Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हिंदुत्व आणि असहिष्णुता! - भाग १

D
DEADPOOL
गुरुवार, 03/24/2016 - 10:21
🗣 482 प्रतिसाद
भारतात म्हणे असहिष्णुता वाढीस लागली आहे! जर भारतात असहिष्णुता आहे तर बोंबाबोंब करणाऱ्यानी खालील प्रश्नाची उत्तरे द्यावीत! १.क्षणोक्षणी बाबरीचा उल्लेख करणाऱ्यानी आजपर्यंत प्रत्येक इस्लामिक शासकांनी किती मंदिरे पाडलीत याचा हिशेब द्यावा! २. जर असहिष्णुता वाढली असेल तर हिंदूंचा आराध्य प्रभु श्रीराम याचा अत्यंत अपमानास्पद उल्लेख करणाऱ्या ओवेसीवर एकाही हिंदूने हल्ला केला का? ३. भारतात ८० कोटी हिंदू आहेत तरीही यू आर अनंतमूर्ती यांचे विधान ऐकून किती हिंदूनी दंगली केल्या? ४. सरकार उजवे आहे व अल्पसंख्यविरोधी आहे तर अजूनपर्यंत अल्पसंख्य आरक्षण का संपवले नाही? ५. दादरी प्रकरनाचा गाजावाजा करतांना तुम्हाला मुम्बईची दंगल आठवत नाही? ६. असहिष्णुता वाढली आहे म्हणून देश सोडून जाऊ म्हणणारे किती लोक देश सोडून गेले ७. देव देवतांची नग्न चित्र काढणारा हुसैन याला आपल्या धर्माच्या प्रेषितची चित्र काढण्याची का बुद्धि सुचली नाही? ८. आणि चार्ली हेब्दो च्या हल्याची तुलना करता हिंदूंनी हुसैनला कोणती शिक्षा दिली? ९. आपण भारत माता की जय ही घोषणा का देतो हा प्रश्न हिंदूंना का पडला नाही? १०. तथाकथित धर्मचिकित्सक व विचारवंत हिंदूधर्माचीच का चिकित्सा करतात? (दुसऱ्या शब्दात का टीका करतात?) अजूनही बरेच प्रश्न आहेत पण त्याबद्दल नंतर!

प्रतिक्रिया द्या
62422 वाचन

💬 प्रतिसाद (482)
V
viraj thale Sun, 03/27/2016 - 10:08 नवीन
सहिष्णुता म्हणजे गांडुगिरि नव्हे जर कोणी विकृत माणूस एखादया धर्माच्या देवतांबद्द्ल अत्यंत अश्लील पेंटिग काढून प्रसिध्द करत असेल तर जस भंकस बाबा म्हटले तस त्याचे तोंड वहाणेने चारचौघात फोडलेच पाहिजे अशी सर्वसामान्य हिंदुंची फक्त भावना आहे लगेच या भावनेला शर्लि हेब्दो च्या आफिस वर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेशी तुलना करायची गरज नाही .उद्या कोणी जर म्हणाल की बघा मी तुमच्या देवी देवतां ची अश्लील चित्रे काढतो आणी ती प्रकाशित करतो आणि तुमच्या प्रतीकीयेवरून तुमची असहिष्णुता ठरवेन तर ते हास्यास्पद आहे .जर कोणीही देशद्रोहा बद्दलची प्रमाणपत्र देऊ शकत नाही तशीच असहिष्णुते बद्द्लचीही प्रमाण पत्रे देण्याचा कोणाला अधिकार नाही .
D
DEADPOOL Sun, 03/27/2016 - 16:20 नवीन
+११११११११
↩ प्रतिसाद: viraj thale
त
तर्राट जोकर Sun, 03/27/2016 - 16:44 नवीन
बरोबर. पण सहिष्णुतेची सेल्फ अटेस्टेड प्रमाणपत्रं स्वतःलाच देण्यासाठी धागे काढले जातात ती एक विसंगती लक्षात येते, बघा आता कसं ते.
↩ प्रतिसाद: viraj thale
D
DEADPOOL Sun, 03/27/2016 - 17:23 नवीन
इथे कोणालाही प्रमाणपत्रे नको आहेत! आणि गिरे तो भी टाँग ऊपर अशी म्हण आहेच!
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sun, 03/27/2016 - 17:34 नवीन
मग वरचे दहा प्रश्न मन की बात कार्यक्रम आहे का?
↩ प्रतिसाद: DEADPOOL
म
मितभाषी Sun, 03/27/2016 - 17:51 नवीन
ओम भट स्वाहा.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
D
DEADPOOL Sun, 03/27/2016 - 18:08 नवीन
दिल की बात! आणि मी मन की बात ऐकत नाही. बोर असतं!
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
म
माहितगार Sun, 03/27/2016 - 13:45 नवीन
एम.एफ. हुसेन चित्र विषयक सदस्य भंकस बाबा आणि इतरांची चर्चा कायदे विषयक बाजू पासून बर्‍यापैकी दूर असण्याची शक्यता पाहून दिल्ली न्यायालयाच्या निकालावर आधारीत स्वतंत्र धागा काढला आहे, तेथे निकाल अनुवाद आणि चर्चेत सहभागाचे आदरपुर्वक निमंत्रण आहे. एम. एफ. हुसेन विषयक दिल्ली उच्चन्यायालयाच्या निर्णयाच्या अनुवादात साहाय्य हवे
D
DEADPOOL Sun, 03/27/2016 - 16:22 नवीन
च्यामारी मंडळी लय तापलीत! सवताचे धागे उघडतायेत आता ;)
म
माहितगार Sun, 03/27/2016 - 17:59 नवीन
अभिव्यक्ती संदर्भाने मी बराच आधी पासून बरेच काही लिहित आलो आहे. हे मला नित्याचे आहे. लेख कुठेतरी बॅक ऑफ द माईंड आधी पासून असतो निमीत्त मिळाले की एकुण चर्चेस अनुरुप रहाते
↩ प्रतिसाद: DEADPOOL
आ
आनंदी गोपाळ Sun, 03/27/2016 - 17:45 नवीन
उन्माद.
श
श्री गावसेना प्रमुख Sun, 03/27/2016 - 18:04 नवीन
असहिष्णुता इतकी वाढली आहे कि ब्रिगेडी मंडळीने कालनिर्णय घ्यायचं बंद केलं आहे।। ओम भट स्वाहा।
द
दिग्विजय भोसले Mon, 03/28/2016 - 18:04 नवीन
छान चाललीय आहे चर्चा! सगळी वाचली! विशेषतः दोन्ही बाजू मांडणारे लोक आहेत,शिवाय मनोरंजनासाठी इथे ट्रोलांची पिलावळ आहेच. एकंदरीतच मस्त आहे मिसळपाव!
L
lgodbole Tue, 03/29/2016 - 08:59 नवीन
भारतमाता म्हणणे सक्तीचे नाही.. आर एस एस
म
मितभाषी Tue, 03/29/2016 - 10:15 नवीन
दाभोळकर, पानसरे यांच्या हत्त्याबाबत काय म्हणने आहे हिन्दूत्ववाद्यांचे?
D
DEADPOOL Tue, 03/29/2016 - 11:43 नवीन
कश्मीरी पंडितांविषयी काय म्हणणं आहे?
↩ प्रतिसाद: मितभाषी
म
मितभाषी Tue, 03/29/2016 - 12:02 नवीन
आधी प्रश्न मी विचारला आहे.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Tue, 03/29/2016 - 13:10 नवीन
दाभोलकर व पान्सरे यांना हिन्दूत्ववाद्यानी मारले याचा काय पुरावाआहे! समीर पाटीलला न्यायालयाने अजून दोषी ठरविले नाही! कश्मीरी पंडिताविषयी द्या उत्तर
↩ प्रतिसाद: मितभाषी
म
मितभाषी Tue, 03/29/2016 - 13:35 नवीन
दाभोलकर व पान्सरे यांना हिन्दूत्ववाद्यानी मारले याचा काय पुरावाआहे!
=)) =)) =)) ते पुढे बघु आपण. अजून ट्रेलरच चालू झालाय तुम्ही थेट क्लायमॅक्सलाच पोहोचले. हत्येबद्दल मत विचारले होते. सनातन्यांची भूमिका जाणून घ्यायची आहे.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Tue, 03/29/2016 - 15:58 नवीन
आता कश्मीरी पंडिताविषयी मत द्या. व खालील लिंक जरूर वाचा!
↩ प्रतिसाद: मितभाषी
D
DEADPOOL Tue, 03/29/2016 - 16:00 नवीन
आणि मी सनातनी नाही पण हिंदुत्ववादी जरूर आहे!
↩ प्रतिसाद: मितभाषी
म
मितभाषी Tue, 03/29/2016 - 18:20 नवीन
चला किमान एक मान्य केले तुम्ही सनातनी नाही. माझा मूळ प्रश्न "हिन्दूत्ववाद्यांची" भूमिका याबद्दल तुम्ही सोइस्कर मऔन बाळगले आहे.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Wed, 03/30/2016 - 04:08 नवीन
आमची भूमिका- त्यांच्या हत्येचा जाहीर निषेध!
↩ प्रतिसाद: मितभाषी
D
DEADPOOL Wed, 03/30/2016 - 04:23 नवीन
कारण त्यांचा हल्ला बुवाबाजी व अंधश्रद्धा यांवर होता!आणि आमचाही या दोन्ही गोष्टीस विरोधच असेल!
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Wed, 03/30/2016 - 04:24 नवीन
कश्मीरी पंडितविषयी आपल्या मतांच्या प्रतिक्षेत!
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Wed, 03/30/2016 - 13:53 नवीन
मितभाषी आहात का?
↩ प्रतिसाद: DEADPOOL
इ
इरसाल Tue, 03/29/2016 - 11:57 नवीन
काय ठरल मग ?
त
तर्राट जोकर Tue, 03/29/2016 - 12:11 नवीन
छ्या. असं काही ठरत असतं का इरसालबुवा? जुनीजाणती माणसं तुम्ही, तुमको क्या बताना. या मिपावरी अष्टोप्रहरी, चर्चांचे गुर्हाळ चाले निरंतरी उसाला तर तोटा नाही, जळणाला मिळतेच काहीतरी.
↩ प्रतिसाद: इरसाल
D
DEADPOOL Tue, 03/29/2016 - 13:18 नवीन
www.indiandefencereview.com/news/kashmiri-pandits-offered-three-choices-by-radical-islamists/
भ
भंकस बाबा Tue, 03/29/2016 - 18:57 नवीन
अशा कश्मीरी पण्डिताविषयी लिंका द्यायच्या नसतात. खांग्रेस तर त्यांना अनुल्लेखाने मारते. उगाच्च तुम्ही सर्वधर्मसम्भाववाल्याच्या धोतराला हात घालत आहात.
↩ प्रतिसाद: DEADPOOL
भ
भंकस बाबा Tue, 03/29/2016 - 19:10 नवीन
आत्ताच एक क्लिप बघितली. कायउप्पवर वायरल झाली आहे. उस्मान ख्वाजा औस्ट्रेलियाचे राष्ट्रगीत चालु असताना काय चाळे करत आहे त्याची! बघा आणि विसरून जा.
D
DEADPOOL Wed, 03/30/2016 - 13:53 नवीन
जाऊ द्या मग! ;)
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
व
विटेकर गुरुवार, 03/31/2016 - 12:12 नवीन
वाचन मात्र करावा
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/31/2016 - 12:37 नवीन
सहमत. ;)
↩ प्रतिसाद: विटेकर
D
DEADPOOL गुरुवार, 03/31/2016 - 12:57 नवीन
आपली बाजू लंगडी पडते म्हटल्यावर सहमति असणारच
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/31/2016 - 15:48 नवीन
हा हा. इतरांना वाट्टेल ती सर्टीफिकेटं वाटायची खुमखुमी असलेल्यांना दुसरं काय वाटणार?
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL गुरुवार, 03/31/2016 - 21:48 नवीन
सर्टीफिकीट घ्यायला व द्यायला पात्रता असावी लागते! ;)
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
म
माहितगार गुरुवार, 03/31/2016 - 18:19 नवीन
विटेकरजी आपण दुसर्‍य धाग्यावर सुचवल्यामुळे योगी अरविंदांचे एक पुस्तक डाउनलोड केले. योगी अरविंदांनी एम.एफ. हुसैन बद्दल काय मत मांडले असते असा सहजच मनात प्रश्न पडला, आपले योगी अरविंदांवर बरेच वाचन असणार आता या धागा चर्चेचा टंकाळा आलेला असेल तर ठिकच पण पुढे मागे प्रसंग पाहून आपले योगी अरविंदांच्या दृष्टीकोणातून मत काय राहीले असते हे जाणून घेण्यास उत्सुक असेन.
↩ प्रतिसाद: विटेकर
ख
खालीमुंडी पाताळधुंडी गुरुवार, 03/31/2016 - 15:05 नवीन
आता भाग 2 येवू द्या. आम्ही वाचायला घाबरत नाय;;
D
DEADPOOL गुरुवार, 03/31/2016 - 15:42 नवीन
येईल ओ! जसे की अच्छे दिन आने वाले है!!!!
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/31/2016 - 16:07 नवीन
@गुरुजी,
इतर धर्मियातील कट्टरवाद्यांचे लांगूलचालन केले की निवडणुकीत फायदा होतो. मते मिळतात. सत्ता मिळते. कट्टरवाद्यांच्या माध्यमातून व्होट बँक जोपासता येते.
>> असे करुनच राज्यांमधे व केंद्रात भाजपा सत्तेत आली आहे काय?
उदारमतवादी, विचारवंत, निधर्मी, पुरोगामी, मानवतावादी असे प्रमाणपत्र मिळाले की माध्यमातून प्रतिष्ठा मिळते. जातीयवादी असा शिक्का मारून वाळीत टाकले जात नाही. हातून चुकीची गोष्ट घडून चव्हाट्यावर आली की हा जातीयवाद्यांचा, मनुवाद्यांचा कट आहे असा कांगावा करता येतो. कट्टर, धर्मांध, पुराणमतवादी, मनुवादी, अल्पसंख्याकविरोधी असे शिक्के मारून तुच्छतेने बघितले जात नाही. आचारविचारातील ढोंगावर पुरोगामित्वाचा लेप चढून ढोंग झाकले जाते.
>> ह्याने काय फायदा होतो?
श
श्रीगुरुजी गुरुवार, 03/31/2016 - 17:21 नवीन
>> असे करुनच राज्यांमधे व केंद्रात भाजपा सत्तेत आली आहे काय?
आधीच्या प्रतिसादातील "इतर धर्मियातील" हे शब्द वाचलेले दिसत नाही.
>> ह्याने काय फायदा होतो?
सगळे फायदेच प्रतिसादात दिले आहेत.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/31/2016 - 20:08 नवीन
इतर धर्मियातील म्हणजे? नीट कळले नाही. जरा विस्तार कराल का? तसेच वरचे फायदे कसे काय ते कळले नाही. ते तर तुमची मतं आहेत तेही सभ्य भाषेत मांडलेली पण त्यामागची तुच्छता लपत नाही. तुमची मतं नकोत, पुरोगाम्यांना नक्की काय फायदे होतात ते जीवंत उदाहरणांसकट स्पष्ट सांगा. तुम्ही दिलेली उदाहरणे जर खरी मानायची तर हे कारच्या मागे धावत जाणार्‍या श्वानांसारखे दिसते. तुम्हाला खरंच असे म्हणायचे आहे काय?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 04/01/2016 - 11:44 नवीन
इतर धर्मियातील म्हणजे? नीट कळले नाही. जरा विस्तार कराल का?
इतर धर्मियातले म्हणजे हिंदू धर्म वगळता इतर धर्मियातले.
तसेच वरचे फायदे कसे काय ते कळले नाही. ते तर तुमची मतं आहेत तेही सभ्य भाषेत मांडलेली पण त्यामागची तुच्छता लपत नाही. तुमची मतं नकोत, पुरोगाम्यांना नक्की काय फायदे होतात ते जीवंत उदाहरणांसकट स्पष्ट सांगा. तुम्ही दिलेली उदाहरणे जर खरी मानायची तर हे कारच्या मागे धावत जाणार्‍या श्वानांसारखे दिसते. तुम्हाला खरंच असे म्हणायचे आहे काय?
इतक्या स्पष्ट शब्दात फायदे काय व कोणते आहेत ते लिहिले आहेत ते समजले नसावेत असं वाटतंय.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
L
lakhu risbud गुरुवार, 03/31/2016 - 20:47 नवीन
तजो,इस्लाम धर्मीय आणि इस्लाम धर्माविषयी काहीही मतप्रदर्शन करण्या आधी तारेक फ़तह यांच्या मुलाखती बघा असे मी वेगवेगळ्या धाग्यांवर विनंती केली होती. https://www.youtube.com/results?search_query=tarek+fatah&page=2 शरिया चा उदय https://www.youtube.com/watch?v=DJtLKLPIYB4 ही ती संपूर्ण मुलाखत https://www.youtube.com/watch?v=yjNX_3jJt-E तुम्ही ती सोयीस्कर पणे दुर्लक्षिली. अर्धवट ज्ञानावर इथे बसून अक्कल पाजळण्यात कोणता कंड शमतो हे तुमचे तुम्हालाच माहित. ज्या धर्माच्या संस्थापकाच्या मृत्युनंतर २४ तासाच्या आतच पुढचा वारस कोण याच्या वरून अत्यंत रक्तरंजित पद्धतीने घडामोडी घडल्या,वाळवंटात,जिथे दिवसाचे तापमान ५० अंशा पेक्षा जास्त जाते अशा ठिकाणी संस्थापकाचा मृतदेह ४८ तास कुठल्याहि मरणोत्तर विधी शिवाय तंबूत ठेवला जातो,कारण काय ? तर त्या दैवी संस्थापकानंतर पुढचा वारस कोण होणार हे ठरलेले नसते. जे दोन गट दावेदार असतात त्यांच्यातला प्रबळ गट दुसऱ्या गटाच्या सर्व पुरुषांना शब्दशः कापून काढतो,तेव्हाच या वादाचा निकाल लागतो. आणि त्यानंतरच मरणोत्तर विधी पार पडतो. जिंकलेला गट पराजित गटाच्या बायका मुलांना मारण्यासाठी मारेकरी पाठवतो,त्यांना ७ व्या शतकात सिंध चा राजा दाहीद (हो हो हिंदू !) आश्रय देतो.संपूर्ण जगातले दुसऱ्या क्रमांकाचे धार्मिक स्थळ भारताच्या केरळ या राज्यात तिथला राजा जागा देऊन बनवून घेतो.आजकालच्या बुद्धीमंतांच्या मतांनुसार हि असहिष्णुताच म्हणावी लागेल. ज्या धर्मग्रंथाचा दाखला अनुयायी उठता बसता देत असतात तो धर्मग्रंथ संस्थापकाने लिहिलेलाच नाही. संस्थापकाच्या मृत्युनंतर जवळचा अनुयायी,ज्याला सर्व वचने मुखोद्गत होती, ती त्याने त्याला जशी आठवत होती त्या क्रमाने लिहून काढली.या धर्मग्रंथात दैवी आवाजाचे संस्थापकाच्या मुखातून आलेले उल्लेख कोणत्याही क्रमाशिवाय आलेले आहेत. या धर्माच्या अत्यंत जाणकार म्हणविणाऱ्याना सुद्धा त्याच्या सुयोग्य क्रम सांगता येत नाही. तीच गोष्ट रोजच्या जगण्यातील कानून सांगणाऱ्या दुसऱ्या एका कायद्याची.संस्थापकाच्या मृत्युनंतर सुमारे २०० वर्षे त्यात भर पडत होती. संस्थापकाने तो सांगितलेला नाही. ती भर सुरुवातीला या धर्माच्या नावाखाली ज्यांना स्वताची मनमानी करायची होती अशा म्हणायला अनुयायी पण आतून विरोधक असणाऱ्या कट्टर अनुयायांनीच घातली. त्यालाच दैवी आवाज,संस्थापकाच्या मुखातून आलेले एकमेव सत्य वचन असे रूप दिले. आजच्या आधुनिक काळातील या धर्मासंबंधित जगातील जवळपास सर्व प्रश्न या भ्रष्ट रुपामुळेच तयार झाले आहेत. मुळ स्वरूपातील धर्माची उपासना आणि जाण असणारे विवेकी असणारे, काही मुठभर लोक खाजगी जीवनात करतात. परंतु या भ्रष्ट रुपाला विरोध करण्याची हिम्मत त्यांच्यात नाही.या अशा विवेकी लोकांना समर्थ करणे हे या देशासाठी आणि कालांतराने संपूर्ण जगासाठी एकमेव पर्याय उरणार आहे. तुमच्या सारखे अर्धवट बुद्धिमंत,आणि अनुयायी सुद्धा ज्यांना या धर्मांध दाहकतेच्या येणाऱ्या काळातील आव्हानांची जाण नाही ते या धर्माच्या आजच्या भ्रष्ट रूपाचे जीव तोडून समर्थन करतात. हि प्रवृत्ती त्या नदीकिनारी असणाऱ्या मगर आणि माकडा च्या कथे सारखी आहे, त्या माकडाला वाटते मी मगरीला मदत केली,ती मला खाणार नाही. वास्तवात तसे काही घडत नाही. मगर मला खाणार नाही हा मूर्खपणा आजच्या सेकुलर/धर्मनिरपेक्ष बुद्धीमंतात ठासून भरलेला आहे. ती मगर तुम्हाला खाणारच फक्त शेवटी खाईल इतकेच. तेव्हा मदत करायला सुद्धा कोणी नसेल याची खात्री बाळगा. आपल्या शेजारच्या देशाला (जो मुळचा भारतच होता) या अशाच विचारसरणी चा कर्क रोग झाला आहे. तुमच्या सारखे सेकुलर/धर्मनिरपेक्ष बुद्धीमंत त्या धर्माच्या भ्रष्ट रूपाचे समर्थन करून तोच कर्करोग या देशात आणण्याचा प्रयत्न करत आहात.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/31/2016 - 23:13 नवीन
रिसबुडसाहेब. बाकीच्या क्रॅपची खरंतर काहीच गरज नव्हती. तुमच्या प्रतिसादातल्या इस्लामबाबतच्या तीनही परिच्छेदांबद्दल काहीच आक्षेप नाही. मला कधी ह्याविषयी खंडन करतांना पाहिले आहे काय? किमान शरियाचे समर्थन करतांना पाहिले आहे काय? अर्धवट ज्ञानावर इथे बसून अक्कल पाजळण्यात कोणता कंड शमतो हे तुमचे तुम्हालाच माहित. >> माझ्याबद्दल अशी वक्तव्ये करुन तुमचा कोणता कंड शमायला मदत झाली तेही तुमचे तुम्हाला माहित. मुळ स्वरूपातील धर्माची उपासना आणि जाण असणारे विवेकी असणारे, काही मुठभर लोक खाजगी जीवनात करतात. परंतु या भ्रष्ट रुपाला विरोध करण्याची हिम्मत त्यांच्यात नाही.या अशा विवेकी लोकांना समर्थ करणे हे या देशासाठी आणि कालांतराने संपूर्ण जगासाठी एकमेव पर्याय उरणार आहे. >> ह्या पर्यायाचा उल्लेख मी इथं मिपावर जेवढं वाचलंय तेवढ्यावरुन तरी तुमच्याशिवाय कोणीही केलेला आजवर आढळला नाही. जेवढं मुस्लिमांबद्दलचे प्रतिसाद वाचले ते सर्व घृणा, द्वेष ह्यांनीच ओतप्रोत भरलेले आढळले. केवळ घृणा, आरोप आणि आरोपांच्या पुष्ट्यर्थ दिले जाणारे मुस्लिम दहशतवादाचे पुरावे ह्यापलिकडे कोणीही हा विचार इथे मांडलेला दिसला नाही. 'ते असेच आहेत आणि कधीही सुधारणे शक्य नाही' हीच अंडरकरंट भूमिका यच्चयावत प्रतिसादकांची आजवर बघितली आहे. मुस्लिमांच्या समस्यांबद्दल करवादण्याशिवाय कोणीही काही करत नाही. आपल्या घृणेला समर्थन देणार्‍या जहाल मतांची पिंक बघितली. माझ्यामते काहीतरी सकारात्मक विचार मांडनारे तुम्ही पहिलेच. अभिनंदन! (बाकी कोणी असतील तर क्षमस्व. पण अशा विचारांचा कोणताही प्रभाव इथल्या प्रतिसादांवर दिसला नाही.) तुमच्या सारखे अर्धवट बुद्धिमंत,आणि अनुयायी सुद्धा ज्यांना या धर्मांध दाहकतेच्या येणाऱ्या काळातील आव्हानांची जाण नाही ते या धर्माच्या आजच्या भ्रष्ट रूपाचे जीव तोडून समर्थन करतात. >> तुमच्यासारखे अर्धवट बुद्धिमंत हा तर थेट व्यक्तिगत अपमान आहे, कदाचित तुमची सहिष्णुतेची पातळी फारच खाली असावी. कोण किती बुद्धीमंत आहे आणि नाही ह्याचे प्रमाणपत्र वाटायचा अधिकार तुम्ही कुठून मिळवला ते जाणून घेण्याची उत्सुकता आहेच पण त्याआधी तुमच्या पुढच्या वाक्याकडे बघूया. तुम्ही म्हणताय की तुमच्यासारखे या धर्माच्या आजच्या भ्रष्ट रुपाअचे जीव तोडून समर्थन करतात. हाउ डू यू से दॅट? माझा एक प्रतिसाद इथे मिसळपाववर दाखवा ज्यात मी भ्रष्ट स्वरुपाचे तर सोडा, इस्लामचे चिमूटभर तरी समर्थन केले आहे. उत्खननाला जाण्याआधी पुढचं वाचून घ्या, कारण ज्या बेफिकिर वृत्तीने तुम्ही हे वाक्य फेकले आहे त्यातुन आपली चष्मेबहादूर वृत्ती दिसली. इथे काही सदस्यांच्या प्रतिक्रियांना विरोधी मत प्रदर्शित केले तर थेट 'इस्लामच्या भ्रष्ट रुपाचे जीव तोडून समर्थन' ह्या अगदी टोकाच्या बाजूला कसे पोचलात? मला नानानेफळे, ग्रेटथिंकर, मोगाखान ह्यांच्या लाईनीत बसवल्याबद्दल तुमचा निषेध करावा तेवढा कमीच. बरे हिंदूंच्या वाईट चालिरीती, प्रथा, मान्यतांबद्दल टिका केली तर ते 'इस्लामच्या भ्रष्ट स्वरुपाचे जीव तोडून समर्थन' असा अर्थ असेल तर धन्य आहे. अशा प्रथा, मान्यतांना विरोध करनार्‍या ऐतिहासिक पुज्य हिंदुंबद्दल आपण हेच बोलणार का? माझी सुरुवातीपासून एकच भूमिका आहे ती अशी की आज जो काही हिंसाचार मुस्लिम धर्माच्या, कुराणाच्या नावावर करतात तो फक्त आधार घेऊन. त्यांची मूळ मानसिकताच तशी आहे किंवा काहीतरी कुठेतरी बिनसलेले आहे. हे वर तुम्हीच प्रतिसादात दिलंय की संस्थापकाच्या मृत्यूनंतर काय काय झाले व जे काही भयंकर झाले तेव्हा तर कुरान लिहिलेले नव्हते, हे तुम्हीच लिहिलंय. मग माझ्या विधानात काही चुकते आहे काय? मीही तेच म्हणतोय पण इथले काही सदस्य म्हणतात मुस्लिम हिंसाचार करतात कारण त्यांना कुराणातून प्रेरणा मिळते. मला वाटतं तुम्ही त्या सदस्यांना इस्लामचा व मुस्लिमांचा इतिहास सुरुवातीपासून शिकण्यास सांगायला हवं. इथल्या सदस्यांच्या काही गैरसमजूतींना उत्तर देणे, त्या ज्या बाबतीत आहेत त्याबद्दल सत्य सांगणे हे इस्लामच्या भ्रष्ट स्वरुपाचे जीव तोडून समर्थन आहे की काही हिंदूंच्या घृणा करण्याच्या कारणांचे उच्चाटन करणे आहे? दुसर्‍या एका धाग्यावर काही गैरसमजुतींना उत्तरादाखल काही पुरावेही दिलेत. इथल्या सदस्यांना त्यापेक्षा जास्त काही समजत असेल, त्यांच्याकडे ती आकडेवारी, पुरावे, विधानं खोडणारी काहीही सामग्री असेल तर प्रतिवाद करावा. नुसती बसल्याजागी टिवटिव करुन स्वतःच्या मनातला नपुंसक द्वेष वाढवुन आजूबाजुच्या वातावरनाला गढुळ करण्याला हातभार लावण्यावाचून ह्या समजूतींचा काय उपयोग? इथले सदस्य म्हणतात की ह्यांच्यावर विश्वास कसा ठेवावा? दुसरे म्हणतात बसट्रेनविमानात भीती वाटते. अशा पद्धतीने विचार करुन आपण 'मुळ स्वरूपातील धर्माची उपासना आणि जाण ठेवणार्‍या विवेकी मुस्लिमांना' कशी मदत करणार? तुमची नजर गढुळ असेल तर ते 'विवेकी' तुम्हाला कधीच रिस्पॉन्स देणार नाहीत हे परमसत्य आहे. ते शेवटी धर्मालाच सामिल होणार आणि तसेच वागणार. मुलामुलींना रितसर शिकवणारे, चार बायका नसणारे, ढिगभर पोरं नसणारे, मुल्लांचे फतवे न मानणारे, इसिससारख्यांना विरोध करणारे जे मुस्लिम आहेत त्यांच्याबद्दल इथे चांगले लिहिणे म्हणजे 'इस्लामच्या भ्रष्ट रुपाचे जीव तोडून समर्थन' आहे हे तुमच्याकडूनच समजले. अहो पण हीच तर ती विवेकी लोकं आहेत ना ज्यांना समर्थन द्यावे असे तुम्ही सुचवताय. तुमचेच तर काम मी करत आहे इथे. हिंदूंच्या मनात मुस्लिमांबद्दलची दिवसेंदिवस वाढत चाललेली घृणा दहशतवादावर उत्तर नाही. पण ती गल्ली-मोहल्ल्यात पेटू शकणार्‍या दंगलीसाठीचे पेट्रोल आहे. अशा दंगली ज्या स्थळ काळ उद्देश जात धर्म बघत नाहीत. दहशतवादापेक्षा माझ्यासाठी ह्या दंगलींचा, धार्मिक उन्मादाच्या स्थितीचा मोठा प्रश्न आहे. कारण १०० दहशतवादी हल्ले प्लान केले जातात त्यापैकी ९९ आधीच रोखले जातात. देशोदेशीच्या सरकारी यंत्रणांचे मोठ्या स्तरावर ह्यावर काम चालू असते. हे हल्लेही मुख्य ठिकाणावर केले जातात जसे मेट्रो शहरे, स्ट्रॅटेजीक लोकेशन्स. पण दंगल भडकली तर अगदी पन्नास हजार लोकवस्तीच्या गावातही कित्येक दशकं भरुन येणार नाही असे नुकसान करुन जाते. लोक रोज सिरीया, इजिप्त, इराक, पाकिस्तान, अफगाणिस्तान इथे होणार्‍या हिंसाचाराबद्दल चर्चा करुन मुस्लिमांबद्दल सरसकट प्रतिमा बनवतात. पण तुम्हाला रोज ज्यांच्या सोबत जगावे लागते त्या आजुबाजुच्या भारतीय मुस्लिमांबद्दलही तुम्ही तोच विचार करुन शांततेने रात्री झोपू शकाल काय? तुमच्या गल्लीमोहोल्ल्यात दंगल भडकली तर तुम्ही काय करु शकाल? काहीच नाही. त्यापेक्षा दंगल न भडकण्यासाठी, धार्मिक सलोखा आणि सहजीवनासाठी चांगले प्रयत्न तर नक्कीच करु शकता. भारतात अशी अनेक गावं शहरं आहेत जिथे हिंदु मुस्लिम दंगल कधीच झाली नसेल, कधीच दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट केले नसतील. अशा शहरांमधे धार्मिक ताणतणाव होतातही, नाही असे नाही. पण आपसी सलोख्याने परिस्थिती नियंत्रनात आनली जाते. विशेषतः राजकिय हेतुने जे तणाव प्रेरित नसतात ते असेच आटोक्यात आणले जातात. अशा शहरांची शांतता बिघडवण्याचे अचूक काम गैरसमजुतींनी तयार होणारी घृणा करते. आपण त्याला हातभार लावतोय का याचा विचार इथल्या सदस्यांनी जरूर करावा. तुम्ही तारिक फतेह काय म्हणतो त्याबद्दल शंभरवेळा सांगणार. त्यात काही विशेष नाही. तुम्हाला आवडेल अशी भाषा बोलणार्‍यांचाच संदर्भ तुम्ही द्याल. माझ्यामते गुरुजींनी वर सांगितलेले पुरोगामी असण्याचे सर्व फायदे फतेहसाहेबांना हवे आहेत. केनेडात बसून ते भारतीय मुस्लिमांबद्दल काय बोलतात ह्यापेक्षा इथे भारतात माझ्या आजूबाजूला काय घडतंय, काय जळतंय, स्थानिक पातळीवर, देशभरात काय काय चाललंय, इथल्या हिंदू, मुस्लिमांशी बोलून, त्यांचे विचार ऐकून, वर्तन बघुन आपले मत ठरवणे जास्त इष्ट आहे. अर्थात हे आपले माझे मत. आपण कोणावर लादत नाही. अधिक माहितीसाठी वाचा: https://www.quora.com/How-do-Pakistanis-view-Tarek-Fatah-who-considers-himself-an-Indian-despite-being-a-Pakistani भारतात सतत उद्धार केल्या जाणार्‍या फुरोगाम्यांची आठवण येईल. बाकी तुम्हाला हिंदू किंवा मुस्लिमांबद्दलची माझी भूमिका माझ्या आजवरच्या प्रतिसादांमधून कळली नाही ह्याचे श्रेय तुमच्या चष्मेबहादूर वृत्तीला द्यावे की कसे हा प्रश्न राहिला शेवटी. (वरच्या काही वाक्यांमधे इथल्या सदस्यांबद्दल, प्रतिसादांबद्दल लिहिले आहे ते सरसकटीकरण सम्जून मला झोडपण्याची उत्तम संधी दवडू नये असे कोणाला वाटत असेल तर देव त्यांना चांगली बुद्धी देवो! समझदार को इशारा काफी ;-) )
↩ प्रतिसाद: lakhu risbud
D
DEADPOOL Fri, 04/01/2016 - 06:06 नवीन
त जो आज पहिल्यांदा तुम्ही बॅकफूटवर खेळताना दिसत आहात!
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
S
sagarpdy Fri, 04/01/2016 - 07:19 नवीन
हा आणि असे ४-५ स्पष्टीकरणात्मक प्रतिसाद एका पानावर डकवून त्याचा दुवा आपल्या स्वाक्षरीत (लेखकाची भूमिका) ठेवत चला. बरेच निरर्थक वाद आणि मेगाबायटी प्रतिसाद टळतील.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
L
lakhu risbud Fri, 04/01/2016 - 10:42 नवीन
हिंदूंच्या वाईट चालिरीती, प्रथा, मान्यतांबद्दल टिका केली तर ते 'इस्लामच्या भ्रष्ट स्वरुपाचे जीव तोडून समर्थन अहो हिंदू धर्माची चिकित्सा करा ना,चालीरीतीबद्दल प्रश्न सुद्धा विचारा. असे चिकित्सक विचार करणाऱ्यांना हिंदू समाजाने सुरवातीच्या विरोधानंतर त्या चिकित्सेची योग्यता ध्यानात आल्यावर शिरोधार्य सुद्धा मानले आहे. इस्लाम धर्मात अशी किती उदाहरणे आहेत ? आणि दुसरा महत्वाचा मुद्दा हिंदू धर्माची,बहुसंख्य असणाऱ्या समाजाच्या अंतर्गत विरोधाभासांची चिकित्सा करण्याचे महत कार्य तुम्हाला इस्लाम धर्म,भारत या देशाच्या संबंधित कोणत्याही धाग्यावर करण्याचे का सुचते? त्यासाठी वेगळा धागा सुरु न करता प्रतिसाद देनारयांचेच कसे चुकते हा युक्तिवाद का करत असता ? धार्मिक कट्टरता मुस्लिम धर्मात जशी लहानपणा पासून बिंबवली जाते त्याच प्रकारे हिंदू धर्मात बिम्बविली जाते का याचा विचार करा. माझ्या आई ला आणि बायको ला जो पर्यंत मशिदीत जाऊन नमाज अदा करण्याची परवानगी मिळत नाही तो पर्यंत मी सुद्धा मशिदीत जाणार नाही अशी तारेक फ़तह यांची भूमिका आहे, स्त्रियांसाठी समानतेचा आग्रह धरणारी अशी किती उदाहरणे मुस्लिम धर्मात तुच्या डोळ्यासमोर आहेत ? हिंदूंच्या मनात मुस्लिमांबद्दलची दिवसेंदिवस वाढत चाललेली घृणा दहशतवादावर उत्तर नाही. पण ती गल्ली-मोहल्ल्यात पेटू शकणार्‍या दंगलीसाठीचे पेट्रोल आहे. तुम्ही इथे मिपावरचे बहुसंख्य प्रतिसाद देणारे मुस्लिमांच्या बद्दल "ते तसलेच आहेत"या भूमिकेतून प्रतिसाद देतात अशी मांडणी करता.पण सामान्य माणूस ज्याचा या धर्माच्या लोकांशी रोजच्या जगण्यात कोणत्या न कोणत्या प्रकारे संबंध येतो अशा लोकांना या धर्माबद्दल असा विचार का करावासा वाटला याच्या कार्यकारण भावाचा शोध न घेता तुम्ही ते विरोध करतात म्हणून त्यांच्या विरोधात ओरडत सुटलेले आहात. तुम्ही तारिक फतेह काय म्हणतो त्याबद्दल शंभरवेळा सांगणार. त्यात काही विशेष नाही. तुम्हाला आवडेल अशी भाषा बोलणार्‍यांचाच संदर्भ तुम्ही द्याल कमाल आहे बुवा, एक अभ्यासू इस्लामी विचारवंत ,ज्यांचा आजच्या भारताशी,देशाच्या तथाकथित हिंदुत्ववादी विचारसरणीशी काहीच संबंध नाही किंबहुना ते असली विचारसरणी नाकारतातच.असे असून सुद्धा राष्ट्रवादाची भाषा मांडणारे विचारवंत आणि तारेक फ़तह इस्लाम च्या अनुयायांची धर्माच्या नावाखाली चाललेली दादागिरी यांच्या बाबत एकमत कसे ? हे खरच कळत नाही. आता त्यांचे आणि इथल्या राष्ट्रवादी विचारवंतांचे एका मुद्द्यावर एकमत आहे म्हंटल्यावर तुमच्या सारखे सेकुलर/धर्मनिरपेक्ष विचारवंत त्यांना खोटे म्हणणर हे ओघाने आलेच. या बाबतीत ज्यांनी आपल्याच धर्माच्या ३० लाख लोकांना फक्त भाषा उर्दू न स्वीकारल्यामुळे मारले असा पाकिस्तानी दृष्टीकोन तुम्हाला महत्वाचा वाटतो यावरूनच तुमच्या वैचारिक पातळीची उंची कळून येते.स्वतःचा मुद्दा खरा ठरवण्यासाठी प्रसंगी पाकिस्तानी जे कि अत्यंत दुटप्पी,ढोंगी,भारतद्वेषी,हिंदुद्वेषी लोक आहेत अशा माध्यमां मधील बातमीचा विदा तुम्हाला द्यावासा वाटतो,तुमच्या बुद्धीची कीव येते! खरंच! तारेक फ़तह यांनीच सांगितलेला किस्सा, हिमाचल प्रदेशात एक थंड हवेचे ठिकाण आहे १२०० च्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या त्या गावात मुस्लिम समाजाची संख्या ६० च्या आसपास आहे. तिथल्या माशिदिवरचा भोंग्या वरून पहाटे ४.३० वाजता मोठ्ठ्या आवाजात अजान दिली जाते.फ़तह त्या ठिकाणी मुक्कामी असताना त्यांनी हि अजान ऐकली,एवढ्या सकाळी अशा शांत ठिकाणी मोठ्या आवाजातील ती अजान सगळ्यांच्या झोपमोडीचे कारण ठरली तर नवल नाही.ते त्या मशिदीत गेले तेव्हा तिथे त्यांना नमाजासाठी आलेले फक्त ४ लोक दिसले, त्यांनी तिथल्या इमाम ला समजावले कि या एवढ्या मोठ्या आवाजाच्या भोन्ग्याची गरज नाहीये, इमाम सुद्धा त्यांचे म्हणणे ऐकून पहाटे तो भोंगा न वापरण्याबद्दल तयार झाले. २ दिवस असे गेल्यावर तिसऱ्या दिवशी पुन्हा त्यांना पूर्वीच्याच मोठ्या आवाजातील अजान ऐकू आली.फ़तह त्या मशिदीत गेल्यावर तेथील इमाम म्हणाले कि तुमचे म्हणणे आम्हाला पटते पण समाजातील जी तरुण मुले आहेत ती ऐकण्यास तयार नाहीत,त्यांच्या आग्रह मी मोडू शकत नाही त्यामुळे अजूनसुद्धा माशिदिवरचा भोंग्या वरूनच पहाटे ४.३० वाजता मोठ्ठ्या आवाजात अजान दिली जाते. आपल्या देशात अशी लाखो उदाहरणे आहेत. असहिष्णुता वाढली अशी जी ओरड होत आहे त्याला बर्याच अंशी इस्लाम च्या अनुयायांची धर्माच्या नावाखाली चाललेली दादागिरी कारणीभूत आहे. जी गेल्या १०-१५ वर्षापासून आहे, सरकारचा या गोष्टींशी संबंध नाही.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
L
lgodbole Sat, 04/02/2016 - 11:41 नवीन
चारच लोक येतात म्हणुन भोंगा वाजवु नये , हा कुठला कायदा म्हणे ? कोपर्‍या कोपर्‍यात लाल शेंदरी दगड असतात , ते पुजायला चार लोकही नसतील तर चार लोकही नसतात , हे कारण दाखवुन ते हटवणे चालू शकेल का ?
↩ प्रतिसाद: lakhu risbud
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा