Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हिंदुत्व आणि असहिष्णुता! - भाग १

D
DEADPOOL
गुरुवार, 03/24/2016 - 10:21
🗣 482 प्रतिसाद
भारतात म्हणे असहिष्णुता वाढीस लागली आहे! जर भारतात असहिष्णुता आहे तर बोंबाबोंब करणाऱ्यानी खालील प्रश्नाची उत्तरे द्यावीत! १.क्षणोक्षणी बाबरीचा उल्लेख करणाऱ्यानी आजपर्यंत प्रत्येक इस्लामिक शासकांनी किती मंदिरे पाडलीत याचा हिशेब द्यावा! २. जर असहिष्णुता वाढली असेल तर हिंदूंचा आराध्य प्रभु श्रीराम याचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करणाऱ्या ओवेसीवर एकाही हिंदूने हल्ला केला का? ३. भारतात ८० कोटी हिंदू आहेत तरीही यू आर अनंतमूर्ती यांचे विधान ऐकून किती हिंदूनी दंगली केल्या? ४. सरकार उजवे आहे व अल्पसंख्यविरोधी आहे तर अजूनपर्यंत अल्पसंख्य आरक्षण का संपवले नाही? ५. दादरी प्रकरनाचा गाजावाजा करतांना तुम्हाला मुम्बईची दंगल आठवत नाही? ६. असहिष्णुता वाढली आहे म्हणून देश सोडून जाऊ म्हणणारे किती लोक देश सोडून गेले ७. देव देवतांची नग्न चित्र काढणारा हुसैन याला आपल्या धर्माच्या प्रेषितची चित्र काढण्याची का बुद्धि सुचली नाही? ८. आणि चार्ली हेब्दो च्या हल्याची तुलना करता हिंदूंनी हुसैनला कोणती शिक्षा दिली? ९. आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न हिंदूंना का पडला नाही? १०. तथाकथित धर्मचिकित्सक व विचारवंत हिंदूधर्माचीच का चिकित्सा करतात? (दुसऱ्या शब्दात का टीका करतात?) अजूनही बरेच प्रश्न आहेत पण त्याबद्दल नंतर!

प्रतिक्रिया द्या
62422 वाचन

💬 प्रतिसाद (482)
D
DEADPOOL Sat, 04/02/2016 - 15:05 नवीन
त्या कोपऱ्यावरचे दगड सकाळी उठून कोणाची झोपमोड करायला जात नाहीत! आणि काही लोकांच्या त्या दगडावरच आशा असतात!
↩ प्रतिसाद: lgodbole
L
lgodbole Sun, 04/03/2016 - 15:39 नवीन
दगडावर अपेक्षा असतात. भोंग्यातुन ऐकु येणार्‍यावर अजाणावरही कुणाच्या अपेक्षा असु शकतील की !
↩ प्रतिसाद: DEADPOOL
म
माहितगार Sun, 04/03/2016 - 16:20 नवीन
चारच लोक येतात म्हणुन भोंगा वाजवु नये , हा कुठला कायदा म्हणे ? कोपर्‍या कोपर्‍यात लाल शेंदरी दगड असतात , ते पुजायला चार लोकही नसतील तर चार लोकही नसतात , हे कारण दाखवुन ते हटवणे चालू शकेल का ?
क्षमा असावी गोडबोले साहेब, आपली तुलना प्रथमदर्शनी तार्कीक उणीवेची आणि भूमिका किमान उपरोक्त प्रतिसादा पुरती लांगुलचालनाची दिसते. भोंगा वाजला त्या आवाज निर्मात्याची पार्श्वभूमी बाजूला ठेवा, १) मानवी कानाच्या, मेंदूच्या, आणि आवश्यक दैनंदीन जिवनाच्या सुसह्यतेत कोणतेही ध्वनी प्रदुषण येणे रास्त होत नाही मग तो भोंगा फॅक्टरीचा, असो अथवा धर्म स्थानाचा, किंवा एखाद्या मिरवणूकीने केलेले ध्वनी प्रदुषण समर्थनीय होत नाही. २) जो पर्यंत कायद्याची चौकट सांभाळली जाते तो पर्यंत तुमच्या चार भिंतीतून तुम्ही काय करत आहात याच्याशी इतरे जनांना देणे घेणे असण्याचे कारण नाही, इतरे जनांना त्रास न पोहोचवणारा चार भिंतीतील व्यवहार आणि आपल्याला दिलेल्या चार भिंतींच्या पलिकडे असलेल्या जनसमुदायावर नकारात्मक परिणाम करणारे कार्य यात फरक आहे.एक समांतर तुलना करु खत निर्मिती करणारा कारखाना दुसर्‍यांना इजा पोहोचवत नाही खताची निर्मिती चार भितींच्या आत करतो तो पर्यंत समस्या नाही. पण भोपाळ वायु दुर्घटनेत झाले तसे चार भिंतीच्या आतून विषारी वायू सोडेल आणि आजू बाजूच्या समुदायाला विषामध्ये गुरफटेल तर त्याचे समर्थन होत नाही. असो.
↩ प्रतिसाद: lgodbole
त
तर्राट जोकर Sat, 04/02/2016 - 15:18 नवीन
खरंतर माझ्या प्रतिसादात माझी भूमिका स्पष्ट केल्यावर थांबावे असे ठरवले होते. पण तुमची तशी इच्छा दिसत नाही.असो.
अहो हिंदू धर्माची चिकित्सा करा ना,चालीरीतीबद्दल प्रश्न सुद्धा विचारा. असे चिकित्सक विचार करणाऱ्यांना हिंदू समाजाने सुरवातीच्या विरोधानंतर त्या चिकित्सेची योग्यता ध्यानात आल्यावर शिरोधार्य सुद्धा मानले आहे. इस्लाम धर्मात अशी किती उदाहरणे आहेत ?
>> हिंदूंनी चिकित्सा करणार्‍यांना शिरोधार्य मानले. ओके. पण त्यांना इस्लामचे समर्थक तर मानले नव्हते ना? जे आजकाल सर्रास होते. परत इस्लाम मधे अशी उदाहरने असण्याचा नसण्याचा हिंदूधर्माशी नक्की काय संबंध? मी सांगतो काय संबंध ते. हिंदूंना त्यातल्या त्यात कट्टर हिंदूंना टिका सहन होत नाही. त्यांना कुठलेही रिफॉर्म्स नको असतात. कारण त्यांची दुकाने बंद होतील. झाली आहेत. हिंदू संस्कृतीला वारंवार इस्लामशी तुलना करण्याचे कारण हेच आहे की तिकडे बघा धर्माविरुद्ध बोलले की कशी मुंडकी उडवतात, इकडे उडवत नाहीत म्हणून तुम्हाला बोलायला मिळतं. इतकी सुविधा आहे ना मग कशाला बोलता असा तर्क मांडणे चालू असते. म्हणजे वेगळ्या भाषेत टिका नको हेच सांगणे. वास्तविक इस्लामम्धे धर्मसुधारणेवर बंदी आहे की नाही ह्याचे हिंदूंना काही घेणे-देणे नसावे. तुमचा प्रश्न बघितला तर असे काही वाटते जणू लाखो करोडो हिंदू पळत सुटले आहेत हवाहवासा वाटणारा इस्लाम कबूल करायला आणि तुम्ही सांगताय अरे इस्लाममधे अमुक नाय तमुक नाय, तिकडे जाऊ नका. काळजी करु नका, कोणी मरायला तिकडे जाणार नाही. बाकी मी इस्लामचे समर्थन केलेले नसल्याने हा प्रश्न मला विचार असेल तर माझ्या भूमिकेशी संयुक्तिक नाही असेच म्हणेन. ह्याचा अर्थ उत्तर टाळतोय असा नसून तुमच्या प्रश्नात तथ्य, वजन नाही असा आहे.
आणि दुसरा महत्वाचा मुद्दा हिंदू धर्माची,बहुसंख्य असणाऱ्या समाजाच्या अंतर्गत विरोधाभासांची चिकित्सा करण्याचे महत कार्य तुम्हाला इस्लाम धर्म,भारत या देशाच्या संबंधित कोणत्याही धाग्यावर करण्याचे का सुचते? त्यासाठी वेगळा धागा सुरु न करता प्रतिसाद देनारयांचेच कसे चुकते हा युक्तिवाद का करत असता ?
ह्या प्रश्नाच्या उत्तरादाखल मी आपल्याला काही दाखले देतो. १. तुडतुडी ह्यांचा हा प्रतिसाद. सदर धाग्यात फक्त हिंदूंच्या चालिरीतींबद्दल चर्चा चालू असतांना ह्यांनी धाग्याचा विषय नसतांना मुस्लिमांवर यथेच्छ टिका करायला सुरुवात केली. तेव्हा आपण असा प्रश्न आपण विचारला नाही. जेव्हा जेव्हा हिंदूंना सुधारनांविषयी बोलल्याजाते, टिका केली जाते तेव्हा 'त्यांना आधी सांगा, तिकडे सांगायची हिंमत आहे का' म्हणून कोण मुस्लिमांचा असंबंधित विषय काढतो? हिंदूंच्या चालिरीतींच्या मागासलेपनाला मुस्लिम कारणीभूत असल्यासार्खे तर्क इथे बघितले. जणू मुस्लिम नीट झाले की हिंदू आपोआप नीट होणार आहेत. तुडतुडींच्या मतांविरुद्ध मत मी मांडले तेव्हा तो धागा हिंदूंशी संबंधित होता. २. दुसरा धागा हा http://www.misalpav.com/node/33048?page=1 ह्यात खूद्द धागालेखकांनी धर्मनिरपेक्षतेवर धागा लिहलाय. ह्यात अफझलखान-शिवाजी प्रकरणाचे धार्मिक धृवीकरणासाठी जे राजकारण केले जाते त्याविरूद्ध मी बोललो. तेव्हा धागाविषय तोच होता. ह्या धाग्यावरचे माझे सर्व प्रतिसाद वाचा आणि मी काय व कशावर बोलतोय ते ध्यानात येतं का बघा. ३. तुडतुडी यांचा इसिसवाला हा एक धागा http://www.misalpav.com/node/33103 बघा इथे मी हिंदूंबद्दल टिकास्पद कुठे आणि काय बोललोय ते. बाकी त्या धाग्यावर आलेल्या जहाल प्रतिक्रियांबद्दल तुमचा काही प्रतिसाद दिसला नाही. ४. ढोलपथकांबद्दलचा वेल्लाभट यांचा धागा http://www.misalpav.com/node/33075. इथे मी हिंदूंच्या उत्सव साजरा करण्याच्या पद्धतीचे खंडन करतोय की काय ते बघा. ५. मेंटलेक्चुअलांचे उसासे आणि उमाळे ह्या धाग्यावर ट्रेडमार्क यांचा हा प्रतिसाद बघा. आणि त्यानंतर सुरु झालेली सर्व चर्चा बघा. धाग्याचा विषय मुळात गोमांसावरुन झालेली हत्या आणि त्या निमित्त विचारवंतांचे पुरस्कारपरतीकरण. मूळ विषय हिंदूभावना व मुस्लिम खाद्य संस्कृती ह्याचा झगडा आहे. ह्यात मला चुकीच्या वाटनार्‍या प्रतिसादांना मी प्रतिवाद केलाय. इथे हिंदूंचा विरोध, टिका केलेली नाही. शुद्ध राजकिय स्वरुपाची चर्चा होती. ६. सगळ्यात मजेदार तर हा धागा आहे. http://www.misalpav.com/node/33256 मोहरमबद्दल माहिती. ह्यात तोच प्रश्न विचारला आहे जो इथे ह्या धाग्यावर विचारला आहे. कट्टरपणा हिंस्रपणाचे मूळ धर्मात की वृत्तीत? पण काही लोकांना सरळ प्रश्नांना सरळ उत्तर देता आले नाही वर माझीच खरडपट्टी काढायला गेले आणि धागा भरकटला. एवढेच धागे आहेत तुम्ही म्हणता तसे. बाकीचे तर सगळे राजकिय धागे आहेत. त्यात भाजपविरोधी, संघविरोधी, मोदीविरोधी, भक्तविरोधी प्रतिसाद दिलेत. तेही हिंदूविरोधी वाटत असतील तर धन्य आहे.
तुम्ही इथे मिपावरचे बहुसंख्य प्रतिसाद देणारे मुस्लिमांच्या बद्दल "ते तसलेच आहेत"या भूमिकेतून प्रतिसाद देतात अशी मांडणी करता.पण सामान्य माणूस ज्याचा या धर्माच्या लोकांशी रोजच्या जगण्यात कोणत्या न कोणत्या प्रकारे संबंध येतो अशा लोकांना या धर्माबद्दल असा विचार का करावासा वाटला याच्या कार्यकारण भावाचा शोध न घेता तुम्ही ते विरोध करतात म्हणून त्यांच्या विरोधात ओरडत सुटलेले आहात.
मी कसलाही शोध घेत नाही, माझे ज्ञान अपुरे, बुद्धी अर्धवट इत्यादी बोलून तुम्हाला समाधान मिळतं काय? असु देत. या धर्माबद्दल असा विचार करायला त्यांना भाग पाडलं जात आहे. राजकिय हेतुसाठी धार्मिक धृवीकरण करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना गेल्या कित्येक दशकांपासून प्रयत्न करत आहेत. गेल्या दहा बारा वर्षात त्याला उधान आलंय कारण आता जगात वाढलेला इस्लामप्रेरित हिंसाचार सपोर्टला आहे. गेल्या काही वर्षात डोळ्यात भरण्यासारख्या काही मोठ्या घटना झाल्या आहेत. ज्यात मुंबैचा आझाद मैदानावरचा हिंसक मोर्चा, ओवेसीबंधूंची भाषणे, काही दंगली ह्या पण आगीत तेल ओतत्या झाल्या आहेत. गेल्या दहाबारावर्षांआधी धार्मिक तणाव नव्हतेच आणि ते आताच आलेत असेही नाही म्हणत मी. धार्मिक तानतनाव संवेदनशील भागांमधेच होते. हिंदुबहुल भागांमधे ज्यांच्या अशा दंगली तनावांशी प्रत्यक्ष कधी संबंध आला नाही तिथल्या हिंदूंमधे मुस्लिमांबद्दल एक कडवट प्रतिमा होती. पण ती आजसारखी विखारी द्वेषाने भरलेली नव्हती आजच्यासारखा इस्लामोफोबिया नव्हता. आजच्या सारखी शत्रू भावना नव्हती. ज्या सामान्य माणसाला ज्या मुस्लिमांशी व्यवहार करण्याची फारशी गरज पडत नाही त्यांच्याबद्दल घृणा मात्र पराकोटीची निर्माण झालेली आहे हे आजुबाजूला बघतोय. ह्याचा कार्यकारण भाव मी जमिनीवर राहून बघत आहे. खयाली पुलाव पकवत नाही.
कमाल आहे बुवा, एक अभ्यासू इस्लामी विचारवंत ,ज्यांचा आजच्या भारताशी,देशाच्या तथाकथित हिंदुत्ववादी विचारसरणीशी काहीच संबंध नाही किंबहुना ते असली विचारसरणी नाकारतातच.असे असून सुद्धा राष्ट्रवादाची भाषा मांडणारे विचारवंत आणि तारेक फ़तह इस्लाम च्या अनुयायांची धर्माच्या नावाखाली चाललेली दादागिरी यांच्या बाबत एकमत कसे ? हे खरच कळत नाही. आता त्यांचे आणि इथल्या राष्ट्रवादी विचारवंतांचे एका मुद्द्यावर एकमत आहे म्हंटल्यावर तुमच्या सारखे सेकुलर/धर्मनिरपेक्ष विचारवंत त्यांना खोटे म्हणणर हे ओघाने आलेच.
तारेक फतह बद्दल ची माझी विधानं तुम्ही हाच परिच्छेद टाकावा म्हणून केली होती. तारेक फतह तुम्हाला अभ्यासू, विचारवंत इत्यादी वाटतो. कारण तो इस्लामची पिसं काढतो. पण तिथेच हिंदूंची पिसं काढणार्‍यांना विचारजंत, पुरोगामी व काय काय तुच्छ नावांनी पुकारल्या जाते ते सोयिस्कर विसरल्या जातं. ह्याच तारेक ने समजा हिंदूधर्माची अशीच पिसं काढली तर तुमचा काय पवित्रा असेल? तुम्ही त्याला अभ्यासू इत्यादी म्हणायला धजाल? त्याच्याबद्दल अधिक टंकत बसून मला वेळ घालवणे योग्य वाटत नाही. कालचा एक लेख पुर्ण वाचा. तारेकला काय हवंय ह्यावर अधिक विचार करावा. त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारतीय मुस्लिमांचे बॅशिंग करण्याचा आनंद फसवा आहे. या सगळ्यात फायदा फक्त तारेक फतह ह्या एकाच व्यक्तिचा होनार आहे हे जरा खोलात विचार केल्यावर लक्षात येईल.
या बाबतीत ज्यांनी आपल्याच धर्माच्या ३० लाख लोकांना फक्त भाषा उर्दू न स्वीकारल्यामुळे मारले असा पाकिस्तानी दृष्टीकोन तुम्हाला महत्वाचा वाटतो यावरूनच तुमच्या वैचारिक पातळीची उंची कळून येते.
माझ्या वैचारिक पातळीची उंची मोजण्याआधी वर उल्लेख केलेला पाकिस्तानी दृष्टीकोनाचे कुठेतरी उल्लेख करुन मी समर्थन केल्याचे तुम्ही दाखवुन द्यावे. अन्यथा प्रतिपक्षावर अतिघाईने, उतावीळपणे, मागचा पुढचा विचार न करता बेछूट आरोप करत, बिनबोभाट शिक्के मारत सुटणाराची वैचारिक पातळी वाचकांना लगेच लक्षात येईल.
स्वतःचा मुद्दा खरा ठरवण्यासाठी प्रसंगी पाकिस्तानी जे कि अत्यंत दुटप्पी,ढोंगी,भारतद्वेषी,हिंदुद्वेषी लोक आहेत अशा माध्यमां मधील बातमीचा विदा तुम्हाला द्यावासा वाटतो,तुमच्या बुद्धीची कीव येते! खरंच!
अहो पण ते पाकिस्तानी जे अत्यंत दुटप्पी, ढोंगी, भारतद्वेषी, हिंदुद्वेषी का काय ते लोक आहेत ते त्यांच्याच एका हाकलून दिलेल्या नागरिकाबद्दल काय विचार करतात ते दिलंय त्या दुव्यात. त्या पाकिस्तान्यांनी तारेकबद्दल तसा विचार करणे आणि त्यांचे भारतद्वेषी, हिंदूद्वेषी असण्याचा काय संबंध? मी फक्त त्याला पाकिस्तानी कसे बघतात तेवढे पाहायला सांगितले. आपल्याकडच्या डाव्या, पुरोगामी, लोकांबद्दल हिंदुत्त्ववादी ज्या भावना ठेवून असतात अगदी तशाच पाकिस्तानी त्यांच्या देशातल्या पुरोगाम्यांबद्दल ठेवून असतात. माझ्या बुद्धीची किव करण्याची सवड तुम्हाला मिळणार नाही जर मी काय म्हणत आहे ह्याचे नीट डिकोडिंग केले तर. अर्थात ते जमायला हवे. तुम्ही तारेकची बाजू घेताय याची मौज वाटते पण. खरंच!
तारेक फ़तह यांनीच सांगितलेला किस्सा
बघा आता. कोण कोठला तो पाकिस्तानी पण त्याने तुमच्या आवडीचा मुद्दा मांडला तर किती कौतुक दाटून आलेय शब्दांमधे? हा जो किस्से सांगतो, ज्या प्रकारे सांगतो ते ऐकून तुम्ही माना डोलावणार. पण तिकडे आयसिसविरुद्ध फतवा काढणार्‍या भारतीय मुस्लिमांकडे नाके मुरडणार. तुमच्या वृत्तीतच घृणा भरली आहे हे ह्याचे द्योतक आहे. तो पाकिस्तानी इथे भारतीय मुस्लिम आणि भारतीय हिंदूंमधे अधिकाधिक तेढ कशी निर्माण होईल याची जोरदार पेरणी करतोय आणि आपलेच देशबांधव त्याच्या ह्या परस्परद्वेष वाढवण्याच्या धंद्याला समर्थन देतात हे बघून वैषम्य वाटते.
आपल्या देशात अशी लाखो उदाहरणे आहेत.
आपल्या देशात अशी लाखो उदाहरणे आहेत? आहेत ना. पण त्यात धार्मिक उन्मादाची मुस्लिमांची एकमेव नाहीत. हिंदूंच्या विभत्सतेकडे भयंकर वेगाने धावू लागलेले सण उत्सव आहेत, डिजेच्या दणदणाटात साजरी होणारी शिवजयंती आहे, गनपती आहे, अजून बरंच काही आहे. पर्यावरनाचे नियम धाब्यावर टाकून होणारे उत्सव आहेत. कायमस्वरुपी बांधकामं आहेत. त्याबद्दल ओरड करनार्‍याम्चे आवाजही गप दाबले जातात. हिंदुविरोधी आहेत म्हनून मानहानी केली जाते. कसे असते ना आपला तो बाब्या दुसर्‍याचे ते कार्टे.
असहिष्णुता वाढली अशी जी ओरड होत आहे त्याला बर्याच अंशी इस्लाम च्या अनुयायांची धर्माच्या नावाखाली चाललेली दादागिरी कारणीभूत आहे. जी गेल्या १०-१५ वर्षापासून आहे, सरकारचा या गोष्टींशी संबंध नाही.
आता खरेच काय खरे मानावे हाच प्रश्न पडलाय. लोक म्हणतात इस्लामची दादागिरी चौदाव्या शतकापासून सुरु आहे. तुम्ही म्हणताय गेल्या १०-१५ वर्षा पासून आहे. गेल्या १०-१५ वर्षात धर्माच्या नावाखाली कसली दादागिरी केल्या गेली आहे व तेही हिंदूंवर त्याबद्दल जरा सांगाल काय? आणि दादागिरी म्हणजे नक्की काय हे आपणास ठावूक असावे. पुन्हा लक्षात घ्या. मी असे कधीच म्हटले नाही की भारतीय मुस्लिमांमधे कोणतेच प्रश्न नाहीत. पण ज्या पद्धातीने तुम्ही किंवा हिंदुत्ववादी सतत प्रोजेक्ट करत आला आहात गेल्या दोन दशकांपासून ते तसे खूप भयंकर, दैत्यस्वरुपाचे, प्रलयाकारी नाहीत. मी कोणत्याही प्रकारे शहामृगासन करत नाही. दोन धर्मियांमधे निर्माण झालेली दरी कंस्ट्रक्टीव प्रयत्नांनी लवकरात लवकर मिटवणे आवश्यक आहे. मुस्लिमांमधे रिफॉर्म्स हवेत तर तसे प्रयत्न केले गेले पाहिजेत. पण तिथे हिंदुत्ववादी टाळाटाळ करतात. काय तर हिंदूंचा संबंध काय त्यांच्या मागासलेपणाशी? त्यांचे त्यांनी बघावे. म्हणजे इथे मिटक्या मारत फालतू गैरसमजांवर मारे टिवटिव करायची. मुस्लिम कसे धोकादायक झालेत हे वढवून सांगायचे. संतुलीत भारतीयांनाही आपल्या चर्चांनी नुसते घाबरुन सोडायचे. ह्यावर उपाय काय म्हटलं तर हात झटकायचे. ह्याशिवाय हिंदुत्ववाद्यांनी दुसरं काय केलंय? मुस्लिमांवर येताजाता टिका केल्याने नक्की काय बदल घडणार आहे कुणास ठावूक. इथं एक रहिलंच. तुमच्या आधीच्य प्रतिसादात विवेकी लोकांना समर्थन द्यावे असे तुम्ही म्हटलात. त्याबद्दल काय करावे, कसे करता येईल हे ह्या प्रतिसादात काही दिसले नाही. नेहमीसारखा विद्वेषी सूर दिसला. ते 'विवेकी लोकांना समर्थन' वैगरे बाता मुखवटा आहे काय?
↩ प्रतिसाद: lakhu risbud
त
तर्राट जोकर Sat, 04/02/2016 - 18:52 नवीन
हे सुटलं नजरेतून.
माझ्या आई ला आणि बायको ला जो पर्यंत मशिदीत जाऊन नमाज अदा करण्याची परवानगी मिळत नाही तो पर्यंत मी सुद्धा मशिदीत जाणार नाही अशी तारेक फ़तह यांची भूमिका आहे, स्त्रियांसाठी समानतेचा आग्रह धरणारी अशी किती उदाहरणे मुस्लिम धर्मात तुच्या डोळ्यासमोर आहेत ?
इस्लामचं तर जाऊ द्यात. इथे मंदिरांमधे स्त्रियांना प्रवेश देऊ नये म्हणून मारामारी चालली आहे. तेव्हा किती पुरुष तारेक फतेह सारखी भूमिका घेतांना दिसत आहेत? आपण नाक वर करुन विचारतोय पण आपल्याच नाकाला शेंबुड आहे हे विसरलं जात आहे. बाकी, माझा मुळ आणि महत्त्वाचा प्रश्नः मी इस्लामच्या भ्रष्ट रुपाचे जीव तोडून समर्थन करतो हा निखालस खोटा आरोप जो तुम्ही केलाय त्याबद्दल पुरावा द्या. नाहीतर माफी मागा.
↩ प्रतिसाद: lakhu risbud
भ
भंकस बाबा Sat, 04/02/2016 - 20:43 नवीन
शिंगणापुरच्या शनि मंदिरातील चौथर्यावर जायला बंदी आहे, आणि कार्तिकेयाच्या मंदिरात जायला बंदी आहे. इतर कुठे असल्यास दाखवुन द्यावी, असली तरी जगातील एकूण मंदिराची संख्या घेतल्यास .0001 टक्केच असेल कदाचित्! आता जगातल्या कोणत्या मशीदित महिलांना जायला परवानगी आहे? तजो साहेब मागे मी हुसैनच्या काही चित्राबद्दल आपले मत विचारले होते, ते तुमच्या आतापर्यन्तच्या प्रतिसादाला अनुकूल नव्हते म्हणुन कानाडोळा केला काय?
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sun, 04/03/2016 - 15:50 नवीन
शिंगणापुरच्या शनि मंदिरातील चौथर्यावर जायला बंदी आहे, आणि कार्तिकेयाच्या मंदिरात जायला बंदी आहे. इतर कुठे असल्यास दाखवुन द्यावी, असली तरी जगातील एकूण मंदिराची संख्या घेतल्यास .0001 टक्केच असेल कदाचित्!
आलेत का पुन्हा मीनिंगलेस सांख्यिकीवर? पुन्हा मशिदीत प्रवेश नाही मंदिरात आहे हा मुद्दाही माझा नव्हताच. रिसबुडसाहेबांनी तारेक फतेह किती महान आहे हे सांगण्यासाठी दिलेला. मी त्याला फक्त प्रतिप्रश्न केलाय की ज्या मंदिरांमधे प्रवेश नाही महिलांना तिथे किती पुरुषांनी अशा भूमिका घेतल्या. तरी तुमच्या इच्छेसाठी एक यादी देतो, काही नावाजलेली हिंदू मंदिरे आहेत. आणि मंदिरांची संख्या मोजू नका, भक्तांची मोजा. तसेच जशी ही आहेत तशी लहान मंदिरांची उदाहरने हजारोंने असू शकतात. आणि जे आहे ते आहे म्हणा. काही बट्टा लागणार नाही हिंदूधर्माला. आपला धर्म चुकत नाहीच हे छातीठोकपणे सांगणारे सगळ्यात धर्मात असतात, जसं तुम्ही आता करत आहात. http://newseastwest.com/10-temples-in-india-that-still-dont-allow-entry-of-women/ मुस्लिम महिलांना मशिदीत परवानगी नाही ही समस्या मी कुठेही अमान्य केली नाही. पण ज्या पद्धतीने तारेकफतेह चे कौतुक केले जाते ते बघता हिंदूंमधेही असे पुरुष आहेत का हा प्रश्न तर साहाजिकच येईल. कारण गरज तर इथेही आहे. त्यात 'प्रमाण' आणून मुद्दा डायलूट केला जाऊ शकत नाही. हुसैनच्या चित्रांबद्द्ल माझ्या मताची तुम्हाला काय गरज? तुम्हाला कसे कळले की ते माझ्या प्रतिसादांना अनुकूल प्रतिकूल आहे म्हणून? पैगंबराचे वादग्रस्त चित्र, जिजसचे वादग्रस्त चित्र हे जेवढे माझ्यासाठी मुल्यहिन आहेत तेवढीच हिंदू देवतांची वादग्रस्त चित्रे महत्त्वहिन आहेत. I don't believe in stupidity called Religion. That's all.
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
भ
भंकस बाबा Sun, 04/03/2016 - 16:53 नवीन
माझ्या प्रतिसादात दाखवुन द्या, सांख्यिकी देण्याचे कारण त्यावरनच तर ठरेल ना की काय प्रमाण आहे भेदभावाचे! हुसैनच्या चित्राबाबत, तुम्ही म्हणता त्यात आक्षेपार्ह काहीच नाही मग तसं दाखवुन द्या ना. मी तुम्हाला इथे परत सांगत आहे की मी नास्तिक असुनदेखिल ही चित्रे बघुन भड़कतो मग ज्यांची या देवांवर श्रद्धा आहे त्याची काय स्थिति होत असेल? मी अजूनही त्यावर बोलायचे टाळत आहे कारण ही चित्रे आक्षेपार्ह आहेच वर बीभस्यदेखिल आहेत. तुम्ही ती बघितलि का? हनुमान व् सीतेचे तसेच रावण,हनुमान व् सीता असे? साध्या प्रश्नाचे इतके कठिन उत्तर द्यायला कोणी तुमच्याकडून शिकावे.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sun, 04/03/2016 - 17:10 नवीन
तुमचे सांख्यिकी देण्यामागेच उद्देश दिसत आहे की हिंदू धर्म चुकत नाही असे तुम्हाला म्हणायचे आहे. तसे नसेल तर मागे घेतो माझे विधान. जे आहे ते आहे. त्यात काय? सांख्यिकीवरुन भेदभाव ठरवायचा? हाउ कूल! तेही त्या ज्याची कोणतीच आकडेवारी मिळणे आतातरी शक्य नाही. इमॅजिनरी आकड्यांची सांख्यिकी ग्राह्य नसते धर्ली जात. बरं मुद्दा सांख्यिकीचा नाहीच. फक्त अशा पुरुषांचा आहे ज्यांनी तारेक फतेह सारखी भुमिका घेतली आहे. हुसैनच्या ती चित्रे मी बघितलीत. त्याबद्दल माझे मत दिले आहे. तुम्हाला कळत नाही त्याचे मी काय करु? तुम्ही नास्तिक असून तुम्हाला ही चित्रे आक्षेपार्ह वाटली यात तुमच्या नास्तिकपणाचा काय संबंध? शार्ली हेब्दोने काढलेली इतर सर्व धर्मांची आक्षेपार्ह चित्रे तुम्हाला अशीच खटकली आहेत का? हा प्रश्न विचारतोय कारण तुम्ही नास्तिक ना? आता त्यात हिंदूंचे नास्तिक, मुस्लिमांचे नास्तिक, क्रिश्चनांचे नास्तिक असा प्रकार नसतो ना म्हणून. जितके महत्त्व मी शार्ली हेब्दोने काढलेल्या पैगंबराच्या, क्रिश्चनांच्या कथित आक्षेपार्ह चित्राला देतो तेवढेच महत्त्व मी हुसैनच्या त्या तथाकथित हिंदू देवांच्या चित्राला देतो. काही कळलं काय? ह्याला नास्तिकतेची भूमिका म्हणतात.
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
भ
भंकस बाबा Sun, 04/03/2016 - 18:34 नवीन
कोणत्या आकड्याची बात करत आहात तुम्ही, नाही मिळणार आकडेवारी याची चिंता तुम्ही करु नका. हिंदू कडून एकाची सुरुवात झाली तर दुसरीकडे तो आकड़ा हजारवर पोहोचला असेल. आवाजी मतदानाने प्रस्ताव पास व्हावा. चिठ्या टाकून मतदानाची गरज नाही हुसैनच्या चित्राबाबत चित्र एक , हनुमान लंका जाळत आहे व् नग्न असलेली सीता त्याच्या शेपटीवर बसलेली आहे. यात हुसेनला जे म्हणायचे आहे ते अत्यंत घाणेरडे आहे दूसरे चित्र हनुमान रावणाबरोबर युध्द करत आहे व् नग्न असलेली सीता त्याच्या मांडिवर बसलेली आहे. आपला विकृतपणा हुसैन या चित्रातुन दाखवत आहे. या चित्राचे समर्थन करणारा हुसैन व् रामन राघव यात फरक काय असू शकेल ? हुसैनला काहीतरी लैंगिक समस्या असाव्यात त्याशिवाय तो अशी चित्र काढणार नाही रच्याकने शर्ली अद्बोने छापलेले व्यंगचित्र होते कलाविष्कार नव्हे. त्यात ते व्यंग दाखवनार. हुसैन मात्र भारतीय संस्कृति चितारल्याचा आव आणत होता.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ट
ट्रेड मार्क Fri, 04/01/2016 - 14:48 नवीन
दारुल उलूम नि आज काढलेला फतवा बघा. दारुल उलूम ही मुस्लिमांची प्रमुख धर्मसंस्था आहे. त्यांनी आज फतवा काढला की 'भारतमाता की जय' हे म्हणणे इस्लामविरोधी आहे त्यामुळे कोणत्याही मुसलमानाने ही घोषणा देऊ नये. तजो म्हणतात की मुसलमानांकडे या नजरेने बघू नका. पण प्रयत्न त्यांच्या बाजूनी होताहेत का? खरं तर ही एक छान संधी होती दोन्ही बाजूंची मने सांधायची ती घालवली. त्यातून पण भारतविरोधी नारे पण देऊ नयेत हे सांगायला फतवा काढत नाहीत. बस/ ट्रेन/ विमानात वाटण्याबद्दल - ही प्रतिमा मुसलमानांनीच तयार केलीये आणि ती बदलण्यासाठी ते काय प्रयत्न करत आहेत ते पण विदा देऊन सांगा. एक उदाहरण देतो. तुम्ही राहता त्या भागात एक गुंड आहे हे तुम्हाला माहीत आहे. त्याचे उद्योग, लोकांकडे पैसे मागणे, मारहाण करणे, मुलींची/ बायकांची छेड काढणे ई ई करून तो कसा तेथील लोकांना त्रास देतो हे पण तुम्ही बघताय. जर का तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर जात असताना तो समोर आला तर तुम्ही कसे वागाल? माझे म्हणणे तुम्हाला समजले नसावे. ही प्रतिमा मुसलमानांनीच बनवली आहे. का बाकी कोणाबद्दल लोकांना भीती वाटत नाही? तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे भारतात कितीतरी गावं असतील की जिथे धार्मिक दंगल झाली नाहीये. पण ज्यांनी धार्मिक दंगल प्रत्यक्ष अनुभवलीये त्यांची भीती अनाठायी आहे का? (तजो: तुम्हाला कशाला कोण झोडपेल? हा पण तुम्ही बाकीच्यांबद्दल करून घेतलेला समजच नाही का?)
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
D
DEADPOOL Sat, 04/02/2016 - 06:34 नवीन
मस्त ट्रेड मार्क! पण तजो याचा युक्तिवाद करायला येतील असे वाटत नाही!
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
L
lgodbole Sat, 04/02/2016 - 11:48 नवीन
भारतमाता की जय म्हणणे सक्तीचे नाही , असे साक्षात संघानेच जाहीर केले आहे. त्यामुळे इतर कुणी काय नोटिसा काढतात याची आता काय गरज ? मुस्लिम ' हिंदुस्तान झिंदाबाद ' अशे घोषणा देवू शकतात / देतात. ' अखंड हिंदुस्तान झिंदाबाद ! '
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
D
DEADPOOL Fri, 04/01/2016 - 06:02 नवीन
रिसबुड साहेब +११११११११११
↩ प्रतिसाद: lakhu risbud
ग
गामा पैलवान गुरुवार, 03/31/2016 - 20:09 नवीन
लोकहो, आज ही बातमी वाचली. http://hindi.irib.ir/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/item/86325 याला म्हणतात असहिष्णुता. तन्निमित्त कोणी पुरस्कार परत केलेले दिसंत नाहीत! कुण्णीही कसलाही आवाज काढला नाही. सगळे गपचिप पडलेत. काय कारण आहे बरे? आ.न., -गा.पै.
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/31/2016 - 20:25 नवीन
तुम्हाला काय वाटतं?
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
D
DEADPOOL गुरुवार, 03/31/2016 - 21:51 नवीन
खास त जो स्टाइल! आपला मुद्दा उलटला की लगेच 'तुम्हाला काय वाटत'
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/31/2016 - 22:42 नवीन
माझा कोणता मुद्दा इथे उलटलेला दिसला बरे डेडपूल? मूळ प्रतिसादात गा पै यांनी इथल्या सगळ्यांना प्रश्न विचारला आहे. त्या प्रश्नाचे त्यांच्यामते काय उत्तर असेल ह्याबद्दल उत्सुकता होती, ह्यात माझा मुद्दा उलटल्याचे कुठे बरे आढळले? नस्ता उतावीळपणा आवरला तर तुमचाच फायदा आहे.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Fri, 04/01/2016 - 05:43 नवीन
माझाच जुना प्रतिसाद इथे पुन्हा टंकतो.! आमच्याकडे एक म्हण आहे, "गिरे तो भी टाँग ऊपर"
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Fri, 04/01/2016 - 13:00 नवीन
म्हणी संस्कृतीतून जन्माला येतात. तुमच्याकडे तशी म्हण आहे म्हणजे तुम्हाला फारच परिचयाचे असेल. ;)
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Sat, 04/02/2016 - 06:37 नवीन
चला तर आम्हाला संस्कृती आहे! आता असंस्कृत लोकांच्या मागे लागून आपली संस्कृती खराब करून घेणे नको!
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sat, 04/02/2016 - 18:39 नवीन
बेटा, तुमसे ना हो पायेगा. सिक्सरवर सिक्सर बसायला लागले की डेडबॉल टाकणे ही तुमची संस्कृती. आणि हो, जगात प्रत्येक माणसाला संस्कृती असते बरंका, तेव्हढंच तुमच्या ज्ञानात भर. ;)
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Sat, 04/02/2016 - 19:50 नवीन
बेटा, तुमसे ना हो पायेगा. >>>>>>> बेटा भ्रमात राहू नकोस, प्रतिसाद मेगाबायती असला तर मुद्दा खोडला असा अर्थ होत नाही! सिक्सरवर सिक्सर बसायला लागलेकी डेडबॉल टाकणे ही तुमची संस्कृती.>>>>>>>>> नाही हो आम्ही छक्क्यानाही मान देतो म्हणूनच तर तुमच्याशी वादविवाद करतोय (इथे छक्क्याचा अर्थ सीक्सर घ्यावा अशी नम्र विनंती) आणि हो, जगात प्रत्येक माणसाला संस्कृती असते बरंका, तेव्हढंच तुमच्या ज्ञानात भर. ;)>>>>>>> हो पण सांस्कॄतिमध्ये असंस्क्रूत असतातच! तेवढीच आपल्या ज्ञानात भर!
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
D
DEADPOOL Sat, 04/02/2016 - 21:32 नवीन
एक सांगायचच राहिलं ..................................... संपादित. सदस्यांनी खरडवही किंवा व्यक्तिगत निरोपातला कोणताही मजकूर मुख्य बोर्डावर धाग्यामधे अथवा प्रतिसादामधे आणू नये.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
S
sagarpdy Fri, 04/01/2016 - 07:21 नवीन
+१११
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
S
sagarpdy Fri, 04/01/2016 - 07:21 नवीन
असहिष्णुतेचे मार्केट सध्या डाऊन आहे =))
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
इ
इरसाल Fri, 04/01/2016 - 12:53 नवीन
निवडणुक तोंडावर आलेली आहे का?
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
च
चेक आणि मेट Fri, 04/01/2016 - 07:18 नवीन
काहींची व्ययच्छेदक लक्षणे,मुद्दे अंगलट आले कि असे प्रतिसाद येतात. 1) तुम्ही उद्विग्न झाल्यासारखे वाटत आहात. 2) तुमच्या प्रतिसादातून मोरल पोलिसिंगचा गंध येतोय. 3) असो,तुमचे बरेच गैरसमज आहेत. 4) (.......उत्तर न देता पळ काढणे...)
द
दिग्विजय भोसले Fri, 04/01/2016 - 08:11 नवीन
च्याआयला, धार्मिक कट्टरता गुंडाळून ठेवायली हवी आता! नाहीतर देशाचं नुकसानच आहे.
ग
गामा पैलवान Fri, 04/01/2016 - 12:38 नवीन
तर्राट जोकर, तुम्ही म्हणालात : >> माझ्यामते काहीतरी सकारात्मक विचार मांडनारे तुम्ही पहिलेच. अभिनंदन! (बाकी कोणी असतील तर क्षमस्व. >> पण अशा विचारांचा कोणताही प्रभाव इथल्या प्रतिसादांवर दिसला नाही.) मुस्लिमांची (निदान भारतातल्या तरी) नेमकी हीच समस्या आहे. विवेकी मुस्लिमांकडे सर्वसाधारण मुस्लिम माणूस ढुंकूनही बघंत नाही. तो नेहमी मुल्लामौलवीकडेच आकर्षित होतो. जे बहुतांश विवेकी नाहीत. म्हणूनच तुम्हाला हे जाणवतं : >> 'ते असेच आहेत आणि कधीही सुधारणे शक्य नाही' हीच अंडरकरंट भूमिका यच्चयावत प्रतिसादकांची >> आजवर बघितली आहे. असो. माझ्या परीने संगती लावायचा प्रयत्न केला आहे. आ.न., -गा.पै.
ड
डँबिस००७ Fri, 04/01/2016 - 15:21 नवीन
रीसबुड, तारेख फतेहच उदाहरण खुपच समर्पक आहे. भारत पाकिस्तानातल्या हिंदु द्वेष्ट्या मुसलमान लोकांनाच काय तर खुद सौदीतल्या मुसलमान लोकांना सांगता यायच नाही की मदिनेनंतरची सौदी बाहेरची जगातली पहीली मस्जिद कुठे बांधली गेली . ही मस्जिद केरळातल्या मलबार मध्ये एका हिंदु राजाने दिलेल्या जागेवर बांधलेली आहे.
L
lgodbole Sat, 04/02/2016 - 12:56 नवीन
त्याने इस्लाम धर्म स्वीकारलेला होता
↩ प्रतिसाद: डँबिस००७
D
DEADPOOL Sat, 04/02/2016 - 13:47 नवीन
विदा द्या!
↩ प्रतिसाद: lgodbole
अ
अमित_निंबाळकर Sat, 04/02/2016 - 11:18 नवीन
हिंदू हा शब्द कोणत्याही स्मुर्ती वेद पुराणात उच्चारला नाही आहे..पाच हजार वर्षापूर्वीचा धर्म हा वैदिक धर्म म्हणून ओळखला जातो ..वैदिक धर्माचे कोणी निर्माते नाही आहे ..वैदिक धर्म हा अपौरेषेय आहे ..वैदिक धर्मातून राम कृष्ण जरी वागलेत तरी वैदिक धर्म त्याच उंचीवर राहतो ..वैदिक धर्म हाच खरा मानव धर्म आहे
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Sat, 04/02/2016 - 18:10 नवीन
400 प्रतिसाद्दांबद्दल "डेडपूल" यांचा "जिवंतफूल" देवून सत्कार!!!
D
DEADPOOL Sat, 04/02/2016 - 18:12 नवीन
फालतू जोक आणि तुमचा ३९९ वा होता!
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
न
नाना स्कॉच Sun, 04/03/2016 - 05:49 नवीन
१. सती प्रथा - पुर्ण बंद झाली आहे मान्य २. केशवपन- बंद झाले आहे मान्य ३. अस्पृश्यता- अजिबात बंद झालेली नाही ! फ़क्त कायद्याच्या भीती ने पांढरपेशे मराठी हिंदु सवर्ण ती पाळत नाहीत, बाकी एकदा उत्तर भारत अन पूर्व भारताबद्दल ही लक्षात घ्या, अस्पृश्यता अजिबात बंद वगैरे झाली नाही ४. बालविवाह बंद- अर्धवट झाले आहेत, अजुनही प्रचंड प्रमाणात होतात ५. विधवा पुनर्विवाह- परत एकदा उत्तर भारत पहा, विधवा पुनर्विवाह इतके रुळले आहेत तर मथुरेत विधवांची इतकी गर्दी का??(नशीब त्या मथुरेत पोचल्या ज्या पोचल्या नाहीत त्यांची हालात पहा) ६. गावबंदी- अजुनही होते ७. देशबंदी- त्याकाळी (मध्ययुग अन संस्थानिक काळ) देश ही संकलपना वेगळी होती आज वेगळी आहे तरी मान्य बंद झाले आहे ८. नदी ओलांडून जाण्यास बंदी- मान्य ९. धर्मात परत यायाला बंदी- हा मुद्दा कसा आला डिटेल समजून घ्यायला आवडेल १०. स्त्रीशिक्षनास मान्यता- एकदा गर्ल चाइल्ड एनरोलमेंट अन ड्रापआउट चा ऑल इंडिया स्टैट बघावा म्हणतो ११. नसबंदीस मान्यता- मान्य अजून बरेच आहेत आठवेल तसे लिहिल! ओके अजुन आठवतील तसे लिहा ९० % लक्षात ठेवा! व्यवस्थित लक्षात ठेवले आहे . धन्यवाद
D
DEADPOOL Sun, 04/03/2016 - 06:26 नवीन
३. अस्पृश्यता- अजिबात बंद झालेली नाही ! फ़क्त कायद्याच्या भीती ने पांढरपेशे मराठी हिंदु सवर्ण ती पाळत नाहीत, बाकी एकदा उत्तर भारत अन पूर्व भारताबद्दल ही लक्षात घ्या, अस्पृश्यता अजिबात बंद वगैरे झाली नाही>>>>>>>> प्रंचडपणे अमान्य. उत्तर भारतात फक्त अतिमागास बँधुआ व जमीनदारी असलेल्या भागात आहे! आणि त्याच उत्तर भारतात मायावती या दलित समाजातील महिला मुख्यमंत्री झाल्या हे अस्पृश्यता राहिल्यावर कसे शक्य आहे? ४. बालविवाह बंद- अर्धवट झाले आहेत, अजुनही प्रचंड प्रमाणात होतात>>>>>> ९०% बंद झालेत. ५. विधवा पुनर्विवाह- परत एकदा उत्तर भारत पहा, विधवा पुनर्विवाह इतके रुळले आहेत तर मथुरेत विधवांची इतकी गर्दी का??(नशीब त्या मथुरेत पोचल्या ज्या पोचल्या नाहीत त्यांची हालात पहा)>>>>> त्या पुनर्विवाहस बंदी हेच एक कारण असेल असे वाटते का?इतरही अनेक कारणे असू शकतात! आणि मी रुळले आहेत असे अजिबात म्हणालो नाही पण हिंदू धर्मात ही सुधारणा झाली की नाही? आणि एखाद्या स्त्रीला आपला पति गेल्यावर जीवनात विरक्ती आली असेल आणि ती मथुरेला गेली तर ती हिंदू धर्माचीच चूक! ९. धर्मात परत यायाला बंदी- हा मुद्दा कसा आला डिटेल समजून घ्यायला आवडेल>>>>>>> आहे का नाही ते सांगा? आणि वि दा हवा असल्यास तो ही सांगा १०. स्त्रीशिक्षनास मान्यता- एकदा गर्ल चाइल्ड एनरोलमेंट अन ड्रापआउट चा ऑल इंडिया स्टैट बघावा म्हणतो>>>>>>>> हिंदू धर्मानुसार बंदी आहे का हे बघावं म्हणतो
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
D
DEADPOOL Sun, 04/03/2016 - 06:53 नवीन
आणि आपल्या हिशेबानुसार आपल्या १०% च्या बरेच पुढे मान्य करत आहात हा आपला वैचारिक पराभव समजायचा का?
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
D
DEADPOOL Sun, 04/03/2016 - 06:53 नवीन
आणि आपल्या हिशेबानुसार आपल्या १०% च्या बरेच पुढे मान्य करत आहात हा आपला वैचारिक पराभव समजायचा का?
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Sun, 04/03/2016 - 07:04 नवीन
अरे बापरे हे युद्ध होते की काय? पराभव वगैरे ठरवायला? मी आधीही बोललो होतो जे पटेल ते स्वतःच्या ज्ञानात जोडून घ्यायला मला आवडते ! तरीही जर आपणाला हा "पराभव" वगैरे वदवून घ्यायचा असेल माझ्या तोंडून तर हो दादा मी हरलो तुम्ही जिंकले! श्रीराम!!! :D :D (उगाच डिक्लेरेशन ऑफ़ डिफीट सही घेणारा चतुर रामलिंगम आठवला) असो कृ ह घ्या
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Sun, 04/03/2016 - 07:18 नवीन
नाना युध्द वैचारिक रित्या लढले जाते? मला वाटत ते रणभूमीवर लढले जाते. हो दादा मी हरलो तुम्ही जिंकले! श्रीराम!!!>>>>> जय श्रीराम. असो तुम्हाला श्रीराम तर आठवला! आणि अजूनही आपण प्रतिवाद करू शकतात. नो लिमिटस! आणि मला यावेळी चतुरचा वैचारिक रित्या पराभव करणारा रँचोच आठवला. आपले विचार मिळतात, नाही?
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
L
lgodbole Sun, 04/03/2016 - 07:45 नवीन
यातील बहुतांश सुधारणा कायदे कठोर झाल्याने आम जनतेने निमूटपणे स्वीकरल्या. धर्म किंवा धर्ममार्तंड उदार झाले अन त्यानी या सुधारणा घडवल्या असे घडलेले नाही.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
भ
भंकस बाबा Sun, 04/03/2016 - 15:28 नवीन
हा प्रतिसाद देऊन फसलात तुम्ही, तुमचे हे म्हणणे मान्य केले तर मग मुस्लिम धर्मावर देखिल कायद्याने सक्ति केलि पाहिजे ना? नाय जर तुम्हाला ते शरीयत, हातपाय तोड़ने आणि हो मुलींची सुंता(हां एक विषारी मुद्दा आहे) मान्य असेल तर मग प्रश्नच उदभवत नाही. गोडबोले जरा विचार करून मुद्दे टाकत जा. रच्याकने मुस्लिम धर्मात अजूनही भरपूर त्रुटि आहेत पण तुमच्यापुरत्या इतक्याच् टाकल्या आहेत.
↩ प्रतिसाद: lgodbole
भ
भंकस बाबा Sun, 04/03/2016 - 11:09 नवीन
नाना काहीही बरळु नका. ड्रॉपआउटचे कारण धार्मिक नाही तर आर्थिक आहे व् असते. किमान धाग्याच्या वर जाऊन विषय तरी तपासा. ड्रॉपआउट आहे म्हंजे मुलीं बाहेर पडल्या आहेत, इथे अबायामधे करकचुन बांधलेल्या त्या गोजिरवाण्या बाहुल्या मदर्शात जाताना बघुन जीव तुटतो हो!
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
द
दिग्विजय भोसले Sun, 04/03/2016 - 06:45 नवीन
हिंदूंनी स्वतः आपल्या जुनाट चालीरिती,रूढी,परंपरा बंद केल्या आहेत. अजूनही काही मिथक/पुराणकथा यावर विश्वास ठेवणारे आहेतच,त्या एकेक अतार्किक कथांचे भंजन आपण करतच आहोत,आणि करायला हवं.जेणेकरून बाहेरच्यांना हिंदूंवर शिंतोडे उडवण्याची संधी मिळणार नाही. पण तरीही शिंतोडे उडवणारे आहेतच,"बहुसंख्यांक हिंदू आहेत म्हणून आम्ही हिंदूधर्मातील सुधारणांवरच लक्ष देतो" हा ड्यायलाॅक ऐकून कंटाळा आलाय आता.तसेच आधी "आपले घर साफ करावे" वगैरे अनेक ड्यायलाॅग तथाकथित सेक्युलरांकडून ऐकायला मिळतात त्याचाही वैताग आलाय ऐकून. मुळात या फेक्युलरांचा बुडात दम नाही मुस्लिमांच्या विरोधात बोलण्याचा.ही माध्यमं सुद्धा घाबरायची पण आता थोडी शहाणी होत आहेत. धार्मिकतेच्या बाबतीत मुसलमान अधिक कट्टर आहे,यात काही वादच नाही.तरीही हिंदूविरोधी मर्कटचेष्टा चालू असतातच. ,आधीच मर्कट त्यात फेक्युलरी मद्य प्याला.
V
viraj thale Sun, 04/03/2016 - 06:59 नवीन
+11111111
↩ प्रतिसाद: दिग्विजय भोसले
म
माहितगार Sun, 04/03/2016 - 15:31 नवीन
आधीच मर्कट त्यात फेक्युलरी मद्य प्याला.
=)) आपला रोष म्हणीतून प्रकट करण्यास मन मोकळी दाद.
हिंदूंनी स्वतः आपल्या जुनाट चालीरिती,रूढी,परंपरा बंद केल्या आहेत. अजूनही काही मिथक/पुराणकथा यावर विश्वास ठेवणारे आहेतच,त्या एकेक अतार्किक कथांचे भंजन आपण करतच आहोत,आणि करायला हवं. जेणेकरून बाहेरच्यांना हिंदूंवर शिंतोडे उडवण्याची संधी मिळणार नाही.
सहमत आहेच, पण आपण आपल्या घराला उत्तम स्थितीत ठेऊ इच्छितो ते केवळ इतर काय म्हणतात या साठी नव्हे, आपण आपल्या आपल्या घरची आपल्याच स्वकीयांची काळजी करतो म्हणून ह्याचाही विचार सोबतीने व्हावा वाटते एवढेच. असो.
↩ प्रतिसाद: दिग्विजय भोसले
L
lgodbole Sun, 04/03/2016 - 18:37 नवीन
मुसलमानांच्या दारात रांगेत उभं रहायला जायची अगदी पुर्वीपासुनच पद्धत आहे. ... हायला ! आता घरासमोर अंगणही करावे लागेल ! शब्बा खैर !
↩ प्रतिसाद: दिग्विजय भोसले
न
नाना स्कॉच Sun, 04/03/2016 - 06:59 नवीन
प्रंचडपणे अमान्य. उत्तर भारतात फक्त अतिमागास बँधुआ व जमीनदारी असलेल्या भागात आहे! आणि त्याच उत्तर भारतात मायावती या दलित समाजातील महिला मुख्यमंत्री झाल्या हे अस्पृश्यता राहिल्यावर कसे शक्य आहे? त्यांना कोणत्या जातींचा आधार घ्यावा लागला हे एकदा तपासा, जातीयवादाला वेठबिगारी सोबत जोडले तरी (तसे तर उत्तर भारतात सर्वत्र जातीवाद आहेच) तो हिंदु धर्मात अस्तित्वात आहे अन प्रचंड प्रमाणात आहे विदा दिला जाऊ शकतो ------------------ ९०% बंद झालेत. 10% आपणांस दुर्लक्ष करावे असा आकड़ा वाटत असल्यास आमचे अन तुमचे सामयिक दुर्दैव ! ------------------ त्या पुनर्विवाहस बंदी हेच एक कारण असेल असे वाटते का?इतरही अनेक कारणे असू शकतात! आणि मी रुळले आहेत असे अजिबात म्हणालो नाही पण हिंदू धर्मात ही सुधारणा झाली की नाही? आणि एखाद्या स्त्रीला आपला पति गेल्यावर जीवनात विरक्ती आली असेल आणि ती मथुरेला गेली तर ती हिंदू धर्माचीच चूक! आपण बहुदा मथुरेत गेला नाहीत कधी, तिथे कुठलीच विधवा "विरक्ति" वगैरे मुळे गेलेली नसते "पती खाणारी" "पांढऱ्या पायाची" वगैरे म्हणून सासरच्या लोकांनी सोडलेल्या असतात बहुसंख्य विधवा, तिथे त्यांना कायकाय हाल होतात हे डिटेल्स नाही सांगत मी कारण ते सभ्यतेच्या कक्षेत बसणार नाहीत __________ आहे का नाही ते सांगा? आणि वि दा हवा असल्यास तो ही सांगा मला बेसिक मधे मुद्दाच नीट कळला नाही तो स्पष्ट कराल मग बोलता येईल ------------------ स्त्रीशिक्षनास मान्यता ह्या विषयात खुप कांगोरे आहेत, इच्छा असल्यास डिटेल बोलतो, पण तर्क पहायचा झाल्यास सुरुवात एनरोलमेंट स्टेटिस्टिक्स अन ड्रापआउट रेट्स बेस मधे ठेऊनच करावी लागेल , बालिका कितव्या वर्षी शाळेत दाखल होते, ती किती शिकते, न्हात्या वयात आलेल्या किती मुलींना शाळा सोडावी लागते, का सोडावी लागते, सैनिटेशनची प्रभावी जागृती करुन सुद्धा गर्ल चाइल्ड ला शाळा का सोडाव्या लागतात , ह्याचे आकड़े पहावे लागतील, मग ओवर ऑल सैनिटेशन विषयात धर्ममत काय आहे ते पहावे लागेल, मग कळेल बुआ तोंडदेखले acceptance दिले आहे धर्माने की खरेच दिले आहे. हे फ़क्त सैनिटेशन संबंधी झाले ! त्या शिवाय बरेच मुद्दे आहेत (वरती सांगितलेले बालविवाह वगैरे सुद्धा)
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा