Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल

ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/13/2016 - 22:52
🗣 637 प्रतिसाद
नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला. या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी : १. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच. २. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे. ३. गुप्तता : सहा महिन्यांच्या तयारीच्या काळात व पंतप्रधान कारवाई जाहीर करेपर्यंत गुप्तता पाळणे हा या प्रकल्पाचा जीव होता. या एका मुद्द्यावर सर्व कारवाईचे मुख्य यशापयश अवलंबून होते. वरच्या दोन क्रमांकांच्या मुद्द्यात आलेल्या विवरणावरून + गेल्या ७० वर्षांत सरकारप्रणाल्यांमध्ये निर्माण झालेल्या हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर गुप्तता पाळणे हे काम किती कठीण होते हे सांगायला नकोच. माध्यमांत असलेल्या बातम्यांप्रमाणे या कारवाईच्या प्रकल्पाची काही रुपरेखा आता हळूहळू बाहेर येत आहे. त्याबद्दल मला समजलेले व भावलेले काही, थोडक्यात... काळापैसेवाल्यांना व अतिरेकी जाळ्याला या कारवाईचा वासही येऊ नये यासाठी बँकाच काय या कारवाईचा आराखडा फक्त निवडक मंत्री आणि आरबीआयचे अत्युच्च अधिकारी यांनाच माहीत होता.इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ही माहिती ऐन वेळेला दिली गेली, त्या मिटींगमला मोबाईल न आणण्याची सूचना होती. त्यांनतर मोदी राष्ट्रपतींना भेटून नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्री मिटिंग रूम मध्ये बसून होते. त्यानंतर वित्त मंत्रालय व आरबीआयची कारवाई सुरू झाली. बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. तसेच, बातमी गुप्त ठेवण्यासाठी रु २०००च्या नवीन नोटांसाठी एटीएम मशीन्स ८ नोव्हेंबरच्या आधी कॅलिब्रेट करणे शक्य नव्हते. बातमी थोडीही बाहेर फुटली असती तर कारवाईमधली सगळी नाही तरी बरीचशी हवा निघून गेली असती... मुख्य म्हणजे बदमाषांनी आपला काळा पैसा इतरत्र गुंतवून अथवा अननुभवी सामान्य गरिबांच्या माथी मारून सरकारचे काम फार कठीण केले असते. त्याचसाठी पंतप्रधानांची घोषणा रात्री आठच्या सुमाराला आणि कारवाई सुरु होण्याची वेळ रात्री १२ वाजता ठेवली गेली. या चार तासात बँका बंद असल्याने बातमी कळली तरी काहीच फायदा नव्हता. बँकाचे लॉकर्सही पुढचा एक दिवस तरी उघडता येणे शक्य नव्हते. मला वाटते, या कारवाईतला हा शेवटचा घाव वर्मी बसणारा होता. केवळ आरबीआयच्या परिपत्रकाने अश्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही आणि असे पत्रक सरळपणे न समजेल अश्या शासकीय व कायदेशीर भाषेत असते. वित्तमंत्रालयाच्या, आरबीआयच्या व करविभागाच्या अश्या परिपत्रकांबद्दल सीए सुद्धा संभ्रमात असतात व निर्णय देण्यापूर्वी बाबूलोकांच्या विश्लेषणाची वाट पहातात, हे आपण नेहमी पाहतोच. स्वतः पंतप्रधानांनी आदल्या रात्री टीव्हीवर बातमी सांगून लोकांमध्ये शक्य असलेले अफवांचे पीक टाळले. मला वाटते पूर्वीच्या अश्या प्रकारच्या कारवायांत टाळलेली आणि आता आवर्जून पंतप्रधानांकरवी सर्व जनतेला संबोधून माहिती देणारी ही पायरी "मास कम्युनिकेशन"ची नाडी पक्की माहीत असल्याचे लक्षण आहे. कारवाईचा त्रास होऊनही व काही नेत्यांची उसकवणारी वक्तव्ये येवूनही लोकक्षोभ न होण्याचे हे महत्वाचे कारण आहे, असे मला वाटते. इतर काही असले तरी, इतकी बंधने असलेली, इतक्या थोड्या वेळेत करायची, एवढी मोठी कारवाई भारतासारख्या आवाढव्य देशात करण्यात अपेक्षित होता त्यापेक्षा कमी गोंधळात आणि सामान्य लोकांच्या उत्तम सहकार्याने काम चालू आहे असे माध्यमांतील बातम्यांवरून दिसते आहे. असा प्रकल्प पूर्णपणे आलबेल प्रकारे होईल हे अपेक्षित नव्हतेच. ज्यांना मोठ्या प्रकल्पांची थोडीबहुतही माहिती आहे त्यांना तसा विचार शेखचिल्लीचे स्वप्न वाटेल. यासंदर्भात, सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळेस किती आठवडे/महिने तयारी केली जाते व त्यानंतरही ती निवडणूक अनेक विभागांत, दीडदोन महिन्यांच्या कालावधीत घेतली जाते, याची आठवण उपयोगी ठरेल. मुख्य म्हणजे विरोधी पक्षांनी या देशाच्या फायद्याच्या कारवाईत मदत तर केली नाहीच. पण, सुरुवातीच्या एकदोन दिवसांत, बसलेल्या धक्क्यात काय करावे हे न कळल्याने, पहिल्यांदा सरकारचे हे पाऊल बरोबर आहे असे म्हणून टाकले आणि नंतर "पण-परंतू" असे बोलत दिशाभूल करणार्‍या गोष्टी सुरू झाल्या आहेत. काहीजण लोकभावना भडकाव्या अशीच वक्तव्ये आणि कारवाया करत आहेत. काही जण तर ही पूर्ण कारवाईच मागे घ्या असे म्हणत आहेत ! हे अपेक्षित आहेच म्हणा. सरकारने यालाही तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी, ठेवली असेलच. सर्वसामान्य लोक मात्र त्या वक्तव्यांनी फारसे प्रभावित न होण्याइतके प्रगल्भ झालेले पाहून एक भारतिय म्हणून आनंद व अभिमान वाटला. हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. त्या वाटेत अनेक समस्या येतील, एखादी कारवाई फसेलही. कारण ७० वर्षांत काळ्या पैशाने गडगंज झालेले लोक ना निर्बुद्ध आहेत, ना ते तो पैसा सहजासहजी सोडतील. सरकारच्या कारवाया अयशस्वी व्हाव्या यासाठी ते त्यांची सर्व हुशारी व नवे-जुने हितसंबंध वापरून सर्व भले-बुरे (मुख्यतः बुरेच) मार्ग चोखाळतील, यात शंका नाही. काही सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी व गटबंधनातल्या पार्टीतल्या लोकांचे अंतर्गत हितसंबंधही गुंतलेले असतील. तो गुंताही सोडवावा लागेल. अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांना सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल. अशी तयारी आहे असेच संकेत सद्या तरी दिसत आहेत. आतापर्यंत या कारवाईतल्या दोन तृटी बाहेर आल्या आहेत. पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे. दुसरे म्हणजे नोटांचा रंग पाण्यात विरघळतो व फिकट होतो आहे अश्या बातम्या आहेत. मोठ्या प्रमाणात सामग्रीची जुळवाजुळव करत असतानाच गुप्तता आणि घाई पाळायला लागयामुळे याप्रकारे नोटांची प्रत कमी होणे झाले असावे. मात्र जोपर्यंत भारत सरकार त्या नोटांना "लीगल टेंडर" मानते आहे तोपर्यंत ते केवळ "टेक्निकल एरर" असतील व त्यांचा नागरिकांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. आताचा गडबड गोंधळ ताब्यात आल्यावर मात्र याबाबत पावले उचलणे अत्यावश्यक ठरेल. त्यासंबंधी एखादा प्रकल्प आरबीआय आत्ताच तयार करत नसल्यास आश्चर्य वाटेल. माझ्या अंदाजाप्रमाणे ५०० व १००० च्या पुरेश्या नोटा चलनात आल्यावर या नोटांना बँकिंग व्यवहारातून हळू हळू काढून / बदलून टाकण्याची कारवाई होईल. कारण, पहिल्यापेक्षा जास्त किंमतीच्या (पक्षी : ५०० व १००० ऐवजी २०००च्या) नोटा कारवाई गुप्त ठेवण्यासाठी व तसे करताना कारवाईचा सुरुवातीचा भार (कागद, शाई, छपाई, साठवण, वाहतूक, वितरण, इ) अर्धा करण्यासाठीच वितरीत केल्या जात आहेत. परंतु, या कारवाईसंबंधीच्या जनतेच्या प्रतिसादाने अंतीम यशाच्या आशा उंचावल्या आहेत. कारण, काळ्या पैश्याच्या निर्मुलनातली हीच एक पायरी आहे की जिच्याशी सामान्य जनतेचा तडक संबध येतो व त्याला त्रास होतो. इतर पायर्‍यांत सामान्य जनतेला फारसा त्रास असण्याची शक्यता फार कमी आहे. ही व पुढच्या पायर्‍या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !
वर्गीकरण
अर्थकारण
राजकारण
देशकारण

प्रतिक्रिया द्या
133576 वाचन

💬 प्रतिसाद (637)
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 12/24/2016 - 15:55 नवीन
करविभागातील पूर्व वरिष्ठ अधिकार्‍याच्या तोंडून टीव्हीवर मुलाखतीत बाहेर आलेली स्फोटक तथ्ये माहीत करून घ्यायची असल्यास युट्युबवरील खालील चित्रफीत पहाणे रोचक ठरेल. https://youtu.be/PpxmMeXJlgo
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Sat, 12/24/2016 - 17:33 नवीन
विनोदी चित्रफीत. IPC 378 द्वारे रेड कॉर्नर नोटीस काढून स्विस बँकेतला भारतियांचा काळा पैसा भारतात आणण्याच्या ह्या महाशयांच्या कल्पनेला दाद देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 12/24/2016 - 20:13 नवीन
आयकरविभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सार्वजनिकरित्या एका वाहिनीवर दिलेल्या माहितीने भरलेल्या चित्रफीतीत ही एकच गोष्ट सापडली हे जास्त विनोदी आहे ! =)) =)) =)) "एकदा चष्मा घातला की अनेक गोष्टी सहज नजरेआड होतात" हे तत्व हे सतत सिद्ध होत असते, असे म्हणतात ते खरे आहे ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 12/24/2016 - 20:35 नवीन
अजून एक धक्कादायक बातमी, जी काहींना मनोरंजक वाटू शकते... BJP reels out documents to accuse UPA of favouring big corporates सर्वात मोठ्या गमतीची गोष्ट म्हणजे मोदींना अंबानी-अडानीचे एजंट म्हणणार्‍या काँग्रेसच्या राजवटीत अंबानी गृपला १ लाख १३ हजार कोटी आणि अडानी गृपला ७२ हजार कोटींची कर्जे दिली गेली होती. या कर्जांच्या परतफेडीच्या कारवाया मात्र मोदी सरकारने सुरू केल्या ! या बातमीत फार धक्कादायक आरोप असा आहे की, कॉंग्रेसच्या २००५ ते २०१३ या कार्यकाळात एकूण ३६.५ लाख कोटींची कर्जे माफ केली गेली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/26/2016 - 05:20 नवीन
या माहितीवर एकदम भयाण शांतता ???!!! चष्याच्या रंगामुळे गाळून जाऊन ती माहिती अदृश्य झालीय बहुतेक (कुठे, काय, कधी, कोणी, हॅ हॅ, छे छे, पण नाही ???) !!! =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
पिजा Sun, 12/25/2016 - 18:35 नवीन
हे सगळं सोडा आणि खालची लिंक बघा : https://youtu.be/AnxrJiS5uKU सिमकार्ड मधून बॅटरीत डेटा ट्रान्सफर काय किंवा जंगलात cloud computing च्या समस्या काय, सगळंच थोर आहे. कृपया सगळ्यांनी आनंद घ्यावा. म्हात्रे सर, वरील लिंक शेयर केल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
पिजा Sun, 12/25/2016 - 18:43 नवीन
कृपया या विडिओ खालच्या कंमेंट्स चुकवू नका, लाफ्टरची guarantee माझी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिजा
स
संदीप डांगे Mon, 12/26/2016 - 05:14 नवीन
तो बोलतोय ते १००% सत्यच आहे हो, आयकरविभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सार्वजनिकरित्या एका वाहिनीवर दिलेल्या माहितीने भरलेल्या वगैरे वगैरे... =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिजा
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 12/26/2016 - 05:23 नवीन
सर, अत्यंत हुकलेला माणूस आहे हा माझ्या मते. त्याचे विडिओज करमणुकीकरता बनवलेले असतात की गंभीरपणे हेच मला समजू शकलेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
पुंबा Sat, 12/24/2016 - 16:59 नवीन
सरकार आजपावेतो किती पैसे जमा झाले याचा आकडा जाहीर करत नाहीये, याचा अर्थ निदान काळा पैसा अर्थचक्रातून कायमचा बाहेर काढणे हे निश्चलनीकरनाचे एक उद्दीष्ट तरी फोल गेले याची खात्री पटली असा घ्यावा का? कारण अनेक अंदाजांप्रमाणे ३१ तारखेला भारतातील सर्व बॅंकांमध्ये जमा झालेली एकूण रक्कम पंधरा लाखांना स्पर्ष करणारी असेल. माझे प्रश्न: १. जर असे झाले तर याचा किती टक्के दोष मोदींना जाईल? २. काळा पैसा निपटून काढणे हे अशक्य आहे अशी धारणा लोकांत बनेल काय? ३. सध्या चालू असलेली आयकर व ई डी च्या धाडींचे सत्र असेच चालू राहील काय? ४. सरकार व त्याचे पाठीराखे निश्चलनीकरणाचे उद्दिष्ट फसले हे मान्य करतील काय?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 12/24/2016 - 20:08 नवीन
(अ) अजून ३० डिसेंबर २०१६ ही अखेरची तारीखसुद्धा उलटून गेली नाही आणि (आ) डिमॉनेटायझेशन ही काही एकमेव व अखेरची कारवाई आहे असे नाही असे सरकार सतत सांगत आहे, या वस्तूस्थिती तुमच्या नजरेआड झालेल्या दिसत आहेत. O: शिवाय, अनेक दशके पाय रोवून बसलेली अट्टल भ्रष्टाचारी मंडळी एका फटक्यात साळसूदपणे वागून सरकारच्या योजनेला सुरुंग लावण्याचा प्रयत्नच करणार नाही असे म्हणणे हा आदर्शवादी भाबडेपणा होईल किंवा त्यापेक्षा जास्त राजकारणी कावा होईल. किंबहुना, सरकारच्या दर चालीवर/बदलावर टिका करून त्यातून आपल्याला अजून काही पळवाट मिळवता येईल काय हे पाहण्याचा आटोकाट प्रयत्न चालला आहे हे निश्चित दिसत आहेच. :) असो. परिक्षेचा पेपर संपण्याअगोरच निकाल लावून नापास झाल्याचे जाहीर करण्याची घाई करण्याचा प्रयत्न मनोरंजक आहे ! =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा Sun, 12/25/2016 - 15:04 नवीन
म्हात्रे काका, मी निश्चलनीकरणाचा सुरुवातीपासून समर्थक आहे. मोदी या व्यक्तीबद्दल मला व्यक्तीश: आदर आहे, हे पाऊल उचलणे किती धाडसाचे होते हे माहिती असल्याने त्यांच्या धडाडीबद्दल विस्मय वाटतो. मात्र कुठल्याही पक्ष, संघटना, विचारप्रणालीचा समर्थक नसल्याने केवळ issue based भुमिका घेत असतो, कोणताही अजेंडा नसतो आणि विद्वेष् व भक्ती या दोन्हींना माझ्या विचारांसमोर पडदा धरू देत नाही. निव्वळ आर्थिक आधारावर मी निश्चनीकरनाचे समर्थन केले, लोकांना पैसे मिळवण्यासाठी होणारा त्रास तात्पुरता आहे यावर विश्वास ठेवला. अंतीम उद्दीष्ट गाठले गेले तर it is worth it, असे मला वाटले. मात्र माझा भ्रमनिरास झाला तो १२ डिसेंबर रोजी ज्या दिवशी १२ लाख कोटी पुन्हा अर्थचक्रात आले. अनेक तज्ञांच्या मते जवळजवळ सर्वच रक्कम अशा प्रकारे परतेल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानंतर सरकारने ज्या प्रकारे डिपॉझीटसचे विवरण देणे बंद केले व सर्व रक्कम अर्थव्यवस्थेत येणे कसे चांगले आहे कारण मग संपत्तीचे अनामिकीकरण थांबेल् असे प्रवचन सुरू केले(संदर्भ: http://indianexpress.com/article/business/economy/money-has-lost-its-anonymity-after-demonetisation-arun-jaitley/ ) त्यावरून हे उद्दीष्ट फोल गेले हे मान्य केल्यासारखे असल्याचे वाटले. सरकारच्या मते, काळा पैसा मुख्यत्वे १००० व ५०० च्या नोटांमध्ये असल्याने आणि त्याची वैधता अचानक काढून घेतल्याने काळा पैसा बाळगून असलेले लोक हादरतील व हा पैसा पुन्हा अर्थव्यवस्थेत आणण्यास असमर्थ ठरतील. दुर्दैवाने लोकांनी निरनिराळ्या प्रकारे बुद्धी लावून काळा पैसा पांढरा करवून घेतला. SBI च्या रिपोर्टमध्ये जे अंदाज केले गेले होते (२.५ लाख कोटी इतकी रक्कम बॅंकींग व्यवस्थेत परतणार नाही आदी) ते कधीच फसवे सिद्ध झाले. दहशतवाद, काळा पैसा आणि बनावट नोटा या तिहेरी समस्यांवर उतारा असे निश्चलनीकरनाचे वर्णन केले गेले. ही उद्दिष्ट्ये पूर्ण व्हावीत अशीच माझी अपेक्षा आहे. माझे प्रश्न ही उद्दीष्ट्ये पूर्ण न झाली तर काय अशा प्रकारची होती त्यात निकाल लावण्याचा प्रश्नच नाही. असो, ३१ तारखेला फायनल आकडे येतीलच, त्या वेळी हे प्रश्न महत्वाचे आहेत की नाहीत ते ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 12/25/2016 - 16:24 नवीन
तुमच्या भावना समजू शकतो. पण, सद्यासाठी, "हे प्रकरण '२ + २ = ४' इतके सोपे नाही, त्यापेक्षा बरेच गुंतागुंतीचे आहे. अनेक दशके निर्माण झालेले स्वार्थी हितसंबंध दीर्घ काळाच्या अनेक कारवायांच्या मदतीने निकामी करावे लागतील. म्हणून घाईघाईने किंवा एखाद्या कारवाईच्या आकड्यांवरून काही निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही, इतकेच मला म्हणायचे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/26/2016 - 06:12 नवीन
३१ तारखेचे आकडे अखेरचे नसून त्यांत इतर अनेक फॉलो अप कारवायांनी देशाच्या दृष्टीने फायदेशीर बदल होत राहतील, याचे अनेक पुरावे तुम्हाला खालील प्रतिसादांत मिळतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा Wed, 03/08/2017 - 05:51 नवीन
सरकार आजपावेतो किती पैसे जमा झाले याचा आकडा जाहीर करत नाहीये, याचा अर्थ निदान काळा पैसा अर्थचक्रातून कायमचा बाहेर काढणे हे निश्चलनीकरनाचे एक उद्दीष्ट तरी फोल गेले याची खात्री पटली असा घ्यावा का?
हे आकडे अजूनदेखील बाहेर आलेले नाहीत. कॅगच्या म्हणण्यानुसार निश्चलनीकरणाचा करावर झालेला परिणाम तसेच संपूर्ण निश्चलनीकरणाची प्रक्रिया राबवण्यासाठी आलेला खर्च याचे ऑडीट कॅगचे ऑफिस करणार आहे. ते पूर्ण झाल्यानंतर तरी आकडे येतील. तोवर आरबीआय किंवा अर्थ मंत्रालय काही स्पष्टीकरण देते का ह्याची वाट पाहत बसणे आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
अ
अनुप ढेरे Wed, 03/08/2017 - 06:04 नवीन
काळा पैसा केवळ नोटा आल्या नाहीत तरच मेला असं नाही. लोकं या वर्षात आपला काळा पैसा बँकेत जमा करून घोषित करतील आणि कर देतील. हे देखील काळा पैसा नष्ट होणंच आहे. यावर्षी किती आयकर आला गेल्या वर्षीपेक्षा जास्तं हे काळा पैसा किती गेला याचं द्योतक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 03/08/2017 - 08:29 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
प
पुंबा Wed, 03/08/2017 - 12:15 नवीन
पण ढेरेशास्त्री, बँकेत पैसे जमा केले की थोडाच त्याच्यावर टॅक्स लागणार आहे? अडीच लाखापेक्षा अधिक पैसे जमा करणार्‍यांनाच फक्त चौकशीच्या फेर्‍यात अडकवून करवसूली करण्यात येईल ना? असा किती टॅक्स जमा होईल त्याने? शिवाय मुख्य उद्दीष्ट्य काळा पैसा अर्थव्यवस्थेमधून निपटून टाकणे होते ना? अनैतिक व्यवहारांमधून आलेला काळा पैसा कर भरून पांढरा करणे नव्हते ना? आणि मुख्य गोष्ट असेच आहे तर सगळा डेटा जनतेसमोर मांडला का जात नाही? पंतप्रधानांवरचा जनतेवरचा विश्वास अजून्देखील दृढ आहे तेव्हा त्यांनी स्वतः नक्की काय परिणाम झाले ते सांगावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Wed, 03/08/2017 - 12:54 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
अ
अनुप ढेरे Wed, 03/08/2017 - 13:52 नवीन
अर्र.. गायब झाला प्रतिसाद. मुद्दा हा की यापुढचं यशापयश हे आयकर विभागावर अवलंबून आहे. तिथे काय होईल इज एनीबडीज गेस. पण किती जास्तीचा कर आला हे बहुधा जूनमध्ये समजेल. काळा पैसा कर आणि दंड देऊन पांढरा करण्यात काहीच चूक नाही. नोटा किती आल्या परत हा आकडा का जाहीर होत नाही माहिती नाही. व्हायला हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/26/2016 - 06:09 नवीन
पैसा बँकेत गेला म्हणजे तो पांढरा झाला असे नाही, हे विरोधकांना पूरेपूर माहीत आहे. पण, गैरसोईचे असल्याने तिकडे डोळेझाक करून, "पहा, पहा, बहुतेक सर्व पैसा बँकेत आला, चला कारवाई असफल झाल्याचे सिद्ध झाले" अशी हाकाटी मारायला सुरुवात झाली आहे. ही राजकिय चलाखी घ्यानात न येऊन, तिला बळी पडणारे अनेक सर्वसामान्य नागरिक असतात... अश्या अननुभवी नागरिकांच्या जीवावर तर चलाख राजकारणी अपप्रचार करत आपले खिसे भरत असतात, हे काही गुपीत नाही. अश्या राजकारण्यांच्या आणी जनसामान्यांच्या खास माहितीसाठी... काही उलट्सुलटे व्यवहार पकडले जाण्याच्या आणि त्यांच्यावरून काळाबाजाराचे अजून पुढचे घागेदोरे मिळण्याच्या सुवार्ता (?!) येणे सुरु झाले आहे ;) :) १. Bhajiawala used 700 people to deposit, withdraw cash या माणसाच्या आतापर्यंत सापडलेल्या २७ बँकखात्यांपैकी २० बेनामी आहेत. २. Enforcement Directorate: 4 banks helped Mumbai trader legalise Rs 150 crore ३. http://timesofindia.indiatimes.com/pm-modis-address-to-the-nation/liveblog/55315325.cms • Kolkata businessman Parsamal Lodha arrested by ED for converting over Rs 25 crore old currency into new, reports ANI. • DRI Chennai intercepts Rs 1.34 crore in denomination of Rs 2000 notes from five persons in the early hours of today (Thursday) near Chennai airport. Enquiries going on. • Kerala: Officials examining the documents of huge deposits after November 8 to 14th, fake accounts and hawala deposits • Kerala: ED officials conduct inspections in the state cooperative bank of Kannur, Kozhikode and Thrissur and CBI in Kollam and Malappuram • Private charter grounded for flying with Rs 3.5 crore in old notes : A private charter company has been grounded after one of its aircraft was rented to fly a person with Rs 3.5 crore in demonetised currency notes from Haryana's Hisar to Dimapur in Nagaland on November 22. The Bureau of Civil Aviation Security (BCAS) has cancelled the "security programme" of Air Car Airline Pvt Ltd, a mandatory clearance without which no charter can fly. • Old currency worth Rs 31 lakh seized at New Delhi Railway station • Tax raids in four branches of Axis Bank in Ahmedabad after getting inputs that the bank had allegedly settled money after demonetisation • Union Cabinet passes ordinance to let companies pay salary via e-mode, cheque • Lower rates to push digital deals: CMs' panel : A high-powered panel of chief ministers has asked Reserve Bank of India (RBI) to "substantially lower" the merchant discount rates (MDR) or the price that is paid by the merchants to bank for payments received through cards, a move aimed at providing a push to digital payments. ४. Rs 2.35 crore in new currency seized in income tax raids on two businessmen in Assam ५. I-T officials stunned by Rs 7 crore deposits in Hyderabad cab driver's account ६. Amid rush for white money, Pune businessman converts cash into black सद्याच्या कारवाईत जुने काळाबाजारी व्यवहारही उघडकीस येत आहेत. त्यातले हे एक महत्वाचे उदाहरण. या इसमाच्या काळ्याबाजाराचा सद्याच्या कारवाईशी तसा अर्थाअर्थी संबंध नाही. पण बँक अकाऊंट तपासताना त्याचेही प्रकरण बाहेर आले ! संगणकीय प्रणालींमुळे हे सहजसाध्य आहे. सद्याची गडबड संपल्यावर करविभाग तीच प्रणाली ०८ नोव्हेंबर २०१६ पूर्वीच्या जुन्या ट्रांझॅक्शन्सवर वापरून असले अजून अनेक व्यवहार शोधून काढेल यात संशय नाही. काळाबाजार्‍यांचे एकमेकाशी साटेलोटे असते हे काही गुपीत नाही. त्यामुळे त्यातला एक जण जाळ्यात अडकला की इतरांपर्यंत जायला घागेदोरे सापडतातच !

नोटाबंदी अयशस्वी झाली आहे असा अपप्रचार करत असलेल्यांसाठी काही खास बातम्या...

१. I-T dept’s black money cell flooded with calls, emails कोणाला काळाबाजारासंबंधी माहिती असल्यास ती सरकारला कळविण्यासाठीचा इमेल अ‍ॅड्रेस : blackmoneyinfo@incometax.gov.in २. Cashless means less cash, not no cash: Arun Jaitley ३. Demonetisation not last action against corruption: NITI Ayog chief hints at more schemes ४. People who were claiming that demonetization will not lead to any effective action against black money, should keep track of their claims’ laughable futility in the following continuously updated blog…

आणि नवीन वर्षानिमित्त येणार्‍या महत्वाच्या सुवार्तांपैकी पहिली !!!

Law against 'benami' properties to be operationalised soon: PM Modi "अजून पुढे काय करणार, अजून पुढे काय करणार ?" असे विचारणार्‍यांना त्यांच्या सर्व प्रश्नाची उत्तरे एक एक करत मिळत जातील असे दिसू लागले आहे ;) :)
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 12/26/2016 - 15:32 नवीन
"अरे बैकमे गया तो काम तमाम हो गया नही भैय्या उधर तो असली काम शुरू हो गया !" इति मोदी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
क
कपिलमुनी Mon, 12/26/2016 - 14:41 नवीन
उद्या ५० वा दिवस ! नंतर सगळ्या एटीएम मधून पैसे मिळणार . ५००-१००० च्या नवीन नोटा मिळणार . सर्वसामान्याचे हाल संपणार.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Mon, 12/26/2016 - 15:29 नवीन
आमच्याकडे लई नोटा हायती. आम्ही आमीरखानला ३ दिवसात शंभर कोटी दिले ते सगले काय ऑनलाईन दिले काय.. ? सरकारने या कलेक्शनचा अभ्यास करावा यातील ६० टक्के जर कॅश असेल तर सरकारने हाल होताहेत लोकांचे या दाव्याकडे काणाडोळा करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
श
श्रीगुरुजी Mon, 12/26/2016 - 15:55 नवीन
एकीकडे म्हणतात नोटाबंदीमुळे लोकांचे हाल सुरू आहेत, लोकांकडे किरकोळ खरेदीसाठी नोटाच नाहीत, विक्री मंदावली आहे व त्यामुळे भाव उतरले आहेत व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान होत आहे इ. इ. काही दिवसांपूर्वी टोमॅटो, बटाटे वगैरे फेकल्याच्या बातम्या दाखविल्या व त्याचे खापर नोटाबंदीवर फोडण्यात आले. परंतु टोमॅटो फेकून लाल चिखल करणे, फ्लॉवरच्या गड्ड्या फेकणे, दूध ओतून देणे, कांदे रस्त्यावर ओतून देणे असे कार्यक्रम नोटाबंदीपूर्वी भूतकाळात असंख्य वेळा झालेले आहेत. मग आता नोटाबंदीवर खापर का फोडायचे? हे सर्व होत असतानाच "दंगल" प्रचंड धंदा करीत आहे, महाराष्ट्रात सर्व पर्यटनस्थळे हाऊसफुल झाल्याची बातमी आहे, कोकणात मासळीची मागणी वाढल्यामुळे माशांचे भाव वाढले आहेत अशी बातमी वाचली, सारंगखेडा येथील घोडेबाजारात रोख पैसे देऊन अनेक घोड्यांची खरेदीविक्री झाल्याची बातमी आहे, जिथे रोख पैसे द्यावे लागतात अशा बसेस सुद्धा तुडुंब भरलेल्या दिसतात, कारची विक्री डिसेंबर मध्ये वाढलेली आहे. नक्की कोण खरे बोलत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/29/2016 - 07:52 नवीन
भूतपूर्व प्लॅनिंग कमिशन मेंबर, भूतपूर्व चीफ इकॉनॉमिस्ट ऑफ आरबीआय, आणि पूर्व पंतप्रधान मनमोहनसिंग यांना आपले मेंटॉर समजणार्‍या अर्थतज्ञाचे विचार या चित्रफितीतून समजतील व बरेच समज-गैरसमज दूर व्हायला मदत होईल...
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 12/29/2016 - 08:59 नवीन
नोटाबंदीमुळे बॅकांमध्ये जमा झालेल्या पैशाबद्दल बोलताना जाधवसाहेबांच्या तोंडातून लाळच टपकायची बाकी होती. कल्पनेचे मनोरे रचत कर्जाचे दर कसे होतील हे त्यांच्यासारखा अर्थत़ज्ञ जेव्हा जेव्हा सांगतो तेव्हा आश्चर्य वाटते. साधी गोष्ट आहे हे पैसे लोकांनी स्वतःहून बेंकेत ठेवलेले नाहीत, ठेवी म्हणून तर नाहीच नाही. उद्या सरकारने बँकांतून पैसे काढण्याचे निर्बंध काढले तर सगळा पैसा पुन्हा परत बँकांतून काढला जाईल. जर हे निर्बंध असेच राहीले तर लोकं ते पैसे अल्पमुदत ठेवीत ठेवतील, ज्याचे व्याजदर हे बचत खात्यापेक्षा जास्त असते. जाधवसाहेब जसे म्हणतात , की बँकांना अल्पदरात (३ %) निधी उपलब्ध झालाय त्यामूळे कर्जाचे दरही कमी करता येतील, हे सत्यात उतरणे कठीण आहे. एकतर बँकांना सध्या ह्या पैशावर व्याज द्यावे लागणार आहे आणि तेही त्यांच्या खिशातून. पुढचं सगळं जरतरवर अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 12/29/2016 - 09:09 नवीन
नोटबंदी व सरकारच्या बाजूने बोलणारे सर्व निष्पक्ष, निस्वार्थी, निर्मळ आहेत आणि विरुद्ध बोलणारे बायस्ड, चोर, बेईमान आहेत हे एकदा ठरले आहे ना? शंका घेण्याचे कोणतेच कारण नाही, नरेंद्र जाधवांवर. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
व
विशुमित गुरुवार, 12/29/2016 - 09:54 नवीन
नरेंद्र जाधवांचे विचार मग काय बोलायलाच नको..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/29/2016 - 10:03 नवीन
आपल्या विरोधी बाजूच्या मतांवर सतत संशय घ्यायचे ठरले आहेना ?! शिवाय, भविष्यात चांगले परिणाम निघाले तरी "नसलेल्या राईचा पर्वत करून त्यांना खोटे पाडता येईलच", तेव्हा आता आपल्याशी सहमत नसलेल्या सर्वांना आपले सर्व शब्दसामर्थ्य वापरून खोटारडे, मूर्ख आणखी अपयशी असल्याचे आत्ताच जाहीर करून त्यांना बदनाम करणे भागच आहे ! =)) =)) =)) चालूंद्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/29/2016 - 10:48 नवीन
या प्रतिसादाचे उत्तर खुद्द भविष्यच देईल... जाऊ द्या जोरात!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
L
lakhu risbud गुरुवार, 12/29/2016 - 11:01 नवीन
आपल्या विद्वतेची मिपाकरांवर उधळण करण्याआधी डांगे सरांना हा विडिओ पाहण्याची विनंती. देशाची अर्थव्यवस्था कोणत्या धोकादायक वळणावर येऊन पोचली होती आणि नोटबंदी आत्ताच कशाप्रकारे करणे गरजेचे होती याचे उत्तम विवेचन या भाषणात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 12/29/2016 - 11:09 नवीन
व्हिक्टीम कार्ड कि काय ते यालाच म्हणत असतील का बरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
पुंबा गुरुवार, 12/29/2016 - 10:50 नवीन
एक्झॅक्टली.. हा पैसा जो जमा झाला आहे बँकांत तो काही मुदत ठेव म्हणून जमा झालेला नाही. हे डिमांड डिपॉझीटस आहेत. किंबहुना, सरकार आणि बँकांना हे ठाऊक आहे कि लोक पैसा काढून घेण्यासाठी गर्दी करतील म्हणूनच ३० नंतरही पैसे काढण्यावर निर्बंध लादावेत असा सल्ल बँकांच्या शिखर संघटनेने दिलाय. प्रत्यक्षात असे करतील तर सरकारची विश्वासार्हता धुळीत मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
व
विशुमित गुरुवार, 12/29/2016 - 10:57 नवीन
सौरा जी, आमच्या गावाकडची परिस्थिती सांगतो. आता उसाची बिलं जिल्हा बँकांच्या खात्यामध्ये जमा झाली/होत आहेत. सगळे शेतकरी २ जानेवारीच्या वाट पाहत आहेत. अन जर त्यांना पैसे मिळण्यासाठी समस्या आली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. हे कॅशलेस वाल्यांच्या लक्ष्यात कसे काय येत नाही, देव जाणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा गुरुवार, 12/29/2016 - 11:11 नवीन
मान्य. लोकांनी, मोदींच्या "फक्त ५० दिवस कळ काढा" या वक्तव्यावर विश्वास ठेऊन पैसे बँकेत ठेवले(अर्थात अन्य पर्याय नव्हता देखील) आता सरकारने उगाच पैसे काढण्यावर निर्बंध लादू नयेत. लोक खरंच संतापतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 12/29/2016 - 11:14 नवीन
जर खरंच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ह्या सरकारला जबाबदार धरून पुढच्या निवडणुकीत दणका द्यायला हरकत नाही. बाकी अशी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण व्हावी याकडे गेले काही दिवस बरेच जण डोळे लावून बसले आहेत पण हि मुर्दाड जनता काही अन्यायाविरुद्ध बंड करून उठायला तयारच नाही! दुर्दैव या देशाचे दुसरे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
प
पुंबा गुरुवार, 12/29/2016 - 11:19 नवीन
आतापर्यंतचं जाऊ द्या, पण ठरलेली मुदत संपल्यानंतरदेखील जर पैसे काढण्यावर निर्बंध ठेवले तर लोकांचा उद्रेक होऊ शकतो कि नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 12/29/2016 - 12:20 नवीन
होऊ शकतोच कि, नाकारण्यासारखं काय आहे त्यात? पण ते तसं झाल्यावर त्यावर बोलून सरकारला धारेवर धरण्यात अर्थ आहे ना? निर्णयाला २५ दिवस झाल्यानंतरची परिस्थिती आणि ५० दिवस झाल्यानंतरची परिस्थिती यात सुधारणा झालीच नाहीये असे मानूनच चालायचे असेल तर चर्चा खुंटते असे मला वाटते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
स
संदीप डांगे गुरुवार, 12/29/2016 - 12:23 नवीन
परिस्थिती बिघडलेली होती असे म्हणायचं आहे का तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 12/29/2016 - 12:40 नवीन
अर्थ स्पष्ट आहे (म्हणजे तुम्हाला तरी विस्कटून सांगण्याची गरज पडू नये आणि तुम्ही खोचकपणे विचारात नसाल असे गृहीत धरून) - जास्त त्रासाची परिस्थिती-->कमी त्रासाची परिस्थिती--> किरकोळ त्रासाची परिस्थिती या अर्थाने सुधारली- तुम्ही बिघडलेली परिस्थिती असा वैयक्तिक अर्थ घेतलात तरी त्याला माझी हरकत नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/29/2016 - 12:51 नवीन
चला, जास्त त्रासाची परिस्थिती होती हे तुम्ही मान्य करत आहात हे काय कमी आहे. काही लोक किरकोळ त्रास झाला, किंवा कुठेही काही त्रास नाही असे म्हणत आहेत. ( बहुतेक तुम्हीच, वर विचारले की इतका त्रास होत आहेत तर उद्रेक का झाला नाही ते.... उद्रेक नाही म्हणजे जास्त त्रास नाही हा तुमचा निष्कर्ष आता विसंगत वाटत आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 12/29/2016 - 13:11 नवीन
परत तेच! तुम्ही तुम्हाला हवा तसा अर्थ काढू शकता, माझी काहीच हरकत नाही! प्रत्येकानी आपापले अनुभव सांगितले आहेत! कोणाचा जास्त त्रास म्हणजे किती जास्त असं कसं ठरवणार? आहे त्या परिस्थितीत विरोधक ज्याला खूप भयानक त्रास होतोय असं म्हणत होते त्याला मी वर "जास्त त्रास(२ तास रांगेत उभं राहावं लागणं वगैरे) असे संबोधले, ते नंतर कमी झाले (अर्धा-एक तास वगैरे) आणि आता एटीएमसमोरही पाहिल्याइतक्या लांब रांगा दिसत नाहीयेत. बाकी उद्रेक नाही म्हणजे जास्त त्रास नाही हे चुकीचे वाटते का तुम्हाला (तुमच्या "जास्त त्रासाच्या" किंवा "बिघडलेल्या परिस्थितीच्या" व्याख्येच्या आधारावर)?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/29/2016 - 13:48 नवीन
मला काहीही अर्थ काढायचे नाहीत हो. तुमच्या शब्दांचे काय अर्थ होतात तुम्हीच सांगा. १
आहे त्या परिस्थितीत विरोधक ज्याला खूप भयानक त्रास होतोय असं म्हणत होते त्याला मी वर "जास्त त्रास(२ तास रांगेत उभं राहावं लागणं वगैरे) असे संबोधले, ते नंतर कमी झाले
२
जास्त त्रासाची परिस्थिती-->कमी त्रासाची परिस्थिती--> किरकोळ त्रासाची परिस्थिती या अर्थाने सुधारली-
३
निर्णयाला २५ दिवस झाल्यानंतरची परिस्थिती आणि ५० दिवस झाल्यानंतरची परिस्थिती यात सुधारणा झालीच नाहीये असे मानूनच चालायचे असेल तर चर्चा खुंटते असे मला वाटते!
तर तुमची तीनही विधाने जरा नीट बघितली तर तुम्ही ज्याला जास्त त्रास संबोधत आहात ते विरोधकांच्या म्हणण्यावर (विरोधक ज्याला खूप भयानक त्रास होतोय असं म्हणत होते. २ तास रांगेत उभे राहणे) विश्वास ठेवून. "जास्त त्रासाची परिस्थिती" ह्या विधानाचा सोर्स "विरोधक". पुढे आहे: "ते नंतर कमी झाले". ते नंतर कमी झाले? काय कमी झाले, विरोधक की त्रास? तुम्हाला कोणी सांगितले त्रास कमी झाला म्हणून? विरोधकांनी? पण तुम्हीच तर परत म्हणाले "सुधारणा झालीच नाहीये असे मानूनच चालायचे असेल तर चर्चा खुंटते असे मला वाटते!" हे नक्की कोणाला उद्देशून आहे, विरोधकांना की समर्थकांना? गडबड नाही वाटत? आता प्रश्न एवढाच की तुम्हाला विरोधकांची वक्तव्ये मान्य आहेत की नाहीत? मान्य असतील तर त्रास होता हे तुम्ही मान्य करताय. कमी झालाय हे म्हणताय त्यालाही मग विरोधकांची सहमती लागेल की नाही? की "आता सुधारणा झाली आहे असे सरळ मान्य करा बघू" असा दबाव आणताय? विरोधकांच्या वक्तव्यांवर विश्वास ठेवून परत त्यांनाच "सुधारणा झालीच नाही असे मानत आहात" असे म्हणणे परत विसंगत होते आहे. फार सरळ अर्थ आहेत तुमच्या वाक्यांचे. वेगळे काढायची गरज नाही. तुम्हाला फिरवाफिरवी करायची असेल तर तसं करु शकता. तुम्ही आरोप केलात की मी तुमच्या विधानांतुन मला पाहिजे ते अर्थ काढतोय म्हणून हा प्रतिसाद दिला. राग नका मानू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 12/29/2016 - 15:59 नवीन
हसण्याशिवाय काही करू शकत नाही! या मुद्यात मी विसंगत कसे बोलत आहे यापलीकडे कुठलीही अधिक माहिती इतर वाचकांना मिळणार नसल्याने तूम्ही म्हणाल ते योग्य मानून आपली सपशेल माघार! धन्यवाद! :):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे गुरुवार, 12/29/2016 - 17:08 नवीन
हसण्यावारी नेल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला राग आला नाही हे काय कमी आहे? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 12/29/2016 - 17:21 नवीन
त्याबाबतीत निश्चिन्त रहा हो डांगेसाहेब, राग यायला वाद-प्रतिवाद म्हणजे भांडण थोडेच आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
विशुमित गुरुवार, 12/29/2016 - 11:31 नवीन
२ आठवड्या पूर्वी इंदापूरच्या(पुणे जिल्हा) एका बँकेची तोडफोड झाली होती. वेळीच नियंत्रण आणल्यामुळे त्याचे लोन जास्त पसरले नाही. (दुवा आता सापडत नाहीये). हो निवडणुकीला अजून दोन अडीच वर्ष टाईम आहे. कोण डोळे लावून बसले आहेत? त्यांना ती गरजच नाही पडली त्यांचे सगळे आरामात पांढरे झाले आहेत. तुम्ही त्याला दुर्दैव म्हणा पण "समय से पहिले और भाग्य से ज्यादा किसी को कुछ नही मिलता" असे गीता सार मध्ये वाचले होते...असो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 12/29/2016 - 12:36 नवीन
अहो इंदापूरच कशाला अजूनही काही ठिकाणी अशा छोट्यामोठ्या घटना घडल्या आहेतच की! पण बहुतेक ठिकाणी त्या घटना ह्या तेथील बँक कर्मचाऱ्यांच्या अरेरावीमुळे किंवा रांगेची शिस्त न पाळण्यामुळे झाल्याचेच माध्यमे दाखवत होती. त्याला सरकारच्या विरोधातील आक्रोश वगैरे म्हणणे म्हणजेच त्या घटनेकडे निष्पक्षपणे न बघणे असे नाही का (लोन वगैरे पसरले असते हि तर अतिशयोक्ती वाटत नाही का)? काळे पैसे बँकेत गेले असे म्हणू शकतो आपण, पण काळ्याचे "पांढरे" झाले हा निष्कर्ष आताच कशाला? हा निष्कर्ष काढायला अजून थोडा वेळ आहेच कि! आणि काळ्याचे पांढरे करणारे नाही डोळे लावून बसले, हा निर्णय कसा फसलाय हे दाखवून देण्याची घाई करणारे अस्थिरतेकडे डोळे लावून नक्कीच बसले होते. पण जनता मोदींच्या पाठीशी आहे दिसल्याने भ्रमनिरास! आणि हो, सरकारच्या या निर्णयाने देशाचे नुकसान झाले तर जनतेने असे सरकार नक्की उलथवून टाकावे २०१९ ला, त्यात दुमत असण्यासारखे काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित गुरुवार, 12/29/2016 - 12:44 नवीन
जनता मोदींच्या पाठी ५० दिवसानंतर किती राहते आहे ते जरा आपला परीघ वाढवून बघा, बाकी शुभेच्छा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा