उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-bandh-may-bring-privilege-motion-over-mp-ravindra-gaikwad-on-no-fly-list/story-5aYaUj9cwxRup9US7FiteL.html)
माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.
मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
शिवाय मिपासारखा प्लॅटफॉर्म हाताशी मिळाला म्हणजे काहीही मनाला येईल ते आक्षेपार्ह भाषेत लिहिण्याचा अधिकार लोकांना प्राप्त होत नाही!हेच आणि असेच लोकांना नोटाबंदी झाल्यापासून सांगत आहे, पण पटतच नाही. बिन्धास्त खोटी माहिती देतात, चुकीच्या लॉजिकचे ट्रक फिरवतात, यांवर आपण उत्तरे दिली की मिपाकरांवर निखालस खोटी टीका करायची आणि ते ही उलटले की पळ काढणे आणि सोयीस्कर निवृत्ती स्वीकारणे आहेच.गायकवाड शांतपणे बोलत असताना सुकुमार यांच्याकडून काहीतरी वाक्य गेल्याचे ती हवाई सुंदरी म्हणते आहे.हवाईसुंदरीची कहाणी फक्त लोकसत्ता व मटाच्या आंतरजाल आवृत्तीतच आहे. लोकसत्ताच्या छापील आवृत्तीत याचा उल्लेख नाही (मटाची छापील आवृत्ती वाचलेली नाही). मटा व लोकसत्ताचे शिवसेनाप्रेम सर्वश्रुत आहे. इतर वृत्तसंस्थांनी याची दखल घेतलेली नाही. दोन्ही ठिकाणी दिलेल्या बातमीत तफावत आहे. लोकसत्ताच्या बातमीत म्हटले आहे की गायकवाडांनी फक सँडल काढली होती. परंतु मटाच्या बातमीत म्हटले आहे की त्यांनी कर्मचार्याला सँडलने मारहाण करून विमानाच्या शिडीवरून ढकलून दिले होते. दोन्ही बातम्यात हवाईसुंदरीची ओळख लपविण्यात आली आहे. या प्रकरणात ओळख लपविण्याची अजिबात गरज नव्हती. तरीसुद्धा ओळख लपविण्यामागचा हेतू समजत नाही.ते चंद्रकांत पाटील (भाजप) म्हणत आहेत की नारायण राणे हे सर्वांना हवेहवेसे व्यक्तिमत्व आहे.काहीही.. भाजपाला राजकीय आत्महत्या करायची इतकी घाई का करत आहेत ते कळत नाहीभाजप नारायण राणेंसारखा झगा स्वतःच्या गळ्यात बांधून घेईल असे वाटत नाही.मुंडेंना हलवतील असेही वाटले नव्हते.