Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हिंदुत्व आणि असहिष्णुता! - भाग १

D
DEADPOOL
गुरुवार, 03/24/2016 - 10:21
🗣 482 प्रतिसाद
भारतात म्हणे असहिष्णुता वाढीस लागली आहे! जर भारतात असहिष्णुता आहे तर बोंबाबोंब करणाऱ्यानी खालील प्रश्नाची उत्तरे द्यावीत! १.क्षणोक्षणी बाबरीचा उल्लेख करणाऱ्यानी आजपर्यंत प्रत्येक इस्लामिक शासकांनी किती मंदिरे पाडलीत याचा हिशेब द्यावा! २. जर असहिष्णुता वाढली असेल तर हिंदूंचा आराध्य प्रभु श्रीराम याचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करणाऱ्या ओवेसीवर एकाही हिंदूने हल्ला केला का? ३. भारतात ८० कोटी हिंदू आहेत तरीही यू आर अनंतमूर्ती यांचे विधान ऐकून किती हिंदूनी दंगली केल्या? ४. सरकार उजवे आहे व अल्पसंख्यविरोधी आहे तर अजूनपर्यंत अल्पसंख्य आरक्षण का संपवले नाही? ५. दादरी प्रकरनाचा गाजावाजा करतांना तुम्हाला मुम्बईची दंगल आठवत नाही? ६. असहिष्णुता वाढली आहे म्हणून देश सोडून जाऊ म्हणणारे किती लोक देश सोडून गेले ७. देव देवतांची नग्न चित्र काढणारा हुसैन याला आपल्या धर्माच्या प्रेषितची चित्र काढण्याची का बुद्धि सुचली नाही? ८. आणि चार्ली हेब्दो च्या हल्याची तुलना करता हिंदूंनी हुसैनला कोणती शिक्षा दिली? ९. आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न हिंदूंना का पडला नाही? १०. तथाकथित धर्मचिकित्सक व विचारवंत हिंदूधर्माचीच का चिकित्सा करतात? (दुसऱ्या शब्दात का टीका करतात?) अजूनही बरेच प्रश्न आहेत पण त्याबद्दल नंतर!

प्रतिक्रिया द्या
62422 वाचन

💬 प्रतिसाद (482)
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 07:52 नवीन
जर समोरचा ओरिजिनल असेल तर आमचीही हरकत नाही
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Fri, 03/25/2016 - 07:58 नवीन
आम्ही ओरिजिनलच आहोत हो! फ़क्त मुद्दे सोडुन दरवेळी तेच ते तुम्ही कोण कुठले काय नाव गाव वस्तु प्राणी खेळायला नकोसे होते म्हणूनच तर आधी विचारले! चर्चा उपयुक्त मेंदूस खाद्य अन व्यायाम असणार असेल तर आम्हाला आवडेल चर्चा! बघा काय ठरते ते तसे सांगा! :) -शुभेच्छा.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
म
माहितगार Fri, 03/25/2016 - 08:01 नवीन
तुमचे काम प्रतिपक्षाचा मुद्दा खोडण्याचे आहे, आयडी कुणाचा आहे आणि कुणाचा नाही याच्याशी सहसा देणेघेणे असण्याचे कारण असावयास नको. अमुक तमुक आयडीने मुद्दा मांडला म्हणून बरोबर होतो असे नसावे. प्रतिपक्षाचे मुद्दे व्यक्तिगत टिका न करता खोडता येणे शक्य नसेल तर अशा चर्चा चालू करणे आणि/अथ्वा सहभाग स्पृहणीय असतील का ? व्यक्तिगत टिका अथवा आक्रस्ताळेपणा करुन स्वपक्षीयांचीच बाजू दुबळी करण्यात कुणालाही हशील नसावे. हे लिहिण्याचे कारण मोदींनी त्यांच्या कार्यकर्त्यांना वाचाळविरता करुन ट्रॅप मध्ये न जाण्याचे सुचवले आहे याचे स्मरण.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
न
नाना स्कॉच Fri, 03/25/2016 - 08:06 नवीन
साधुवाद!!!!
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 03/25/2016 - 07:46 नवीन
७. देव देवतांची नग्न चित्र काढणारा हुसैन याला आपल्या धर्माच्या प्रेषितची चित्र काढण्याची का बुद्धि सुचली नाही? ८. आणि चार्ली हेब्दो च्या हल्याची तुलना करता हिंदूंनी हुसैनला कोणती शिक्षा दिली?
नग्नता हे हिंदू धर्मातील कुणाच्याही पावित्र्याच्या मोजणीचे माप नसावे. हिंदू धर्म तुम्हाला तुमचे मन पवित्र ठेवण्यास सांगतो. त्यामुळे या बाबतीत आक्षेप घेणार्‍यांनी स्वतःचे मन शुद्ध करुन मग आक्षेप नोंदवणे श्रेयस्कर असावे किंवा कसे. एम.एफ. हुसैन एकांगी वागला हे नक्की म्हणून त्याला शिक्षा देण्याची भूमिका मनात येणे स्पृहणीय ठरत नसावे उलटपक्षी बघा तुम्हाला व्यक्ति स्वातंत्र्य आहे आता तुमच्या धर्माबद्दल तेच काम करुन दाखवा तसे स्वातंत्र्य तुम्हाला इतर धर्मात मिळत नाही तेव्हा अधिकत्म स्वातंत्र्य देणारा आमचा धर्म श्रेष्ठ ठरतो अशा प्रकारच्या भूमिकेची मांडणी यावयास हवी पण अशी मांडणी करण्यात हिंदू धर्मीय कमी पडतात कारण स्वधर्माच्या अभ्यासातच ते कमी पडतात असे असेल का ? तुम्हाला सरळ आवाहन घ्यायचे नसले तरी प्रेषित अशाच वाळवंटात फिरला असू शकतो म्हणून वाळवंटातील मार्गांची चित्रे काढा आणि उपलब्ध कक्षेत आवाहन द्या. हाकानाका
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 07:57 नवीन
यावरून तुम्ही हिंदू धर्म जास्त सहिष्णु आहे असे दाखवत आहात. तेच तर मला म्हणायचे आहे!
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Fri, 03/25/2016 - 08:03 नवीन
झाले तर मग :)
↩ प्रतिसाद: DEADPOOL
भ
भंकस बाबा Sat, 03/26/2016 - 04:12 नवीन
हुसैनने हिन्दू देवतांची नग्न चित्रे काढली याला आक्षेप नव्हता, आक्षेप होता तो या देवतांची आक्षेपार्ह चित्रे काढली याला! यातील एक हनुमान व् सितेचे चित्र जे अत्यंत हिडिस् स्वरुपात हुसैननें ( या हरामखोरचा उल्लेख एकेरी करत आहे कोणाला आक्षेप असल्यास गेले उड़त) दाखवले होते यासाठी त्याचे तोंड वहाणेने चारचौघात फोडले पाहिजे होते. आमच्या सेकुलरवाद्यानि काय केले,जे हिडिस् दाखवले होते त्याला कलाकृति म्हणुन संबोधले व् सैटनिक व्हर्सेस(सलमान रश्दी) जे भारतात वाचले देखिल गेले नव्हते त्यावर बंदी आणली. आता या लेखकाचे काही साहित्य वाचनात आले होते,माझे प्रांजल मत असे आहे की एका टुकार लेखकाला ब्रिटिशानि आश्रय देऊन सेलेब्रिटी बनवले.
↩ प्रतिसाद: माहितगार
अ
अत्रे Sat, 03/26/2016 - 07:20 नवीन
त्याचे तोंड वहाणेने चारचौघात फोडले पाहिजे होते.
ही "आवडलं नाही की मार त्याला" ची व्रुत्ती माणसात कशी निर्माण होत असेल? शाळेत/घरी झालेल्या "संस्कारांचा" हा परिणाम असेल का?
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
उ
उगा काहितरीच Sat, 03/26/2016 - 08:32 नवीन
नाही आवडलं की वहानेने मारणं परवडलं हो कुठेतरी तर म्हणे नाही आवडलं की कॉलश्निकोव्हने (तिच ती AK-47) मारतात म्हणे. रच्याकने तोंड फोडायची नुसती धमकी की AK-47 काय परवडते पहा.
↩ प्रतिसाद: अत्रे
त
तर्राट जोकर Sat, 03/26/2016 - 08:42 नवीन
एखाद्याला मारण्याची उर्मी महत्त्वाची, वहाण काय किंवा एके४७ काय, साधन महत्त्वाचे नाही.
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
उ
उगा काहितरीच Sat, 03/26/2016 - 09:01 नवीन
ओक्के टीजे ! आमच्या ज्ञानात भर घालण्याबद्दल... (फक्त उदाहरण म्हणून देतोय हघ्या) म्हणजे मी तुम्हाला वहानाने मारलं अन् तुम्ही मला AK -47 ने मारलं तर तुमच्या लेखी हिशेब बरोबर ना ?
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
उ
उगा काहितरीच Sat, 03/26/2016 - 09:07 नवीन
हा प्रतिसाद असा हवा... ओक्के टीजे , धन्यवाद !आमच्या ज्ञानात भर घालण्याबद्दल... (फक्त उदाहरण म्हणून देतोय हघ्या) म्हणजे मी तुम्हाला वहानाने मारलं अन् तुम्ही मला AK -47 ने मारलं तर तुमच्या लेखी हिशेब बरोबर ना ?
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
त
तर्राट जोकर Sat, 03/26/2016 - 09:37 नवीन
अस्सं नाही मांडाय्चं दादा. दोघांकडेही एक-४७ आणि वहाणा दोन्ही आहेत, कोण कशाने कशासाठी मारतो हे बघून हिशोब करायचे की नाही? शार्ली हेब्दो आणि दादरी दोन घटना ठेवा उदाहरण म्हणून समोर. मारण्याच्या उर्मीला साधनांची आवश्यकता नसते. मूळ प्रश्न हुसैनचा. तो हुसैन आहे म्हणुन सगळा तळतळाट. अन्यथा नग्न देवी देवता चितारनारे हिंदुस्थानात लै होऊन गेलेत.
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
अ
अत्रे Sat, 03/26/2016 - 09:36 नवीन
कशाने मारतो ते त्या साधनाच्या उपलब्धतेवर अवलंबून असावे. AK 47 असली असती तर ती वापरली नसती कशावरुन?
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
उ
उगा काहितरीच Sat, 03/26/2016 - 09:51 नवीन
अहो साहेब , AK-47 हे उदाहरण आहे. थोडं समजून घ्याना . नसेल AK उपलब्ध मग काय घरातील चाकू, सुरी, वगैरे वगैरे बरेचसे जबरदस्त आघात करणारे शस्त्र उपलब्ध असतातच की! उपयोग केला का कुणी त्यांचा त्या चित्रकार महोदयाविरूद्ध. ते महोदय वयाच्या ९५ व्या वर्षी वारले नैसर्गिक कारणांमुळे . पण चार्ली हेब्दो चे चित्रकार अनैसर्गिक रित्या मारल्या गेले. असो , डोळे बंद करून रात्रच आहे असा विश्वास बाळगणार्यांना मी बापूडा काय समजावणार ? या विषयावर , या लेखावर हा माझा शेवटचा प्रतिसाद .
↩ प्रतिसाद: अत्रे
त
तर्राट जोकर Sat, 03/26/2016 - 10:06 नवीन
मी शार्ली हेब्दोचे अजिबात समर्थन करत नाही पण तुम्ही तेच उदाहरण वापरुन हिंदु कसे सहिस्नु आहेत ह्याची मांडणी करत आहात. दोन्ही घटनांमधले कित्येक फरक लक्षात घेणार की नाही. नुसतं एखाद्याला जीवे मारणे किम्वा न मारणे इतकंच साम्य आहे दोन घटनेत. तेवढ्यावरुन तुम्ही स्वर्ग गाठत आहात. शिवाय हुसैनला जीवाच्या भीतीने देश सोडावा लागला हे सोयिस्कर विसरत आहात ते वेगळे.
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
श
श्रीगुरुजी Sat, 03/26/2016 - 12:33 नवीन
शिवाय हुसैनला जीवाच्या भीतीने देश सोडावा लागला हे सोयिस्कर विसरत आहात ते वेगळे.
हुसेनला जीवाच्या भीतिने देश सोडावा लागला ही एक लोणकढी अफवा निधर्मांधांनी हिंदुत्ववाद्यांना बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक पसरवली आहे. हिंदुत्ववाद्यांच्या भीतिने हुसेनने देश सोडला असे ही मंडळी वारंवार सांगून हिंदुत्ववाद्यांची बदमानी करीत आहेत. हुसेनच्या चित्रांविरूद्ध न्यायालयात खटले दाखल होण्यापूर्वीच व वादंग निर्माण होण्यापूर्वीच हुसेनने भारत सोडला होता. दस्तुरखुद्द हुसेननेच आपल्या मुलाखतीत काय सांगितले आहे ते वाचा. I have not fled India, said MF Husain in his last interview _________________________________________________ In his last interview to BBC Hindi in October 2010, the 95-year-old painter had said that he left India in 2005 (not in 2006 as widely reported), mainly to pursue three major projects, and not because of the controversy caused by some paintings upsetting sections of Hindu society. "I am not in self-exile", the artist, who was one of the pioneers of modern art in India, had said firmly. He said: "I left India in 2005; then nothing of this (protests by Hindu activists) had happened. I wanted to do three major projects that I could not do in India, because I needed sponsors. I still deny it, I am not in exile". http://timesofindia.indiatimes.com/india/I-have-not-fled-India-said-MF-Husain-in-his-last-interview/articleshow/8791202.cms
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
D
DEADPOOL Sat, 03/26/2016 - 12:37 नवीन
गुरुजी किती वाट पाहीली? ड्वले पाणावले!!
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 03/26/2016 - 12:59 नवीन
हुसेनची एनडीटीव्ही च्या बरखा दत्त ने घेतलेली अजून एक मुलाखत - http://www.ndtv.com/india-news/full-transcript-of-mf-husains-interview-411979 या मुलाखतीत हुसेन वारंवार सांगतो आहे की मला ३ वेगळे प्रोजेक्ट्स करायचे होते व त्याला भारतात स्पॉन्सर नव्हता. त्याला भारताबाहेर स्पॉन्सर मिळाल्यामुळे त्याने भारत सोडला. परंतु बरखा दत्त त्याला वारंवार हेच विचारत आहे की त्याच्या चित्रांमुळे झालेल्या वादंगामुळे देश सोडला का. किंबहुना याच चुकीच्या गृहितकावर विसंबून वारंवार त्याच संबंधी प्रश्न विचारले गेले. बरखा दत्त च्या दुर्दैवाने हुसेनने एकदाही तिला पाहिजे तसे उत्तर दिले नाही.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
त
तर्राट जोकर Sat, 03/26/2016 - 13:08 नवीन
एम एफ हुसैन प्रकरणाची टाइमलाईन काय आहे हो गुरुजी? त्याने भारत सोडल्यानंतर प्रोटेस्ट सुरु झालेत का? पेंटींग्स तर १९७० पासून बनवलेली आहेत. http://www.frontline.in/static/html/fl1510/15100210.htm ही बातमी १९९८ ची आहे. His paintings allegedly hurt the religious sentiments of Hindu nationalist groups, which beginning in the 1990s mounted a campaign of protest against him. The paintings in question were created in 1970, but did not become an issue until 1996, when they were printed in Vichar Mimansa, a Hindi monthly magazine, which published them in an article headlined "M.F. Husain: A Painter or Butcher". In response, eight criminal complaints were filed against him. In 2004, Delhi High Court dismissed these complaints of "promoting enmity between different groups ... by painting Hindu goddesses – Durga and Sarswati, that was later compromised by Hindu fundamentalist groups." In 1998 Husain's house was attacked by Hindu fundamentalist groups like Bajrang Dal and art works were vandalised. The leadership of another fundamentalist political party Shiv Sena endorsed the attack. Twenty-six Bajrang Dal activists were arrested by the police. Protests against Husain also led to the closure of an exhibition in England. आता तो म्हणतोय २००५ ला भारत सोडला तेव्हा काही वादग्रस्त नव्हते. पण फॅक्ट्स तर फॅक्ट्स आहेत. त्या काय वेगळंच सांगत आहेत.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 03/26/2016 - 13:16 नवीन
फ्रंटलाईन हे कोणत्या विचारसरणीच्या लोकांचे प्रकाशन आहे हे माहित असले तर असले प्रश्न पडणार नाहीत. दस्तुरखुद्द हुसेनने दोन वेगवेगळ्या मुलाखतीत (एक टाइम्स ऑफ इंडियामध्ये व दुसरी एनडीटीव्हीला दिलेली मुलाखत व या दोन्ही वृत्तसंस्था कोणत्या विचारसरणीच्या आहेत हे माहित असेलच) एकच गोष्ट सांगितली आहे. बरखा दत्तने वारंवार हुसेनच्या तोंडून हे वदवायचा प्रयत्न केला की हिंदुत्ववाद्यांच्या भीतिने त्याने देश सोडला. परंतु हुसेनने एकदाही तसे सूचित न करता त्याला जे पाहिजे आहे तेच सांगितले. इथे दसुरखुद्द हुसेन कतारमध्ये बसून वस्तुस्थिती सांगतो आहे आणि ते सोडून फ्रंटलाईनवर विश्वास ठेवायचा?
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sat, 03/26/2016 - 13:39 नवीन
साहेब, हुसैन काय बोलला, का बोलला ते नंतर पाहु. आधी एवढंच सांगा, हुसैनच्या पेंटींगबद्दलचा वाद त्याने भारत सोडल्यावर सुरु झाला का? २००५ च्या नंतर सुरु झाला काय? आणि बजरंग दल च्या हुसैनच्या घरावरिल हल्ल्याची बातमी खोटी आहे काय? पोलिसांनी सव्वीस कार्यकर्त्यांना अटक केली ते खोटे आहे काय? १९९६ मधे ही पेंटींग्स विचार मिमांसामधे M.F. Husain: A Painter or Butcher ह्या टायटलसह छापुन आली ते खोटे आहे काय? तुम्ही एनडीटीवीचाच हवाला देताय त्यांच्या साईटीवरच ही बातमी मिळाली. http://www.ndtv.com/india-news/interesting-trivia-on-m-f-husain-411618?site=full
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 03/26/2016 - 16:07 नवीन
हुसेनच्या चित्रांबद्दलचा वाद त्याने २००५ मध्ये भारत सोडण्यापूर्वी बरीच वर्षे म्हणजे १९९६ मध्ये सुरू झाला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी घरावर हल्ला करून काही चित्रांची नासधूस केली होती. परंतु हा हल्ला हुसेनवर नसून त्या चित्रांवर होता. या हल्ल्यानंतरही अनेक वर्षे हुसेन भारतात होता. २००५ मध्ये भारत सोडण्याचे कारण दस्तुरखुद्द हुसेनने २ वेगवेगळ्या मुलाखतीत अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. १९९६ मधील घरावरील हल्ला किंवा सुरू असलेले खटले हे त्यामागचे कारण नव्हतेच. तुमचा मूळ मुद्दा "हुसेनचे जीवाच्या भीतिने देश सोडला" हा पूर्ण चुकीचा होता. दस्तुरखुद्द हुसेननेच हे स्पष्ट केले आहे. बरखा दत्तने अनेकवेळा खोदूनखोदून एकसारखे प्रश्न विचारून त्याच्या तोंडून हे वदवून घ्यायचा प्रयत्न केला की देश सोडण्यामागे हिंदुत्ववादी हे कारण होते. परंतु हुसेनने आपली भूमिका सोडली नाही की देश सोडण्यामागे पूर्ण वेगळे कारण होते. बरखा दत्त ने घेतलेली मुलाखत वाचून मला समझोता एक्स्प्रेस बाँबस्फोटाची आठवण झाली. बाँबस्फोटानंतर पाकिस्तानमधील अतिरेकी संघटनेने त्याची जबाबदारी घेतली होती. प्रत्यक्ष पाकिस्तानच्या एका मंत्र्याने त्या बॉम्बस्फोटामागे पाकिस्तानमधील संघटना आहे असे अधिकृत निवेदन केले होते. पण युपीएवाले म्हणत राहिले की बॉम्बस्फोट तुम्ही नाही केला. तुम्ही निर्दोष आहात. तो आमच्याच देशातल्या हिंदुत्ववाद्यांनी केला. अशी भूमिका घेऊन पाकिस्तानला क्लीन चिट देऊन विनाकारण काही हिंदुत्ववाद्यांना त्या खटल्यात युपीए सरकारने अडकविले. या अत्यंत चुकीच्या भूमिकेचे परीणाम भारत आजही भोगत आहे. गंमत अशी की हुसेनच्या मुलाखतीत हुसेनने अनेकवेळा स्पष्ट करूनसुद्धा बरखा दत्त चा गोबेल्सरूपी प्रचार कायम राहिला. हुसेनच्या मृत्युनंतर केलेल्या ट्वीटमध्ये तिने खालील वाक्ये लिहिली होती. Such shame that an artist who put India on the global stage spent his last years in exile. Atleast in his death give Husain a sense of home, tweeted NDTV editor Barkha Dutt. हुसेनच्या बाबतीत असेच घडले. दस्तुरखुद्द हुसेन सांगतोय की मी माझ्या प्रोजे़क्टसाठी व स्पॉन्सर मिळविण्यासाठी भारत सोडला. देश सोडण्यामागे हिंदुत्ववाद्यांचा काहीही संबंध नव्हता. पण निधर्मांध मात्र हे ठासून सांगण्याचा प्रयत्न करताहेत की देश सोडला तो हिंदुत्ववाद्यांमुळे.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sat, 03/26/2016 - 16:52 नवीन
काय तुम्ही बरखा दत्तला घेउन बसता होत सारखे सारखे. हुसैन ला जीवानिशी मारण्याच्या धमक्या मिळाल्या नव्हत्या का?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 03/27/2016 - 12:27 नवीन
हुसेनला जीवानिशी मारण्याच्या धमक्या मिळालेल्या नव्हत्या. तुमचा मूळ मुद्दा - "हुसेनला जीवाच्या भीतिने देश सोडावा लागला", पूर्णपणे असत्य आहे हे दस्तुरखुद्द हुसेनच्या २ मुलाखतीतून केव्हाच स्पष्ट झाले आहे.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
श
श्रीगुरुजी Sun, 03/27/2016 - 12:31 नवीन
तुम्ही एनडीटीवीचाच हवाला देताय त्यांच्या साईटीवरच ही बातमी मिळाली.
एनडीटीव्ही च्या बातम्या अत्यंत पक्षपाती असतात. मी दोन लिंक्स दिल्या आहेत. एक टाईम्सची व दुसरी एनडीटीव्हीची. दोन्हीमध्ये बातमी नसून हुसेनच्या मुलाखती आहेत. हुसेनने आपण २००५ मध्ये भारत का सोडला हे अत्यंत स्पष्टपणे व वारंवार सांगूनसुद्धा हुसेनने जीवाच्या भीतिने भारत सोडला हे असत्य एनडीटीव्ही गोबेल्स तंत्राने वारंवार सांगत आहे. शक्य असतं तर एनडीटीव्ही ने हुसेनची मुलाखत सुद्धा एडीट करून त्यात आपल्याला हवी ती वाक्ये टाकली असती.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 03/28/2016 - 13:28 नवीन
His detractors questioned whether he would ever paint his own mother in the nude as he had painted India. “Their reactions are purely political,” Husain tells AAP.“These are political parties that do it to garner support. I never responded. Later, they became more violent, and that led me to move to the United Arab Emirates, but I continue making my work.” http://artasiapacific.com/Magazine/70/MFHusainFacedWithPromiseAndProtest
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 03/28/2016 - 17:18 नवीन
"artasiapacific" हे चित्रकलेला वाहिलेले मासिक दिसते. संपूर्ण लेखात हुसेनचे कौतुक आहे व ज्या चित्रांमुळे वाद निर्माण झाले त्यावर हिंदू संघटनाच दोषी आहेत असा लेखात कल दिसतो. मी वर दिलेल्या टाइम्स ऑफ ईंडिया च्या मुलाखतीत हुसेनचे स्पष्टपणे खालील वाक्ये सांगितली आहेत. In his last interview to BBC Hindi in October 2010, the 95-year-old painter had said that he left India in 2005 (not in 2006 as widely reported), mainly to pursue three major projects, and not because of the controversy caused by some paintings upsetting sections of Hindu society. या मुलाखतीची चित्रफीत सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे हुसेन जे बोलला ते ऐकता व बघता येते. वरील मासिकात तपशीलाच्या चुका आहेत. हुसेनने २००६ मध्ये भारत सोडला असा उल्लेख आहे. प्रत्यक्षात आपण २००५ मध्येच भारत सोडला असे हुसेन स्वतःच सांगतो. वरील मासिक आंतरराष्ट्रीय चित्रकारांनी चालविलेले दिसते. भारतात कशी असहिष्णुता आहे हे सांगण्यात ही मंडळी पुढे असतातच. हुसेनच्या वरील मुलाखतीचे संपूर्ण टेक्स्ट दिलेले नाही. मुलाखतीची चित्रफीतही दिलेली नाही. यात हुसेनच्या तोंडात टाकलेल्या वाक्यांवर कितपत विश्वास ठेवायचा ? याउलट टाईम्सच्या मुलाखतीचे संपूर्ण टेक्स्ट व चित्रफीत उपलब्ध आहे व त्यात त्याने अत्यंत स्पष्टपणे सांगितले आहे की माझ्या चित्रांवर झालेल्या वादामुळे मी भारत सोडलेला नसून माझ्या प्रोजेक्टसाठी भारत सोडलेला आहे. याचाच पुनरूच्चार त्याने एनडीटीव्ही ला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत केलेला आहे. जर या मासिकात हुसेनने सांगितलेले खरे असेल तर तो बाकीच्या दोन सविस्तर मुलाखतीत खोटे बोलला असे दिसते.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
श
श्रीगुरुजी Mon, 03/28/2016 - 17:23 नवीन
“Their reactions are purely political,” Husain tells AAP.“These are political parties that do it to garner support. I never responded.
"I never responded" हे देखील खरे नाही. हुसेनने नंतर भारतमातेचे नग्न चित्र काढल्याबद्दल माफी मागून चित्र मागे घेतले होते. कतार, लंडन व दुबईत रहात असताना व भारतात परतण्याची अजिबात शक्यता नसताना व त्यामुळे हिंदू संघटनांच्या तथाकथित धमक्यांची अजिबात भीति नसताना हुसेनने हे चित्र मागे का घेतले? एकंदरीत या मासिकात हुसेनच्या तोंडात ही टाकलेली वाक्ये खरी दिसत नाहीत. हुसेन जे बोललाच नाही ते त्याच्या तोंडी टाकलेले दिसते.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sat, 03/26/2016 - 13:45 नवीन
अजून एक दुवा. Communalising art Ruckus over a 20-year-old work by the painter raises questions about artistic freedom. Madhu Jain October 31, 1996 | UPDATED 11:47 IST http://indiatoday.intoday.in/story/m-f-husain-20-year-old-painting-of-nude-deity-raises-questions-about-artistic-freedom/1/282509.html
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
D
DEADPOOL Mon, 03/28/2016 - 05:30 नवीन
टाइमलाइन ला महत्व प्रत्येक वेळी असतेच असे नाही. समजा तुम्ही घरात २५ वर्षापासून बेकायदेशीर बंदुका लपवून ठेवल्या आहेत आणि जर त्या आज सापडल्या तर तोंड वर करून न्यायालयात 'जरा टाइमलाइन बघा की' असं म्हणणार का?
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 03/28/2016 - 13:06 नवीन
टाइमलाईन बघणे आपल्या सोयीनुसार नसते. तुमच्या प्रतिसादात तुम्ही इतके लाचार दिसत आहात त्यावरुन स्पष्ट आहे की तुम्हाला तुमचे मत हेच तुम्हाला सत्य मानायचे आहे. टाइमलाईनला महत्त्व प्रत्येकवेळी असतेच असे नाही असं म्हणताय तुम्ही? म्हणजे तुम्हाला वाटेल तेव्हा महत्त्व, तुमचे मुद्दे फसत असतील तेव्हा नाही. गुड. मग गुजरात दंगलीला गोध्रा हे कारण का दिले जाते, साहेब? जावा, काहीतरी चांगले पाइंट घेउन यावा.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Tue, 03/29/2016 - 11:40 नवीन
प्रतिसादात तुम्ही इतके लाचार दिसत आहात >>>>>>> जेव्हा आपल्या मनाविरुद्ध प्रतिसाद येतो तेव्हा ही भाषा वापरली जाते.!
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 03/29/2016 - 11:49 नवीन
तुमच्या प्रतिसादात भुमिका तशीच दिसते आहे. की बॉ, 'मी काहीच्या काही लिहिन तुम्ही असं सम्जुन घ्या की मुद्दा खोडला गेलाय'. ह्याला तुमच्याकडे दुसरा काही शब्द असेल तर तो वापरा.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Tue, 03/29/2016 - 13:04 नवीन
त जो मी कशी भाषा वापरत आहे हे चांगलंच ठाऊक आहे मला! आपण मात्र वैयक्तिक हल्ला करता आहात!
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 03/29/2016 - 13:13 नवीन
समजा तुम्ही घरात २५ वर्षापासून बेकायदेशीर बंदुका लपवून ठेवल्या आहेत आणि जर त्या आज सापडल्या तर तोंड वर करून न्यायालयात 'जरा टाइमलाइन बघा की' असं म्हणणार का? ही काय भाषा आहे? ह्यात मुद्दा तरी काय आहे? मी कोणता वैयक्तिक हल्ला केला? असो.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Sat, 03/26/2016 - 12:39 नवीन
दोन्ही घटनांमधले कित्येक फरक लक्षात घेणार की नाही. नुसतं एखाद्याला जीवे मारणे किम्वा न मारणे इतकंच साम्य आहे >>>>>>> म्हणजे तुम्हाला कोणी जिवे मारले किंवा न मारले त्यात नुसतं एखाद्याला जीवे मारणे किम्वा न मारणे इतकंच साम्य आहे
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
D
DEADPOOL Sat, 03/26/2016 - 12:39 नवीन
दोन्ही घटनांमधले कित्येक फरक लक्षात घेणार की नाही. नुसतं एखाद्याला जीवे मारणे किम्वा न मारणे इतकंच साम्य आहे >>>>>>> म्हणजे तुम्हाला समजा कोणी जिवे मारले किंवा न मारले त्यात नुसतं एखाद्याला जीवे मारणे किम्वा न मारणे इतकंच साम्य आहे
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sat, 03/26/2016 - 12:57 नवीन
शब्दांचे खेळ खेळायला मला वेळ नाही. तुम्हाला आहे तुम्ही खेळा. नॉट इण्टरेस्टेड सिरियसली.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Tue, 03/29/2016 - 16:55 नवीन
म्हणजे तुम्हाला समजा कोणी जिवे मारले किंवा न मारले त्यात नुसतं एखाद्याला जीवे मारणे किम्वा न मारणे इतकंच साम्य आहे >>>>>> यावर आपले उत्तर ऐकण्यास आवडेल!
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
D
DEADPOOL Tue, 03/29/2016 - 16:56 नवीन
आणि काय आहे माणूस आपल्याच शब्दात अडकून पडला की त्याचा इंटरेस्ट जातो हो!
↩ प्रतिसाद: DEADPOOL
अ
अत्रे Sat, 03/26/2016 - 10:28 नवीन
मान्य आहे, पण माझा रोख याकडे होता की आपल्या (as in our) भाषेत आपण हिंसेचा वापर किती सहजतेने करतो. असा भारत पाहिजे की लेखक, चित्रकार, विद्यार्थी यांना चप्पल काय, चापट सुद्धा मारण्याचा विचार मनात नाही आला पाहिजे. आपला standard सौदी अरेबिया वरुन का म्हणून ठरवायचा?
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
त
तर्राट जोकर Sat, 03/26/2016 - 10:41 नवीन
आपला standard सौदी अरेबिया वरुन का म्हणून ठरवायचा? >>> मिलियन डॉलर क्वश्चन. आणि नेहमीचाच. =))
↩ प्रतिसाद: अत्रे
D
DEADPOOL Sat, 03/26/2016 - 12:43 नवीन
असा भारत पाहिजे की लेखक, चित्रकार, विद्यार्थी यांना चप्पल काय, चापट सुद्धा मारण्याचा विचार मनात नाही आला पाहिजे.>>>>>>> आणि त्यात कलाकारांनी आपल्या धर्माचाच मान न ठेवता दुसऱ्या धर्माचासुद्धा मान ठेवला पाहिजे. आणि मान ठेवता येत नसेल तर अपमान तरी करू नये!
↩ प्रतिसाद: अत्रे
न
नाना स्कॉच Sat, 03/26/2016 - 12:48 नवीन
धर्म (मग तो कुठलाही असो) लॉजिकल असतो असा आपला गैरसमज दिसतो!
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Mon, 03/28/2016 - 05:32 नवीन
नाही पण आमचा हिंदू धर्म लॉजिकलच आहे असा आमचा अत्यंत खात्रीशिर समज आहे!
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Tue, 03/29/2016 - 03:52 नवीन
नाही बाकी तुमची खात्री वगैरे बद्दल आदर आहेच, फ़क्त कुठलाही धर्म लॉजिकल नसतो हे मी म्हणतो, अन सिद्ध ही करू शकतो, पण बघा असहिष्णुता कायम होती हे मी मांडले स्वतः, आता मान आपला, तुम्ही तुमचा तर्क मांडा (ज्याच्यामुळे तुम्हाला हिंदूधर्म लॉजिकल वाटतो), मी त्याला खंडन म्हणून माझ्या तर्काची उदाहरणे देतो, lets enjoy the good art of debating ! जर आपली इच्छा असेल तर बॉटम लाइन :- 1 मी जेव्हा कुठलाच धर्म लॉजिकल नसतो असे म्हणतो तेव्हा मला कुठल्याच एका धर्माचा अधिक्षेपही करायचा नसतो अन कुठल्या एकाच्या नावं उदोउदो सुद्धा नाही 2 धर्म लॉजिकल नाहीत हे मी काळ सुसंगत उदाहरणे देऊन सिद्ध करू शकतो 3 धर्मं लॉजिकल नसतात असे विधान केल्यामुळे अहमहमिका लावुन माझ्यावर शिक्के मारले जाऊ नयेत , माझे आव्हान खुल्या वादाचे आहे अन मी माझ्याकडून सभाशास्त्राचे नियम पाळले जाण्याची ग्वाही देतो , बाकी प्रत्येकाचा अभ्यास वकुब वगैरे
↩ प्रतिसाद: DEADPOOL
न
नाना स्कॉच Sat, 04/02/2016 - 06:45 नवीन
अंतर्धान पावले का डेडपूल जी!
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
D
DEADPOOL Sat, 04/02/2016 - 07:18 नवीन
नाही हो आहे मी! हिंदू धर्मात काही इल्लोजीकल गोष्टी होत्या, पण काळानुसार त्यांवर त्यांनी मात केली उदा सती प्रथा, केशवपन ई. आणि मुख्य म्हणजे धर्माने धर्मसुधारकांचे विचार मान्य केले, लगेच शरियत शरियत करून डोके नाही उडविले! आजची ताजी बातमी सर्वोच्च न्यायालयच्या निर्णयांचा आदर करून शनि शिंगनापुर देवस्थानाच्या विश्वासतांनी महिलांना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करणार नाही असे सांगितले!
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा