Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल

ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/13/2016 - 22:52
🗣 637 प्रतिसाद
नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला. या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी : १. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच. २. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे. ३. गुप्तता : सहा महिन्यांच्या तयारीच्या काळात व पंतप्रधान कारवाई जाहीर करेपर्यंत गुप्तता पाळणे हा या प्रकल्पाचा जीव होता. या एका मुद्द्यावर सर्व कारवाईचे मुख्य यशापयश अवलंबून होते. वरच्या दोन क्रमांकांच्या मुद्द्यात आलेल्या विवरणावरून + गेल्या ७० वर्षांत सरकारप्रणाल्यांमध्ये निर्माण झालेल्या हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर गुप्तता पाळणे हे काम किती कठीण होते हे सांगायला नकोच. माध्यमांत असलेल्या बातम्यांप्रमाणे या कारवाईच्या प्रकल्पाची काही रुपरेखा आता हळूहळू बाहेर येत आहे. त्याबद्दल मला समजलेले व भावलेले काही, थोडक्यात... काळापैसेवाल्यांना व अतिरेकी जाळ्याला या कारवाईचा वासही येऊ नये यासाठी बँकाच काय या कारवाईचा आराखडा फक्त निवडक मंत्री आणि आरबीआयचे अत्युच्च अधिकारी यांनाच माहीत होता.इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ही माहिती ऐन वेळेला दिली गेली, त्या मिटींगमला मोबाईल न आणण्याची सूचना होती. त्यांनतर मोदी राष्ट्रपतींना भेटून नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्री मिटिंग रूम मध्ये बसून होते. त्यानंतर वित्त मंत्रालय व आरबीआयची कारवाई सुरू झाली. बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. तसेच, बातमी गुप्त ठेवण्यासाठी रु २०००च्या नवीन नोटांसाठी एटीएम मशीन्स ८ नोव्हेंबरच्या आधी कॅलिब्रेट करणे शक्य नव्हते. बातमी थोडीही बाहेर फुटली असती तर कारवाईमधली सगळी नाही तरी बरीचशी हवा निघून गेली असती... मुख्य म्हणजे बदमाषांनी आपला काळा पैसा इतरत्र गुंतवून अथवा अननुभवी सामान्य गरिबांच्या माथी मारून सरकारचे काम फार कठीण केले असते. त्याचसाठी पंतप्रधानांची घोषणा रात्री आठच्या सुमाराला आणि कारवाई सुरु होण्याची वेळ रात्री १२ वाजता ठेवली गेली. या चार तासात बँका बंद असल्याने बातमी कळली तरी काहीच फायदा नव्हता. बँकाचे लॉकर्सही पुढचा एक दिवस तरी उघडता येणे शक्य नव्हते. मला वाटते, या कारवाईतला हा शेवटचा घाव वर्मी बसणारा होता. केवळ आरबीआयच्या परिपत्रकाने अश्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही आणि असे पत्रक सरळपणे न समजेल अश्या शासकीय व कायदेशीर भाषेत असते. वित्तमंत्रालयाच्या, आरबीआयच्या व करविभागाच्या अश्या परिपत्रकांबद्दल सीए सुद्धा संभ्रमात असतात व निर्णय देण्यापूर्वी बाबूलोकांच्या विश्लेषणाची वाट पहातात, हे आपण नेहमी पाहतोच. स्वतः पंतप्रधानांनी आदल्या रात्री टीव्हीवर बातमी सांगून लोकांमध्ये शक्य असलेले अफवांचे पीक टाळले. मला वाटते पूर्वीच्या अश्या प्रकारच्या कारवायांत टाळलेली आणि आता आवर्जून पंतप्रधानांकरवी सर्व जनतेला संबोधून माहिती देणारी ही पायरी "मास कम्युनिकेशन"ची नाडी पक्की माहीत असल्याचे लक्षण आहे. कारवाईचा त्रास होऊनही व काही नेत्यांची उसकवणारी वक्तव्ये येवूनही लोकक्षोभ न होण्याचे हे महत्वाचे कारण आहे, असे मला वाटते. इतर काही असले तरी, इतकी बंधने असलेली, इतक्या थोड्या वेळेत करायची, एवढी मोठी कारवाई भारतासारख्या आवाढव्य देशात करण्यात अपेक्षित होता त्यापेक्षा कमी गोंधळात आणि सामान्य लोकांच्या उत्तम सहकार्याने काम चालू आहे असे माध्यमांतील बातम्यांवरून दिसते आहे. असा प्रकल्प पूर्णपणे आलबेल प्रकारे होईल हे अपेक्षित नव्हतेच. ज्यांना मोठ्या प्रकल्पांची थोडीबहुतही माहिती आहे त्यांना तसा विचार शेखचिल्लीचे स्वप्न वाटेल. यासंदर्भात, सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळेस किती आठवडे/महिने तयारी केली जाते व त्यानंतरही ती निवडणूक अनेक विभागांत, दीडदोन महिन्यांच्या कालावधीत घेतली जाते, याची आठवण उपयोगी ठरेल. मुख्य म्हणजे विरोधी पक्षांनी या देशाच्या फायद्याच्या कारवाईत मदत तर केली नाहीच. पण, सुरुवातीच्या एकदोन दिवसांत, बसलेल्या धक्क्यात काय करावे हे न कळल्याने, पहिल्यांदा सरकारचे हे पाऊल बरोबर आहे असे म्हणून टाकले आणि नंतर "पण-परंतू" असे बोलत दिशाभूल करणार्‍या गोष्टी सुरू झाल्या आहेत. काहीजण लोकभावना भडकाव्या अशीच वक्तव्ये आणि कारवाया करत आहेत. काही जण तर ही पूर्ण कारवाईच मागे घ्या असे म्हणत आहेत ! हे अपेक्षित आहेच म्हणा. सरकारने यालाही तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी, ठेवली असेलच. सर्वसामान्य लोक मात्र त्या वक्तव्यांनी फारसे प्रभावित न होण्याइतके प्रगल्भ झालेले पाहून एक भारतिय म्हणून आनंद व अभिमान वाटला. हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. त्या वाटेत अनेक समस्या येतील, एखादी कारवाई फसेलही. कारण ७० वर्षांत काळ्या पैशाने गडगंज झालेले लोक ना निर्बुद्ध आहेत, ना ते तो पैसा सहजासहजी सोडतील. सरकारच्या कारवाया अयशस्वी व्हाव्या यासाठी ते त्यांची सर्व हुशारी व नवे-जुने हितसंबंध वापरून सर्व भले-बुरे (मुख्यतः बुरेच) मार्ग चोखाळतील, यात शंका नाही. काही सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी व गटबंधनातल्या पार्टीतल्या लोकांचे अंतर्गत हितसंबंधही गुंतलेले असतील. तो गुंताही सोडवावा लागेल. अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांना सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल. अशी तयारी आहे असेच संकेत सद्या तरी दिसत आहेत. आतापर्यंत या कारवाईतल्या दोन तृटी बाहेर आल्या आहेत. पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे. दुसरे म्हणजे नोटांचा रंग पाण्यात विरघळतो व फिकट होतो आहे अश्या बातम्या आहेत. मोठ्या प्रमाणात सामग्रीची जुळवाजुळव करत असतानाच गुप्तता आणि घाई पाळायला लागयामुळे याप्रकारे नोटांची प्रत कमी होणे झाले असावे. मात्र जोपर्यंत भारत सरकार त्या नोटांना "लीगल टेंडर" मानते आहे तोपर्यंत ते केवळ "टेक्निकल एरर" असतील व त्यांचा नागरिकांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. आताचा गडबड गोंधळ ताब्यात आल्यावर मात्र याबाबत पावले उचलणे अत्यावश्यक ठरेल. त्यासंबंधी एखादा प्रकल्प आरबीआय आत्ताच तयार करत नसल्यास आश्चर्य वाटेल. माझ्या अंदाजाप्रमाणे ५०० व १००० च्या पुरेश्या नोटा चलनात आल्यावर या नोटांना बँकिंग व्यवहारातून हळू हळू काढून / बदलून टाकण्याची कारवाई होईल. कारण, पहिल्यापेक्षा जास्त किंमतीच्या (पक्षी : ५०० व १००० ऐवजी २०००च्या) नोटा कारवाई गुप्त ठेवण्यासाठी व तसे करताना कारवाईचा सुरुवातीचा भार (कागद, शाई, छपाई, साठवण, वाहतूक, वितरण, इ) अर्धा करण्यासाठीच वितरीत केल्या जात आहेत. परंतु, या कारवाईसंबंधीच्या जनतेच्या प्रतिसादाने अंतीम यशाच्या आशा उंचावल्या आहेत. कारण, काळ्या पैश्याच्या निर्मुलनातली हीच एक पायरी आहे की जिच्याशी सामान्य जनतेचा तडक संबध येतो व त्याला त्रास होतो. इतर पायर्‍यांत सामान्य जनतेला फारसा त्रास असण्याची शक्यता फार कमी आहे. ही व पुढच्या पायर्‍या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !
वर्गीकरण
अर्थकारण
राजकारण
देशकारण

प्रतिक्रिया द्या
133576 वाचन

💬 प्रतिसाद (637)
म
मिहिर Sun, 11/13/2016 - 23:32 नवीन
पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे.
ते कोकणीत आहे. हिंदीत 'दो हज़ार रुपये' असे मोठ्या फाँटमध्ये छापले आहेच.
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Mon, 11/14/2016 - 05:39 नवीन
Exactly दोन हजार रुपया हे कोकणीत लिहिलय. ती चुक नाहीये. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिहिर
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/14/2016 - 09:46 नवीन
अच्छा असं आहे काय ? मी टिव्हीवरच्या बातमीत नोट दाखवून सांगितले ते लिहिले होते. टिव्ही अत्यंत अविश्वासी माध्यम बनले आहे याचा हा अजून एक पुरावा ! म्हणजे आता फक्त एक शाईचा मुद्दा राहिला, तोही टेक्निकल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर
स
स्वधर्म Mon, 11/14/2016 - 14:12 नवीन
नाही. ती चूकच असावी असे वाटते. कोकणीत रुपया असे म्हणत नाहीत, रुपे असे म्हणतात, हे whatsapp वर वाचले अाहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
पैसा Mon, 11/14/2016 - 14:49 नवीन
आम्ही कोकणी बोलणारे सांगतोय की ते कोंकणी आहे. रुपे नक्कीच म्हणत नाहीत. रुपय, रुपये. रुपै, रुपया असे बरेच उच्चार कोंकणीत होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
य
यशोधरा Mon, 11/14/2016 - 14:52 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
स्वधर्म Tue, 11/15/2016 - 08:16 नवीन
धन्यवाद पैसा ताई व पिशी अबोली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पिशी अबोली Mon, 11/14/2016 - 17:40 नवीन
जुन्या चालत असलेल्या नसलेल्या नोटा बघा की. असंच लिहितात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वधर्म
म
मोहनराव Mon, 11/14/2016 - 17:16 नवीन
शाई जात नाही http://zeenews.india.com/news/india/what-happens-when-you-crush-or-dip-in-water-your-new-rs-2000-note-watch-the-video_1949460.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/14/2016 - 17:47 नवीन
काल तर एका वहिनीवर नोटा ओल्या कापदाने घासून आणि पाण्यात भिजवून रंग जात आहे असे दाखवत होते. त्याशिवाय एक भूतकाळात टंकसाळीत क्वालिटी कंट्रोल करणारी व्यक्ती आनली आहे असे सांगून तिच्याकरवी ते खरे आहे आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या आरबीआयच्या अधिकार्‍यावर खटला भरावा असे वदवून घेत होते. ही अफवा पसरवण्यासाठी केलेली बदमाषी असल्यास त्या वाहिनीवर कायदेशीर कारवाई करायला हवी. दुर्दैवाने त्या वाहिनीचे नाव लक्षात नाही. पण हे अनेक लोकांनी पाहिलेले असल्याने ती वाहिनी सापडायला कठीण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव
य
यशोधरा Tue, 11/15/2016 - 05:55 नवीन
अबप तुमची का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 11/15/2016 - 06:55 नवीन
बहुतेक. पण वाहीन्यासर्फिंग करताना बातमी पाहिली आणि वाहिनीचे नाव बघितले नाही. नेहमी न पाहिली जाणारी वाहिनी होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
म
मार्मिक गोडसे Tue, 11/15/2016 - 07:23 नवीन
काल तर एका वहिनीवर नोटा ओल्या कापदाने घासून आणि पाण्यात भिजवून रंग जात आहे असे दाखवत होते.
२००० च्या नोटेचा रंग जातोय ही बातमी खरी आहे, मी प्रत्यक्ष करून बघितलं आहे. फक्त नोट ओली झाल्यामुळे नोटेचा रंग इतरत्र पसरत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मार्मिक गोडसे Tue, 11/15/2016 - 16:49 नवीन
ही अफवा पसरवण्यासाठी केलेली बदमाषी असल्यास त्या वाहिनीवर कायदेशीर कारवाई करायला हवी.
खुद्द RBI ने एका वृत्तवाहीनीवर सांगितले की, ज्या नोटेचा रंग जातो तीच नोट खरी आहे. वित्त मंत्रालयाने वृत्तपत्रात २००० व ५०० नोटेच्या दिलेल्या जाहिरातीत ह्या नोटांच्या खास व सामान्य वैशिष्ट्यांत रंग जाण्याबद्दलची माहीती का दिली नाही? सरकार गोंधळलेले आहे हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
क
कपिलमुनी Tue, 11/15/2016 - 06:36 नवीन
ही सर्वात खोटारडी आणि भाजपाधार्जिणी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव
प
प्रसाद_१९८२ Tue, 11/15/2016 - 09:44 नवीन
बॉर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र, बाकीच्या वाहिन्या धुतल्या तांदळा प्रमाणे आहेत जणू !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 11/15/2016 - 13:41 नवीन
माफ करा साहेब बाकी चालू द्या, फक्त झी न्यूज भाजप धार्जिणी आहे ह्यात बाकीच्या वाहिन्या धुतल्या तांदळाच्या आहेत हे कसे ठरले ?? बाकी तुमचे कपिलमुनींसोबत काही जुने स्कोर सेटल करायचे असले तर असो,मला त्यातही रस नाही फक्त 'क बीजेपी धार्जिणा आहे असे म्हणणे म्हणजे ख हा धुतल्या तांदळाप्रमाणे म्हणण्या बरोबर आहे' हे कसे ठरले ते समजून घ्यायला आवडेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
प
प्रसाद_१९८२ Tue, 11/15/2016 - 13:50 नवीन
ही सर्वात खोटारडी आणि भाजपाधार्जिणी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 11/15/2016 - 14:00 नवीन
ओके तुम्हाला बहुदा कळलेले नसावे म्हणून परत एकदा आकड्यात बोलायचा प्रयत्न करतो दादा, (कमुच्या मते, माझे मत तेच असेल असे अजिबात नाही हे आगाऊ नोंदवतो) जर झी न्यूज सर्वात खोटारडी आहे म्हणजे आकड्यात १००% खोटारडी आहे ? मान्य ? आता ती १००% खोटारडी आहे म्हणले म्हणजे दुसऱ्या वाहिनी गेला बाजार एबीपी, आजतक, एनडीटीव्ही, टाइम्स नाऊ ० % आहेत असे म्हणणे कितपत बरोबर असेल तुमच्यामते? कपिलमुनींनी वरचेच गृहितक म्हणले आहे असे तुम्हाला वाटते का? उत्तर होय असल्यास कुठल्या तर्काने ही सिस्टिम बायनरी झाली ते विश्लेषण आपण करू शकाल का? मला ते समजून घेण्यात रस आहे. परत एकदा क्वालिटेटिव्ह+क्वांटीटेटिव्ह मांडतो. एखाद्याच्या मते, अ एखाद्या बाबतीत १००% आहे तर त्याचा अर्थ दुसरे शून्यच आहेत हे कसे म्हणता येईल ? उरलेल्यांसाठी ०-१००% इतकी रेंज ओपन नसेल का? तरीही एक १०० म्हणजे बाकी शून्य ह्याच्या मागचे तुम्ही वर्कआऊट केलेले सिलोजिझम समजून घ्यायला आवडेल :) धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 11/15/2016 - 14:02 नवीन
०-९९% रेंज असे वाचावे आगाऊ आभार _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ज
जोन Mon, 11/14/2016 - 01:21 नवीन
धन्यवाद सर.....
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 11/14/2016 - 02:56 नवीन
दोन हजार रूपयांची नोट बाजारात आणायला नको होती. एखाद्याला मोठी रक्कम द्यायची आहे तेव्हा तिचा उपयोग होईल परन्तु लहान खरेदीसाठी ती फारशी उपयोगाची नाही. डुप्लीकेट नोट जर तशी बाजारात आली तर आगीतुन फ़ूफ़ाट्यात पडन्यासारखे आहे. आपण म्हणता तसे नव्या पाचशेच्या हजाराची नवी नोट मुबलक प्रमाणात आल्यावर हळूहळू मार्केट मधून काढून घेणे हे चांगलेच आहे, असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 11/14/2016 - 03:39 नवीन
दोन हजार रूपयांची नोट बाजारात आणायला नको होती. एखाद्याला मोठी रक्कम द्यायची आहे तेव्हा तिचा उपयोग होईल परन्तु लहान खरेदीसाठी ती फारशी उपयोगाची नाही
यावर श्री बोकिल (अर्थक्रांतीचे प्रणेते) यांचे स्पष्टीकरण असे की. एखाद्या रस्तावरचे खड्डे बुजवण्यासाठी दुसरा तात्पुरता रस्ता उपलब्ध करुन देणे गरजेचे होते. जे त्यांनी २००० च्या नोटेने केले. तसेच पुर्वीच्या तुलनेत २००० च्या खूप कमी नोटा बाजारात येणार आहेत. (उदा. १००० रु. च्या १०० नोटांच्या बदल्यात २००० च्या ५० नोटा यायला हव्या. पण प्रत्यक्षात १० नोटाच येतील.) त्यामुळे काळ्या बाजार करु इच्छीणार्‍यांना त्या कमी उपलब्ध असतील. पुढे जाउन सरकार २००० च्या नोटा रद्द करणारच नाही याची शाश्वती नाही. सद्याची नोटेची प्रत पहाता लवकरच २००० ची नोट रद्द होइल असेच वाटतेय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विवेकपटाईत Mon, 11/14/2016 - 04:22 नवीन
नमोजी परल्या दर्जाचे इमानदार आहे, जो माणूस आपल्या पत्नीला सरकारी गाडी देऊ शकत नाही त्याला कुणाचे सुख सहन होणार. (दिल्लीकरांची प्रतिक्रिया). शिवाय या वर्षी १,२८,००० कोटींचे काळे धन बाहेर काढून सरकारी खजाण्यात ४५,००० कोटींचा वर कर व जुर्माना जमा झाला असेल. नोट छापण्याचा खर्च ३.१७ रुपयाच्या हिशोबाने जास्तीस जास्त 6००० कोटी होईल.सरकारला काही नुकसान नाही. शिवाय एकट्या महाराष्ट्रात शेकडो कोटींचे सरकारी कर भरल्या गेले. सर्व राज्य सरकारांचे काही प्रमाणात खजाने भरले. काही दिवसात बघा १०० च्या नोटा हि बाद होतील. घरी पैसा ठेवण्यापेक्षा बँकेत ठेवा आणि रूपे/डेबिट कार्ड वापरा हेच योग्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 11/14/2016 - 03:59 नवीन
तिकडे जातिवंत सीए असलेल्या प्रभूंनी सुद्धा बूच मारल्याचे ऐकिवात येते आहे. काळा पैसा वाले लोक पुंड, नोटा चेंज करायला रेल्वेची तिकिटे बुक करू लागले, अर्थातच त्रिवेंद्रम-हजरत निजामुद्दीन राजधानीचा फर्स्ट एसी पॅक झाला अश्याने, हे ट्रेंड लक्षात येताच प्रभूंजीनी शक्कल लढवली, त्यांनी स्पष्ट केले आहे की आता तिकिटे रद्द करायची असल्यास पेमेंट NEFT किंवा चेकने(च) करतो, तरीही जर कोणाला कॅश हवीच असेल त्याने तिकीट बारीवर आपले पॅनकार्ड घेऊन यावे, कॅश मिळेल ! बघू आता कोण किती तिकिटे कॅन्सल करतंय ते =))
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Mon, 11/14/2016 - 04:02 नवीन
अजून काही एअरलाईन्स ने नोटा कॅन्सल नोटिफिकेशन आल्यानंतरच्या काही दिवसात (१२ नोव्हेंबर पर्यंत) बुक केलेली सगळी फ्लाईट तिकिट्स नॉन रिफंडेबल सेगमेंट मध्ये कन्व्हर्ट करून टाकली! भांडा तिच्यायला कोण भांडतोय ते =))
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 11/14/2016 - 05:34 नवीन
ते 2000 ची नोट, हायवे लॉजिक झेपलं नाही, कुणाला समजलं असेल तर नीट समजावून सांगा हि विनंती.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 11/14/2016 - 07:02 नवीन
साहेब, २००० हजार ची नोट ही तात्पुरती आहे असा अंदाज आहे. जी कामे मोठ्या नोटेनेच होतात ती कामे सद्या आलेल्या २००० च्या नोटेने करावीत. या नोटा खूप कमी असणार आहेत. त्यांची क्वालीटी पहाता त्या जास्त दीवस टीकतील का ही शंका आहे. हायवे चे लॉजीक असे की, हायवेवरचे खड्डे बुजवायचे असतील तर रस्ता बंद करुन चालत नाही. म्हणून पर्यायी मार्ग (२००० ची नोट) मुळ रस्ता चांगला झाला की पर्यायी रस्ता बंद करता येइल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/14/2016 - 10:06 नवीन
रद्द केलेल्या नोटांच्या बदल्यात द्यायल्या लागणार्‍या १०० च्या नोटा गुप्तता ठेऊन छापणे अशक्य होते आणि त्यांचे सर्व बँकांच्या खात्यात वितरण करणे (हिशेब ठेवणे, वाहतूकीच्या गाड्यांचा आकडा, इ) हा अत्यंत मोठा गोंधळ विकत घेणारा व्यवहार झाला असता. शिवाय त्यामुळे, गडबडीचा काळ संपल्यावर, बाजारात मोठ्या प्रमाणात सर्क्युलेट होणार्‍या रु१०० च्या नोटा कमी करण्याचा एक मोठा प्रकल्प करावा लागला असता. या सगळ्यासाठी खर्चही अनेक पटींनी मोठा झाला असता. त्यापेक्षा रु२००० च्या नोटांमुळे वरच्या सर्व कृतींचा खर्च (कागद, शाई, वाहतूक, हिशेब, वितरण, बाजारातून परत काढून घेणे, इ) अत्यंत कमी झालेला आहे. शिवाय, हे सगळे कारवाई गुप्त ठेवून कमी वेळात करण्यासाठी आवश्यक होते. यामुळे, उघड न दिसणारा फार मोठा फायदा म्हणजे, आयएसआयला बसलेला दणदणीत दणका त्याला कायमचा आठवणीत राहील: (अ) त्याला नवीन कागद, नवीन छपाई, नवीन किंमतीच्या असणार्‍या खोट्या नोटा छापायला काही वर्षे लागतील. (आ) काही बातम्यांप्रमाणे काश्मीर समस्या वाढविण्यासाठी आणि भारतातल्या नजीकच्या निवडणुकींत हस्तक्षेप करण्यासाठी आएसआयने नेहमीपेक्षा मोठ्या प्रमाणावर रु५०० व रु१०००च्या खोट्या नोटा छापल्या होत्या. त्या सगळ्या सिंधु नदीच्या दोन बँकांच्या मध्ये जमा करायला लागणार आहेत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मराठी कथालेखक Mon, 11/14/2016 - 10:53 नवीन
हे सगळं ५०० च्याच नव्या नोटेने साध्य झालं असतं. त्यासाठी तात्कालिक अशी २००० ची नोट गरजेची नव्हती. २००० ची नोट चालवण्यात अनेक व्याहवारिक अडचणी येवू शकतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अमु१२३ Mon, 11/14/2016 - 11:56 नवीन
???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मार्मिक गोडसे Mon, 11/14/2016 - 11:59 नवीन
हे सगळं ५०० च्याच नव्या नोटेने साध्य झालं असतं.
नाही हो, बायपासही हायवेसारखा प्रशस्त हवा, भले अर्धवट बांधलेला का असेना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/14/2016 - 16:43 नवीन
याचे उत्तर वर आहे. त्यापेक्षा रु२००० च्या नोटांमुळे वरच्या सर्व कृतींचा खर्च (कागद, शाई, वाहतूक, हिशेब, वितरण, बाजारातून परत काढून घेणे, इ) अत्यंत कमी झालेला आहे. शिवाय, हे सगळे कारवाई गुप्त ठेवून कमी वेळात करण्यासाठी आवश्यक होते. दर २०००च्या नोटेमागे चार ५००च्या नोटा छापायला लागल्या असत्या. त्यासाठी पैसे, श्रम आणि वेळ चौपट लागले असते. त्यापेक्षा जास्त महत्वाचे म्हणजे, हे जेवढे जास्त तेवढे ही कारवाई गुप्त राहण्याची शक्यता कमी. ही कारवाई गुप्त राहणे तिचा जीव होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
N
Nitin Palkar गुरुवार, 12/01/2016 - 14:46 नवीन
"सिंधु नदीच्या दोन बँकांच्या मध्ये" अतिशय समर्पक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सुबोध खरे Mon, 11/14/2016 - 05:48 नवीन
दुसऱ्या धाग्यावर बेनामी मालमत्तेबद्दल पारित झालेल्या कायद्याबद्दल आणि या नोटा रद्द करण्याच्या अचूक वेळेबद्दल" लिहिलेला प्रतिसाद येथे परत उद्धृत करीत आहे. काळा पैसे फक्त नोटांमध्ये असतो इतरही अनेक मार्गानी लपवला जातो सरकारला हे कळत नाही का? सामान्य माणसांना त्रास द्यायची गरज काय असा उच्चरवा ने टाहो फोडणार्यांचे लक्ष मी बेनामी मालमत्तेबद्दल आताच पारित झालेल्या कायद्याकडे वेधू इच्छितो. http://www.prsindia.org/uploads/media/Benami/Benami%20Transactions%20Act,%202016.pdf भारत सरकार का असामान्य राजपत्र. extraordinary Gazzette of India मध्ये प्रसारित झालेले आहे. जाणकारांनी आणि जिज्ञासूंनी पाहून घ्यावे. सरकारने "रोकड नोटा" या एकाच मार्गावर बंदी आणली नसून बेनामी मालमत्ता हा सर्वात मोठा अवैध संपत्तीचा मार्ग बंद करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केलेली आहे. श्री मोदींच्या कालच्या गोव्याच्या भाषणात याचे पडसाद उमटलेले आहेत हे काळजीपूर्वक विश्लेषण केल्यास लक्षात येईल. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्याची वेळ हि अतिशय काळजीपूर्वक निवडलेली होती. दिवाळी झाल्यामुळे सामान्य लोकांनी बोनसची रक्कम आपल्या दिवाळीच्या खरेदी साठी वापरलेली होती. हि रक्कम व्यापाऱ्यांच्या खिशात आहे पण बँकेत भरलेली नाही. ७ तारीख होऊन गेल्यामुळे लोकांचे पगार झालेले होते. तेंव्हा आपल्या सेवकवर्गाला पगार देण्यासाठी पैसे नाहीत हा आरडा ओरडा मालक वर्गाला करता आला नाही. बहुसंख्य लोकांच्या हातात रोख पैसे पगार झाल्यामुळे होता. दिवाळीची सुट्टीवरून लोक आणि बँकेचे कर्मचारीही परत आलेले होते. लग्न साराय साठी मोठ्या प्रमाणावर काळा पैसा वापरला जाण्याची शक्यता होती. दिवाळी नंतर स्थावर मालमत्तेची बरीच देवाणघेवाण रोखीच्या/ काळ्या पैशाच्या माध्यमातून होणार होती. अशा अतिशय काळजीपूर्वक निवडलेल्या वेळेत केलेल्या शल्यक्रियेमुळे बऱ्याच लोकांचे हितसंबंध दुखावले गेले आहेत म्हणून हि कोल्हेकुई चालू आहे. सामान्य माणसाला त्रास होतो आहेच परंतु त्यासाठी सामान्य माणसांनी कोठेही आंदोलने इ केलेली नाहीत. राजकारणी लोक अशी चिथावणी देण्याचा प्रयत्न करीत असले तरीही सामान्य जनता अशा भूल थापांना अजून तरी बळी पडलेली नाही. त्यासाठी मी मिसळपाव वरील आपल्या मित्रांना विनंती करतो कि व्हॉट्स अँप वर फिरणाऱ्या अफवा आपण तरी पुढे पाठवू नका.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 11/14/2016 - 06:03 नवीन
आज मय महसूस कर रहां हू मित्रों , कि डॉ खरे और डॉ म्हात्रे इनका फॅन बननेमे मय्ने कोई गलती नही की !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संजय क्षीरसागर Mon, 11/14/2016 - 06:18 नवीन
व्हॉट्स अँप वर फिरणाऱ्या अफवा आपण तरी पुढे पाठवू नका. ब्लॅक मनीवर फ्लॅट ३०.९% टॅक्स (मॅक्सिमम मार्जीनल रेट) आणि २००% पेनाल्टी म्हणजे साधारण ९३% पैसे जातील. त्यामुळे ५ लाख रुपये अवैध असतील तर पहिले २.५० लाख वजा जाता पुढच्या २.५० लाखावर दंडासकट २,३१,७५० इतकी रक्कम भरावी लागेल. शिवाय व्याज वगैरे भानगडी आहेत. तस्मात, ५ लाखावर ७५,००० रुपये भरावे लागतील हा वॉटस अ‍ॅप मेसेज चुकीचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बोका-ए-आझम Mon, 11/14/2016 - 05:59 नवीन
अर्थतज्ञ आहेत आणि विरोध करणारे राजकारणी आहेत. यावरून काय ते समजून घ्या.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 11/14/2016 - 06:00 नवीन
नेहमीप्रमाणे मस्त लेख. माझ्यासारख्या सामान्यांना काही दिवस त्रास सहन करावा लागत आहे ही सत्य परिस्थिती आहे. पण हा त्रास निदान मी तरी आनंदाने सहन करत आहे.कारण मला माहित आहे की काळ्या पैशावर खरोखरच नियंत्रण आले तर त्यातून सरकारचा करातून महसूल वाढेल, सरकारला कमी पैसे कर्जाऊ उचलावे लागतील आणि त्यातूनच व्याजाचे दर कमी होतील.त्यातूनच माझ्यासारख्यांच्या गृहकर्जावरील व्याजाचा बोजा कमी होईल.त्यासाठी थोडी कळ सोसायला काहीच हरकत नाही.आणि तसेही मी जवळपास प्रत्येक विकांताला ५ तास उभे राहून एका क्लासमध्ये शिकवायला जातोच (आणि त्यातून मला फॉर्म-१६ ए मिळतो आणि त्यावरील उत्पन्नावर करही भरतो :) ). जर गृहकर्ज लवकर आटोक्यात आले तर कदाचित मला माझे विकांत विश्रांतीसाठी वापरता येतील. त्यासाठी आठवड्यातून दोन तास रांगेत उभे राहायला लागले तर माझी अजिबात ना नाही.उलट भविष्यात होणारा फायदा लक्षात घेता मी ते आनंदाने करेन. मला कधीकधी वाटते की दुसर्‍या महायुध्दात रशियन लोकांनी ज्या परिस्थितीचा सामना केला तशी परिस्थिती आपल्यावर आली तर आपले पळपुटे लोक नक्की काय करतील? शहरेच्या शहरे बेचिराख होत आहेत, लाखांनी लोक मारले जात आहेत, खायला मिळायची मारामार, त्यातच रशियातली ती जीवघेणी थंडी. तरीही ते लोक निर्धाराने लढले आणि हिटलरला गाडले. आणि इथे आपण. दोन दिवसांची गैरसोय आपल्याला सहन होत नाही की रांगेत दोन तास थांबावे लागले तरी आपल्याला कित्ती कित्ती त्रास होतो.अन्यथा आपण लालबागच्या राजाच्या दर्शनाला तासनतास उभे राहू, रिलायन्स जिओचे नवे कनेक्शन मिळवायलाही कितीही वेळ उभे राहू, तिरूपतीच्या बालाजीचे दर्शन १२ तास रांगेत राहून घेतले असे अभिमानाने सांगू पण काळ्या पैशाविरूध्द कडक पाऊल सरकारने उचलले असेल तर त्यासाठी थोडीही गैरसोय आम्हाला नको.या दोन तासांच्या गैरसोयीसाठी आम्ही परत त्यांनाच मत द्यायचा विचार करू ज्यांनी मुळात काळा पैसा निर्माण केला. मोदींनी हे पाऊल उचलून नक्कीच चांगले केले आहे. 'अच्छे दिन' म्हणजे आपण काहीही न करता खाटल्यावर पडून राहायचे आणि कुठलातरी हरी येऊन जेवणाचे ताट हातात आणून देईल अशी काहींची कल्पना झाली असावी.असल्या बांडगुळांनी त्यांची बडबड ताबडतोब बंद करावी. आपण आपले भविष्य घडविण्यासाठी हातपाय मारायला तयार नसू तर असेच मॅट्रिक्समध्ये पडून राहा.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Mon, 11/14/2016 - 07:19 नवीन
असल्या बांडगुळांनी त्यांची बडबड ताबडतोब बंद करावी. आपण आपले भविष्य घडविण्यासाठी हातपाय मारायला तयार नसू तर असेच मॅट्रिक्समध्ये पडून राहा. == सहमत आहे, छान प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ट
ट्रेड मार्क Tue, 11/15/2016 - 17:36 नवीन
मस्त प्रतिसाद.
लालबागच्या राजाच्या दर्शनाला तासनतास उभे राहू, रिलायन्स जिओचे नवे कनेक्शन मिळवायलाही कितीही वेळ उभे राहू, तिरूपतीच्या बालाजीचे दर्शन १२ तास रांगेत राहून घेतले असे अभिमानाने सांगू पण काळ्या पैशाविरूध्द कडक पाऊल सरकारने उचलले असेल तर त्यासाठी थोडीही गैरसोय आम्हाला नको.या दोन तासांच्या गैरसोयीसाठी आम्ही परत त्यांनाच मत द्यायचा विचार करू ज्यांनी मुळात काळा पैसा निर्माण केला.
प्रायॉरिटीज चुकत आहेत असं वाटतं. चांगल्या वाईटाची जाणीव बोथट होऊ लागली आहे. एखादा निर्णय कशासाठी घेतला गेला, त्यातून नक्की साध्य काय करायचे आहे व त्याचे दूरगामी परिणाम आपल्या जीवनावर काय होणार आहेत याचा विचार न करता फक्त नावं ठेवायची वृत्ती वाढत आहे. त्यात आपला मेडिया सतत नकारात्मक बातम्या दाखवत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
च
चौकटराजा Mon, 11/14/2016 - 06:10 नवीन
यापूर्वीच मी मिपावर असा अंदाज व्यक्त केला आहे की २००० ची नोट अचानक रद्द होईल. बायपास रस्ता काढून टाकला जाईल. २००० हा एक सापळा आहे असे मला राहून राहून वाटत आहे. त्या नोटेचा सामान्य माणसाला काही फायदा नाही. माझ्या अंदाजाने १०० च्या नव्या नोटा जुन्या रद्द न करता लवकरच म्हणजे अगदी सहा महिन्यात चलनात येतील. पण या सर्व घडामोडीतून मी काय शिकलो असेन तर मी मॉलमधे नोट वापरणार नाही. सबब मामला कार्ड.ही मोहीम मध्यमवर्गीयानी नेटाने लावून धरली तर खाजगी व्यापारी ग्राहक टिकवून धरण्यासाठी कार्डे स्वीकारू लागतील.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Mon, 11/14/2016 - 09:20 नवीन
सहमत. आमचा किराणावाला चौधरी कार्ड पेमेंट घेऊ लागलाय. येत्या वर्षात मंडईसह सर्वत्र असेच होईल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/14/2016 - 16:50 नवीन
२००० ची नोट अचानक रद्द होईल ही अफवा असली तरी आता काळाबाजार्‍यांना बसलेल्या धसक्यामुळे तिच्या स्वरूपात काळा पैसा करणे कमी होईल ;) =)) ती १ ते ३ वर्षांत रद्द होईल असा माझा अंदाज आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
म
मराठी कथालेखक Mon, 11/14/2016 - 07:56 नवीन
ही व पुढच्या पायर्‍या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !
म्हणजे एखादा अधिकारी वा नगरसेवक जो पुर्वी रस्त्याच्या एक कोटींच्या कामासाठी कंत्राटदाराकडून समजा दहा लाख रुपये लाच मागत होता तो आता मागणार नाही का ? 'नको रे बाबा ते काळे धन त्याऐवजी नव्वद लाखात रस्ता बनव' असे कंत्राटदाराला म्हणेल का ? किंवा बिल्डरला NOC देताना संबंधित अधिकारी लाच नाकारुन वर बिल्डरला म्हणेल का की 'आता घराच्या किमती कमी कर. सामान्य नागरिकास फ्लॅट विकत घेणं सोपं झालं पाहिजे' ? एखादा वाहतूक पोलीस सिग्नल मोडल्यावर , पीयूसी नसल्यावर लाच घेण्याची सवय सोडून देईल का ? आणि अशाच प्रकारे अनेक पातळींवर चालत असलेला भ्रष्टाचार संपुष्टात येईल. छान छान ...चला भ्रष्टाचारमुक्त भारताचं 'स्वप्न' रंगवूयात !!
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 11/14/2016 - 08:27 नवीन
असे नेमके प्रश्न विचारायचे नसतात.... इत्यादी,;) असो. वाट बघूया!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/14/2016 - 17:50 नवीन
मला नेमके (किंवा इतरही) प्रश्न प्रश्न विचारले की त्यांना नेमकी उत्तरे मिळतात, हे तुम्हाला माहीत नाही हे माझे दुर्दैव आहे :) खाली नेमकी उत्तरे दिलेली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रसाद_१९८२ Mon, 11/14/2016 - 08:36 नवीन
विचार एव्हढे निगेटिव्ह कसे काय असू शकतात हो? एकादी गोष्ट ह्या आधी कधी झाली नाहि, तर ह्या पुढे ही कधी होणार नाही, असे काहि लॉजिक आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Mon, 11/14/2016 - 09:52 नवीन
मी विचारवंत वगैरे असल्याचा दावा कधीच केला नाही. झालेच तर भ्रष्टाचार/लाचखोरी संपणारच नाही असे मी म्हंटलले नाही. पण केवळ नोटा बाद केल्याने भ्रष्टाचार संपेल का असा माझा प्रश्न आहे? यावर तुमच्याकडे तार्किक उत्तर असेल तर कृपया द्यावे. कदाचित भ्रष्टाचार संपणार असेलही , पण नेमका कसा हे एक सामान्य माणूस म्हणून माझ्या आकलनाच्या बाहेरचे असावे, पण तुम्हाला माहीत असल्यास जरुर विश्लेषण करावे. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
प
पद्माक्षी Mon, 11/14/2016 - 12:04 नवीन
नोटा बंद केल्याने भविष्यातला भ्रष्टाचार संपेल कि नाही माहित नाही. पण एक भीती राहील कि हे परत होऊ शकते. उदा:- आज एखाद्या सरकारी बाबूकडे १० लाखापेक्षा जास्त रोकड आहे तर ती बाद झाली आहे. कारण पैसे जमा करताना तो या पैशाचा स्रोत काय दाखवणार? त्यामुळे उद्या परत लाच घेताना 'कदाचित' तो विचार करेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा