Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हिंदुत्व आणि असहिष्णुता! - भाग १

D
DEADPOOL
गुरुवार, 03/24/2016 - 10:21
🗣 482 प्रतिसाद
भारतात म्हणे असहिष्णुता वाढीस लागली आहे! जर भारतात असहिष्णुता आहे तर बोंबाबोंब करणाऱ्यानी खालील प्रश्नाची उत्तरे द्यावीत! १.क्षणोक्षणी बाबरीचा उल्लेख करणाऱ्यानी आजपर्यंत प्रत्येक इस्लामिक शासकांनी किती मंदिरे पाडलीत याचा हिशेब द्यावा! २. जर असहिष्णुता वाढली असेल तर हिंदूंचा आराध्य प्रभु श्रीराम याचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करणाऱ्या ओवेसीवर एकाही हिंदूने हल्ला केला का? ३. भारतात ८० कोटी हिंदू आहेत तरीही यू आर अनंतमूर्ती यांचे विधान ऐकून किती हिंदूनी दंगली केल्या? ४. सरकार उजवे आहे व अल्पसंख्यविरोधी आहे तर अजूनपर्यंत अल्पसंख्य आरक्षण का संपवले नाही? ५. दादरी प्रकरनाचा गाजावाजा करतांना तुम्हाला मुम्बईची दंगल आठवत नाही? ६. असहिष्णुता वाढली आहे म्हणून देश सोडून जाऊ म्हणणारे किती लोक देश सोडून गेले ७. देव देवतांची नग्न चित्र काढणारा हुसैन याला आपल्या धर्माच्या प्रेषितची चित्र काढण्याची का बुद्धि सुचली नाही? ८. आणि चार्ली हेब्दो च्या हल्याची तुलना करता हिंदूंनी हुसैनला कोणती शिक्षा दिली? ९. आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न हिंदूंना का पडला नाही? १०. तथाकथित धर्मचिकित्सक व विचारवंत हिंदूधर्माचीच का चिकित्सा करतात? (दुसऱ्या शब्दात का टीका करतात?) अजूनही बरेच प्रश्न आहेत पण त्याबद्दल नंतर!

प्रतिक्रिया द्या
62422 वाचन

💬 प्रतिसाद (482)
श
श्रीगुरुजी Sun, 03/27/2016 - 12:11 नवीन
तर सर्व सदस्यांना एक प्रश्नः उद्या शार्ली हेब्दोसारखेच हिंदु देवतांची तशीच आक्षेपार्ह चित्रे कार्टून्स कोणी भारतीय मासिकाने खास हिंदूं धर्मांधांना उचकवण्यासाठी बनवलीत आणि देशभर प्रकाशित केलीत, जाहिरातींतुन दाखवलीत तर बनवणारे व छापणारे आयुष्यभर सुरक्षित राहतील ह्याची खात्री आपण देऊ शकता का? तेवढी सहिष्णुता हिंदूंमधे आहे ह्याची खात्री आहे काय?
तुम्ही समजता त्यापेक्षा कितीतरी जास्त सहिष्णुता हिंदूंमध्ये आहे. दोन उदाहरणे देतो. (१) हुसेनने हिंदू देवदेवतांविषयी अत्यंत आक्षेपार्ह चित्रे काढूनसुद्धा हिंदूंच्या सहिष्णुतेमुळे तो शेवटपर्यंत सुरक्षित होता व शेवटी वयाच्या ९६ व्या वर्षी वृद्धापकाळामुळे त्याचा नैसर्गिक मृत्यु झाला. (२) तिस्ता सेटलवाड या महिलेने २२ ऑगस्ट २०१४ मध्ये एक अत्यंत आक्षेपार्ह चित्र ट्विटरवर टाकले होते. on 22 August 2014, she posted on Twitter a collage of morphed images in which the faces and attributes of Hindu gods and goddesses were superimposed on chilling photographs of the ISIS terrorists mercilessly executing their victims, with the caption of “Chilling Reality”. There was an image of Goddess Kali, one of the most revered Hindu Goddesses, with the face of a terrorist, holding a severed, bleeding head. Another terrorist was shown standing in front of a rackful of severed heads, wielding the Sudarshan Chakra, a dharmic weapon of Lord Vishnu meant to eradicate evil forces. The terrorist that posed with the slain photojournalist James Foley just before decapitating him was shown with a halo like a Hindu god. त्या चित्राविरूद्ध प्रचंड गदारोळ उठल्याने शेवटी तिने ते चित्र मागे घेऊन माफी मागितली. बादवे, हिंदूंच्या सहिष्णुतेमुळे ती अजूनही सुरक्षित आहे. एवढे होऊनसुद्धा तिचे कलाकाराच्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचे टुमणे सुरूच होते. In another statement, despite having apologised for “hurting religious sentiments,” Teesta Setalvad says that people should be open minded regarding such depictions in the name of artistic freedom. Artistic freedom surely is a sign of civilizational progress and nobody in his or her sane mind would disagree and ideally, there should also be freedom to offend. But the reality is different: we don’t live in an ideal world, and two, in the name of artistic freedom, all these so-called artists, do is, run their own anti-Hindu campaigns. Why can’t their artistic freedom show the face of Prophet Mohammed on one of these terrorists?
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
D
DEADPOOL Tue, 03/29/2016 - 17:10 नवीन
हिंदुंच्या भावना मुस्लिमांसारख्या भडकायला लागल्या तर फरक काय राहिला मग>>>>>>>>> धन्यवाद तजो
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
D
DEADPOOL Tue, 03/29/2016 - 17:18 नवीन
म्हणजे हिंदू मुस्लिमांसारखे कशावरूनही भड्कत नाहीत. याचाच अर्थ हिंदू धर्माबाद जास्त सहिष्णू आहे
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Tue, 03/29/2016 - 17:18 नवीन
म्हणजे हिंदू मुस्लिमांसारखे कशावरूनही भड्कत नाहीत. याचाच अर्थ हिंदू धर्म जास्त सहिष्णू आहे
↩ प्रतिसाद: DEADPOOL
ट
टवाळ कार्टा Sun, 03/27/2016 - 08:17 नवीन
65च्या युद्धात ब्लैक आउट असताना पाकिस्तानी विमानाना रस्ता समजावा म्हणुन भेंडीबाजार, नागपाड़ा भागात गच्यावर दिवे लावले गेले.
हे झालेले????
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
न
नाना स्कॉच Sun, 03/27/2016 - 09:23 नवीन
छपरावर दिवे लावुन कोण फुकटचा फायरसेल घेणार आपल्याच घरावर! ?? कारण युद्धात पाकिस्तानला भारतास इजा पोचवणे हा एकमेव एजेंडा राबवायचा होता. त्यामुळे त्यांनी काही बुआ "हा आपल्या 'लोकांचा' एरिया आहे इकडे नको बॉम्ब टाकायला" म्हणले नसते, नाही का?? शिवाय फाळणीपासुन तिकडले इकड़ल्यांना "मोहाजीर" म्हणतात हे अजुन परत आठवण करून द्यायला नकोय नाही का?? असल्या गोष्टी सांगोवांगी ने पसरतात, आम्ही लहान असताना सुद्धा आम्ही आमच्या गावी ऐके 47 न भरलेला ट्रक सापडल्याचे ऐकले होते! अर्थात ती अफवा होती तरी बालपणीचा काहीकाळ त्यावर विश्वास बसला देखील होता!. असल्या वदंता आपण कधीतरी ऐकून खऱ्या मानणे हे समजले जाऊ शकते पण त्या सार्वजनिक संस्थळावर लिहिताना ते सत्यापित असणे गरजेचे असते असे वाटते नाहीतर त्याला सेन्सेशनलिस्ट क्लेम सोडुन जास्त किंमत नसेल.
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
भ
भंकस बाबा Sun, 03/27/2016 - 16:55 नवीन
नाना साहेब ही बातमी तुम्ही भेंडीबाजार भागात रहाणाऱ्या एखाद्या परिचिताकडून माहिती का करून घेत नाही? पाकिस्तानचा हां नाराच होता की 'हसके लिया पाकिस्तान, लङके लेंगे हिंदुस्तान'. वस्तुस्थिति अशी होती की पाकिस्तानी विमाने मुंबईपर्यन्त पोहोचलीच नाही. यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? 93 च्या ब्लास्ट मधे स्फोटक कुठे प्लॉट केलि होती ते माहीत आहे ना? शेयरबाजाराच्या व् एयरइंडियाच्या इमारतिच्या बेसमेंटमधे! उद्देश् होता या इमारती पाडण्याचा! किती जीवितहानि झाली असती यात? प्लाट करणारे भारतीयच होते ना?
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
D
DEADPOOL Tue, 03/29/2016 - 17:20 नवीन
प्लॅंट करणारे भारतीय मुस्लिमच होते ना?
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
अ
अत्रे Sat, 03/26/2016 - 19:01 नवीन
@ तजो या विषयावर सेपरेट धाग्याचे पोटेन्शिअल आहे. तुम्ही टाका चित्र, सोबत रत्नाकर मतकरींचा हा लेख रेफर करतो https://www.facebook.com/ganesh.matkari/media_set?set=a.10153331291328999.1073741879.578143998&type=3
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sat, 03/26/2016 - 19:50 नवीन
धन्यवाद अत्रेसाहेब, जमलं तर काढीन. हुसैनची ती सारी चित्रे वादग्रस्त आहेत पण त्या चित्रांमागचा हुसैन हे तथाकथित हिंदुत्ववादी रंगवतात तसा नाही. ज्याला हुसैनची तमाम जीवनकहानी माहित असेल त्याला त्या चित्रांबद्दल आक्षेप असायचे कारण नाही. पण आक्षेप धंदेवाईक राजकिय पक्ष घ्यायला लागले. आपल्या फायद्यासाठी ह्यांनी सगळे देव बाजारात उभे केले, राममंदिरापासून गायीपर्यंत. १९७० मधे बनवलेल्या पेंटींगबद्दल १९९६ नंतर विवाद व्हायला सुरुवात झाली. शिवसेनेच्या नेत्याने हुसैनचे हात कापायला बक्षिस जाहीर केले तरी श्रीगुरुजी म्हणतात जीवाच्या धोक्याने तो पळाला नाही. हास्यास्पद आहे सगळं. अरे, केलंय तर म्हणा ना केलंय म्हणून. करायचेही आणि घाबरायचेही कि आम्हाला कोणी असहिष्नु म्हणू नये.
↩ प्रतिसाद: अत्रे
श
श्रीगुरुजी Sun, 03/27/2016 - 12:18 नवीन
शिवसेनेच्या नेत्याने हुसैनचे हात कापायला बक्षिस जाहीर केले तरी श्रीगुरुजी म्हणतात जीवाच्या धोक्याने तो पळाला नाही. हास्यास्पद आहे सगळं.
कमाल आहे. हे मी म्हणत नाहीय्ये. माझ्या नावावर काहीही खपवू नका. मी दिलेल्या लिंक्समधील हुसेनच्या मुलाखती नीट वाचा. दस्तुरखुद्द हुसेन हे स्वतःच सांगतोय दोन वेगवेगळ्या मुलाखतीत. मुलाखतीत अनेक वेळा सूचक प्रश्न विचारूनसुद्धा हुसेनचे उत्तर बदललेले नाही. एकदा कतारचे नागरिकत्व घेतल्यावर हुसेनला भारतात कधीही परतायचे नव्हते व सर्व मुलेबाळे, नातेवाईक स्वतःजवळ असताना जे काय घडले होते ते खरे सांगायची अजिबात भीति नव्हती कारण जर कोणी जीवे मारायच्या धमक्या दिल्याच असतील तर ते काही कतारमध्ये जाऊन त्याला मारणार नव्हते. म्हणजे कतारमध्ये बसून कोणतेही दडपण व भीति नसताना सुद्धा हुसेन वारंवार सांगतो आहे की मी भारत सोडला तो माझ्या प्रोजेक्टसाठी. पण यांचा हेका कायम आहे की हुसेन जीवाच्या भीतिने पळाला. फारच हास्यास्पद आहे हे सगळं. हे वाचून पुन्हा एकदा समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटाची आठवण झाली. पाकडे स्वत:हून सांगताहेत की आम्हीच तो बॉम्बस्फोट केला आणि इकडे युपीएवाले हेका धरून बसलेत की तुम्ही नाही तो केला, तो हिंदुत्ववाद्यांनी केला.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 03/28/2016 - 13:18 नवीन
असो,
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 03/28/2016 - 17:32 नवीन
शिवसेनेच्या नेत्याने हुसैनचे हात कापायला बक्षिस जाहीर केले तरी श्रीगुरुजी म्हणतात जीवाच्या धोक्याने तो पळाला नाही. हास्यास्पद आहे सगळं.
पुन्हा एकदा तपशीलाची चूक. हुसेनचे हात कापायला मध्यप्रदेश काँग्रेसच्या अख्तर बेग नावाच्या नेत्याने बक्षिस जाहीर केले होते. शिवसेनेने तसे केले नव्हते. उलट शिवसेनेच्या प्रमोद नवलकरांनी न्यायालयात खटला दाखल करून रीतसर न्यायिक मार्ग स्वीकारला होता.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
त
तर्राट जोकर Mon, 03/28/2016 - 18:13 नवीन
Shiv Sena (Army of Shiva) party leader Bhagwan Goel publicly declared that he would pay a half-million rupee reward for anyone who cut off one of Husain’s arms.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 03/29/2016 - 09:31 नवीन
संदर्भ?
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 03/29/2016 - 09:56 नवीन
आता नाव दिले, बक्षिसही दिले, बक्षिसाचे कारणही दिले. घ्या की शोधून?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 03/29/2016 - 10:25 नवीन
असं नसतं हो. तुम्ही काहीही दावे करता. पण त्यामागचे संदर्भ नको का द्यायला? म्हणजे नसतील संदर्भ तर तसे सांगा.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 03/29/2016 - 11:32 नवीन
https://www.wsws.org/en/articles/2006/07/husa-j03.html आता म्हणा ही वेबसाइट समाजवाद्यांची आहे. ते म्हणतात ते सारे खोटे आहे. असो. बर्‍याच बातम्या इंटरनेट फोफावण्याआधीच्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा ऑनलाईन संदर्भ मिळने शक्य नाही.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 03/29/2016 - 15:17 नवीन
https://www.wsws.org/en/articles/2006/07/husa-j03.html =
World Socialist Web Site
The name says it all!!!!!!!! बादवे, या भगवान गोयलबद्दल या साईटीवर जो दावा केलेला आहे ती घटना २००५/०६ मध्ये घडलेली होती. त्या काळात आंतरजाल सर्वत्र होते. पण आश्चर्य असे की हा दावा फक्त या समाजवाद्यांच्याच साईटीवर आहे. इतरत्र कोठेही उल्लेख सापडत नाही. अशा दाव्याची विश्वासार्हता शून्यापेक्षाही कमी आहे.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 03/29/2016 - 18:36 नवीन
अपेक्षित प्रतिसाद. =)) तुमच्यासाठी पांचजन्य, कमल संदेश हेच एकमेव विश्वासार्ह माध्यम असेल नै?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 03/30/2016 - 09:44 नवीन
नाही. मी पांचजन्य, कमल संदेश, सामना इ. तील लिंक्स कधीही संदर्भ म्हणून देत नाही. आपण दिलेला समाजवाद्यांच्या संकेतस्थळाचा संदर्भ अजिबात विश्वासार्ह नाही हे तुम्हाला पक्के माहिती होते व त्यात भगवान गोयल संबंधी केलेला खोटा दावा गुगल खोदून काढूनसुद्धा इतरत्र कोठेही मिळत नव्हता, त्यामुळेच तुम्ही संदर्भ न देता त्यातील परिच्छेद टाकलात. नंतर मी जेव्हा संदर्भ मागितला तेव्हा तुम्ही तो द्यायची टाळाटाळ केलीत कारण तुमचा संदर्भ विश्वासार्ह नव्हता व हे तुम्हाला माहित होते. नंतर संदर्भ देताना "ही समाजवाद्यांची वेबसाईट असल्याने यात लिहिलेले तुम्हाला खोटेच वाटणार व त्याकाळच्या सगळ्या लिंक्स मिळतीलच असे नाही कारण त्या काळात आंतरजाल नव्हते" असे स्वतःच्या बचावाचे डिस्क्लेमर आधीच लिहून टाकलेत. याचे कारण म्हणजे या वेबसाईटने भगवान गोयलवर केलेला आरोप खोटा होता. तसेच २००६ सालात आंतरजाल सर्वत्र फोफावले होते. त्यामुळे भगवान गोयलने खरोखरच अशी धमकी दिली असती तर ती अनेक माध्यंमातून प्रसिद्ध झाली असती. परंतु हे समाजवाद्यांचे संकेतस्थळ वगळता या धमकीचा पुसटसाही उल्लेख इतरत्र आढळत नाही कारण असे काही झालेच नव्हते. निदान आता तरी मान्य करा की तुम्ही दिलेला संदर्भ खोटा होता म्हणून.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 03/30/2016 - 11:10 नवीन
गुरुजी तुम्हाला वाट्टेल ते समजून घेण्यास तुम्हाला स्वातंत्र्य आहे. एवढा मेगाबाईटी लिहायची आवश्यकता नाही. तो परिच्च्चेद जाणून बुजुन टाकला जेणेकरुन जिज्ञासूंना लगेच कॉपी सर्च मारता येईल आणि तो कुठे आहे हे साद्यंत कळेल, कुठे नाही हेही कळेल. संदर्भ कसा काय खोटा असु शकतो? तुम्ही तर इथे 'आप'च्या ऑफिशियल इमेल आयडीवरुन आलेले उत्तरही खोटे म्हणता. तुमच्या बाजूला नसलेलं सगळं खोटं असतं. हे तुम्ही मान्य नाही केलं तरी जगजाहिर आहे. http://www.indiatraveltimes.com/news/news2006/feb06/feb2606_news3.html बाकी कात्रणं धुंडाळयाला लागतील, प्रेसमधे विचारायला लागेल. तसेच तुम्हाला विष्वासार्ह वाटते त्या सोर्सेची लिस्ट द्या. म्हणजे त्यानुसार ठरवता येईल. संदर्भ खोटे की खरे ते?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 03/30/2016 - 11:41 नवीन
गुरुजी तुम्हाला वाट्टेल ते समजून घेण्यास तुम्हाला स्वातंत्र्य आहे. एवढा मेगाबाईटी लिहायची आवश्यकता नाही. तो परिच्च्चेद जाणून बुजुन टाकला जेणेकरुन जिज्ञासूंना लगेच कॉपी सर्च मारता येईल आणि तो कुठे आहे हे साद्यंत कळेल, कुठे नाही हेही कळेल. संदर्भ कसा काय खोटा असु शकतो? तुम्ही तर इथे 'आप'च्या ऑफिशियल इमेल आयडीवरुन आलेले उत्तरही खोटे म्हणता. तुमच्या बाजूला नसलेलं सगळं खोटं असतं. हे तुम्ही मान्य नाही केलं तरी जगजाहिर आहे.
बातमी व विश्लेषण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. घडलेल्या घटना (उदा. ९/११ चा हल्ला किंवा २६/११ चा हल्ला) याबाबत माहिती घेण्यासाठी अनेक स्रोत असतात. मात्र घडलेल्या घटनांचे विश्लेषण हे वेगवेगळे असू शकते. ९/११ हा हल्ला किंवा २६/११ चा हल्ला ही घडलेली घटना कोणीच नाकारू शकत नाही. परंतु त्यामागचे विश्लेषण हे पक्षपाती असू शकते. २६/११ चा हल्ला पाकिस्तानी अतिरेक्यांनी केला होता. त्याबाबत अनेक पुरावे मिळाले. वेगवेगळ्या ३ न्यायालयात कसाबवर गुन्हा सिद्ध झाला. परंतु अंतुले, दिग्विजय, कोल्हापूरचा मुश्रीफ इ. मंडळी हा हल्ला संघाने योजना आखून केला असा वारंवार अपप्रचार करीत होती. हल्ला झाला ही घटना, हल्ल्याची माहिती ही बातमी व तो कोणी केला याविषयीचा मतमतांतरे हे विश्लेषण. तुम्ही दिलेल्या समाजवाद्यांच्या संकेतस्थळावर भगवान गोयलने हुसेनचे हात तोडण्याची धमकी दिली असा आरोप आहे. हा आरोप घटनेची माहिती व बातमी या स्वरूपात नसून ते संकेतस्थळाचे स्वतःचे मत आहे. जर असे प्रत्यक्षात खरोखरच घडले असते तर भारतातील सर्व माध्यमातून ही बातमी प्रसिद्ध झाली असती. पण असे झालेले दिसत नाही. भगवान गोयलने अशी धमकी दिली हे इतरत्र कोठेच का दिसत नाही? दिल्लीतून अनेक राष्ट्रीय वृत्तपत्रे प्रसिद्ध होतात. अनेक न्यूजचॅनेल्सची कार्यालये दिल्लीत आहेत. अनेकवेळा टीआरपीसाठी अत्यंत फालतू विषय चघळणार्‍या या वाहिन्यांना ही दिल्लीतील बातमी समजली नसेल यावर विश्वास ठेवता येणे शक्य नाही. ही तथाकथित धमकी कोणत्याच माध्यमातून आलेली नाही याचा सरळ अर्थ असा आहे की असे काही घडलेच नव्हते. फक्त समाजवाद्यांच्याच संकेतस्थळावर हा उल्लेख आहे. इतरत्र कोठेही नाही. त्याच संकेतस्तळावर इतर अनेक चुकीचे / असत्य आरोप केले आहेत. तो पूर्ण लेख हिंदुत्ववाद्यांना झोडपण्यासाठी लिहिलेला आहे. त्यामुळे त्यात अनेक पूर्वग्रहदूषित व असत्य आरोप आहेत. आआपच्या अधिकृत ईमेल आयडीवरून जे उत्तर आले ते कसे चुकीचे होते ते मी संदर्भासहीत स्पष्ट केले आहे. वीज वितरण कंपन्यांचे ऑडीट करण्याचा निर्णय न्यायालयाने रद्द केला असताना व ते ऑडीट पूर्ण झालेलेच नसताना केजरीवाल जो आरोप करत होते तो आरोप त्यांच्या अहवालामुळे सिद्ध झाला आहे हे जाहिरातीत लिहिणे ही जनतेची दिशाभूलच होती. यावर मी स्पष्टीकरण विचारल्यावर 'आम्ही या निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे व आम्हीच जिंकणार अशी आम्हाला खात्री आहे' असे उत्तर आले. समजा सर्वोच्च न्यायालयात आआप खटला हरले तर ते ती जाहिरात मागे घेणार आहेत का? जो अहवाल आलेलाच नाही त्याचा आधार घेऊन जाहिरातीत दावे करणे योग्य होते का? >>> http://www.indiatraveltimes.com/news/news2006/feb06/feb2606_news3.html या संकेतस्थळावरील खालील डिस्क्लेमर वाचलेला दिसत नाही. Disclaimer:Though we present you with this wealth of information with utmost sincerity and caution, we urge you to verify the accuracy of the content whenever deemed necessary. There is no guarantee of correctness of all information contained on these pages. This is because it is practically impossible for us to verify all the details of the content. IndiaTravelTimes.com or its associates are not liable for any damage consequent upon blind usage of any information herein.
तसेच तुम्हाला विष्वासार्ह वाटते त्या सोर्सेची लिस्ट द्या. म्हणजे त्यानुसार ठरवता येईल. संदर्भ खोटे की खरे ते?
भगवान गोयलची तथाकथित धमकी बातमी या स्वरूपात (विश्लेषण घटनेनंतर येते) भारतातील प्रमुख माध्यमांनी/वाहिन्यांनी प्रकाशित केली आहे का?
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 03/30/2016 - 12:00 नवीन
अहो एनडीटीवी, हिंदु, इत्यादी माध्यमांनाही तुम्ही विचारधारेचे लेबल लावता, मग उरले कोण ते तरी सांगा. हिंदूविरोधी दिसले की त्यात लेखक कोण, छापणारे कोण, त्यांचे बाप कोण ह्यासगळ्याचा पंचनामा करुन तुम्ही शेवटी ते खोटेच बोलतात, बदनामी करतात असा पवित्रा घेतात. अशा वेळी काय संदर्भ देणार, कप्पाळ? जाउ द्या सोडा.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Wed, 03/30/2016 - 19:30 नवीन
घडलेली घटना, त्या घटनेची माहिती देणारी बातमी व त्या घटनेचे विश्लेषण या गोष्टीतला फरक तुम्हाला अजून समजलेला दिसत नाही. जर घटनाच घडली नसेल तर बातमी येणारच नाही व त्यामुळे विश्लेषणही नाही. द हिंदू, एनडीटीव्ही इ. कट्टर हिंदुत्वविरोधी माध्यमांच्या विश्लेषणावर विश्वास ठेवणे अवघड आहे. परंतु घडलेल्या घटनांची बातमी जशी इतर माध्यमातून प्रसिद्ध होते, तशीच ती या माध्यमातूनही होते व त्या बातमीवर विश्वास ठेवण्यास काहीच हरकत नसते. २६/११ च्या हल्ल्याची बातमी इतर सर्व माध्यमांप्रमाणे या माध्यमातून सुद्धा प्रसिद्ध झाली होती व त्या बातमीवर अविश्वास ठेवण्याचे कारणच नव्हते. आक्षेप असतो तो या माध्यमातून केलेल्या पक्षपाती विश्लेषणावर. २६/११ ची बातमी कोणत्याही माध्यमातून प्रसिद्ध झाली असती तरी त्यावर मी विश्वास ठेवलाच असता. तुम्ही भगवान गोयलवर जे आरोप करीत आहात, ती घटना घडलेलीच नाही व त्यामुळेच कोणत्याही माध्यमातून तसे प्रसिद्ध झालेले नाही. जर गोयलने तशी धमकी खरोखरच दिली असती तर ती नक्कीच सर्व माध्यमातून प्रसिद्ध झाली असती. त्या घटनेसंदर्भात जे दोन संदर्भ तुम्ही दिले आहेत त्यापैकी समाजवाद्यांचे संकेतस्थळ भगवान गोयलच्या नावाखाली खोटेनाटे पसरवित आहे. त्या विशिष्ट पानावर इतर अनेक असत्य आरोप असून एकंदरीत त्या पानावर बातमी या स्वरूपात काहीही नसून त्यांचे स्वत:चे मत व हिंदुत्ववाद्यांवर जोरदार टीका आहे. त्या समाजवाद्यांच्या संकेतस्थळाखेरीज इतरत्र कोठेही या घटनेचा बातमी या स्वरूपात सुद्धा उल्लेख नाही. त्यामुळे या घटनेला कोणताही आधार नाही. तुमचा जो दुसरा संदर्भ आहे ते एका ट्रॅव्हल कंपनीचे संकेतस्थळ आहे. अशा संकेतस्थळावर राजकीय मजकूर असणे अत्यंत आश्चर्यकारक आहे. त्यांनी समाजवाद्यांच्याच संकेतस्थळावरील भगवान गोयल संबंधीचा आरोप कॉपी केलेला आहे व डिस्क्लेमरमध्ये "आम्ही या राजकीय मजकूराची सत्यासत्यता पडताळून पाहिलेली नसून तशी सत्यासत्यता पडताळून पाहणे आम्हाला शक्य नाही" असे लिहून जबाबदारी झटकून टाकली आहे. मुळात या ट्रॅव्हल कंपनीने आपल्या संकेतस्थळावर सत्यासत्यता न पडताळलेला राजकीय मजकूर टाकणे हे एक गूढच आहे. एकंदरीत हे दोन्ही संदर्भ अजिबात विश्वासार्ह नाहीत हे स्पष्ट आहे.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
S
sagarpdy गुरुवार, 03/31/2016 - 07:06 नवीन
द हिंदू - कट्टर हिंदुत्वविरोधी माध्यम : काय विरोधाभास आहे!
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/31/2016 - 09:46 नवीन
प्रत्येक हिंदुने कट्टर हिंदूंच्या विरोधात असलंच पाहिजे. भारताचा तालिबान नको ना व्हायला? ;-)
↩ प्रतिसाद: sagarpdy
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/31/2016 - 10:47 नवीन
सहमत. परंतु त्यासाठी कट्टर हिंदू व हिंदू यातील फरक समजणे आवश्यक आहे. आणि दुसरं म्हणजे प्रत्येक हिंदुने हिंदूंबरोबरच इतर कोणत्याही कट्टर धर्मियांच्या विरोधात असलंच पाहिजे. फक्त कट्टर हिंदूंचा विरोध केला आणि पुरोगामित्वाचे, विचारवंत असल्याचे व निधर्मी असल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी इतर धर्मियातल्या कट्टरांचे लांगूलचालन केले तरीही भारताचा तालिबान होईल.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/31/2016 - 11:51 नवीन
फक्त कट्टर हिंदूंचा विरोध केला आणि पुरोगामित्वाचे, विचारवंत असल्याचे व निधर्मी असल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी इतर धर्मियातल्या कट्टरांचे लांगूलचालन केले >> असे केले तर नक्की काय फायदा होतो प्रमाणपत्राचा आणी लांगुलचालनाचा?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 03/31/2016 - 13:11 नवीन
या ला अ जू न स र क वा य चे का ?
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/31/2016 - 13:18 नवीन
सरकलेल्याला अजून काय सरकवणार? ;)
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
S
sagarpdy गुरुवार, 03/31/2016 - 13:58 नवीन
जा गा आ हे ते व ढ स र क वू न घ्या च
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
श
शलभ गुरुवार, 03/31/2016 - 13:26 नवीन
न को. क शा ला.
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/31/2016 - 15:06 नवीन
फक्त कट्टर हिंदूंचा विरोध केला आणि पुरोगामित्वाचे, विचारवंत असल्याचे व निधर्मी असल्याचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी इतर धर्मियातल्या कट्टरांचे लांगूलचालन केले >> असे केले तर नक्की काय फायदा होतो प्रमाणपत्राचा आणी लांगुलचालनाचा?
असं काय करता? फायदेच फायदे आहेत. इतर धर्मियातील कट्टरवाद्यांचे लांगूलचालन केले की निवडणुकीत फायदा होतो. मते मिळतात. सत्ता मिळते. कट्टरवाद्यांच्या माध्यमातून व्होट बँक जोपासता येते. उदारमतवादी, विचारवंत, निधर्मी, पुरोगामी, मानवतावादी असे प्रमाणपत्र मिळाले की माध्यमातून प्रतिष्ठा मिळते. जातीयवादी असा शिक्का मारून वाळीत टाकले जात नाही. हातून चुकीची गोष्ट घडून चव्हाट्यावर आली की हा जातीयवाद्यांचा, मनुवाद्यांचा कट आहे असा कांगावा करता येतो. कट्टर, धर्मांध, पुराणमतवादी, मनुवादी, अल्पसंख्याकविरोधी असे शिक्के मारून तुच्छतेने बघितले जात नाही. आचारविचारातील ढोंगावर पुरोगामित्वाचा लेप चढून ढोंग झाकले जाते.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
अ
अत्रे Sat, 03/26/2016 - 15:32 नवीन
कोणी काय बोलायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी फक्त ती व्यक्ती असं का बोलत असेल असा विचार करत होतो. आणि माझं असंही म्हणणं नाही कि हा फक्त "भंकस बाबा" चा issue आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपल्या पैकी बऱ्याच लोकांची अशीच reaction असते . राग आला की समोरच्या व्यक्तीला मारायचं . ही हिंसा आपण कुठुन शिकतो? कदाचित शाळेतलं वातावरण असेल, अजून काही असॆल . तुम्ही तुकाराम महराजांचं उदाहरण दिलं. त्यांच्या विषयी पूर्ण आदर ठेऊन मी असं म्हणेन की त्या काळातली परिस्थिती आणि आजची परिस्थिती वेगळी आहे . आज न्यायव्यवस्था शाबूत आहे . कोणालाही इतर कोणाला मारण्याचा (except स्वसंरक्षण ) अधिकार नाही ! मग तुम्हाला कितीही राग आला तरी तुम्हाला तो अधिकार मिळत नाही. (anyway आपल्याला राग आला असल्यास माफी मागतो.)
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
D
DEADPOOL Tue, 03/29/2016 - 16:50 नवीन
आचार्य आपण दुसऱ्याचे संस्कार काढताना त्या व्यक्तिवर व त्याच्या कुटुम्ब वर वैयक्तिक हल्ला करता आहात!
↩ प्रतिसाद: अत्रे
त
तर्राट जोकर Sat, 03/26/2016 - 07:46 नवीन
बाकी काही असो. ह्याला लाखवेळा अनुमोदन एका टुकार लेखकाला ब्रिटिशानि आश्रय देऊन सेलेब्रिटी बनवले.
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
न
नाना स्कॉच Fri, 03/25/2016 - 08:05 नवीन
माझ्या सामान्य आकलनानुसार मला दोन मुद्दे मांडावे वाटत आहेत 1 जर कोणी बीजेपी सरकार आल्यावरच असहिष्णुता आली असे म्हणत असेल तर ते चुक आहे. 2 भारतात असहिष्णुता कायम होती/आहे/राहील अन हो ती धर्मं पंथ क्षेत्र निरपेक्ष आहे! (irony indeed) . आर्थिक उदारीकरण झाल्यावर ह्यात वर्गाधारीत असहिष्णुता सुद्धा आली असावी असा अंदाज आहे (ह्या बाबतीत अभ्यास तितकासा नाही!) बॉटम लाइन भारतात असहिष्णुता कायम होती अन ती नाकारण्यात अर्थ नाही. तसे पाहता जगातल्या प्रत्येक देश संस्कृती मधे असहिष्णुता आहेच
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 08:10 नवीन
1 जर कोणी बीजेपी सरकार आल्यावरच असहिष्णुता आली असे म्हणत असेल तर ते चुक आहे.>>>>>>>>+११११११११ 2 भारतात असहिष्णुता कायम होती/आहे/ राहील अन हो ती धर्मं पंथ क्षेत्र निरपेक्ष आहे! >>>>>>>> स्पष्ट कराल का?
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Fri, 03/25/2016 - 08:14 नवीन
स्पष्ट कराल का? कुठली उदाहरणे देऊ?? ऐतिहासिक का समकालीन? दोन्ही देता येतील!. तुम्ही सांगा कुठली देऊ?
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 09:46 नवीन
दोन्हीही द्या!
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Fri, 03/25/2016 - 11:18 नवीन
माझे विधान भारतात सहिष्णुता कायम होती/आहे/ राहील त्याच्या वानगीदाखल उदाहरणे (आठवतील तितक्या सगळ्या धर्मांतली उदाहरणे देतोय) अ. ऐतिहासिक 1 तुकोबांची गाथा बुडवली गेली , ती असहिष्णुता नव्हती का? 2 पौराणिक दाखला म्हणल्यास द्रोण ह्यांनी एकलव्याला जी वागणूक दिली ती असहिष्णुता नव्हती? 3 बोधीवृक्षाला विषारी काटा टोचला गेला होता तो करुवाकी ने टोचला होता, ती अशोकाची पत्नी होती, का केले तिने असे ह्याचा शोध घेता अजुन एक करकरीत उदाहरण मिळेल असहिष्णुतेचे 4 औरंगजेबाने लादलेला जिजिया कर ही असहिष्णुता नव्हती का? 5 वेद ऐकले तर कानात शीसे वाली शिक्षा असहिष्णुता नव्हती? 6 विठ्ठलपंत कुळकर्णी ह्यांच्या अश्राप मुलांना ज्यांनी धर्माबाहेर काढले ते असहिष्णु नव्हते?? आता काही समकालीन उदाहरणे 1 श्रीरामसेने चे गुंड जेव्हा पब मधे गेल्या म्हणून स्त्रियांना झोड़पतात ती असहिष्णुता नाही?? 2 मदरश्यातल्या मुलांना जन गण मन म्हणायला सांगितले म्हणून मारझोड़ अन दाढ़ी वाढवायचा आदेश देणारे असहिष्णु नसतात?? 3 एखाद्या व्यक्तीला मांसाहार आवडतो किंवा त्याच्या बंद दाराच्या आड़ मांसाहार केला जातो म्हणून त्याला रहिवासी संकुलात घर/सदनिका न देणारे (मांसाहारी व्यक्तीची संपत्तिक स्थिती उत्तम असूनही) असहिष्णु नसतात??? 4 गावातल्या लोकांबद्दल एक मत तयार करुन "हे फुकटखाऊ टॅक्स भरत नाहीत,आळशीपणा करतात अन आत्महत्या करतात" म्हणणारे किंवा शहरातल्या लोकांबद्दल "त्यांना काय संस्कार आहेत , फ्लॅटच्या दारा आड़ बंदिस्त असतात असंवेदनशील असतात" हे म्हणणारे गावकरी दोन्ही बाजु असहिष्णु नसतात? आता थोड़े असहिष्णुता ह्या संकल्पने बद्दल मुळात असहिष्णुता ही फ़क्त एक धर्माचा विचार दुसऱ्याला मान्य नसणे इतके सोपे सुटसुटीत नसते नसावे असे मला वाटते!! ही एक खुप मोठी कांसेप्ट आहे, जीवनातला कुठलाच हिस्सा ह्याच्यापासून वेगळा नाहीये, अगदी विज्ञान सुद्धा ! खोटे वाटते?? आजचे आधुनिक अभियांत्रिकी ते सिग्नल प्रोसेसिंग मधे उपयुक्त असे fourier transform मांडणाऱ्या joseph fourier ला ती थ्योरी मांडताना काय त्रास झाला होता तो पहावा, ती पण असहिष्णुताच होती!. असो थोड़ा भरकटलो त्याबद्दल क्षमस्व. थोडक्यात काय ? असहिष्णुता कायम होती भारतात अन ती एका धर्माकडूनच होती असेही नाही, ती सगळ्यांकडून होतीच, त्यामुळे कोणीच विक्टिम कार्ड खेळणे चुक आहेच, ही विक्टिमकार्ड्स खेळणे म्हणजे "गुड ओल्ड डेज़" मधे रमणाऱ्या पारशी बुढ्या सारखे असणे वाटते मला वैयक्तिक दृष्ट्या!, बरं ह्यावर बोलायची सोय नसते! बोललो तर वेगळे फाटे फूटत असतात! असो!
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 11:28 नवीन
म्हणजे असहिष्णुता पूर्वापार चालत आली आहे! मग उजवे सरकार आल्यावरच असहिष्णुता शब्द का ऐकू यायला लागला? हीदेखील असहिष्णुताच नाही का?
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
च
चेक आणि मेट Fri, 03/25/2016 - 11:39 नवीन
मग उजवे सरकार आल्यावरच असहिष्णुता शब्द का ऐकू यायला लागला? हीदेखील असहिष्णुताच नाही का?
अहो ह्या आणि अशा बर्याच गोष्टींवर काहीजणांची दुकाने चालतात.शिवाय हा संक्रमणाचा काळ असल्याने नवनवीन विचारवंत जन्मास येण्यास अगदी अनुकूल वातावरण आहे.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
न
नाना स्कॉच Fri, 03/25/2016 - 11:44 नवीन
असं म्हणता येईल, जर कोणी म्हणाला की असहिष्णुता मुळात "सुरूच" बीजेपी आल्यावर झाली तर ते चुक आहे, पण जर कोणी म्हणाला की असहिष्णुता बीजेपी आल्यावर "वाढीला" लागली तर त्यावर विचार करता येईल, वैयक्तिक दृष्ट्या मला वाटते की बीजेपी अन काँग्रेस कुठलीही पार्टी असो देश चालवायचा म्हणला की ठराविक सेट ऑफ़ प्रिंसिपल्स वरच चालवतात agree or deny but its a hard fact. बीजेपी जेव्हा विरोधीपक्षात होती तेव्हा त्यांच्यालेखी हिंदुंविरुद्ध असहिष्णुता वाढीला लागली होती and vice versa for all isms and political parties in India including congress lefts socialists and all अन हो निरपेक्ष दृष्ट्या पाहता ती ही असहिष्णुता होती अन ही देखील असहिष्णुता आहेच! त्यात राजकीय असहिष्णुता लैच बेक्कार विषय आहे देवा त्यात भल्या भल्यांची फे फे होईल
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 11:51 नवीन
बिल्कुल नाही कॉँग्रेस जेव्हा सत्तेत होती तेव्हा bjp ने किंवा कुणीही हा शब्द वापरला नाही!
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Fri, 03/25/2016 - 12:03 नवीन
मी शब्दप्रमाणिक अर्थाने म्हणालो ही नाहीये! :) शब्द न उच्चारता सुद्धा असहिष्णुता हा मुद्दा (प्रसंगी) तापवला जाऊ शकतो! असो.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
म
माहितगार Fri, 03/25/2016 - 12:11 नवीन
कॉँग्रेस जेव्हा सत्तेत होती तेव्हा bjp ने किंवा कुणीही हा शब्द वापरला नाही!
का नाही वापरला ? हे म्हणजे पुणेकर दुकानदारांनी आमची कोठेही शाखा नाही सांगण्यासारखे नाही का ;) उदाहरणार्थ हैदराबाद विद्यापीठातील रोहीत वेमुलाच्या आधी झालेल्या दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वेळीच काँग्रेस किंवा केंद्रात आंध्रात जी काही सरकारे होती त्यांच्या विरोधात दलित मुलांच्या बाजूने तेव्हाच आवाज भाजपाने केला असता तर दलितांना त्यांच्या बाजूला वळवणेही झाले असते आणि नंतर आता चालू असलेले राजकारण करण्याची काँग्रेस आणि कम्युनीस्टांची संधी कमी झाली नसती का ? पण अशा सकारात्मक कृतीत भाजपा आणि त्यांच्या सहयोगी संस्थांचे कार्यकर्ते मागे पडतात किंवा कसे. आजही युपी बंगाल बिहार मध्ये दलितांच्या नावाने केवळ तोंड देखले काम करणार्‍या सरकारांची भरती आहे. दलितांच्या बाजूने अभ्यासपूर्ण बाजू घेऊन त्यांना आपल्या बाजूने वळवण्यात भाजपा कमी का पडतो. हा असहिष्णूपणा नाही कामात कमी पडणे आहे.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
न
नाना स्कॉच Fri, 03/25/2016 - 12:15 नवीन
अहो , शब्दप्रमाणिक न राहता बीजेपी ने असहिष्णुतेचा पुरेपूर उपयोग करून घेतला आहे हो! आत्ता काँग्रेस तेच करते आहे फ़क्त शब्द वापरुन हे माझे वैयक्तिक मत आहे
↩ प्रतिसाद: माहितगार
त
तर्राट जोकर Fri, 03/25/2016 - 15:00 नवीन
सहमत, हिंदुबहुल भारतात हिंदूंचा संकोच होतोय अशी बोंब मारत धार्मिक धृवीकरणाचा प्रयत्न करणे हे दुसरे काय आहे? मुद्दे अंगावर उलटायला लागले की शब्दांचे खेळ खेळणे टिपिकल आहे.
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा