Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हिंदुत्व आणि असहिष्णुता! - भाग १

D
DEADPOOL
गुरुवार, 03/24/2016 - 10:21
🗣 482 प्रतिसाद
भारतात म्हणे असहिष्णुता वाढीस लागली आहे! जर भारतात असहिष्णुता आहे तर बोंबाबोंब करणाऱ्यानी खालील प्रश्नाची उत्तरे द्यावीत! १.क्षणोक्षणी बाबरीचा उल्लेख करणाऱ्यानी आजपर्यंत प्रत्येक इस्लामिक शासकांनी किती मंदिरे पाडलीत याचा हिशेब द्यावा! २. जर असहिष्णुता वाढली असेल तर हिंदूंचा आराध्य प्रभु श्रीराम याचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करणाऱ्या ओवेसीवर एकाही हिंदूने हल्ला केला का? ३. भारतात ८० कोटी हिंदू आहेत तरीही यू आर अनंतमूर्ती यांचे विधान ऐकून किती हिंदूनी दंगली केल्या? ४. सरकार उजवे आहे व अल्पसंख्यविरोधी आहे तर अजूनपर्यंत अल्पसंख्य आरक्षण का संपवले नाही? ५. दादरी प्रकरनाचा गाजावाजा करतांना तुम्हाला मुम्बईची दंगल आठवत नाही? ६. असहिष्णुता वाढली आहे म्हणून देश सोडून जाऊ म्हणणारे किती लोक देश सोडून गेले ७. देव देवतांची नग्न चित्र काढणारा हुसैन याला आपल्या धर्माच्या प्रेषितची चित्र काढण्याची का बुद्धि सुचली नाही? ८. आणि चार्ली हेब्दो च्या हल्याची तुलना करता हिंदूंनी हुसैनला कोणती शिक्षा दिली? ९. आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न हिंदूंना का पडला नाही? १०. तथाकथित धर्मचिकित्सक व विचारवंत हिंदूधर्माचीच का चिकित्सा करतात? (दुसऱ्या शब्दात का टीका करतात?) अजूनही बरेच प्रश्न आहेत पण त्याबद्दल नंतर!

प्रतिक्रिया द्या
62422 वाचन

💬 प्रतिसाद (482)
व
विजय पुरोहित Sat, 04/02/2016 - 07:29 नवीन
हिंदू धर्मात काही इल्लोजीकल गोष्टी होत्या, पण काळानुसार त्यांवर त्यांनी मात केली उदा सती प्रथा, केशवपन ई. आणि मुख्य म्हणजे धर्माने धर्मसुधारकांचे विचार मान्य केले, लगेच शरियत शरियत करून डोके नाही उडविले! +११११ हिंदू धर्मातील सुधारणावादी दृष्टीकोनाचा झालेला विकास लक्षात न घेता केवळ इल्लॉजिकल इळ्लॉजिकल असा आरोप करणे चुकीचे आहे.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
L
lgodbole Sat, 04/02/2016 - 07:33 नवीन
सतीची प्रथा इंग्रजानी कायदा करुन बंद पाडली. फुल्यानी शेणगोळे झेलले , पुण्यातील कर्मठानी त्यांच्यावर मारेकरीही धाडले होते.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
व
विजय पुरोहित Sat, 04/02/2016 - 08:00 नवीन
सतीची प्रथा इंग्रजानी कायदा करुन बंद पाडली. अर्थात त्या मागे राजा राममोहन रॉय आणि देशभरातील सुधारक विचाराच्या व्यक्तिंचे भक्कम पाठबळ होते हे लक्षात घ्यावे... फुल्यानी शेणगोळे झेलले , पुण्यातील कर्मठानी त्यांच्यावर मारेकरीही धाडले होते. समाज अशा प्रकारच्या मानसिकतेतून उत्क्रांत होत गेलेला आहे. पश्चिमेत सुद्धा धार्मिक, सामाजिक गैअरसमजुती होत्याच.
↩ प्रतिसाद: lgodbole
न
नाना स्कॉच Sat, 04/02/2016 - 08:03 नवीन
पश्चिमेत सुद्धा धार्मिक, सामाजिक गैअरसमजुती होत्याच. ह्या तुलनेची सतत गरज पडणे म्हणजे कुठेतरी आपली बाजु लुळी आहे असे होत नाही का?
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित
D
DEADPOOL Sat, 04/02/2016 - 08:15 नवीन
पण फुले,रॉय आणि इंग्रज गेले आणि या सुधारणा बंद झाल्या असे घडले नाही! याचा अर्थ समाजाने व धर्माने त्या सुधारणा स्वीकारल्या! नाहीतर शरियत शरियत म्हणून आजही सुधारणा करणाऱ्याचे डोके उडविले जाते आणि आहे त्या सुधारणा इस्लामिक स्टेट च्या नावाखाली बंद केल्या जातात!
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Sat, 04/02/2016 - 08:20 नवीन
नेमक्या सुधारणा झाल्या की त्या नव्या परिवेषाप्रमाणे मॉडिफाई झाल्या हे पाहणे रोचक ठरेल!
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Sat, 04/02/2016 - 08:55 नवीन
म्हणजे आता तुम्हीच शब्दखेळ करत आहात!
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Sat, 04/02/2016 - 09:00 नवीन
अजिबात नाही! मी क्लियर मुद्दा मांडला आहे ! त्यावर मत दिलेत तर बरे होईल
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Sat, 04/02/2016 - 09:41 नवीन
बरं तुमच्या मताप्रमाणे... सुधारणा झाल्याच कारण नव्या परिवेशाप्रमाणे सुधारणा होण्याचे झाल्यास त्या सर्व जगात झाल्या असता पण त्या झाल्याचे दिसत नाही. विदा देऊ?
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Sat, 04/02/2016 - 10:01 नवीन
द्या जमल्यास, अन नेमका मुद्दा काय आहे ते ही अधिक उलगडून सांगाल मेहेरबान :)
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Sat, 04/02/2016 - 10:39 नवीन
घ्या विदा मग https://en.m.wikipedia.org/wiki/Sharia
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Sat, 04/02/2016 - 11:13 नवीन
शरिया कुठून मधेच उपटला साहेब? माझे विधान अन बोलणे त्या विषयावर नाहीच मी स्पष्ट म्हणले आहे "हिंदु धर्म पुर्णपणे लोजिकल नाही", किंवा "सुधारणा झाल्या असे वाटले तरी त्या झाल्यात का ? की मॉडिफाई झाल्यात हे पाहणे रोचक ठरेल" ह्याच्यात शरियाचा संबंध कसा अन कुठून आला? आपण स्वतंत्रपणे "हिंदु धर्मात 100% तर्क आहे किंवा 100% सुधारणा झाल्यात (टक्केवारी तुमच्या अभ्यासानुसार ठेवा)" हे सांगा माहीती असल्यास, तार्किक असल्यास मी माझे मत बदलण्याची ग्वाही देतो लिखित इथे हिंदु धर्म मुळीच तार्किक वगैरे काहीच नाहीये हे मी म्हणतो आहे त्याचे खंडन करा की मुद्देसुद, आता ह्याच्या तुलनेत मधेच शरिया मग टेन कमांडमेंट्स घुसडून ठेवणे म्हणजे थोडक्यात

"पलिकडल्या अळीतला बबन्या नागडा फिरतो मग आमचे नागड़ेपण न चालायला काय आहे असे म्हणून थ्री पीस उतरवुन दिगंबरावस्था धारण करणे होय!"

↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Sat, 04/02/2016 - 12:45 नवीन
नेमक्या सुधारणा झाल्या की त्या नव्या परिवेषाप्रमाणे मॉडिफाई झाल्या हे पाहणे रोचक ठरेल!>>>>>>> हा आधीचा प्रतिसाद! त्यावर उत्तर दिल्यानंतर, " सुधारणा झाल्या असे वाटले तरी त्या झाल्यात का ? की मॉडिफाई झाल्यात हे पाहणे रोचक ठरेल " हा नवा प्रतिसाद! मस्त शब्दछल चाललाय! आता हिंदू धर्मातील इल्लोजीकल गोष्टी व कालानूरूप त्यांवर झालेल्या सुधारणा यांवर उत्तर दिले आणि बाकीच्या धर्मातील शरियत सारख्या इल्लोजीकल गोष्टीही सांगितल्या. हिंदु धर्म मुळीच तार्किक वगैरे काहीच नाहीये हे मी म्हणतो>>>>>>> काही अतार्कीक गोष्टींचा समावेश होता पण सुधारणा करून त्याला तार्किक आधारित धर्म असे रूप प्राप्त झाले! आता या स्पष्टीकरनानंतर मी असे म्हणावे अशी आपली इच्छा असल्यास माझा नाईलाज आहे "अगर मेरे जवाब से आप संतुष्ट नही होगे तो अपना सर कलम करके हम आपके चरणों में छोड़ देंगे |" अवांतर कोणी कितीही नागडे फिरले तरी ज्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान असतो तो कधीही नागडा होत नाही!! (याचा अर्थ आम्ही बीचवर कुर्ता पायजामा घालून वरून मफलर बांधून फिरत नाही व आमची मंडळी नववारी घालून कोपऱ्यात बसून आमचे कौतुक बघत बसत नाही)
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Sat, 04/02/2016 - 14:17 नवीन
मस्त शब्दछल चाललाय! काय शब्दच्छल झाला सांगाच् दादा आता, तुम्ही म्हणाले सगळ्या अतार्किक रीतीभाती गाडल्या आहेत अन धर्म तर्कअधिष्ठित झाला आहे, त्यावर मी म्हणतो आहे की काही चाली गाडल्या गेल्या असल्या तरी खुपश्या अजुनही बाकी आहेत , मी तुम्हाला धर्म किती टक्के तार्किक झाला आहे हे ही विचारले त्यावर उत्तर न देता आपण मात्र मलाच शब्दच्छल करताय वगैरे म्हणता आहात ! माझा सिंपल प्रश्न

"हिंदु धर्मातला किती टक्के भाग तार्किक झाला आहे पुर्णपणे?"

मुद्द्याला बगल नको! मी अजुनही माझा अतिशय साधा प्रश्न विचारतो आहे .
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Sat, 04/02/2016 - 15:28 नवीन
९०% आणि काळानुसार बाकीचे १० % ही होतील!
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Sat, 04/02/2016 - 17:57 नवीन
10% झाले आहे व् 90% बाकी आहे हे आमचे म्हणणे आहे! :) तुमची इच्छा असल्यास ते सिद्ध करता येईल, पण मला नाही वाटत की आपले एकमत होऊ शकेल त्यामुळे आपण इथेच पुर्ण विराम देऊया. प्रूव करायला काही हरकत नाही, हे परत एकदा अधोरेखित करतो मात्र.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Sat, 04/02/2016 - 18:17 नवीन
सिद्ध करा! आता आव्हानच देतोय असे समजा!
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Sat, 04/02/2016 - 18:51 नवीन
ओके , एक विनंती आहे 90% सुधारणा झाल्याचे विधान आपण केले आहे , ज्याला मी हरकत घेतली आहे, जर आपण कुठले 90% प्रॉब्लम लॉजिकल एंड ला पोचुन त्यांचे समाधान झाले आहे हे सांगितले तर मला प्रत्येक मुद्द्याचा नीट प्रतिवाद करता येईल, खंडन करता येईल, किंवा जे जेन्युइन असेल ते एक्सेप्ट करता येईल, तरीही आपण 1 90% सुधार कुठल्या मुद्द्यांत/प्रॉब्लम मधे झालाय ? हे मांडावे 2 विदा नसला तरी चालेल फ़क्त मुद्द्यांची एक लिस्ट द्या म्हणजे 90% वाटावे अश्या कुठल्या मुर्ख प्रथा बंद झाल्या आहेत ते लिस्ट रुपात सांगता आले तर बरे होईल तसेही जर आपण अत्यंत आत्मविश्वासाने 90% म्हणता आहात सुधारणा तर अशी एखाद लिस्ट टाइप फ़क्त आपल्याला टाइप करावे लागेल कारण आपले बेसिक पक्के असल्या कारणे आपण चटकन निष्कर्ष (एप्लाइड एन्ड) गाठू शकला आहात मांडायला मी ही मुद्दे मांडू शकतो पण त्याने गोंधळ वाढेल अन हाती काहीच लागणार नाहीत कारण मुळात माझ्या डोक्यातले पॉइंट मॅच होतीलच तुमच्या पॉइंट्स सोबत असे खात्रीने सांगता येत नाही (मलातरी) तसेही संख्यात्मक आकडे प्रथम आपण मांडले आहेत तर त्या आकड्यात अंतर्भूत असलेले सुधारणा झालेले मुद्दे आपण मांडावेत म्हणजे चर्चा नीट पुढे होऊन आपण एकमेकांच्या ज्ञानात भर घालू शकु , कसे??
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Sat, 04/02/2016 - 19:04 नवीन
ओके तुम्ही सांगा कुठल्या सुधारणा बाकी आहेत. मी त्यांवर प्रतिवाद करतो!
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Sat, 04/02/2016 - 19:11 नवीन
दावा आपल्याला करायचा आहे ! मला नाही (ज्याची सुरुवात आपण ठामेठोक 90% हा आकड़ा लिहून केली आहे) तरीही एकदा प्रतिसाद नीट वाचाल ही विनंती अन मुद्दा मांडाल ही अपेक्षा, वादविवादाच्या नियमा नुसार ज्याने पहिला दावा केला आहे/असतो त्याने प्रथम त्याच्या समर्थनार्थ बोलायचे असते (नीट पुरावे देऊन) त्याला फॉर पार्टी असे म्हणतात त्याचे पुरावे विवेचन पुर्ण झाले की दूसरा पक्ष त्याचा प्रतिवाद करत असतो त्याला म्हणतात अगेंस्ट पार्टी तेव्हा लिस्ट देऊन सुरुवात करा गई विनंती बाकी मी आहेच इथे :)
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Sat, 04/02/2016 - 20:04 नवीन
१. सती प्रथा २. केशवपन ३. अस्पृश्यता ४. बालविवाह बंद ५. विधवा पुनर्विवाह ६. गावबंदी ७. देशबंदी ८. नदी ओलांडून जाण्यास बंदी ९. धर्मात परत यायाला बंदी १०. स्त्रीशिक्षनास मान्यता ११. नसबंदीस मान्यता अजून बरेच आहेत आठवेल तसे लिहिल! ९० % लक्षात ठेवा!
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Sun, 04/03/2016 - 05:36 नवीन
धन्यवाद
↩ प्रतिसाद: DEADPOOL
भ
भंकस बाबा Sun, 04/03/2016 - 04:08 नवीन
तुम्ही जेव्हा जेव्हा हिन्दू धर्मातील सुधारणेचि गोष्ट काढाल तेव्हा शरियाची चर्चा होणारच. हिन्दू धर्मात बहुपत्निक पद्धतिला कायद्याने बंदी आहे तेव्हा काही महाभाग मुस्लिम धर्म स्विकारुन दूसरे लग्न करतात. अशा लोकांना एकाही इस्लामी धर्मगुरुने वा मौलविने हे चुकीचे आहे म्हणुन नाकारले नाही आहे. असा माणूस केवळ स्वार्थासाठी इस्लाम कबुल करत आहे, असा माणूस इस्लामी तत्त्वे कशी पाळणार? अगदी अलिकडचे दूसरे उदाहरण घेतले तर आरक्षणावरुन उठलेल्या वादळात हार्दिक पटेल व् जाट समुदायाने धमकी दिली आहे की जर आमच्या मनासारखे झाले नाही तर आम्ही इस्लाम स्वीकारु. या वेळी पण एकाही इस्लामी जानकाराने आम्ही अशा अवसरवादी लोकांना आमच्या धर्मात स्थान देणार नाही हे नमूद केले नाही आहे. तर मग अशा फ़क्त आणि फ़क्त मेंढराच्या कळपात भर करणाऱ्या धर्माविषयी टिका झाली तर वाईट वाटून घेण्याचे कारण काय?
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Sun, 04/03/2016 - 05:34 नवीन
दूसरे उदाहरण घेतले तर आरक्षणावरुन उठलेल्या वादळात हार्दिक पटेल व् जाट समुदायाने धमकी दिली आहे की जर आमच्या मनासारखे झाले नाही तर आम्ही इस्लाम स्वीकारु. मला ह्या संबंधी माहीती नाही, जमल्यास विदा द्या अभ्यासाला बरे पडेल ! क्लेम सेंसेशनलिस्ट आहे इतके तुर्तास नोंदवतो
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
D
DEADPOOL Sun, 04/03/2016 - 05:37 नवीन
नाना मुद्दे खोडनार होतात त्याचे काय?
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
त
तर्राट जोकर Sat, 04/02/2016 - 10:47 नवीन
नाना, ह्यांचं घोडं झापड लावून शरियाभोवती फिरते आणि फुरफुरते. खाली काय जळतं त्याची काय खबर नाही आणि बारा मैलावर धूर कशाचा निघतो ह्याची फक्त चिंता. नका वेळ घालवू.
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
L
lakhu risbud Sat, 04/02/2016 - 11:33 नवीन
तजो शेठ, तुमच्या उत्तराची इकडे वाट बघतो आहे
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
D
DEADPOOL Sat, 04/02/2016 - 13:42 नवीन
मग शरियाच समर्थनही कराल तुम्ही आता?
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
न
नाना स्कॉच Sat, 04/02/2016 - 15:19 नवीन
आज घालवायला वेळ आहे तर्राट जी बराच! असो! सद्धया गाडी शब्दच्छल पर्यंत पोचली आहे! आयडी पर्यंत पोचायला अजुन वेळ आहे आम्ही शेवटल्या जंक्शन चे पाशींजर असतोय! संयमाची दीक्षा घेऊन बसलो आहे!
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
D
DEADPOOL Sat, 04/02/2016 - 16:03 नवीन
नाही आय डी वरीजीनल हाय! असे आम्हास अजूनतरी वाटते!
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
D
DEADPOOL Sat, 04/02/2016 - 15:30 नवीन
त जो नानांना समर्थन देण्याआधी रिसबुड साहेब तुमची तिकडे वाट बघतात तिकडे जा!
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sat, 04/02/2016 - 15:40 नवीन
तर्राट जोकर - Sat, 02/04/2016 - 18:48 माइण्ड इट! उगाच नाही म्हटलं की खाली काय जळतं ते तुम्हाला कळत नाही म्हणून.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Sat, 04/02/2016 - 16:05 नवीन
बरं! आम्हाला नाही कळत हो! आपल्या खाली काय जळत ते तरी बघा!!!
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
L
lgodbole Sat, 04/02/2016 - 10:56 नवीन
सांगायचे राहिलेच. इंग्रजांच्या आधीही अकबर दि ग्रेट व शहेनशाह आलमगीर औरंगजेब यानीही सतीबंदीचे प्रयत्न केले होते , असे ऐकुन आहे.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Sat, 04/02/2016 - 12:47 नवीन
गोडबोले हा कितवा आईडी?
↩ प्रतिसाद: lgodbole
V
viraj thale Sat, 04/02/2016 - 13:15 नवीन
या अकबर , औरंगजेब यांच्या बापजाद्यानी केलेल्या आत्याचारांमुळेच स्त्रियांना सती जाण्याची प्रथा सुरु केली हे विसरलात काय .महंमद गोरी पासून रझाकारा पर्यंत कित्येक हिंदू स्त्रियांवर अत्याचार ,बलात्कार झाले .स्वतः हजारो बायकांचे जनानखाने सांभाळणारे ,देशोदेशिंच्या सुंदर स्त्रिया पळवून आणून त्यांचा उपभोग घेणारे हे इस्लामी राज्यकर्ते काय सतीची प्रथा बंद पाडणार.इस्लामी आक्रमकांपासून स्वतची अब्रू वाचवण्यासाठी स्त्रिया आत्महत्ये सारखा विधि करत त्याच पुढे हिंदू धर्मातील कही कर्मठ लोकांकडुन सतीची प्रथा चालू झाली असावी .आणी हिंदू धर्माची लाज काढण्याची काही गरज नाही त्याआधी हिंदू धर्माचा सखोल अभ्यास करा इस्लामी शासन भारतात येण्याआधी भारतात काय परिस्थिती होती तेही अभ्यासा .
↩ प्रतिसाद: lgodbole
त
तर्राट जोकर Sat, 04/02/2016 - 13:21 नवीन
प्रतिसाद आवडला. हिंदूंच्या सर्व वाईट चालिरीतींना मुस्लिमच कारणीभूत आहेत तर. धन्यवाद.
↩ प्रतिसाद: viraj thale
V
viraj thale Sat, 04/02/2016 - 13:26 नवीन
पुढे हिंदू धर्मातील कही कर्मठ लोकांकडुन सतीची प्रथा चालू झाली .मी सती बाबत म्हणतोय तर्राट जी
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sat, 04/02/2016 - 13:42 नवीन
हो ते कळले. पण इतरही चालिरीतींसाठी मुस्लिम, इंग्रज इत्यादीं हिंदूबाह्य राज्यकर्त्यांना दोषी ठरवलेलं बघितलंय म्हनून म्हटलं.
↩ प्रतिसाद: viraj thale
त
तर्राट जोकर Sat, 04/02/2016 - 13:23 नवीन
पण तुमच्या प्रतिसादामुळे एक जहरी बोचनारा प्रश्न पडतो पण त्याने त्रास होईल म्हनून सोडतो. जाउ दे. गोडबोले बोलतीलच नेहमी च्या पद्धतीने ;-)
↩ प्रतिसाद: viraj thale
D
DEADPOOL Sat, 04/02/2016 - 13:45 नवीन
त जो प्रश्न विचाराच आता! आमच्या शक्तिप्रमाणे आम्ही उत्तर देऊ!
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
L
lgodbole Sat, 04/02/2016 - 13:40 नवीन
महाभारतात माद्री सती गेली. रामायणात बहुतेक इंद्रजीताची बायको सती गेली. रमाबाई माधवराव बल्लाळ पुण्यात सती गेल्या . सगळ्या औंरंगजेबाच्या अन अकबराच्या भीतीने सती गेल्या ! ज्ञानात भर पडली ! ...
↩ प्रतिसाद: viraj thale
V
viraj thale Sat, 04/02/2016 - 13:56 नवीन
पहील्या दोघी स्वतःच्या मर्जीने सती गेल्या होत्या सती ला विरोध केला असतानाही पतीवर असण्यार्या प्रेमपायी आता हे झाले 000.1 % बाकी उरलेल्या 99.9% स्त्रिया सती का नाही गेल्या तेही सांगा .उदा दशरथ पत्नी ,रामायण ,महाभारत व इतर युध्दात युध्दात मेलेल्य लाखो सॆनिकांबरोबर त्यांच्या त्यांच्या पत्नीही ?सांगा आता .
↩ प्रतिसाद: lgodbole
L
lgodbole Sat, 04/02/2016 - 14:12 नवीन
सतीची प्रथा इंग्रज मोघलांच्या आधीपासुन आहे . हे सिद्ध होते..
↩ प्रतिसाद: viraj thale
D
DEADPOOL Sat, 04/02/2016 - 14:16 नवीन
पण मोगलांच्या काळात ती वाढली! बरं जंत बरे झाले!
↩ प्रतिसाद: lgodbole
V
viraj thale Sat, 04/02/2016 - 14:27 नवीन
सती जाणे ऐच्छिक होते हेही सिद्ध होते .
↩ प्रतिसाद: lgodbole
त
तर्राट जोकर Sat, 04/02/2016 - 15:03 नवीन
नायपन आता तुमचा मुद्दा फसतोय ना विराज? आधी तुम्ही मुस्लिम शासकांचे कारण दिले सतीसाठी. आता मोगाने त्याच्याआधीपासून होती तर म्हणता ऐच्छिक होती. म्हनजे ऐच्छिक असो वा नसो होती हे तर तुम्ही मान्य करता मग आधीच्या प्रतिसादात मुस्लिम आक्रमनाआधीचा हिंदू धर्म काय होता हे अभ्यासायला सांगत आहात. नक्की एक काय ते सांगा राव. नवरा मेल्यावर सती जाणे आणि जौहार करणे ह्यात तुम्ही गल्लत तर नाही ना केलीत? दोन्ही दुवे मुळातून वाचण्यासारखे आहेत. सतीप्रथेसाठी मुस्लिम शासकांना दोषी ठरवणे चुकीचे आहे. आपल्या धर्माच्या सर्व चूका दुसर्‍यांमुळे झाल्यात हा डिनायल मोड आहे.
↩ प्रतिसाद: viraj thale
V
viraj thale Sat, 04/02/2016 - 15:40 नवीन
माझे म्हणणं आहे की इस्लाम शासन पूर्वी सती साठी जबरदस्ती किंवा अत्याचार होत नव्हते नंतर ते व्हायला लागले .ऐच्छिक आणि बळजबरी यात तुम्हाला फरक वाटत नाही .शील वाचवण्यासाठी जौहार करण्याचा सती परम्परेवर प्रभाव पडला आणि त्यातून सतीसाठी बळजबरी करण्याची पद्धत सुरु झाली आणि अत्याचार वाढायला लागले .बाकी मुस्लिम शासकांमुळे अनेक स्त्रिया बळी पडल्या हे तुम्ही मान्य केलेच .
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sat, 04/02/2016 - 19:27 नवीन
किती कोलांट्याउड्या खाल हो? माझे म्हणणं आहे की इस्लाम शासन पूर्वी सती साठी जबरदस्ती किंवा अत्याचार होत नव्हते नंतर ते व्हायला लागले ह्याला विदा-पुरावा, संशोधन आहे का? कुठे वाचले तुम्ही? कोणत्या पुस्तकात? ऐच्छिक आणि बळजबरी यात तुम्हाला फरक वाटत नाही . बळजबरी कोण करत होतं? मुस्लिम शासक? इतकाच मुस्लिमा शासकांचा जाच होता तर ते काय नवरा मरायची वाट बघायचे काय? काहीतरी बोलायचं आपलं. मी दिलेला दुवा तुम्ही बिल्कूल वाचलेला दिसत नाही. आपलंच घोडं दामटायचं का? शील वाचवण्यासाठी जौहार करण्याचा सती परम्परेवर प्रभाव पडला आणि त्यातून सतीसाठी बळजबरी करण्याची पद्धत सुरु झाली आणि अत्याचार वाढायला लागले . देवा! जरा अभ्यास वाढवा. हिंदूंच्या प्रत्येक वाईट चालिरीतींसाठी मुस्लिमांना जबाबदार धरणं सोडा. बाकी मुस्लिम शासकांमुळे अनेक स्त्रिया बळी पडल्या हे तुम्ही मान्य केलेच . म्हणूनच म्हणतो अभ्यास वाढवा. आपल्या प्रतिसादातला अभ्यासहिन निरागसपणा आवडला असे होते ते. तुम्ही खरेच समजलात काय? बाकी, लैच उजवीकडे जायला लागलंय. तेव्हा इथेच थांबतो. अभ्यास करुन या मग भाग दोन मधे भेटू. टाटा बाय बाय.
↩ प्रतिसाद: viraj thale
V
viraj thale Sat, 04/02/2016 - 20:31 नवीन
इस्लाम शासन पूर्वी सती साठी जबरदस्ती किंवा अत्याचार होत नव्हते -नव्हतेच मुळी एक तरी नाव सांगा प्रतिसाद नीट वाचत जा मी कधी म्हटले की मुस्लिम शासक सती जाण्यासाठी बळजबरी करतात म्हणून . तुम्ही जेव्हा जौहर चे उदाहरण दिले त्यासाठी मी ते शेवटचे विधान केले "बाकी मुस्लिम शासकांमुळे अनेक स्त्रिया बळी पडल्या हे तुम्ही मान्य केलेच" .तेव्हा शांतपणे वाचा . तुम्ही दिलेल्या दुव्यामध्ये सती परंपरेचा काळ मुस्लिम आक्रमणाशी मिळता जुळता आहे त्याआधीचा तर कुठला काळ आढळत नाही . शेवटचे स्वतला अतिशहाण समजण थांबवा .
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा