका धर्माने आक्रमण केले म्हणे ! आणि दुसर्या धर्माने लढु नका म्हटले म्हणे ! म्हणुन आम्ही हरलो म्हणे ! खोटी रडगाणी बंद करा.
म
माहितगार
Sun, 04/03/2016 - 14:09
नवीन
अल्प अवांतरः
हम्म.. बौद्ध तत्वज्ञान आणि व्यवहारातील हिंसा अहिंसा यांचा संबंध जेवढा सरळ प्रस्थापित व्हावयास हवा तेवढा होईलच याचे आश्वासन देणे कदाचित कठीण असेल कारण कोणतेही तत्वज्ञान आणि मनुष्य व्यवहार यात तफावत असू शकतेच. सिंध आणि अफगाणीस्तान मध्ये बौद्ध धर्मीयांनी इस्लाम धर्मीयांना एक तर्फी सौहार्दता दाखवली का अशी काही जणांना शंका येत असेल तर तो अभ्यासाचा विषय असेल नाही असे नाही.
मला एक वाटते ते वेगळेच बौद्ध धर्माचा जसा पुर्व आशीयात प्रसार झाला तसा तो पश्चिम अशियातही झाला असता तर गेल्या एकविसशे वर्षापासून पश्चिम आशीयाचे संघर्ष जगभर ओसंडत राहीले आहेत त्याचे प्रमाण पुर्ण नाहीतरी किमान काही अंशाने कमी राहीले असते का ? आणि बौद्ध धर्म पश्चिम आशियात का पोहोचू शकला नाही ?
भ
भंकस बाबा
Sun, 04/03/2016 - 14:51
नवीन
मी कुठे लिहिले आहे की बौद्ध धर्माची अहिंसा हिन्दू धर्माला भोवली?
एकतर तुम्ही लिहिलेले नीट वाचत नाही आणि जे तुम्ही वाचले आहे, भले ते अर्धवट ज्ञान असो ते टाकायला बघत आहात.
मी लिहिले आहे ह्या अहिंसेचा अतिरेक केल्यामुळे बौद्ध धर्म जो अफ़ग़ानिस्तानपर्यन्त पोहोचला होता तो तिथुन नामशेष झाला. तुम्ही पार जापान, चीन पर्यन्त पोहोचला. जापान, चीनवर कोणता इस्लामी शासक चालून गेला होता?
अफ़ग़ानिस्तान मधे बौद्ध धर्माचे अस्तित्व होते हे तालिबानिनि तेथील जगप्रसिद्ध बुद्धाचि मूर्ति तोफा लावुन फोडली तेव्हा माझ्या वाचनात आले. मी बौद्ध धर्माचे मुळ शोधायला गेलो नव्हतो.
बर् कराटे, कुंगफू त्यायकंडो हे प्रकार युद्धात वापरले जातात हे तुम्हाला कोणी सांगितले?
जरा थोड़ी अजुन काही पुस्तके वाचा मग प्रतिक्रिया टाका, नाहीतर हसे होईल तुमचे.
अ
अत्रे
Sat, 03/26/2016 - 14:48
नवीन
१. धर्म ही काही व्यक्ती नाही अपमान करायला. मला वाटतं मान-अपमान फक्त लोकांना लागू होतात.
तुम्हाला असं का वाटतं की काही म्हटलं म्हणजे एखाद्या concept चा अपमान होइल?
२. असं धरुन चालू कि धर्माचा अपमान होउ शकतो. प्रश्न हा आहे कि कोण ठरवणार अपमान झाला आहे? न्यायालय कि रस्त्यावरचे गुंड?
३. समजा कोणी अपमान केलाच (assuming असं होउ शकतं) तर त्या धर्माच्या अनुयायांनी काय करणं बरोबर आहे? ते कायदा हातात घेउ शकतात का? जर घेतला, तर त्याचा अर्थ असा होतो कि त्यांचा संविधानावर विश्वास नाही. बरोबर?
D
DEADPOOL
Sat, 03/26/2016 - 19:04
नवीन
मला वाटतं मान-अपमान फक्त लोकांना लागू होतात.>>>>>
कन्टेम्प्ट ऑफ कोर्ट आणि राष्ट्रगीतांचा अपमान ही प्रतिनिधिक उदाहरणे
अ
अत्रे
Sat, 03/26/2016 - 19:34
नवीन
चांगला मुद्दा आहे :) विचार करायला लावणारा.
https://en.wikipedia.org/wiki/Contempt_of_court
"there are essentially two types of contempt: (1) being rude, disrespectful to the judge or other attorneys or causing a disturbance in the courtroom, particularly after being warned by the judge; (2) willful failure to obey an order of the court.
इथे त्यांनी 'कन्टेम्प्ट ऑफ कोर्ट' ला दोन प्रकारे डीफाईन केलं आहे. पहिला प्रकार व्यक्तिगत (personalized) आहे, दुसरा नाही.
--
माझं मत मी खालीलप्रमाणे दुरुस्त करतो.
तुम्ही जर असं डीफाईन केलं, की अमुक-अमुक केल्यावर धर्माचा अपमान होइल, आणि कोणी तसे केले, तर "तुमच्या दृष्टीने" तो अपमान असेल. पण याचा अर्थ असा नाही की इतर लोकांची पण अपमानाची तीच डेफिनेशन केली असेल.
धर्माच्या बाबतीत problem असा वाटतो मला, कि कोणी authority च जर नाहिये, तर कोणिही अपमान मानला / नाही मानला तरी, तरी अपमान झाला हे सिद्ध करणं फार अवघड (अशक्य?) आहे.
आणि जरी झाला, तरी नुकसान कोणाचे होत आहे? As in, समाजावर त्याचे काही दुष्परिणाम होत आहेत का, हे बघायला पाहिजे. तुमच्या दोन्ही उदाहरणांमधे, तसे केल्याने समाजावर वाईट परिणाम होतील (लोकं कायदा मोडतील / देशविघातक कृत्य करतील वगैरे वगैरे) तसं धर्माच्या बाबतीत नाही म्हणता येणार.
D
DEADPOOL
Sat, 03/26/2016 - 12:46
नवीन
आणि ak 47 असूनही ती वापरली गेली नसेल तर?
इ
इरसाल
Sat, 03/26/2016 - 08:48
नवीन
आणी असे दुसर्याचे घरचे संस्कार काढणार्यांचे पण.
अ
अत्रे
Sat, 03/26/2016 - 09:38
नवीन
कार्य-कारण भावामधे थोडा गोंधळ होत आहे.
भ
भंकस बाबा
Sat, 03/26/2016 - 14:13
नवीन
साहेब माझ्यावर काय संस्कार झाले आहेत याची उठाठेव तुम्ही करु नका. आपली संत परंपरा पण बोलते 'तुका म्हणे ऐशा नरा मोजुन माराव्या पैजारा' . आता काय सदेह स्वर्गात जाणार तुम्ही तुकाराम्बुवाना समजावयला असे नाय बोलायचे! पैजारा म्हणजे वहाण बर् का अत्रे, शुद्ध मराठीत त्याला चप्पल म्हणतात.
रच्याकने तुम्ही ते हनुमान व् सीतेचे हुसैनने काढलेले चित्र बघितले आहे काय? कोणाही हिंदुचे रक्त खवळेल असे ते चित्र आहे.
आमच्या तजो साहेबाना विदा आणि लिंक द्यायची भारी हौस! टाका की साहेब फोटू, बघा मग काय गदारोळ उड़ेल. तुम्ही याला कलाकृति म्हणता?
ते प्रह्लाद केशव अत्रे स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध होते, कमितकमि त्या अत्र्यांचे नाव तरी लावू नका.
माझे मत अजूनही कायम आहे चपल्लेने मारण्याचे! काय म्हणणे आहे तुमचे?
त
तर्राट जोकर
Sat, 03/26/2016 - 14:50
नवीन
आपली संत परंपरा पण बोलते 'तुका म्हणे ऐशा नरा मोजुन माराव्या पैजारा' .
>> हा पूर्ण अभंग काय आहे हो भंकसबाबा?
आमच्या तजो साहेबाना विदा आणि लिंक द्यायची भारी हौस! टाका की साहेब फोटू, बघा मग काय गदारोळ उड़ेल. तुम्ही याला कलाकृति म्हणता?
>> हुसैन च्या चित्रांना बंदी आहे काय?
भ
भंकस बाबा
Sat, 03/26/2016 - 16:18
नवीन
होउन जाउदे, टाकाच तुम्ही ते चित्र इथे मिपावर, मी अजूनही त्या चित्रात काय आहे हे सांगणे टाळण्याचा प्रयत्न करत आहे. नाही बंदी ना मग टाका.
मी टाळण्याचा का प्रयत्न करत आहे? या प्रश्नाचे उत्तर पण देतो पण तुम्ही हे चित्र टाका. मग मी विश्लेषण करतो
त
तर्राट जोकर
Sat, 03/26/2016 - 16:46
नवीन
हुसैनच्या चित्रांना कायद्याने बंदी आहे का ह्या प्रश्नाचे हो किंवा नाही हे उत्तर द्या. बाकी फळफळाट राहु देत बाजुला. विश्लेषण तुम्ही करनार की हुसैन? कारण इथेच श्रीगुरुजींच्या मते हुसैनचे म्हणने ऐकले पाहिजे. नैका?
भ
भंकस बाबा
Sat, 03/26/2016 - 17:25
नवीन
चित्र टाकाना,
इथे मी तुम्हाला चिथवत नाही आहे, पण तुम्हाला विषाचि परीक्षा घ्यायची लहर आली आहे तर मग होऊन जाउदे.
त
तर्राट जोकर
Sat, 03/26/2016 - 17:46
नवीन
शेवटी खरे बाहेर आले तर. =))
भ
भंकस बाबा
Sat, 03/26/2016 - 18:25
नवीन
या चित्रात दंगली भड़कवण्याचे सामर्थ्य आहे. जर शहाणे असाल तर या फंदात पडणार नाही. इथे तुम्ही कायद्याच्या कचाटयात तर अड़कालच वर नसती झेंगट मागे लावुन घ्याल.
तुम्ही फार्र् फार्र् विद्वान आहात, जरा त्या चित्रात काय होते ते सांगाल?
बाकी अशी आराधना एखाद्या रूपगर्वितेची केलि असती तर आतापर्यन्त कह्यात आली असती.
त
तर्राट जोकर
Sat, 03/26/2016 - 19:39
नवीन
ह्या धाग्यावर माझे प्रतिसाद संपले होते पण आता तुम्ही फारच चेकाळला आहात म्हणुन उत्तर देत आहे.
या चित्रात दंगली भड़कवण्याचे सामर्थ्य आहे.
>> असे असेल तर अजून ही चित्रे जालावर उपलब्ध कशी? तीही हिंदूजागृती ह्या संस्थळावर?
http://webneel.com/mf-husain-paintings-art-controversy-indian-artist
http://www.speakingtree.in/allslides/20-controversial-mf-hussain-paintings-575327
जर शहाणे असाल तर या फंदात पडणार नाही.
>> हे जाणून बुजून उचकवण्याचा ट्रॅप आहे. मला फरक पडत नाही हुसैनचे पेंटींग इथे लावायला. पण तुम्ही दंगल भडकवण्याची मानसिकता पुरेपुर तयार करुन ठेवली आहे हे तुमच्या प्रतिसादातून दिसतेच.
इथे तुम्ही कायद्याच्या कचाटयात तर अड़कालच वर नसती झेंगट मागे लावुन घ्याल.
>> असल्या फालतू धमक्यांना मी भीक घालत नाही. कायद्याने बंदी आहे का ह्याचे उत्तर तर तुम्ही देत नाही वर गोल गोल फिरत आहात. कोणत्या न्यायालयाने हुसैनच्या त्या तथाकथित दंगे भडकवण्याची क्षमता असलेल्या चित्रांवर बंदी घातली आहे ते सांगा. कचाट्यात यायचे असल्यास तुमचे कैक प्रतिसाद इथे अल्पसंख्यांक समाजाबद्दल गैरसमजुती व द्वेष पसरवण्याच्या लेबलखाली आणता येतील. ते मागे लागले तर काय होईल याचा विचार आधी करावा.
तुम्ही फार्र् फार्र् विद्वान आहात, जरा त्या चित्रात काय होते ते सांगाल?
>> वर दिली आहे लिण्क. मनभरुन पाहू शकता. हाथ कंगन को आरसी क्या, पढे लिखे को फारसी क्या?
बाकी अशी आराधना एखाद्या रूपगर्वितेची केलि असती तर आतापर्यन्त कह्यात आली असती.
>> ह्या शुद्ध व्यक्तिगत हल्ल्याने ह्या प्रतिसादावर उत्तर देण्यास बाध्य केले. आता ऐका उत्तर. तुम्हाला ज्याने कोणी सांगितले असेल की अशी आराधना केली की रुपगर्विता कह्यात येते, त्याला जाऊन चार मुस्काटात हाणा. कारण आतापावेतो आमच्या कह्यात आलेल्या रुपगर्वितांची आम्हाला कधी आराधना करायची जरुर पडली नाही. तुमची आराधना फळत नसेल तर तुम्हाला शिष्य करुन घेण्यास तयार आहोत. पण रुपगर्वितांच्या विशेष गरजा असतात, त्या पूर्ण करण्याची क्षमता जर असेल तर बोला कधी येताय गंडा बांधुन घ्यायला?
-तर्राट जोकर (मुद्द्यावरच घालतो घाव, मग बोंबलू नका बचाव बचाव)
म
मितभाषी
Sat, 03/26/2016 - 19:51
नवीन
बादवे उद्या नास्तिक मेळावा आहे पसाला. येणार असाल तर बरोबर जाउ.
भ
भंकस बाबा
Sat, 03/26/2016 - 20:38
नवीन
तुम्ही ज्या लिंका दिल्या आहेत त्यात मी संगीतलेले चित्र नाही.
मी कोणते अल्पसंख्यक समाजाबद्दल भावना भड़कवायचे प्रतिसाद टाकले?
रूपगर्विता प्रकरण हे मला स्वतःला उद्देशून होते, तुम्ही उगाच्च आपल्या अंगाला लावुन घेतले.
तुम्ही म्हणता तो अल्पसंख्यक समाज आपल्या सिस्टिमला फाट्यावर मारत आंहे. मला काही फरक पडत नाही की तो धर्मान्तर करतो की धर्मस्थळे वाढवतो. पण तो आपल्या न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवत आहे, जे पुढे जाऊन नवीन पिढीला चुकीचा सन्देश देत आहे. नेमकी हीच बाब काही राजकीय पक्ष आपली पोळी भाजण्यासाठी वापरत आहे. जर तुम्ही हिन्दू असाल आणि तरिही तुमचं रक्त खवळंल नसेल तर ( ही चित्र बघुन) सेक्युलरिजम जास्तच बोकाळला आहे असेच म्हणावे लागेल.
याआधि पण मी म्हटले होते की सैटनिक वर्सेस वर बंदी आणि हुसैन मोकाट याला काय म्हणावे?
अगदि गल्फ वॉरच्या वेळी येथील मुस्लिमानि अमेरिकन विमानात ईंधन भरण्यास मनाई केलि होती आणि आपले सेक्युलर सरकार ऐकले देखिल होते. सद्दाम हुसैन काय कुवैतमधे तीर्थयात्रा भरवायला गेला होता?
अगदी 65च्या युद्धात ब्लैक आउट असताना पाकिस्तानी विमानाना रस्ता समजावा म्हणुन भेंडीबाजार, नागपाड़ा भागात गच्यावर दिवे लावले गेले. कसा विश्वास ठेवावा हो या लोंकावर?
मी स्वतः मुस्लिम भागात रहातो. मुस्लिम वाईट नाहीत पण इस्लाम खतरेमें अशी आरोळी आली की ते सैरभिर होतात. जगातला दुसऱ्या क्रमाकांची लोकसंख्या असलेला धर्म एका सैटनिक वर्सेसने खतरेमें येतो?
शहाबानो खटल्यात कोर्टाचा निर्णय फ़क्त भावना दुखावु नए म्हणुन फिरवला जातो. हे तुष्टिकरण नाही तर काय आहे?
त
तर्राट जोकर
Sat, 03/26/2016 - 22:54
नवीन
तुम्ही ज्या लिंका दिल्या आहेत त्यात मी संगीतलेले चित्र नाही.
>> कोणते चित्र? द्या लिण्क, नैतर चिटकवा इथेच. कोणत्याही चित्रावर कसलीच बंदी नाही. कोणत्या टिनपाट चित्राने हिंदुंच्या भावना मुस्लिमांसारख्या भडकायला लागल्या तर फरक काय राहिला मग? कशाला सहिष्णुतेचे ढोल वाजवायचे?
मी कोणते अल्पसंख्यक समाजाबद्दल भावना भड़कवायचे प्रतिसाद टाकले?
>> शोधा म्हणजे सापडेल. बाकी कशाने भावना भडकतील ते प्रतिसाद टाकणार्याने नाही तर ज्याच्या भडकतील त्याने ठरवायचे असते ना?
जर तुम्ही हिन्दू असाल आणि तरिही तुमचं रक्त खवळंल नसेल तर ( ही चित्र बघुन) सेक्युलरिजम जास्तच बोकाळला आहे असेच म्हणावे लागेल.
>> आमचं रक्त कशाने खवळावं हे तुम्ही ठरवत असाल तर धर्मांधता जास्तच बोकाळली आहे असेच म्हणावे लागेल. हुसैन चे पेंटींग्स १९७० पासून बन्वलेत. रिकामचोट हिंदुत्ववाद्यांनी बोंबाबोंब केली नसती तर त्याने अशी काही पेंटींग्स बनवलीत हे त्याच्या गल्लीतल्या न्हाव्यालाही कळले नसते. बाकी हिंदूंमधे अशा व अशा अनेक लांछनास्पद घटना घडतात तेव्हा हिंदू म्हणुन तुमचं रक्त खवळतं का प्रश्न आहे. जेव्हा हिंदूंमधे धर्मसुधारणा सुचवनार्यांना 'मुस्लिमांना आधी सांगा' असे टोमणे मारले जातात तेव्हा ह्या टोमणे मारणार्यांचे रक्त अशा प्रथा-परंपरांसाठी खवळतं का हाही प्रश्न आहे. मुस्लिम समाजातल्या स्त्रियांच्या हक्कासाठी कळवळण्याचे ढोंग करणार्यांना आपल्याच धर्मातल्या स्त्रियांचे आक्रोश ऐकून रक्त खवळतं का हाही प्रश्न आहे.
मी स्वतः मुस्लिम भागात रहातो. मुस्लिम वाईट नाहीत पण इस्लाम खतरेमें अशी आरोळी आली की ते सैरभिर होतात. जगातला दुसऱ्या क्रमाकांची लोकसंख्या असलेला धर्म एका सैटनिक वर्सेसने खतरेमें येतो?
>> अगदी अगदी. सेम सिच्युएश्न हिंदूंची करण्यात येत आहे. हजारो पंथ, संप्रदाय, मान्यता, देवीदेवता असलेला प्रचंड हिंदू समुदाय एका फाल्तू पेंटींगने दुखावतो?
मूळ मुद्दा आहे हुसैनची आक्षेपार्ह पेंटींग्स आणि त्यावर हिंदूंची प्रतिक्रिया.
तर सर्व सदस्यांना एक प्रश्नः उद्या शार्ली हेब्दोसारखेच हिंदु देवतांची तशीच आक्षेपार्ह चित्रे कार्टून्स कोणी भारतीय मासिकाने खास हिंदूं धर्मांधांना उचकवण्यासाठी बनवलीत आणि देशभर प्रकाशित केलीत, जाहिरातींतुन दाखवलीत तर बनवणारे व छापणारे आयुष्यभर सुरक्षित राहतील ह्याची खात्री आपण देऊ शकता का? तेवढी सहिष्णुता हिंदूंमधे आहे ह्याची खात्री आहे काय?
भ
भंकस बाबा
Sun, 03/27/2016 - 03:04
नवीन
मी हुसैनने काढलेल्या हनुमान व् सीतेच्या चित्राबाबत बोलत आहे, अजुन एक चित्र रावण व् सीतेचे आहे. ही चित्र तुमच्या पहाण्यात आली नाहीँ असे दिसते.
हिंदुत्ववाद्यानी गदारोळ केला नसता तर कोणाला कळलेही नसते हे काय भानगड़ आहे. त्याचसाठी मी तुम्हाला सांगत आहे की ही चित्रे बघा, आणि याचसाठी मी त्याच्यावर भाष्य करायचे टाळत आहे. मी स्वतः हिन्दू असूनदेखिल कोणत्याही हिंदू चालिरिति पाळत नाही वा माझ्या मुलाला त्या पाळायला लावत नाही. पण माझ्या आईला व् बायकोला हे समजावनें कठिन आहे, तरिही पितृपक्ष , श्रावण पाळणे या गोष्टी मी घरी टाळतो. पण जेव्हा कोणी अकारण हिंदू धर्मावर हल्ला करत असेल तर त्याला उत्तर देणे माझे कर्तव्य समजतो.
नेहरुनी discovery of india मधे शिवाजी महाराजांचा उल्लेख अपमानास्पद केला होता. हे लिहिले होते 39साली, नंतर 55साली लोकांना ते कळले की त्यांनी काय लिहिले आहे कारण तेव्हा त्याचे भाषांतर झाले होते. मग आम्ही काय त्याचा प्रतिकार करु नए? तरिही अट्टहासाने नेहरुनी आपलेच् बरोबर अशी भूमिका घेतली पण जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरु झाली तेव्हा विरोधकाना आयते कोलित मिळाले तेव्हा हा मजकूर पुस्तकातुन काढण्यात आला. मग तुमचा प्रतिवाद याला पण लागू होतो काय?
जर तेव्हा गदारोळ झाला नसता तर जगापुढे काय प्रतिमा गेली असती शिवाजी महाराजांची? नेमके हेच हुसैनच्या चित्राबाबत झाले होते. मॉडर्न आर्ट च्या नावाखाली हुसैनने जे केले ते चुकीचे होते, हा जर त्याने रामायण वाचले असते तर हां प्रकार झाला नसता. पण रामायण वाचणे, लाहोलबिलाकुवत
असो तुम्ही ही चित्रे पहा मगच तुमचा अभिप्राय दया.
D
DEADPOOL
Sun, 03/27/2016 - 03:17
नवीन
उद्या शार्ली हेब्दोसारखेच
हिंदु देवतांची तशीच आक्षेपार्ह चित्रे कार्टून्स
कोणी भारतीय मासिकाने खास हिंदूं धर्मांधांना
उचकवण्यासाठी बनवलीत आणि देशभर प्रकाशित
केलीत, जाहिरातींतुन दाखवलीत तर बनवणारे व
छापणारे आयुष्यभर सुरक्षित राहतील ह्याची
खात्री आपण देऊ शकता का? तेवढी सहिष्णुता
हिंदूंमधे आहे ह्याची खात्री आहे काय?>>>>>>>>
हुसेन ९५ वर्षांचा होऊन मेला. त्याचा गुन्हा चार्ली पेक्षा अत्यंत मोठा होता! आणि गुरुजींनी वर विदा दिलेलाच आहे.
सबब
तेवढी सहिष्णुता हिंदूंमधे आहे!
अ
अत्रे
Sun, 03/27/2016 - 05:12
नवीन
पण त्याचा "गुन्हा होता आणि त्याला शिक्षा व्हायला पाहिजे होती"
असे वाटणे म्हणजेच असहिष्णुता नाही का?
का फक्त "जेल मधे जायचे नाही म्हणून शांत बसणं", याला सहिष्णुता म्हणायाचं?
सहनशीलता आणि सहिष्णुतेमधे फरक असावा. सहनशीलते मधे तुम्ही मानून चालता कि तुमच्यावर हल्ला झाला आहे, आणि तरी शांत बसता।
साहिष्णुतेमधे तुम्ही दुसरी बाजू -न भडकावून जाता - समजावून घेण्याचा प्रयत्न करता, किंवा ते जमत नसेल तर "व्यक्ती स्वातंत्र्य" आहे म्हणून दुर्लक्ष करता।
D
DEADPOOL
Sun, 03/27/2016 - 07:04
नवीन
पण त्याचा "गुन्हा होता आणि त्याला शिक्षा व्हायला पाहिजे
होती"
असे वाटणे म्हणजेच असहिष्णुता नाही का?
>>>>>>>>>
नाही याला न्याय मिळण्याची अपेक्षा असे म्हणता येईल
भ
भंकस बाबा
Sun, 03/27/2016 - 05:33
नवीन
चार्ली हेब्दोने या हल्ल्यानंतर काही काळाने जाहिर केले की आता ते प्रेषितावर चित्र काढणार नाही.
नेमका हाच उद्देश् होता मूलतत्त्ववाल्यांचा, आता हेच धर्मान्ध मुल्ले दाढ़ी कुरवाळत इराक सीरिया मधे डींगे मारत असणार की बघा आमचे खरे झाले की नाही. ईशनिंदा थाबवन्याचा जालिम व् खात्रिशीर उपाय हाच असाच सन्देश जगभर गेला की नाही? किती इस्लामी संस्थानि वा सेवकानी चार्ली हेब्दो वर कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन केले?
त
तर्राट जोकर
Sun, 03/27/2016 - 09:41
नवीन
जालावर उपलब्ध असलेल्या बातम्यांमधून तुम्हाला उत्तर मिळेल असे नाही वाटत का? दुवा दिला तर तुम्ही 'किती' हा शब्द धरुन बसाल ट्रेडमार्क ह्यांच्यासारखा.
http://www.theguardian.com/media/2007/feb/07/pressandpublishing.france
D
DEADPOOL
Sun, 03/27/2016 - 09:57
नवीन
आमच्या गावी नेहमीच असं व्हायचं!
एक लय अवघड कुटुम्ब होतं!
काही झालं की समोरच्या व्यक्तीला दणाणून हाणयाच आणि लगेच पोलीस स्टेशनला जाऊन त्याच व्यक्तिविरोधात तक्रार नोंदवून मोकळे!
त
तर्राट जोकर
Sun, 03/27/2016 - 10:03
नवीन
उपरोध कळला पण बातमी आणि त्याची तारिख बघायचे कष्ट घेतले असते तर काही उपयोग झाला असता. बाकी तुम अपना मन बनाही लिये हो तो औ का कही.
लै कंटाळ यायलाय. तेच ते विषय तोच तो चोथा.
D
DEADPOOL
Sun, 03/27/2016 - 10:20
नवीन
उपरोध नाही हो खरी गोष्ट आहे!
ट
ट्रेड मार्क
Mon, 03/28/2016 - 19:48
नवीन
खरं तर तुम्हाला प्रतिवाद करायचा नाही असं ठरवलं होतं, पण आता माझा उल्लेख केलात त्यामुळे नाईलाजाने प्रतिसाद द्यायला लागतोय.
तुमचे सगळे प्रतिसाद सलग वाचले की लक्षात येतं तुम्ही किती माकड उड्या मारता ते.
प्रत्येक वेळी तुम्हीच विदा मागता आणि वर परत म्हणता मी कधी मागितला? सांख्यिकी तुम्ही दिलेल्या बातमीत होती मग ती मी वापरणारच ना?
तुम्ही सांख्यिकी दिलेली बरोबर आणि आम्ही तीच पद्धत वापरली की कसे चूक हे खालील उदाहरणांमधून कळेल (अशी अशा करतो).
दुवा १, दुवा २, दुवा ३, दुवा ४
तुम्हाला एवढे मुस्लिम प्रेम आहे तर असूदे. आम्हाला काही प्रोब्लेम नाही. बाकी कुराण, शांततेचे संदेश, स्त्रियांशी कसे वागावे ई ई तुमच्या मुस्लिम बांधवांना शिकवा, तुम्हाला पण जन्नत नसीब होईल आणि ७२ हूर पण.
त
तर्राट जोकर
Mon, 03/28/2016 - 20:32
नवीन
तुमचे सगळे प्रतिसाद सलग वाचले की लक्षात येतं तुम्ही किती माकड उड्या मारता ते.
>> वाट्टेल ते?
प्रत्येक वेळी तुम्हीच विदा मागता आणि वर परत म्हणता मी कधी मागितला? सांख्यिकी तुम्ही दिलेल्या बातमीत होती मग ती मी वापरणारच ना?
>> तुमचं डोकं सरकलंय का जागेवरुन? मी कधी म्हटले की मी विदा मागितला नाही ते? खालच्या चारही दुव्यांमधे मी विदा मागितलेला तो मिळालेला नाहीच. तुम्हाला तुमच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल दिलेल्या कोणत्या बातमीतली कोणती सांख्यिकी तुम्ही इथे वापरली? ७० हजार मौलवी आणि १५ लाख मुस्लिमांची एकुण भारतीय मुस्लिमांशी असलेली बालीश सांख्यिकी तुम्हीच कॅलक्युलेट करुन इथे टाकली. तुमचा मुद्दा गंडला तर माझ्यावर खोटे आरोप करता आहात. इथे इसिसविरोधी फतवे आणि इसिसविरोधी मुस्लिमांचे पुरावे दिले तर शब्दांचे खेळ करता. म्हणता त्यांनी फक्त निषेध केलाय, मी कुणी विरोध केलाय का असं विचारंतोय. माकडउड्या ह्याला म्हणतात.
मला तुम्ही मांडत असलेल्या तुमच्या सांख्यिकीत दम वाटत नाही. त्यासाठी तुमच्याच लॉजिकने संघाच्या कार्यकर्त्यांची सांख्यिकी मांडली. मुद्दा हाच होता की अशी तिरपागडी सांख्यिकीचे मुल्य शून्य असते हे सांगणे. जर १५ लाख संघकार्यकर्त्यांचा हिंदूंवरचा प्रभाव तुम्ही मान्य करत नसाल तर मीही त्या १५ लाख मुस्लिमांचा भारतीय मुस्लिमांवरचा प्रभाव मान्य करत नाही. बोला काय म्हणता?
तुम्ही सांख्यिकी दिलेली बरोबर आणि आम्ही तीच पद्धत वापरली की कसे चूक हे खालील उदाहरणांमधून कळेल (अशी अशा करतो).
दुवा १, दुवा २, दुवा ३, दुवा ४
>> आपण कोणत्या प्रतिसादांचे दुवे देतोय त्याची शुद्ध आहे का? मी दिलेला विदा व सांख्यिकी सरकारप्रमाणित व मान्यताप्राप्त संस्थांचे अहवाल आहेत. तुमच्यासारखे बसल्या बसल्या टिवल्याबावल्या करत जोडलेले आकडे नाहीत.
तुम्हाला एवढे मुस्लिम प्रेम आहे तर असूदे. आम्हाला काही प्रोब्लेम नाही. बाकी कुराण, शांततेचे संदेश, स्त्रियांशी कसे वागावे ई ई तुमच्या मुस्लिम बांधवांना शिकवा, तुम्हाला पण जन्नत नसीब होईल आणि ७२ हूर पण.
>> मुद्दे नसले की असा तोल जातो बघा. सांभाळा स्वतःला, एवढा द्वेष बरा नव्हे. असला तरी ठेवा तुमच्याकडेच. इथे सार्वजनिक संस्थळावर घृणा पसरवण्यासाठी वापरु नका. तुम्ही मुस्लिमांचे मुडदे पाडा किंवा मांडित घेऊन खडीसाखर भरवा, मलाही काही फरक पडत नाही. तुमचे मुद्दे संपले, तर्क चालत नाहीत, तुम्च्याकडे माझ्या आकडेवारीला तोड देणारी कोणतीच आकडेवारी नाही हे तुम्हाला बोचतंय म्हणून अशा वैयक्तिक डिवचण्यावर उतरत आहात. आपण आपली खरी द्वेषमूलक बाजू अजून स्पष्ट करत आहात. बस इत्ताईच. धन्यवाद.
ट
ट्रेड मार्क
Mon, 03/28/2016 - 22:12
नवीन
उगाच डोकं सरकलंय का आणि शुद्ध आहे का हे बोलायची गरज नाही. आता तुम्ही म्हणताच आहात मी वैयक्तिक होतोय तर होतोच आता. माकड उड्या मारणे हा एक वाक्प्रचार आहे. पण एकूण तुमच्या कडे बघता हे तुम्हाला माहित असेल असं वाटत नाही. पण तुम्ही ते खरंच करताय. आता मी तुम्हाला माकड म्हणत नाहीये पण तुम्हाला स्वतःला माकड समजायचं असेल तर माझी हरकत नाही.
तुमच्यापुढे काही बोलणे म्हणजे गाढवापुढे वाचली गीता (हा पण एक वाक्प्रचार आहे आणि गीता म्हणजे श्रीकृष्णाने लिहिलेली) असं आहे. इथे बरेच लोक तुम्हाला वेळोवेळी सांगत आहेत की तुम्ही तुम्हाला सोयीस्कर अशी भूमिका घेता आणि जर अवघड प्रतिसाद आला की लगेच पळून जाता.
सांख्यिकीचा विचार केला तर तुम्ही दिलेल्या बातमीतील आकडे मी वापरले. आता ती बातमी विश्वासार्ह नसेल तर ती तुमची चूक आहे. मी माझी कुठलीच आकडेवारी वापरली नाही, फक्त तुम्ही दिलेल्या आकडेवारीचा उपयोग केला. उगाच मूर्ख आणि बालिश प्रतिक्रिया/ बातम्या देऊन तुम्ही स्वताचा वेळ वाया घालवताच आणि इतरांचा पण घालवता. वर आणि अडचणीत आणणारे मुद्दे आले की मग मला वेळ नाही असे म्हणून पलायन आहेच. बाकी काही नाही तर लगेच संपादक मंडळींना म्हणालच की माझ्यावर वैयक्तिक हल्ले होतात, जे आता पण तुम्ही करालच.
मी कोणाचाही उगाच द्वेष करत नाही पण तुम्ही तुमची लंगडी बाजू सांभाळायचा मात्र फारच प्रयत्न करता. तुम्हाला मी काय करतो याचा काही फरक नसेल पडत तर एवढा कांगावा कशासाठी?
असो. तुम्हाला काय करायचे ते करा, लिहायचंय ते लिहा, माझा वेळ मला सत्कारणी लावायचा आहे. त्यामुळे माझ्याकडून बास.
त
तर्राट जोकर
Tue, 03/29/2016 - 09:55
नवीन
अपेक्षित थयथयाट. तुमच्या ह्या सग्ळ्या प्रतिसादात मी मांडलेल्या मुद्द्यांचे कुठलेही समर्पक खंडन नाही हे स्पष्ट आहे. बाकी भाषा वापरायची तर जशास तसे हे आपले धोरण आहे. सुरुवात आपण करायची, बॅकफायर झालं की माझं नाव बदनाम करायचं. चांगला खेळ आहे. लगे रहो.
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- ›
- »