Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल

ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/13/2016 - 22:52
🗣 637 प्रतिसाद
नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला. या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी : १. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच. २. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे. ३. गुप्तता : सहा महिन्यांच्या तयारीच्या काळात व पंतप्रधान कारवाई जाहीर करेपर्यंत गुप्तता पाळणे हा या प्रकल्पाचा जीव होता. या एका मुद्द्यावर सर्व कारवाईचे मुख्य यशापयश अवलंबून होते. वरच्या दोन क्रमांकांच्या मुद्द्यात आलेल्या विवरणावरून + गेल्या ७० वर्षांत सरकारप्रणाल्यांमध्ये निर्माण झालेल्या हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर गुप्तता पाळणे हे काम किती कठीण होते हे सांगायला नकोच. माध्यमांत असलेल्या बातम्यांप्रमाणे या कारवाईच्या प्रकल्पाची काही रुपरेखा आता हळूहळू बाहेर येत आहे. त्याबद्दल मला समजलेले व भावलेले काही, थोडक्यात... काळापैसेवाल्यांना व अतिरेकी जाळ्याला या कारवाईचा वासही येऊ नये यासाठी बँकाच काय या कारवाईचा आराखडा फक्त निवडक मंत्री आणि आरबीआयचे अत्युच्च अधिकारी यांनाच माहीत होता.इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ही माहिती ऐन वेळेला दिली गेली, त्या मिटींगमला मोबाईल न आणण्याची सूचना होती. त्यांनतर मोदी राष्ट्रपतींना भेटून नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्री मिटिंग रूम मध्ये बसून होते. त्यानंतर वित्त मंत्रालय व आरबीआयची कारवाई सुरू झाली. बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. तसेच, बातमी गुप्त ठेवण्यासाठी रु २०००च्या नवीन नोटांसाठी एटीएम मशीन्स ८ नोव्हेंबरच्या आधी कॅलिब्रेट करणे शक्य नव्हते. बातमी थोडीही बाहेर फुटली असती तर कारवाईमधली सगळी नाही तरी बरीचशी हवा निघून गेली असती... मुख्य म्हणजे बदमाषांनी आपला काळा पैसा इतरत्र गुंतवून अथवा अननुभवी सामान्य गरिबांच्या माथी मारून सरकारचे काम फार कठीण केले असते. त्याचसाठी पंतप्रधानांची घोषणा रात्री आठच्या सुमाराला आणि कारवाई सुरु होण्याची वेळ रात्री १२ वाजता ठेवली गेली. या चार तासात बँका बंद असल्याने बातमी कळली तरी काहीच फायदा नव्हता. बँकाचे लॉकर्सही पुढचा एक दिवस तरी उघडता येणे शक्य नव्हते. मला वाटते, या कारवाईतला हा शेवटचा घाव वर्मी बसणारा होता. केवळ आरबीआयच्या परिपत्रकाने अश्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही आणि असे पत्रक सरळपणे न समजेल अश्या शासकीय व कायदेशीर भाषेत असते. वित्तमंत्रालयाच्या, आरबीआयच्या व करविभागाच्या अश्या परिपत्रकांबद्दल सीए सुद्धा संभ्रमात असतात व निर्णय देण्यापूर्वी बाबूलोकांच्या विश्लेषणाची वाट पहातात, हे आपण नेहमी पाहतोच. स्वतः पंतप्रधानांनी आदल्या रात्री टीव्हीवर बातमी सांगून लोकांमध्ये शक्य असलेले अफवांचे पीक टाळले. मला वाटते पूर्वीच्या अश्या प्रकारच्या कारवायांत टाळलेली आणि आता आवर्जून पंतप्रधानांकरवी सर्व जनतेला संबोधून माहिती देणारी ही पायरी "मास कम्युनिकेशन"ची नाडी पक्की माहीत असल्याचे लक्षण आहे. कारवाईचा त्रास होऊनही व काही नेत्यांची उसकवणारी वक्तव्ये येवूनही लोकक्षोभ न होण्याचे हे महत्वाचे कारण आहे, असे मला वाटते. इतर काही असले तरी, इतकी बंधने असलेली, इतक्या थोड्या वेळेत करायची, एवढी मोठी कारवाई भारतासारख्या आवाढव्य देशात करण्यात अपेक्षित होता त्यापेक्षा कमी गोंधळात आणि सामान्य लोकांच्या उत्तम सहकार्याने काम चालू आहे असे माध्यमांतील बातम्यांवरून दिसते आहे. असा प्रकल्प पूर्णपणे आलबेल प्रकारे होईल हे अपेक्षित नव्हतेच. ज्यांना मोठ्या प्रकल्पांची थोडीबहुतही माहिती आहे त्यांना तसा विचार शेखचिल्लीचे स्वप्न वाटेल. यासंदर्भात, सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळेस किती आठवडे/महिने तयारी केली जाते व त्यानंतरही ती निवडणूक अनेक विभागांत, दीडदोन महिन्यांच्या कालावधीत घेतली जाते, याची आठवण उपयोगी ठरेल. मुख्य म्हणजे विरोधी पक्षांनी या देशाच्या फायद्याच्या कारवाईत मदत तर केली नाहीच. पण, सुरुवातीच्या एकदोन दिवसांत, बसलेल्या धक्क्यात काय करावे हे न कळल्याने, पहिल्यांदा सरकारचे हे पाऊल बरोबर आहे असे म्हणून टाकले आणि नंतर "पण-परंतू" असे बोलत दिशाभूल करणार्‍या गोष्टी सुरू झाल्या आहेत. काहीजण लोकभावना भडकाव्या अशीच वक्तव्ये आणि कारवाया करत आहेत. काही जण तर ही पूर्ण कारवाईच मागे घ्या असे म्हणत आहेत ! हे अपेक्षित आहेच म्हणा. सरकारने यालाही तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी, ठेवली असेलच. सर्वसामान्य लोक मात्र त्या वक्तव्यांनी फारसे प्रभावित न होण्याइतके प्रगल्भ झालेले पाहून एक भारतिय म्हणून आनंद व अभिमान वाटला. हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. त्या वाटेत अनेक समस्या येतील, एखादी कारवाई फसेलही. कारण ७० वर्षांत काळ्या पैशाने गडगंज झालेले लोक ना निर्बुद्ध आहेत, ना ते तो पैसा सहजासहजी सोडतील. सरकारच्या कारवाया अयशस्वी व्हाव्या यासाठी ते त्यांची सर्व हुशारी व नवे-जुने हितसंबंध वापरून सर्व भले-बुरे (मुख्यतः बुरेच) मार्ग चोखाळतील, यात शंका नाही. काही सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी व गटबंधनातल्या पार्टीतल्या लोकांचे अंतर्गत हितसंबंधही गुंतलेले असतील. तो गुंताही सोडवावा लागेल. अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांना सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल. अशी तयारी आहे असेच संकेत सद्या तरी दिसत आहेत. आतापर्यंत या कारवाईतल्या दोन तृटी बाहेर आल्या आहेत. पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे. दुसरे म्हणजे नोटांचा रंग पाण्यात विरघळतो व फिकट होतो आहे अश्या बातम्या आहेत. मोठ्या प्रमाणात सामग्रीची जुळवाजुळव करत असतानाच गुप्तता आणि घाई पाळायला लागयामुळे याप्रकारे नोटांची प्रत कमी होणे झाले असावे. मात्र जोपर्यंत भारत सरकार त्या नोटांना "लीगल टेंडर" मानते आहे तोपर्यंत ते केवळ "टेक्निकल एरर" असतील व त्यांचा नागरिकांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. आताचा गडबड गोंधळ ताब्यात आल्यावर मात्र याबाबत पावले उचलणे अत्यावश्यक ठरेल. त्यासंबंधी एखादा प्रकल्प आरबीआय आत्ताच तयार करत नसल्यास आश्चर्य वाटेल. माझ्या अंदाजाप्रमाणे ५०० व १००० च्या पुरेश्या नोटा चलनात आल्यावर या नोटांना बँकिंग व्यवहारातून हळू हळू काढून / बदलून टाकण्याची कारवाई होईल. कारण, पहिल्यापेक्षा जास्त किंमतीच्या (पक्षी : ५०० व १००० ऐवजी २०००च्या) नोटा कारवाई गुप्त ठेवण्यासाठी व तसे करताना कारवाईचा सुरुवातीचा भार (कागद, शाई, छपाई, साठवण, वाहतूक, वितरण, इ) अर्धा करण्यासाठीच वितरीत केल्या जात आहेत. परंतु, या कारवाईसंबंधीच्या जनतेच्या प्रतिसादाने अंतीम यशाच्या आशा उंचावल्या आहेत. कारण, काळ्या पैश्याच्या निर्मुलनातली हीच एक पायरी आहे की जिच्याशी सामान्य जनतेचा तडक संबध येतो व त्याला त्रास होतो. इतर पायर्‍यांत सामान्य जनतेला फारसा त्रास असण्याची शक्यता फार कमी आहे. ही व पुढच्या पायर्‍या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !
वर्गीकरण
अर्थकारण
राजकारण
देशकारण

प्रतिक्रिया द्या
133576 वाचन

💬 प्रतिसाद (637)
म
मोदक गुरुवार, 12/01/2016 - 10:51 नवीन
अशी सपशेल शरणागती पत्करलीत तर तुमची हायकमांड नाराज होईल तुमच्यावर..!! :=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/01/2016 - 11:25 नवीन
मोदक, आपल्यावर कोणी जसे आरोप करू नये असे आपल्याला वाटते तसे आरोप दुसऱ्यावर करू नये असा शहाणपणा आपण काही दिवस आधी इथेच कुठेतरी शिकवत होतात, विसरलात काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 12/01/2016 - 11:36 नवीन
अहो डांगे.. शेवटी स्मायली टाकल्या आहेत त्यांच्याकडे पण बघा हो. थोडे तरी हलके घ्या की. ;) असो, वाईट वाटले असेल तर बाकीच्या प्रतिसादांचा योग्य प्रतिवाद करा. तुमचे चुकले असेल तर मान्य करा. मिपाकर सूज्ञ आहेत तसेच मनाने मोकळे ढाकळेही आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/01/2016 - 11:56 नवीन
स्मायली टाकून शिव्या दिल्या म्हणजे सुटता येतं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 12/01/2016 - 11:58 नवीन
ठीक आहे, तुम्ही वरच्या प्रतिसादांचा प्रतिवाद करा मग मी माझे विधान स्मायल्यांसह परत घेतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कपिलमुनी गुरुवार, 12/01/2016 - 11:08 नवीन
टोलनाक्यावर आता कूपन्स ! अशी कूपन्स देणे म्हणजे पॅरॅलल करन्सी निर्माण केल्यासारखे आहे आणि अशा कूपन्सची सक्ती चुकीची आणि बेकायदेशीर आहे . कारण ही कूपन्स सार्वत्रिक स्विकार्ह नसणार आहेत
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 12/01/2016 - 11:18 नवीन
यावर आरबीआयचे माहितीपत्रक पाहिले पाहिजे. तसेच ही तात्पुरती व्यवस्था असेल अशी आशा आहे. लिंक असली तर दे रे..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ड
डँबिस००७ गुरुवार, 12/01/2016 - 12:56 नवीन
मोदींनी आपल्या खासदार आमदारांना आपले बॅन्क व्यवहार सादर करायला सांगितले ५०० / १००० च्या नोटा बंद झाल्याने बर्याच लोकांना (ज्यांच्याकडे ह्या नोटांचा साठा ( अवैध संपत्तीच्या रुपाने) त्यांना त्रास झालेला आहे.ते लोक ह्या नोटा अवैध मार्गाने बदलण्यासाठी कोणाच्याही मागे लागण्याची शक्यता आहे. अश्या परिस्थीतीत नातलग, ओळखीचे वैगेरे लोक पैसे बदलवुन घेण्यासाठी भाजपाच्याच सत्तेत असलेल्या लोकांवर प्रेशर आणुन शकतात व सत्तेतले लोक ह्याला बळी पडु शकतात. सरळ नकार देण भारतीयांना सहज जमत नाही. त्यामुळे मोदीजीनी वॉर्निंग दिलेली असु शकते. ८ नोव्हेंबर नंतर मोदीजी तडक जापानला गेले तेथुन आले ते गोव्याला. त्या कार्यक्रमात एक विषेश घटना घडली होती जी काही लोकांच्याच लक्षात आली असावी. गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मिकांत पार्सेकर हात जोडुन काहीतरी अजिजी पंतप्रधानांच्या समोर करत होते. अगदी लोटांगण घालायच्या परिस्थीतीत आले होते. पंतप्रधानांनी त्यांना सरळ इग्नोर केल होत. हे सर्व कॅमेरात रेकॉर्ड आले. अश्या अजिजीच कारण काय असावा ?
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ गुरुवार, 12/01/2016 - 13:06 नवीन
सरकार भारत भरातील टोल नाके बंद करुन त्याजागी प्रत्येक गाडीवर रेडिओ फ्रिक्वेंसीवर चालणारे आयडी चिकटवुन त्या द्वारे टोलचा डायरेक्ट भरणा करणार आहे. प्रत्येक गाडी वर असा आयडी असेल. आपण आपल्या खात्यात टोल ला लागणारे पैसे ठेवायचे, आयडी ह्या खात्याला लिंक असणार आहे. टोलच्या जागी पास होताना आयडी मार्फत टोल आपोआप कापला जाईल. टोल भरण्यासाठी थांबायची गरज उरणार नाही, गतीरोध उरणार नाही. ब्रेक फ्री जर्नी होईल. सरकारच्या वृत्ता नुसार ह्या रेडीओ आयड्या प्रत्येक गाडीवर बनताना कंपनी तर्फेच लावुनच गाडी मार्केटला येईल.
  • Log in or register to post comments
च
चेक आणि मेट गुरुवार, 12/01/2016 - 13:35 नवीन
कसयं ना,सरकारचा निर्णय योग्य आहे असे सर्वचजण म्हणतात पण काहीजण अंमलबजावणीमधल्या त्रुटींचे विश्लेषण करतात. आता विरोध करणार्या लोकांच्या डोक्यामध्ये काय चाललेलं असतं याचं एक उदाहरण देतो. काही दिवसांपूर्वी संजय आवटे(साम मराठी) यांनी आपल्या फेसबुकवर "urjit patel missing" असा काहितरी dp ठेवला होता,आता त्यांनी तो बदलला आहे हि गोष्ट निराळी! पण यातून त्यांच्या मनोदशेचा अभ्यास करता येतो. ते असं कि आपलं वार्तांकन कुणी ऐकत नाही,ऐकलं तर ते कोणाला पटत नाही,आपण ज्या पक्षाला कायम विरोध करतोय तो तर वाढतच चालला आहे,नगरपालिका निवडणूकांमध्ये मिळालेलं अनपेक्षित यश तसेच झुकाव असलेल्या पक्षाची पीछेहाट,लोकांचा नोटबंदीला असणारा सपोर्ट,तसेच विरोधकांच्या आंदोलनात नसलेली हवा त्याला जनतेनं दाखवलेला ठेंगा त्यातून झालेला त्यांचा पोपट, आणि आपले विचार कोणी स्वीकारत नाहीत,इत्यादी सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून अशा मंडळींना जोरात फ्रस्टरेशन आलेलं आहे,तर त्यातूनच त्यांचा असा पोकळ विरोध सुरू असतो.शेवटी यामध्ये psychological factor's काम करत आहेत त्यात त्यांचा काही दोष नाहीये म्हणा.पण फ्रस्टरेशनचा ज्वर बाकि हाय लेवलवर आहे हे मात्र नक्की. (पत्रकार मंडळींमध्ये इकडचे आणि तिकडचे असे दोन्ही प्रकार आहेत,पण सरकारविरोधींचा सूर थोडा जास्तच जोरकस आहे,पण त्यांना अपयश येत आहे.) ---मोदीभाट,केजरीभाट,गांधीभाट (खोबरं तिकडं चांगभलं)
  • Log in or register to post comments
च
चेक आणि मेट गुरुवार, 12/01/2016 - 13:37 नवीन
आर्रर डब्बल झाला कि!! कृपया एक उडवावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 12/01/2016 - 16:27 नवीन
सहमत! बाकी या अशा नको त्या ठिकाणी केलेल्या पोकळ विरोधामुळे हळूहळू सर्वसामान्यांचं मत "हे विरोध करत आहेत म्हणजे सरकार काहीतरी चांगलं करतंय" असं होऊ नये म्हणजे मिळवली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
म
मोदक गुरुवार, 12/01/2016 - 16:52 नवीन
चांगले आहे की.. या मार्गाने का होईना पण दांभीकपणचे बुरखे टराटरा फाटूदेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
स
संदीप डांगे गुरुवार, 12/01/2016 - 17:40 नवीन
स्वतःचे बुरखे फाटलेले दिसत नाहीत, लोकांचे बघण्याची फार हौस असते काही लोकांना, मोदकशेठ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 12/01/2016 - 18:25 नवीन
गुरुजींना पुरावे द्या आधी, मग लोकांच्या बुरख्याची काळजी करा. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/01/2016 - 19:22 नवीन
तुम्ही तुमची सफाई द्या आधी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 12/01/2016 - 19:34 नवीन
मोदक - Thu, 01/12/2016 - 19:02 Infinite loop माहिती आहे का हो तुम्हाला..? :=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Fri, 12/02/2016 - 10:01 नवीन
तुम्ही तुमची सफाई द्या आधी
ते तुम्ही आणि मोदकशेठ बघून द्या. पण तुम्ही माझ्याविरूद्धचे पुरावे कधी देताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Fri, 12/02/2016 - 10:40 नवीन
श्रीगुरुजी या सदस्याला प्रतिसाद देतांना भाजप चे दलाल नकोत अशी इच्छा व्यक्त केली, तुम्ही आहात असे कधी म्हटले? तुम्ही अंगावर कशाला घेताय?
संपूर्ण प्रतिसाद मला उद्देशून आहे प्रतिसादात दोन वेळा माझे नाव घेऊन माझ्यावर टीका केलेली आहे. तरीसुद्धा दलाल हा शब्द मला उद्देशून नाही अशी वकिली मखलाशी सुरू आहे. शेवटी शेपूट घातलीच तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Fri, 12/02/2016 - 10:48 नवीन
मराठी व्याकरण व व्याकरणाचे नियम समजत असाल अशी अपेक्षा आहे. स्वतःच लिहिलेले खालील वाक्य नीट वाचा.
श्रीगुरुजी, मिपाची जनभावना तुमच्या विचारांविरुद्ध आहे असेच चर्चेत दिसत आहे, योग्य ती समज आपल्याला येवो, भाजपचे दलाल नकोत इथे मिपावर,
यातील पहिली आणि शेवटची ओळ एकाच वाक्याचा भाग आहेत. वाक्याचा शेवटचा भाग हा पहिल्या वाक्याचाच भाग आहे. यात पूर्णविराम कोठेही नसून फक्त स्वल्पविरामच शेवटी असल्याने पहिले वाक्य "येवो" या शब्दानंतर संपलेले नसून पुढील भाग हा पहिल्या वाक्याचाच भाग आहे. तुम्ही वकिली मखलाशी सुरू केल्याने नाईलाजाने हे सांगावे लागत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 10:55 नवीन
तुम्ही आहात काय दलाल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
म
मोदक Fri, 12/02/2016 - 10:58 नवीन
तुम्ही पैसे घेऊन लिहिता का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Fri, 12/02/2016 - 10:58 नवीन
मी नाहीच आणि कधीच नव्हतो आणि कधीही नसेन. तुम्ही मात्र बेधडक माझ्यावर दलाल असण्याचा आरोप करून मोकळे झालात आणि आता वकिली मखलाशी करून "मी नाही बाई त्यातली" अशा धर्तीवर अंग काढून घ्यायचा प्रयत्न सुरू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
J
jp_pankaj गुरुवार, 12/01/2016 - 13:58 नवीन
या नोटाबंदिच्या पार्श्वभुमीवर मी एका लेखमालीकेची आतुरतेने वाट पाहतोय. "महिंद्रा ट्रक,वीस लाख,एक सरदार आणी मी- भाग १.,२,३,........." (संबधितांनी हलके घ्यावे,सध्या बरच काही जड झालय.)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 12/02/2016 - 08:47 नवीन
1.80 lakh ATMs recalibrated to dispense new notes, says ATM manufacturer NCR Corporation
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Fri, 12/02/2016 - 09:01 नवीन
जवळ जवळ २५ दिवसात १ लाख ८० हजार एटीएम ना रिकॅलिब्रेट करण हे कठीण काम एटीएम कंपन्यांनी करुन दाखवल आहे, त्या विरुद्ध बँकेतील अधिकार्याच्या संगनमताने सरकारातल्या ऊच्च अधिकार्यांनी आपले काळे पैसे पांढरे करण्याचा उद्योग सुरुच ठेवलेला दिसतोय, अजुनही काही लोकांना पैसे बदलुन मिळतील का असा फोन येतो असे समजले आहे. सरकारने अश्या उच्च अधिकार्यांना अगोदर नोटबंदीची कल्पना दिली असती तर काळा पैसा कुठेच दिसला नसता, आता ह्या पुढे ही पकडलेल्या ५००/१००० चलनी नोटांवर/लोकांवर वेळीच योग्या कठोर कारवाई करण्यास सरकारातील उच्च अधिकार्यांनी योग्यते सहकार्य करावे, अन्यथा नोटबंदीसारखा ईतका मोठा उपद्वाप फोल ठरेल.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 10:54 नवीन
इथे आता भाजपविरोधी विचारसरणीच्या लोकांनी येऊ नये म्हणून सर्रास धमक्या दिल्या जात आहेत, तरी संस्थळांचे चालक मालक यांना हा प्रकार आणि हि धोरणं चालत असतील तर स्पष्ट करावे. कम्पूबाजीच्या जिवावर बुलिंग चालू आहे. माझ्यावर पैसे घेऊन प्रतिसाद देत असल्याचे आरोप करणारे भाजपचे पेड सदस्य आहेत हे समजायला आता हरकत नाही. विरोध अजिबात सहन होत नाही हे खरे दुखणे यानिमित्त बाहेर पडले आहे, चालू द्या.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 12/02/2016 - 11:01 नवीन
इथे आता भाजपविरोधी विचारसरणीच्या लोकांनी येऊ नये म्हणून सर्रास धमक्या दिल्या जात आहेत, तरी संस्थळांचे चालक मालक यांना हा प्रकार आणि हि धोरणं चालत असतील तर स्पष्ट करावे.
भाजपचे द्लाल इथे मिपावर नकोत असे तुम्हीच म्हटला होता ना? तुम्हाला भाजपचे पेड विरोधक म्हटले तर चालेल का? भाजपने घेतलेले चांगले निर्णय अजिबात सहन होत नाहीत हे खरे दुखणे यानिमित्ताने बाहेर पडले आहे, चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुज्ञ Fri, 12/02/2016 - 11:02 नवीन
इथे आता भाजपविरोधी विचारसरणीच्या लोकांनी येऊ नये म्हणून सर्रास धमक्या दिल्या जात आहेत कोणी तुम्हाला धमक्या दिल्या हो ? आणि इथे येऊ नका अशा ?? आणि ते हि तुम्ही भाजपविरोधी वगैरे आहेत म्हणून ? इथे या नाहीतर येऊ नका कोणाला काय फरक पडतो तुमचा ? त्यानिमिताने तुम्ही स्वतः भाजपविरोधी आहेत हे काबुल केल्याबद्दल अभिनंदन. नाही उगाच कुंपणावर बसून लोकांना स्वतः तटस्थ असल्याच्या शेंड्या लावत होता तर इतके दिवस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 11:04 नवीन
तुम्ही हायबरणेशन मध्ये जावा कि, कशाला जगाच्या चिंता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
स
सुज्ञ Fri, 12/02/2016 - 11:08 नवीन
वरील तीन प्रश्नांची उतारे द्या. चवथ्या प्रश्नाचे खरे उत्तर दिलेत तरीही चालेल. आमची काळजी सोडा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मोदक Fri, 12/02/2016 - 11:23 नवीन
इतका त्रास होत असेल तर या आधी दिलेला सल्ला आणखी एकदा ऐका. "लॉजिकल लिहा"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 11:26 नवीन
तुम्ही ठरवणार मी जे लिहिलं ते लॉजिकल आहे की नाही? सरळ सांगा ना सरकारविरोधी, भाजप विरोधी लिहू नका म्हणून..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 11:26 नवीन
आणि लिहिलं तर तुम्हाला कार्यवाहीची धमकी दिली जाईल ते...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मोदक Fri, 12/02/2016 - 12:34 नवीन
लॉजीकल आहे की नाही ते वाचक ठरवतीलच हो.. पण कधी..? तुम्ही उत्तरे दिलीत तर. तुम्ही आरोप करून पळ काढता. उत्तरे द्यायचे कष्ट घेत नाही हे मिपावर कितीतरी ठिकाणी सिद्ध झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुज्ञ Fri, 12/02/2016 - 11:29 नवीन
नक्की काय म्हणायचे आहे आपल्याला ? म्हणजे सरकारविरोधी लिहिलेले सगळे लॉजिकल का इल्लोजिकल ? का आपण सरकार विरोधी लिहिता म्हणून ते सगळेच लॉजिकल ?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 11:38 नवीन
कोणावर काय लिहावे याबद्दल दबाव आणणे याला आक्षेप आहे, मी लिहितो किंवा कोणी काय लिहितो हे वाचकांना ठरवू देत कि लॉजिकल आहे की नाही ते... लॉजिकल नसेल तर मुद्देसूद खोडून काढा, लोकांना अंधविरोधक, चष्मेधारी, पेड प्रतिसादक म्हणायची सुरुवात केली तर आपल्यालाही भक्तभाट म्हटले जाईल याची शक्यता ध्यानात घेतली नसावी,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
म
मोदक Fri, 12/02/2016 - 12:32 नवीन
लॉजिकल नसेल तर मुद्देसूद खोडून काढा, थोडे वरचे प्रतिसाद वाचायचे कष्ट घ्या की. उत्तरे नाहीत म्हणून संभाषणामधून तुम्ही पळ काढला आहे. लोकांना अंधविरोधक, चष्मेधारी, पेड प्रतिसादक म्हणायची सुरुवात केली तर आपल्यालाही भक्तभाट म्हटले जाईल याची शक्यता ध्यानात घेतली नसावी, भक्तभाट / भाट असे संबोधून संभाषणाची पातळी तुम्ही पहिला खालावलीत.. मग तुमच्यावर आरोप झाल्यानंतर तुम्हाला धर्म आठवला काय..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 12:41 नवीन
अंधविरोधक, चष्मेधारी, पेड प्रतिसादक म्हणायची सुरुवात केली कोणी??? जाओ पहले उस आदमी का साईन लेके आओ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 12/02/2016 - 12:46 नवीन
हा हा हा.. आणखी येवूद्यात असे विनोद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 12:55 नवीन
नाही? उत्तर नाही? अरारारा... आता कसं व्हायचं? =)) ज्याला कुणाला इण्टरेस्ट असंल की बॉ नोटाबंदीच्या चर्चा सुरु झाल्यापासून इथे 'मी कोणालाही भक्तभाट म्हणण्याआधी' विरोधी मत प्रदर्शित करणारांना "अंधविरोधक, पेड प्रतिसादक, काळे-पिवळे चष्मेवाले" असे आधी म्हटले गेलेच नाही त्यांनी उत्खनन करुन घ्यावे. अजुनही प्रतिसाद तिथेच असतील. "अंधविरोधक, पेड प्रतिसादक, काळे-पिवळे चष्मेवाले" असे मिपाकरांना नाही तर बहुतेक परग्रहावरच्या लोकांना उद्देशून म्हटले गेले म्हणुन कोणी इतकं मनावर घेतलं नसेल. पण भक्तभाट म्हटल्यावर मात्र जखम चिघळली... =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 12/02/2016 - 12:47 नवीन
लॉजिकल नसेल तर मुद्देसूद खोडून काढा, यावर आपले अमूल्य ज्ञानकण शिंपडा की..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 13:00 नवीन
वैयक्तिक हल्ल्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही. त्यालाच आपण लॉजिकल प्रतिवाद म्हणत असाल तर धन्य आहे. फक्त गा.पै. यांचा प्रतिसाद सुयोग्य प्रतिवाद म्हणावा असा होता, बाकी नुसता थयथयाट... इग्नोर पक्शी फाट्यावर मारले. बाकी, पळ काढला, उत्तर दिले नाही, इत्यादी गमजा म्हणजे मनातले मांडे, खुशाल खावे ज्याला पाहिजे तितके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
सुबोध खरे Fri, 12/02/2016 - 13:40 नवीन
मोदक शेट तुम्हाला तुमचाच प्रतिसाद परत देतो आहे. कशाला पातळी सोडताय? डांगे अण्णांना सवय आहे कि बेफाट आणि बेजबाबदार विधाने करायची आणि त्याला उत्तर देता आले नाही कि गिगा बायटी प्रतिसाद द्यायचा आणि गोल फिरत राहायचे. माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. कारण ते कधीही चूक नसतातच. गेल्या काही दिवसात पाहिलंत तर मी, डॉक्टर सुहास म्हात्रे, तुम्ही, श्री गुरुजी, सुज्ञ अशा अनेक लोकांशी यांचे भांडण चालू आहे आणि ते वैचारिक भांडण नसून केवळ बेफाट आरोप केल्यामुळे आहे. तेंव्हा सोडून द्या.( पातळी नव्हे वाद घालणे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 12/02/2016 - 14:10 नवीन
अहो ही असली प्रवृत्ती इग्नोर केले की आम्ही जिंकलो म्हणून उड्या मारत बसणार, म्हणून बुरखे फाडून दुर्लक्ष करावे असे ठरवले. वाद घालण्यात मलाही रस नाही, पण जगात फक्त मलाच सगळ्या गोष्टींचा फर्स्टहँड अनुभव आहे अशा थापा मारत फिरवलेला वीस लाखाचा ट्रक किमान मिपावर चालणार नाही इतके कळाले तरी बास आहे..! तुमच्या सल्ल्यानुसार आता दुर्लक्ष करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 14:11 नवीन
मिपाचे ठेकेदार! नमस्कार! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 12/02/2016 - 14:13 नवीन
देव तुम्हाला खोटे न लिहिण्याची सद्बुद्धी देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि तुम्हाला बालदिनाच्या शुभेच्छा. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 12/02/2016 - 14:19 नवीन
देव तुम्हालाच सर्व बुद्धी प्रदान करून गेलाय, त्यामुळे नवीन स्टॉक येईपर्यंत आम्हाला झेलावं लागेल. फुकट फौजदारी, ठेकेदारी, दादागिरी, धमकीबाजी सोडाल त्या दिवसासाठी बेस्ट लक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
सुबोध खरे Fri, 12/02/2016 - 14:25 नवीन
देव तुम्हालाच सर्व बुद्धी प्रदान करून गेलाय, त्यामुळे नवीन स्टॉक येईपर्यंत म्हणजे तुम्ही हा स्टॉक येईपर्यंत बुद्धी न वापरता प्रतिसाद देणार कि काय? ह. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मोदक Fri, 12/02/2016 - 14:26 नवीन
"इतके दिवस प्रतिसाद देताना बुद्धी वापरली होती" असे तुम्हाला वाटते आहे काय..? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा