Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ऑपरेशन नोटा-रद्द आणि नोटा-बदल

ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 11/13/2016 - 22:52
🗣 637 प्रतिसाद
नुकत्याच सरकारने अतिरेकी व काळाबाजारी लोकांवर अचानक ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करून एक प्रकारे "सर्जिकल स्ट्राईक" केला. या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ठ्ये अशी : १. राष्ट्रीय महत्व : याचा भारताच्या अर्थकारणावर पडणारा प्रभाव सांगायला नकोच. २. प्रचंड आवाका : भारतासारख्या क्षेत्रफळाने आवाढव्य, भौगोलिक परिस्थिती व विकासाच्या अभावामुळे अनेक भाग असलेला व १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या राष्ट्रातला प्रत्येक नागरीक प्रभावित होईल असा प्रकल्प. रद्द केलेल्या चलनी नोटा या सगळ्यांकडून परत घेऊन त्यांना नवीन नोटा देणे अत्यंत जिकरीचे काम आहे. ३. गुप्तता : सहा महिन्यांच्या तयारीच्या काळात व पंतप्रधान कारवाई जाहीर करेपर्यंत गुप्तता पाळणे हा या प्रकल्पाचा जीव होता. या एका मुद्द्यावर सर्व कारवाईचे मुख्य यशापयश अवलंबून होते. वरच्या दोन क्रमांकांच्या मुद्द्यात आलेल्या विवरणावरून + गेल्या ७० वर्षांत सरकारप्रणाल्यांमध्ये निर्माण झालेल्या हितसंबंधांच्या पार्श्वभूमीवर गुप्तता पाळणे हे काम किती कठीण होते हे सांगायला नकोच. माध्यमांत असलेल्या बातम्यांप्रमाणे या कारवाईच्या प्रकल्पाची काही रुपरेखा आता हळूहळू बाहेर येत आहे. त्याबद्दल मला समजलेले व भावलेले काही, थोडक्यात... काळापैसेवाल्यांना व अतिरेकी जाळ्याला या कारवाईचा वासही येऊ नये यासाठी बँकाच काय या कारवाईचा आराखडा फक्त निवडक मंत्री आणि आरबीआयचे अत्युच्च अधिकारी यांनाच माहीत होता.इतर कॅबिनेट मंत्र्यांनाही ही माहिती ऐन वेळेला दिली गेली, त्या मिटींगमला मोबाईल न आणण्याची सूचना होती. त्यांनतर मोदी राष्ट्रपतींना भेटून नंतर त्यांचे टीव्हीवरचे भाषण संपेपर्यंत सर्व मंत्री मिटिंग रूम मध्ये बसून होते. त्यानंतर वित्त मंत्रालय व आरबीआयची कारवाई सुरू झाली. बँकांना सर्व प्रकल्प समाजावून देण्यासाठी व बँकात नवीन २००० च्या नोटा व साथीला १०० च्या नोटा पोचविण्यासाठी ९ तारखेलाला बँका बंद ठेवणे आवश्यक होते. या नोटा अगोदर पाठविल्याने कारवाईची बातमी फुटली असती. तसेच, बातमी गुप्त ठेवण्यासाठी रु २०००च्या नवीन नोटांसाठी एटीएम मशीन्स ८ नोव्हेंबरच्या आधी कॅलिब्रेट करणे शक्य नव्हते. बातमी थोडीही बाहेर फुटली असती तर कारवाईमधली सगळी नाही तरी बरीचशी हवा निघून गेली असती... मुख्य म्हणजे बदमाषांनी आपला काळा पैसा इतरत्र गुंतवून अथवा अननुभवी सामान्य गरिबांच्या माथी मारून सरकारचे काम फार कठीण केले असते. त्याचसाठी पंतप्रधानांची घोषणा रात्री आठच्या सुमाराला आणि कारवाई सुरु होण्याची वेळ रात्री १२ वाजता ठेवली गेली. या चार तासात बँका बंद असल्याने बातमी कळली तरी काहीच फायदा नव्हता. बँकाचे लॉकर्सही पुढचा एक दिवस तरी उघडता येणे शक्य नव्हते. मला वाटते, या कारवाईतला हा शेवटचा घाव वर्मी बसणारा होता. केवळ आरबीआयच्या परिपत्रकाने अश्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत पोचत नाही आणि असे पत्रक सरळपणे न समजेल अश्या शासकीय व कायदेशीर भाषेत असते. वित्तमंत्रालयाच्या, आरबीआयच्या व करविभागाच्या अश्या परिपत्रकांबद्दल सीए सुद्धा संभ्रमात असतात व निर्णय देण्यापूर्वी बाबूलोकांच्या विश्लेषणाची वाट पहातात, हे आपण नेहमी पाहतोच. स्वतः पंतप्रधानांनी आदल्या रात्री टीव्हीवर बातमी सांगून लोकांमध्ये शक्य असलेले अफवांचे पीक टाळले. मला वाटते पूर्वीच्या अश्या प्रकारच्या कारवायांत टाळलेली आणि आता आवर्जून पंतप्रधानांकरवी सर्व जनतेला संबोधून माहिती देणारी ही पायरी "मास कम्युनिकेशन"ची नाडी पक्की माहीत असल्याचे लक्षण आहे. कारवाईचा त्रास होऊनही व काही नेत्यांची उसकवणारी वक्तव्ये येवूनही लोकक्षोभ न होण्याचे हे महत्वाचे कारण आहे, असे मला वाटते. इतर काही असले तरी, इतकी बंधने असलेली, इतक्या थोड्या वेळेत करायची, एवढी मोठी कारवाई भारतासारख्या आवाढव्य देशात करण्यात अपेक्षित होता त्यापेक्षा कमी गोंधळात आणि सामान्य लोकांच्या उत्तम सहकार्याने काम चालू आहे असे माध्यमांतील बातम्यांवरून दिसते आहे. असा प्रकल्प पूर्णपणे आलबेल प्रकारे होईल हे अपेक्षित नव्हतेच. ज्यांना मोठ्या प्रकल्पांची थोडीबहुतही माहिती आहे त्यांना तसा विचार शेखचिल्लीचे स्वप्न वाटेल. यासंदर्भात, सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळेस किती आठवडे/महिने तयारी केली जाते व त्यानंतरही ती निवडणूक अनेक विभागांत, दीडदोन महिन्यांच्या कालावधीत घेतली जाते, याची आठवण उपयोगी ठरेल. मुख्य म्हणजे विरोधी पक्षांनी या देशाच्या फायद्याच्या कारवाईत मदत तर केली नाहीच. पण, सुरुवातीच्या एकदोन दिवसांत, बसलेल्या धक्क्यात काय करावे हे न कळल्याने, पहिल्यांदा सरकारचे हे पाऊल बरोबर आहे असे म्हणून टाकले आणि नंतर "पण-परंतू" असे बोलत दिशाभूल करणार्‍या गोष्टी सुरू झाल्या आहेत. काहीजण लोकभावना भडकाव्या अशीच वक्तव्ये आणि कारवाया करत आहेत. काही जण तर ही पूर्ण कारवाईच मागे घ्या असे म्हणत आहेत ! हे अपेक्षित आहेच म्हणा. सरकारने यालाही तोंड देण्याची तयारी ठेवायला हवी, ठेवली असेलच. सर्वसामान्य लोक मात्र त्या वक्तव्यांनी फारसे प्रभावित न होण्याइतके प्रगल्भ झालेले पाहून एक भारतिय म्हणून आनंद व अभिमान वाटला. हा तर एका टेकडीचा टप्पा आहे, भारत पुरेसा भ्रष्टाचारमुक्त करायला अख्खा पर्वत चढून जायला लागेल. त्या वाटेत अनेक समस्या येतील, एखादी कारवाई फसेलही. कारण ७० वर्षांत काळ्या पैशाने गडगंज झालेले लोक ना निर्बुद्ध आहेत, ना ते तो पैसा सहजासहजी सोडतील. सरकारच्या कारवाया अयशस्वी व्हाव्या यासाठी ते त्यांची सर्व हुशारी व नवे-जुने हितसंबंध वापरून सर्व भले-बुरे (मुख्यतः बुरेच) मार्ग चोखाळतील, यात शंका नाही. काही सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी व गटबंधनातल्या पार्टीतल्या लोकांचे अंतर्गत हितसंबंधही गुंतलेले असतील. तो गुंताही सोडवावा लागेल. अनेक अपेक्षित आणि अनपेक्षित घटनांना सामोरे जायची तयारी ठेवावी लागेल. अशी तयारी आहे असेच संकेत सद्या तरी दिसत आहेत. आतापर्यंत या कारवाईतल्या दोन तृटी बाहेर आल्या आहेत. पहिली म्हणजे रु२००० च्या नोटेवर हिंदीत "दोन हजार रुपया" असे छापलेले आहे. दुसरे म्हणजे नोटांचा रंग पाण्यात विरघळतो व फिकट होतो आहे अश्या बातम्या आहेत. मोठ्या प्रमाणात सामग्रीची जुळवाजुळव करत असतानाच गुप्तता आणि घाई पाळायला लागयामुळे याप्रकारे नोटांची प्रत कमी होणे झाले असावे. मात्र जोपर्यंत भारत सरकार त्या नोटांना "लीगल टेंडर" मानते आहे तोपर्यंत ते केवळ "टेक्निकल एरर" असतील व त्यांचा नागरिकांवर त्याचा प्रभाव पडणार नाही. आताचा गडबड गोंधळ ताब्यात आल्यावर मात्र याबाबत पावले उचलणे अत्यावश्यक ठरेल. त्यासंबंधी एखादा प्रकल्प आरबीआय आत्ताच तयार करत नसल्यास आश्चर्य वाटेल. माझ्या अंदाजाप्रमाणे ५०० व १००० च्या पुरेश्या नोटा चलनात आल्यावर या नोटांना बँकिंग व्यवहारातून हळू हळू काढून / बदलून टाकण्याची कारवाई होईल. कारण, पहिल्यापेक्षा जास्त किंमतीच्या (पक्षी : ५०० व १००० ऐवजी २०००च्या) नोटा कारवाई गुप्त ठेवण्यासाठी व तसे करताना कारवाईचा सुरुवातीचा भार (कागद, शाई, छपाई, साठवण, वाहतूक, वितरण, इ) अर्धा करण्यासाठीच वितरीत केल्या जात आहेत. परंतु, या कारवाईसंबंधीच्या जनतेच्या प्रतिसादाने अंतीम यशाच्या आशा उंचावल्या आहेत. कारण, काळ्या पैश्याच्या निर्मुलनातली हीच एक पायरी आहे की जिच्याशी सामान्य जनतेचा तडक संबध येतो व त्याला त्रास होतो. इतर पायर्‍यांत सामान्य जनतेला फारसा त्रास असण्याची शक्यता फार कमी आहे. ही व पुढच्या पायर्‍या यशस्वी होऊन भ्रष्टाचारमुक्त झालेला भारत पहायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नसेल !
वर्गीकरण
अर्थकारण
राजकारण
देशकारण

प्रतिक्रिया द्या
133576 वाचन

💬 प्रतिसाद (637)
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/21/2016 - 18:11 नवीन
बातमी तर तशीच आहे ! माझ्या अप्लमतीप्रमाणे या मागचा उद्येश फक्त "सरकारला राज्यसभेत कोणतेही बिल मांडण्याला प्रतिबंध करणे व त्यामुळे जेवढ्या नवीन कायदे-कारवाया अडवता येतील तेवढ्या अडवाव्या" हेच आहे. जे या सरकारच्या कारकिर्दीतल्या पहिल्या चारपाच अधिवेशनांत केले होते, आणि त्यामुळे सर्व बाजूंनी टीका सुरू झाल्याने गेल्या अधिवेशनात काही बिले पास करावी लागली. आता हे नवीन कारण पुढे करून मागच्याच नाटकाचा पुढचा प्रयोग चालू आहे. सबळ मुद्दे असले तर विरोधी पक्ष सरकारने चर्चा करावी असा आग्रह धरून सरकारला अडचणीत आणतो. इथे सरकार चर्चेला तयार आहे आणि विरोधी पक्ष अ‍ॅडजर्नमेंट मोशनची मागणी करत चर्चा टाळत आहे आणि गदारोळ करून दोन्ही सदनांचे काम बंद पाडत आहे ! गम्मत म्हणजे राज्यसभेतल्या विश्वास/अविश्वास ठरावाला शून्य किंमत असते ! तो लोकसभेत मांडून सरकारचा पराभव झाला तरच सरकारला राजिनामा द्यावा लागतो. हे सर्व माहित नाही असे राज्यसभेच्या माननिय सभासदांना माहित नसेल असे समजणे कठीण आहे. यावरून काय ते ओळखा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/21/2016 - 18:47 नवीन
विरोधी पक्षाने आज लोकसभेत घोषणाबाजी करून कामकाज बंद पाडले. इतकेच काय पण नुकत्याच झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल रेल्वेमंत्र्यांना निवेदन करू दिले नाही. कालपर्यंत ज्या जनतेच्या त्रासाबद्दल आरडाओरडा चालू होता त्या जनतेच्या बद्दलच्या सहानभूतीची ही नवीन पातळी आज लोकसभेत दिसली आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ट
ट्रेड मार्क Mon, 11/21/2016 - 20:03 नवीन
राज्यसभेत आणि लोकसभेत काय चालू आहे हे जनता बघत असेलच पण त्यातून कोण किती पाण्यात आहे हे सर्वांना समजेल अशी आशा आहे. त्यामुळे जनतेचा कल कुठे आहे आणि ते आगामी विधानसभेच्या निवडणुलीत काय कौल देतात हे महत्वाचे आहे. बाकी दोन्ही सभागृहांत गोंधळ घालायचे काम राजकारणी इमाने इतबारे करत असतात. आता बऱ्याच राजकारण्यांची सांपत्तिक स्थिती खालावलेली असेल त्यावर ज्या दिवशी काम होऊ देणार नाहीत त्या दिवसाचे त्या मेम्बर्सचे मानधन कापून घ्यायचा निर्णय लवकरात लवकर व्हावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ध
धनावडे Mon, 11/21/2016 - 23:08 नवीन
फक्त जिल्हा बँकेवर बंदी आहे की सगळ्या सहकारी बँकांवर उदा. सारस्वत, अभ्युदय वैगेरे..
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Tue, 11/22/2016 - 05:27 नवीन
फक्त जिल्हा बँकेवरच. जमा झालेल्या पैशामुळे सारस्वत बँकवाले हबकले आहेत,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनावडे
श
श्रीगुरुजी Tue, 11/22/2016 - 10:29 नवीन
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गेली अनेक दशके अजितदादा, अंकुश काकडे इ. राष्ट्रवादींच्या नेत्यांच्या ताब्यात आहे. ते हबकल्यासारखे वाटत नाहीत. व्यवस्था झालेली दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
द
दिगोचि Tue, 11/22/2016 - 02:46 नवीन
The greed of Indians for money causes them to use various tricks to hoard money so that they do not have to pay tax. The tactics that I know to have been used so far include: using cash coolies (these are people who deposit money into their employer’s account), buying expensive things such as Rolex watches, buying gold at high price and then reselling it to the dealer thus increasing price of gold, renting janadhan account created by Modi, and paying airlines for overseas trips. Another trick used by a hotelier which was told by a friend who has just returned from Mumbai is as follows: a family goes to the hotel for a meal and say the bill comes to say Rupees 1800 when two thousand Rupee not is presented to settle the bill the hotelier says sorry Sir but I do not have change because I am out of 100 Rupee notes. Thus he pockets this 200 Rupees when the bill shows 1800. I am sure all the public servants and police are busy devising tricks like this to amass black money. I do not know what Modi can do to stop this malpractice.
  • Log in or register to post comments
द
दिगोचि Tue, 11/22/2016 - 02:46 नवीन
The greed of Indians for money causes them to use various tricks to hoard money so that they do not have to pay tax. The tactics that I know to have been used so far include: using cash coolies (these are people who deposit money into their employer’s account), buying expensive things such as Rolex watches, buying gold at high price and then reselling it to the dealer thus increasing price of gold, renting janadhan account created by Modi, and paying airlines for overseas trips. Another trick used by a hotelier which was told by a friend who has just returned from Mumbai is as follows: a family goes to the hotel for a meal and say the bill comes to say Rupees 1800 when two thousand Rupee not is presented to settle the bill the hotelier says sorry Sir but I do not have change because I am out of 100 Rupee notes. Thus he pockets this 200 Rupees when the bill shows 1800. I am sure all the public servants and police are busy devising tricks like this to amass black money. I do not know what Modi can do to stop this malpractice.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 11/23/2016 - 08:06 नवीन
Demonetisation " Slew of steps to push digital transactions, help farmers इकॉनॉमिक अफेअर्स सेक्रेटरी, शशिकांत दास यांनी काही नवीन सोईसचलती जाहीर केल्या आहेत. त्यातील काही मह्त्वाचे मुद्दे असे... १. नाबार्डला कोऑप बँकांना रु२१००० कोटीची देणे मंजूर करण्यास सांगितले. यामुळे शेतकर्‍यांना व शेतीविषयक बाबींना कर्जे मिळणे सोपे होईल. २. १.५ लाख पोस्टऑफिसांमध्ये नवीन नोटा उपलब्ध. ३. e-walletची सीमा दुप्पट ४. पैश्यांच्या बहुतेक इलेक्ट्रॉनिक व्यवहारांवरचे सेवाशुल्क ३१ डिसेंबरपर्यंत रद्द. इलेक्ट्रॉनिक व्यवहार मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यास ते कायमचे रद्द होण्याचीही शक्यता. ५. रेल्वेच्या ऑनलाईन बुकिंगवरचे सेवाशुल्क ३१ डिसेंबरपर्यंत रद्द. ६. TRAI ने डिजिटल ट्रांसफरवरचे सेवाशुल्क रु१.५० वरून रु०.५० इतके कमी केले आहे आणि फोन कंपन्या हा रु०.५० चा भार उअचलणार असल्याने ग्राहकासाठी सर्व रु१.५० सेवाशुल्क ३१ डिसेंबरपर्यंत माफ झाले आहे. ७. कालपर्यंत ८२०० एटीएम्स रिकॅलिब्रेट झाली आहेत. इतर काम जोरात चालू आहे. ८. Unified Payment Interface mobile phone application (app) च्या पायलट प्रोग्रॅममध्ये २० बँकाचा सहभाग झाला आहे, नंतर यात अजून वाढ होत राहील. या अ‍ॅपने रु ५०,००० पर्यंतचे पैश्याचे व्यवहार त्वरीत (रियल टाईम) करता येतात. या अ‍ॅपबद्दल तपशीलवार माहिती आपले मिपाकर निनाद यांनी एकात्मिक भरणा पद्धती या शीर्षकाखाली इथे दिलेली आहेच. ९. ECF-compliant RFID प्रणाली बसवलेल्या चारचाकींचा टोल एलेक्ट्रॉनिकली गोळा होण्याच्या दृष्टीने पावले उअचलली जात आहेत. याने टोल देण्यास चारचाकींना रांगेत उभे रहावे लागणार नाही. १०. भविष्यात सर्व सरकारी संस्था फक्त डिजिटल पद्धतींनीच शुल्क स्विकारतील. ११. सर्व सरकारी बँकांमध्ये डेबिट व इतर कार्डांची मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागली आहे. ज्यांना जरूर/अथवा शक्य असेल त्यांनी या माहितीचा फायदा करून घ्यावा व तशी शक्यता असणार्‍या इतरांनाही ही माहिती जरूर द्यावी.
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 11/24/2016 - 02:36 नवीन
सरकारी स्तरावर इतक्या वेगाने हालचाली होतात आणि जनतेची सोय पाहून लगेच इतके मोठे निर्णय पण होतात किंवा बदलता हे मोठे आश्चर्यकारक पण आनंददायी आहे! उदा. TRAI ने डिजिटल ट्रांसफरवरचे सेवाशुल्क रु१.५० वरून रु०.५० इतके कमी केले आहे आणि फोन कंपन्या हा रु०.५० चा भार उअचलणार सगळ्या कंपन्यांना एक्त्र आणून त्यांचा निर्णय ही होणे हे ग्रेट आहे. इथे एक हापिस मिटिंग घ्यायची म्हंटली तर पन्नास लोक म्हणतात वेळ नाही! :) इथे तर एक नाही, अनेक खाती वेगाने आणि कार्यक्षमतेने निर्णय घेत आहेत. ही अ‍ॅजिलिटी, चपळाई आश्चर्यकारक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 11/24/2016 - 09:30 नवीन
बर्‍याच सरकारी खात्यांत बरीच कामे होत आहेत. ब्युरोक्रॅट्स वेळेवर कामावर येत आहेत, उशीरा घरी जात आहेत कारण मंत्री वेळेवर ऑफिसमध्ये येत आहेत आणि उशीरापर्यंत काम करत थांबत आहेत :) यातल्या बर्‍याच पायाभूत व दूरगामी गोष्टी तडक लोकाभिमूख नसल्याने त्यांचे परिणाम जनतेपर्यंत पोचून त्यांचे व्यवहारातले फायदे दिसायला वेळ लागणारच. यातल्या रेल्वेच्या बाबतीतले फरक तडक लोकाभिमूख असल्याने दिसत आहेतच... इतरही दिसतील हळू हळू... लोक आपली जबाबदारी पाळायला शिकले/लागले तर जरा लवकर दिसतील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद
म
मराठी कथालेखक Wed, 11/23/2016 - 09:33 नवीन
दहशतवद्याकडे दोन हजारांच्या नवीन नोटा सापडल्या
  • Log in or register to post comments
न
नावातकायआहे गुरुवार, 11/24/2016 - 03:58 नवीन
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=UBLBNy
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 11/24/2016 - 09:48 नवीन
पाचशे व हजारच्या नोटा बंद झाल्यानंतर जन धन बॅंक खात्यांमधील भरण्यात मोठी वाढ होऊन ती 21 हजार कोटी रुपयांवर पोचली आहे. यात पश्‍चिम बंगालचा प्रथम क्रमाक असून, कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. या प्रकारात पश्चिम बंगाल प्रथम क्रमांकावर आहे आणि ममता बॅनर्जी नोटा रद्द कारवाई मागे घ्या यासाठी हट्ट करत आहेत; यांचा काही संबंध असावा काय ? कालच्या टाईम्स नाऊच्या न्यूजअवरमध्ये गरीब जनतेला होणार्‍या त्रासासाठी नक्राश्रू ढाळणार्‍या तृणमूलच्या डेरेक ओब्रायनला जेव्हा, शारदा स्कॅमबद्दल (जिच्यात काही लाख गरीब लोकांचे पैसे बुडाले होते) काय कारवाई केली असा प्रश्न विचारला गेला तेव्हा, त्याचा चेहरा आणि प्रतिक्रिया बघण्याजोगी होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे
च
चौकटराजा गुरुवार, 11/24/2016 - 05:52 नवीन
मी नुकताच राजस्थान व म. प्र चा दौरा करून आलो. मोदींच्या या निर्णयावर सामान्यलोक प्रचंड आशावादी आहेत असे चित्र आहे. टूरिझम मधे कोणतीही गैरसोय वा मंदी आलेली नाही. सरकारने वीस च्या नोटा मोठ्या प्रमाणात वितरित करायला सुरूवात केली आहे. असे दिसतेय. मोदीपेक्षा माझाच डोळा "जनधन" खात्यांवर जास्त आहे. गरीबी साळसुदीचा भाव आणून आर्थिक गुंडांची मद्त करणारे देखील गजाआड गेले पाहिजेत. अशा लोकानीच मुंबई व काश्मीर येथे दहशतवाद्याना मदत केली आहे. या लायनींमधे कोणते लोक जास्त उभे होते हे आपण पाहिले आहेच. मला वाटतेय "जनधन" हा सापळा मोदीनी फार कल्पकपणे वापरला आहे. ज्या काही केसेस विरोधी पक्ष दाखवीत आहेत त्या वैयक्तिक आहेत. त्या प्रातिनिधिक नाहीत. एरवी घरतला नातेवाईक वारला तर विवाह हे रद्द होत असतातच व उन्हामधे नातवाच्या प्रवेशासाठी उभे असलेले आजोबाही हार्ट अटॅक ने मरू शकतात. मरण व माणसाचे हेतू यांचा काय संबंध ?
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 11/24/2016 - 09:15 नवीन
आह दोन राष्रीयीकृत बॅन्कात जाण्याची वेळ आली. दोन्ही वेळेस व्यवस्थापकाच्या केबिन मधे बसणे झाले. ३० डिसेम्बर पर्यंत काही व्यवस्थापक मानसिक ताणाने मरण्याची देखील शक्यता मला वाटतेय. खाजगी रुग्णालयानी लोकांची पंचाईत केली आहे असे दिसते. इथे चेक घेत नाहीत असे असावे. काही लोक इतके येडचाप आहेत की त्याना कार्ड स्वाईप करायला भिती वाटतेय. ( मी ही परवा परवा पर्यंत या लाईनीत होतोच).लोकाना ज्याअर्थी २५०००० लगनासाठी हवेत यात उधारीने का व्यवहार होत नाही ? हे कळत नाही. वा चेकने कार्डाने पेमेंट का नाही. कारण मॅनेजर ने ज्या लगनपत्रिका दाखविल्या त्या इतक्या भारी होत्या की त्या नवर्‍याकडे कार्ड॑ नसावे हे पटत नाही. भारतात हरेकाचे गुन्हेगारीकरण झाले आहे काय अशी शंका येउ लागली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
स
संदीप डांगे गुरुवार, 11/24/2016 - 07:19 नवीन
गुजरातमधल्या एका कॅशलेस गावाचा विडियो व बातमी सध्या माध्यमांतून फिरत आहे. त्याबद्दल ह्या बातम्या. दुवा १ दुवा २ दुवा ३ तीनही मुळातून वाचाव्या.
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 11/24/2016 - 11:52 नवीन
आणखी एक मृत्यू :-( रांग हि एक व्यवस्था म्हणून शेकडो वर्षांपासून चालू आलेली आहे. तिचे फायदे अनेक असले तरी ती सर्व लोकांना समान संधी देत नाही. जसे वृद्ध, आजारी लोक रांगेत फार काळ उभे राहू शकत नाहीत. शिवाय आजकाल बँकेत लागणाऱ्या रांगा या बँकेच्या बाहेर वेगळ्या आणि फाटक उघडल्यावर वेगळ्या अश्या लागतात. फाटक उघडल्यावर सगळे पळत काउंटर च्या पुढे रांगा लावतात. वृद्ध, बायका सुद्धा धावत पळत रांग गाठतात. 4 5 तास हा सरासरी वेळ जातो. तेव्हा असे दुर्दैवी मृत्यू टाळण्यासाठी काय करता येईल? रांग हि system कशी सुधारता येईल. इतके मृत्यू होणं हे आपल्या व्यवस्थेचं अपयश आहे का? अजून किती दिवस असं चालू राहील?
  • Log in or register to post comments
स
स न वि वि गुरुवार, 11/24/2016 - 12:19 नवीन
आता म्हणे घरांच्या किमती खाली उतरणार म्हणे? किती शक्यता आहे त्याची? आणि असेल तर कधी पर्यंत होऊ शकेल? काही अंदाजा? कुणाला ह्याचा काही नमुना दिसण्यात आलाय का?
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 11/25/2016 - 04:45 नवीन
गेल्या पंधरा दिवसातल्या घडामोडीनुसार प्रॉपर्टी सेक्टर वर फारसा फरक पडणार नाही असे दिसते, छोटी व मध्यम किमतीची घरे यांचे भाव स्थिर राहतील, झालाच तर (ज्याची शक्यता 10 टक्के आहे) अगदी 5 टक्के बदल होईल पण तो फार मोठा बदल नव्हे. कारण इथे ब्लॅक मनी चे व्यवहार फार कमी प्रमाणात होतात, थेट बँकेकडून लोन घेऊन घरे घेतली जातात. व इथली मागणी हि राहण्यासाठी घरे या गरजेवर टिकून आहे व हि मागणी कमी होण्याची चिन्हे नजीकच्या भविष्यात दिसत नाहीत, ज्यांची अशी घरे आहेत त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये व अफवांना भुलू नये. किमान पाच वर्षे आपली घरे तातडीची गरज असल्याशिवाय विकू नये. एक कोटींपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांच्या किंमतीत मात्र 25 ते 35 टक्के करेक्शन येण्याची शक्यता या क्षेत्रातल्या अनेक तज्ञांनी व्यक्त केली आहे. अशी बहुतांश घरे गुंतवणूक व काळा पैसा जीरावण्याचं साधन म्हणून घेतली जातात,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स न वि वि
न
निओ१ Sun, 11/27/2016 - 13:33 नवीन
" कारण इथे ब्लॅक मनी चे व्यवहार फार कमी प्रमाणात होतात, थेट बँकेकडून लोन घेऊन घरे घेतली जातात" ही माहिती तुमची चूकीची आहे. सर्वात जास्त ब्लॅक मनी चे व्यवहार हे घर खरेदी मध्ये होतात, अगदी १०-२०% च्या आसपास देखील होतात. तुम्ही तुमच्या ओळखीच्या बिल्डरला विचारून पहा, तो ८ तारखे आधी अगदी ५०% पण रोख रक्क्म घेण्यासाठी तयार होत असेल. आता थोडी गोच्ची झाली आहे, पण काही महिन्यात ते वेगळा मार्ग शोधतील देखील. पण ज्या प्रकारे प्रत्येक ट्रान्जक्शनचा सरकार हिशोब ठेऊ पाहत आहे त्या सिस्टममध्ये ते जरा अवघड होईल अशी अपेक्शा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 11/27/2016 - 14:57 नवीन
याचा अर्थ असा होतो की घरांच्या किमती सरसकट 30 टक्के लगेच कोसळल्या पाहिजे होत्या, तसे झाल्याची माहिती तुम्हाला उपलब्ध असेल तर जरूर द्यावी, माझे मत बदलून घेईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निओ१
अ
अनुप ढेरे गुरुवार, 11/24/2016 - 16:22 नवीन
ही मुलाखत छान आहे. एस. गुरुमूर्थी हे संघ परिवाराशी निगडीत आहेत. (ट्रिविआ: गुरू सिनेमातला आर माधवन = एस. गुरुमुर्थी)
  • Log in or register to post comments
प
पुंबा गुरुवार, 11/24/2016 - 17:02 नवीन
मुलाखत भारी आहे. गुरुमुर्ती विश्वासार्ह वाटतात. उजव्या वर्तुळातील अतिशय कमी विचारवंतातील एक आहेत. त्यांचं analysis पटनेबल आहे. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मधील भ्रष्टाचार बघुन आपण इन्कम टॅक्स प्रॅक्टिस सोडली असे ते सांगतात म्हणजे त्या खात्यावर पण डोळे झाकून विश्वास ठेवावा अशी परिस्थिती नाही..:-(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे गुरुवार, 11/24/2016 - 17:24 नवीन
उजव्या वर्तुळातील अतिशय कमी विचारवंतातील एक आहेत.
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
प
पुंबा गुरुवार, 11/24/2016 - 17:04 नवीन
त्यांचं भाषण प्रत्यक्ष ऐकायला मिळालं होतं. अरुण फिरोदिया आणि त्यांची जुगलबंदी जब्री झालेली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
प
पुंबा गुरुवार, 11/24/2016 - 19:58 नवीन
बँकेत जमा झालेल्या ठेवींवर दट्ट्या..
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 11/25/2016 - 10:13 नवीन
२.५ लाखापेक्षा जास्त जमा केलेल्या रकमेच्या बाबतीत, जर खातेधारक त्या उत्पन्नाचा योग्य स्त्रोत दाकह्वू शकला नाही किंवा ते करापासून लपवलेले उत्पन्न आहे असे सिद्ध झाले तर, सद्य कायद्याप्रमाणे, त्यावर (कर + करावर २००% दंड) अशी कारवाई सरकार करू शकते. दुसर्‍याचे काळे पैसे आपल्या खात्यात स्विकारून नको ते बालंट ओढवून घेऊ नये यासाठी सरकार/आरबीआय फार पूर्वीपासून इशारे देत आहेच. आता अश्या बेकायदेशीर कृती करणार्‍या खातेदारांना कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागेलच, पण त्यांच्यातर्फे करविभागाला खर्‍या काळाबाजार्‍यांपर्यंत पोहोचायला मदत होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुंबा
श
श्रीगुरुजी Sat, 11/26/2016 - 04:07 नवीन
नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे अन्नपदार्थांचे भाव कोसळले असून शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत आहे, सर्वसामान्य कष्टकरी वर्गावर बेकारीची कुर्‍हाड कोसळली, जीडीपी वर वाईट परीणाम होत आहे, रब्बी पिकांची पेरणी खोळंबली आहे .... अशा अनेक आक्षेपांना उत्तर देणारा इंडियन एक्सप्रेस मधील सुरजित भल्ला यांचा लेख - http://indianexpress.com/article/opinion/columns/demonetisations-short-term-cost-4395435/ अर्थात सुरजित भल्ला यांना भक्त, आंधळा समर्थक समजले गेले तर प्रश्नच मिटला.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 11/26/2016 - 07:01 नवीन
बर्याच शहरात परिस्थीती आटोक्यात आलेली आहे. गुरुमिर्तीनी दिलेल्या सल्ल्या प्रमाणे सरकारी नोकरांना पगार कॅश मध्ये केला जात आहे. त्यामुळे कॅश मार्केटमध्ये इंजेक्ट होईल,
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sat, 11/26/2016 - 07:13 नवीन
गुरुमुर्तीम्नी दिलेल्या सल्ल्या प्रमाणे ४ जणांच्या फॅमिलीत २.५ लाख प्रत्येकी प्रमाणे १० लाख बँकेत डिपॉझीट करु शकतील .
  • Log in or register to post comments
प
पुंबा Sat, 11/26/2016 - 07:39 नवीन
मी किनई लै शाना नोबेलवाला
  • Log in or register to post comments
प
पिजा Sat, 11/26/2016 - 07:50 नवीन
पुणे: मोस्टली कॅशलेस व्यवहार करत असल्यामुळे अजूनतरी फारसा त्रास नाही. घरासमोरच SBI ATM असल्यामुळे आणि कधी नाही ते त्यात वेळोवेळी पैसे लोड होत राहिल्यामुळे ऐकून ४ हजार काढल्येत. रांगेतला एकूण वेळ १ तास. लोकही शांतपणे रांगेत उभे होते. त्यामुळे लोकांचा सपोर्ट दिसतोच आहे. आता गावाकडची परिस्थिती(मराठवाड्यतातलं तालुक्याचं ठिकाण): तीन nationalized बँका. तीन ATM . दिवाळीच्या ४ दिवसात हे तीनही ATM बंद होते. आजूबाजूच्या दोन तालुक्याच्या ठिकाणची हीच परिस्थिती. ह्यावरून आताची कल्पना करता यावी. ८ तारखेनंतर मार्केट कमिटीत सोयाबीन/कापसाचे व्यवहार बंद. व्यापारर्यांकडे कॅश नाही(आठवड्याला काही हजाराची लिमिट, ती तर नुसत्या उचल देण्यातच जाईल) अन शेतकरी cheque घ्यायला तयार नाहीत. इतरत्र हजाराचे ८०० मात्र करून मिळत होते. बहुदा पुढच्या आठवड्यात नगरपालिकेचे election झाल्यावर सुरु होतील असा अंदाज. नगरपालिकेच्या निवडणुका सुरु आहेत, त्याचा लेटेस्ट अपडेट : प्रत्येक वॉर्डात १५ लाखाचा खर्च, प्रभागात ५० (२ ते ३ हजाराचा रेट).तर ह्यांच्याकडे पैसे आले कुठून? ज्याला manage करायला जमलंय तो नव्या २ हजाराच्या वाटतोय, बाकीच्ये हजार, पाचशेच्या जुन्या वाटतायत. हे बघितल्यावर काळ्या पैश्याचं काही होईल असं वाटत नाही. पुढे बघूया काय होतंय, पुण्यात महापालिकेच्या अन आमच्याकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेतच. ह्यावरून एकच दिसतंय, नितीश कुमारांनी म्हटल्याप्रमाणे मोदी वाघावर बसयेत, त्यांना आता आपल्याला ह्या कडीचं त्या कडीला नेल्याशिवाय गत्यंतर नाही.
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Sat, 11/26/2016 - 16:16 नवीन
हे खरे असेल तर मात्र प्रकरण गंभीर आहे.... खोटे असेल तर बरेच आहे.. खरे असेल तर किती जणांना माहीत होते ही विचार करण्यासारखी गोस्ट असेल. खोटे असेल तर बरेच आहे... http://currentnews.in/bjp-knew-demonetizing-deposited-huge-amounts-banks-cpm-sena-warns-modi-peoples-anger/ If Mr. Dubey knew this, question is how many more knew this... Though the Centre has claimed that the decision to demonetise Rs 500 and Rs 1,000 notes were known only to a handful of people, the story was broken by a Kanpur-based Hindi journalist almost a fortnight before the dramatic late evening announcement by the Prime Minister. Brajesh Dubey of the Hindi daily Dainik Jagran is gleefully accepting congratulatory telephone calls and envious looks from his peers for his story of October 27 that also confidently reported that Rs 2,000 notes would be issued as a replacement. Talking over the phone, Dubey, who is on the business beat for the Hindi daily, did not reveal his source for the story citing the “ethics of journalism”, but said it came from “informed and long-standing sources”. It was done routinely, he said and did not draw attention even from colleagues, forget readers, until the November 8 “surgical strike” on black money — an event that was so “top secret” that ministers were reportedly “quarantined” after the cabinet meeting where they were informed of the decision. Dubey is happy now that the story has not only been confirmed by subsequent developments but also that his byline has been noticed by the fraternity everywhere. “It is a normal yet a good feeling to have filed a story which subsequently was confirmed by the announcement of the Prime Minister,” he said. Sources in the newspaper, however, contended that Dubey got a whiff of the coming event on the sidelines of the board meeting of the Reserve Bank of India (RBI) — the first under new Governor Urjit Patel — which was held on October 20 in Kanpur. Opposition parties have been accusing the ruling Bharatiya Janata Party (BJP) of having leaked news of the impending demonetisation to those close to it.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 11/26/2016 - 19:23 नवीन
2000 हजाराची नोट येणार हे खरंच बरेच दिवस आधीपासून माहित होते माध्यमात.. खरेतर आरबीआय ने याचे सूतोवाच खूप आधीच रघुराम राजन असताना केले होते,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 11/26/2016 - 16:32 नवीन
Demonetisation will accelerate digitisation of the financial economy: Nandan Nilekani
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 11/27/2016 - 09:46 नवीन
आता फक्त हेच सांगायचे शिल्लक होते. ______________________________________________________ नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशात सध्या चलन कलह सुरु आहे. विरोधकांनी सभागृहात मोदी सरकारला धारेवर धरले असताना आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य कपिल सिब्बल यांनी नोटाबंदीच्या निर्णयाला मुस्लिमांशी जोडत सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारच्या नोटबंदी निर्णयाचा सर्वात जास्त त्रास हा मुस्लिमांना होत असल्याचे वक्तव्य सिब्बल यांनी लखनऊमध्ये केले. मी दिल्लीच्या चांदनी चौक परिसरात राहतो आणि तेथे मुस्लिमांची संख्या जास्त आहे, मी मुस्लिमांशी जोडला गेलो असल्याने मला याबाबत माहिती आहे असे सिब्बल म्हणाले. बहुतांश मुस्लिमांचे बँकेत खाते नसल्यामुळे सरकारच्या नोटाबंदीमुळे या समाजावर सर्वात मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शनिवारी लखनऊमध्ये अल्पसंख्यांकांच्या बैठकीला संबोधित करताना सिब्बल यांनी नोटाबंदीच्या निर्णय हा मुस्लिमांशी जोडल्याचे वृत्त ‘आजतक’ने दिले आहे. मुस्लीम समुदायातील छोटा किंवा मोठा व्यापारी व्याज मिळविण्याच्या हेतूने कमवत नसल्यामुळे तो बँकेत खाते उघडत नसल्याचे सिब्बल यांनी म्हटले आहे. दहशतवाद्यांचा पैशाशी काहीही संबंध नसतो, असे सांगत या निर्णयामुळे दहशतवादाला आळा घालण्यास कोणतीही मदत होणार नाही, असेही सिब्बल म्हणाले. तसेच सरकारने घेतलेल्या नोटबंदीमुळे गरिबांनाही कोणताच फायदा होणार नाही त्यामुळे नोटाबंदीचा निर्णय म्हणजे सरकारने उचलले घातक पाऊल अाहे, असे ते म्हणाले. http://www.loksatta.com/desh-videsh-news/muslims-are-facing-more-problem-due-to-demonetization-says-kapil-sibal-1348950/
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/28/2016 - 13:15 नवीन
पुढच्या पायर्‍या... मागच्या जनधन योजना, करचुकव्यांना माफीयोजना, इत्यादींनंतर आलेल्या डिमॉनेटायझेशन या पायरीनंतर तिच्यातून मिळणारे धागेदोरे पकडून अर्थगुन्हेगारांना कसे पकडले जाईल या पुढच्या पायर्‍यांचे संकेत येऊ लागले आहेत... १. करविभागाने २.५ लाखापेक्षा जास्त रोख रक्कम खात्यात जमा केलेल्यांना नोटीसा पाठवणे सुरू केले आहे. आजतागायत काही लाख नोटीसा लोकांपर्यंय पोचल्या आहेत. यात पांढरा पैसा असलेले लोक त्याचा पुरावा देवून मोकळे होतील. ज्यांच्याकडे तसा पुरावा नाही त्यांना (अ) कर+दंड भरावा लागेल आणि/किंवा (आ) दुसर्‍या करता आपले खाते मजूरीने दिले असल्यास त्या दुसर्‍या मोठ्या चोराचे नाव द्यावे लागेल... याने मोठे मासे आपोआप सबळ पुराव्यासह गळाला लागतील. २. बँकांत बसवलेल्या सीसीटीव्हीच्या रेकॉर्डची तपासणी, बँकेचे ट्रांझॅक्शन रेकॉर्ड व इतर प्रकारे मिळालेल्या माहितीवरून (आयकर इंटेलिजन्स) बँकेत केलेल्या "घोळदार व्यवहार" उघडकीसा आणले जावू लागले आहे. त्यातली ही एक बातमी... I-T cell finds Rs 40 crore deposit in banned notes at Delhi bank अश्या एका बँक मॅनेजरला पकडले की त्याच्याकडून बर्‍याच संखेने लहानमोठे "गंदे मासे" गळाला लागतील. ३. जुन्या नोटा घेऊन सोने विकणार्‍या सोनारांवर तर पहिल्यापासून डोळा आहेच ! अजून बरीच हुकुमाची पाने हळू हळू उघड होतील असे दिसते आहे. हा चोर पोलिसांचा खेळ काळाबाजरवाल्यांनी तो खूप काळापूर्वी सुरू केला आणि आता तो सरकारने आपल्या अटींवर संपवावा (पक्षी : तो नगण्य करण्याइतपत ताब्यात आणावा) ही अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Mon, 11/28/2016 - 19:53 नवीन
डॉ म्हात्रे अचुक बोललात !! पंतप्रधानांनी ह्या सर्वांची सुरुवात केलेली आहे. नोटाबंदीची सुरुवात करताना गोपनियता राखणे महत्वाचे होतेच कारण आपल्या ईथे कुंपण शेत जास्त खाते. बँकेतले लोक, शासकीय खात्यातले लोक सरकारच्या नाका खालीच गैर प्रकार करतात, सरकारच्या ह्या बोल्ड मुव्ह मुळे सामान्य नागरीकांत एक जोश आलेला आहे, बर्याच ठिकाणी ५००/१००० च्या नोटाबद्दल गैरप्रकार सुरु आहेत अशी माहीती / टिप ही सामान्य जनतेनेच पुढे येऊन दिलेली आहे. आता सुद्धा जनतेने जागरुक राहुन अश्या संभावित प्रकाराची माहिती असल्यास सरकारच्या निदर्शनास आणावी.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 11/28/2016 - 20:30 नवीन
29 तारखेपासून खात्यातून रक्कम काढण्याची मर्यादा पूर्णपणे शिथिल करण्यात आली आहे. आता पाहिजे तितकी रक्कम खातेधारक काढू शकतील. https://m.rbi.org.in/Scripts/NotificationUser.aspx?Id=10752&Mode=0
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 11/29/2016 - 18:50 नवीन
फक्त नवीन किंवा चालू नोटांमध्ये केलेले डिपॉजीट्स असतील तर काढण्यासाठी लिमिट नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 11/29/2016 - 18:04 नवीन
नोटाबंदी कारवाईचे अधिकाधिक परीणाम पुढे येत आहेत... १. Demonetisation leads to highest ever surrender of Maoists in a month नोटाबंदीनंतर आतापर्यंत ४६९ माओवादी किंवा त्यांचे पाठिराखांनी समर्पण केले आहे. यामागे त्यांच्या शस्तास्त्रे, दारूगोळा, औषधे आणि इतर सामुग्री मिळविण्यासाठी मिळणारा पैसा बंद झाला आहे हे महत्वाचे कारण आहे. त्याशिवाय, त्यांच्या स्थानिक भागांत होत असलेला विकासही या समर्पणामागे आहे. २. बँकात रु५०० व रु१००० च्या जुन्या नोटाम्च्या स्वरूपात जवळ जवळ रु८.५ लाख कोटी (नोटा खात्यात टाकणे : रु८,११,०३३ कोटी + नोटा बदल : रु३३,९४८ कोटी) जमा झाले आहेत व रु२,१६,६१७ कोटी नकद चेक किंवा एटीएमने काढली गेली आहे. म्हणजे, पूर्वीपेक्षा रु६ लाख कोटीपेक्षा जास्त पैसे बँकिंग व्यवस्थेत खेळू लागले आहेत. ३. यापुढे जुन्या नोटा फक्त आरबीआयच्या तडक देखरेखीखाली असलेल्या ठिकाणांवरच स्विकारत असलेल्याने त्या नोटा काळाबाजार्‍यांना काळा पैसा पांढरा करण्यासाठी वापरणे कठीण असल्याने, बँकांतून पैसे बाहेर काढण्यावरच्या सीमा उठवलेल्या आहेत.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 11/29/2016 - 18:40 नवीन
४. सशस्त्र सीमा बलाने झारखंडमधिल नक्षल अतिरेक्यांकडील, जुन्या नोटांच्या स्वरूपातले, रु३१ लाख पकडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मोदक Tue, 11/29/2016 - 18:54 नवीन
BSF..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 11/30/2016 - 11:09 नवीन
फरक आहे... भारतीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत एकून पाच सशस्त्र पोलिस दले आहेत. त्यांना एकत्रितपणे "केंद्रिय सशस्त्र पोलीस बल उर्फ Central Armed Police Forces (CAPF)" असे म्हटले जाते. सीमा सुरक्षा बल उर्फ Border Security Force (BSF) : हे दल मुख्यतः शांतता काळात (युद्ध जाहीर केलेले नसताना) भारताच्या सीमेची व 'लाईन ऑफ कंट्रोल'चे रक्षण व तेथिल अवैध आंतरराष्ट्रीय माल वाहतूक (तस्करी) थांबवणे, ही कामे करते. हे बल भारताच्या सीमेवरची "फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स" आहे आणि जगातले सर्वात मोठे सीमा सुरक्षा दल आहे. सशस्त्र सीमा बल उर्फ Sashastra Seema Bal (SSB) : हे दल भारत-नेपाळ सीमेचे रक्षण आणि तेथिल अवैध माल वाहतूक (तस्करी) थांबवणे, ही कामे करते. केंद्रिय राखीव पोलिस दल उर्फ Central Reserve Police Force (CRPF) : या दलाचे मुख्य काम देशांतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यास केंद्र व राज्यसरकारांना मदत करणे हे आहे. याच्यात The Rapid Action Force (RAF) व Commando Battalion for Resolute Action (COBRA) हे विभागही सामील आहेत. केंद्रिय औद्योगिक सुरक्षा बल उर्फ Central Industrial Security Force (CISF) : हे दल भारतीय औद्योगीक व व्यापारी महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेचे काम करते. हे दल विमानतळांच्या सुरक्षेचे काम करताना बहुतेकांनी पाहिले असेलच. जरूर पडल्यास, हे दल आपत्तीकालातील मदतीसाठी (डिझास्टर मॅनेजमेंट) आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य पोलिस दलाची मदत करण्यास पाचारण केले जाते. भारत-तिब्बत सीमा पुलिस बल उर्फ Indo-Tibetan Border Police (ITBP) : १९६२च्या भारत-चीन युद्धानंतर, भारत-चीन (मुख्यतः चीनचा तिबेट प्रांत) सीमेचे रक्षण करण्यासाठी हे दल उभारले गेले. या दलाला नैसर्गिक आपत्तीकालात काम करण्याचे व त्यातल्या काही तुकड्यांना न्युक्लिअर, बायॉलॉजिकल व केमिकल आपत्तीकालात काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Wed, 11/30/2016 - 11:28 नवीन
धन्यवाद.. SSB बद्दल माहिती नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
न
निनाद Wed, 11/30/2016 - 22:22 नवीन
महत्त्वाची माहिती आहे. कृपया मराठी विकि मध्ये डकवण्यास परवानगी देता येईल का? किंवा तुम्हीच लावली तर अतिशय उत्तम! हा दुवा आहे. https://mr.wikipedia.org/wiki/पोलीस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 11/30/2016 - 22:25 नवीन
जरूर डकवा. तुम्हीच करा हे काम, कारण मला त्याचा अनुभव नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/01/2016 - 16:18 नवीन
मात्र ते काम करताना "राज्य पोलिस दल (जे राज्य गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असते)" आणि "केंद्रिय पोलिस दले (जी केंद्रिय राज्यमंत्रालयाच्या अखत्यारीत असतात)" यांच्यातला फरक स्पष्ट होईल असे पहा. म्हणजे वाचकांच्या मनात या दोन स्वतंत्र व्यवस्थांबद्दल गोंधळ होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
च
चौकटराजा Wed, 11/30/2016 - 10:02 नवीन
मी आज अशा मेडिकल शॉपच्या शोधात गेलो जिथे स्वाईप आहे. दोघा तिघा कडे नव्हते. त्याना सांगितले बघा आपल्याकडे सोय नसल्याने दुसरीकडे जातोय. कार्डावर औषधे मिळाली.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा